Translate in Hindi / Marathi / English

Sunday, 7 July 2024

जेवणाचा राजा पापड | शाकाहारी पदार्थांसोबत पापड | पापड स्वादासाठी खायचे असतील तेव्हा तुम्ही ते तळून खावू शकता | ज्यांचे पापड चवीचवीने खातात ते राज्य म्हणजे गुजरात आहे | समारंभामध्ये पंचपक्क्वानांमध्ये न चुकता सलाड व पापड हे असतातच असतात | मसालेदार आणि चटकदार पंजाबी ‘अमृतसरी’ पापडांपासून केरळी ‘गुरुवायुर’च्या पुरीसारख्या फुगणार्या स्पेशल पोप्पाड्मपर्यंत

जेवणाचा राजा पापड

 

शाकाहारी पदार्थांसोबत पापड

आपल्या देशांतील कित्येक भागांत दररोज चुकता शाकाहारी पदार्थांसोबत पापड खाण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. पण सर्वात जास्त पापड कोणत्या राज्यात खाल्ले जात असतील तर ते आहे राजस्थान! पण देशभरात सर्वात जास्त आवडणारे आणि लोक ज्यांचे पापड चवीचवीने खातात ते राज्य म्हणजे गुजरात आहे. देशभरात लग्न किंवा इतर समारंभामध्ये पंचपक्क्वानांमध्ये चुकता सलाड पापड हे असतातच असतात. खरं तर लोणचं आणि पापड हे भोजनासोबत चवीला खाल्ले जातात.  ‘कच्चा पापड पक्का पापडम्हणून जिभेला वळवण्याचा गमतीशीर खेळ खेळलेला विरळाच! घरी बनवलेले असोत वा विकत आणलेले.. भारतीय घरी पापड असणारच असणार. अगदी मसालेदार आणि चटकदार पंजाबीअमृतसरीपापडांपासून केरळीगुरुवायुरच्या पुरीसारख्या फुगणार्या स्पेशल पोप्पाड्मपर्यंत. पापड हा आपल्या जेवणाचा जणू राजाच आहे. पापडासाठी सगळ्यात जास्त वापरली जाते ती उडीद डाळ. त्या खालोखाल मूग डाळ, मटकी डाळ आणि तांदळाचे पापड चवीने खाल्ले जातात. काळीमिरी आणि हिंगाची खमंग चव असलेलेबिकानेरीपापडही देशात प्रसिद्ध आहेत. गंगाकाठच्या बटाट्यांना एक खास खुमासदार चव असते. साहजिकचबनारसचे आलू पापड दर्दी खवैय्यांच्या पसंतीच्या पहिल्या रांगेत असतात. लोणचं आणि पापड हे आपण साईड डिश म्हणून खातो. यामुळे जेवणाची मजा दुप्पट होते. पण फक्त चवीसाठी खाल्ले जाणारे पापड आरोग्यासाठीही तितकेच खास असतील हे तुम्हाला कधी वाटलं तरी होतं का? गरम गरम भातावर साजूक तूप, डाळ आणि सोबत कुर्रम कुर्रम पापड असा बेत असल्यावर कोण नाखुश असेल? सर्वांच्या ह्रदयाजवळच्या या थाळीतील हक्काची एक जागा कायमच पापडाने पटकावलेली असते.

पापडाचे गुणधर्म

पचनक्रिया सुधारते: हो, बरेच लोक जेवणाच्या शेवटी पापड खातात. असं यासाठी केलं जातं कारण पापड पचनक्रियेसाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. जेव्हा आपण खुपच जड आहार घेतो म्हणजेच आहारात जास्त कॅलरीज असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ खातो. तेव्हा पापड ते जड अन्न पचवण्यासाठी आपल्या पचनकेंद्राची मदत करतात. कारण पापड हे विविध डाळींपासून बनवले जातात. त्यामुळे त्यामध्ये पोषक तत्वांचीही भरपूर मात्रा असते.

साधारणत: पापड हे मुगडाळ किंवा उडदाच्या डाळीपासून बनवले जातात. या डाळींना रात्रभर पाण्यात भिजवून आणि सकाळी त्या बारीक वाटून त्याचं मिश्रण केलं जातं. या मिश्रणापासून पापड करण्याची खूप जुनी परंपरा आहे. सोबतच हे पापड बनवताना त्यामध्ये ओवा, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ मिक्स केलं जातं. या तिन्ही गोष्टी पापडांचा स्वाद वाढवण्यासोबतच त्याच्या गुणधर्मांमध्येही वृद्धी करतात. म्हणजेच चवीसाठी खाल्ला जाणारा पापड गुणधर्मांनीही समृद्ध असतो.

पापड घरीच बनवा

पापड घरी करणं अजिबातच अवघड नाही. त्यासाठी काही टिप्स: एक किलो पिठाला तीस ग्रॅम पापडखार पुरतो. त्यापेक्षा जास्त पापडखार घालू नये. लाटायला वेगळं पीठ घ्यावं. मिरे घालायचे असतील, तर ते थोडे जाडसर कुटून चाळून घ्यावेत. मिरपूड पापडात घातली गेली, तर पापड काळपट होतात. पापडाचं पीठ भिजवताना शक्य असेल, तर कोहळा किसून त्याचं पाणी किंवा केळीच्या काल्यातलं पाणी वापरावं. पापड खमंग होतात. पापडाचं पीठ अगदी क्रिकेटच्या बॉलसारखं घट्ट भिजवावं. वरून थोडं तेल टाकून ते चांगलं मुरू द्यावं. थोड्या वेळाने ते खलबत्त्यात किंवा पाट्यांवर चांगलं मऊ होईपर्यंत कुटून घ्यावं. यामुळं पापड हलके होतात. चव खुलते. लाटताना कमीत कमी पीठ वापरावं. म्हणजे पापड टिकतात. नंतर वास येत नाही. मग तळून किंवा भाजून कसेही छान लागतात. आणखी एक अगदी सोपा आणि छान प्रकार म्हणजे दक्षिणेत केले जाणारेआरासी वडाम्. यासाठी तांदळाच्या पावपट साबुदाणा घेऊन पीठ दळून आणतात. यासाठी उकडा तांदूळ वापरला जातो. हे वडाम् करण्यासाठी जितकं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्या दुप्पट पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळलं की त्यात थोडा सोडा, चवीप्रमाणे मीठ, वाटलेली मिरची, जिरं टाकायचं. गुठळी राहू देता नीटपणे हाटून व्यवस्थित शिजवून घ्यायचं. थोडा लिंबूरस घालून नीट मळून घ्यायचं. शेवेसाठी वापरल्या जाणार्या सोर्यात फरसाणमधल्या गाठियाची किंवा पापडीची किंवा नेहमीची चकलीची जाळी लावून घ्यायची. त्यात ते पीठ गरम असतानाच घालून गाठिया/पापडी/चकलीसारख्या प्लॉस्टिकवर लांब लांब पट्ट्या पाडायच्या. या कडक उन्हात दोन-तीन दिवस वाळवून घ्यायच्या. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वाळवल्यावर विरी जायची भीती नाही. तुकडे पडले तरी प्रॉब्लेम नाही. साठवायला फार जागा लागत नाही. सोड्यामुळे छान फुलतात. हा वाळवणातला अगदी बेसिक प्रकार. याच शिजलेल्या पिठात बारीक चिरलेला कांदा घालून सांडगेही घातले जातात. हे असे कांद्याचे सांडगे ही खास सोलापुरी खासियत आहे. हे सांडगे तळून मस्त कुरकुरीत लागतात. वाळवणं करताना काही गोष्टी अगदी प्राथमिक आहेत. त्या लक्षात घ्यायला हव्या. वाळवणासाठी वापरले जाणारे सर्वच जिन्नस ताजे आणि नीट स्वच्छ करून वाळवून घेतलेले असायला हवेत. जास्त जुन्या डाळी किंवा धान्यांनी पापड पापड्या विरी जायची शक्यता असते. वाळवण व्यवस्थित वाळलं पाहिजे, पण फार जास्त उन्हात राहायला नको. त्यामुळे पापड पापड्या सकाळी अगदी लवकर घालायला हव्या. म्हणजे त्यांना ऊन पुरेसं मिळतं. ज्यात कचकच असायची शक्यता असते असे जिन्नस खासकरून ओवा, जिरं, तीळ, भगर, नाचणी फार लक्षपूर्वक स्वच्छ करायला हवेत. पदार्थांमध्ये सुरुवातीला पाणी आणि मीठ कमी टाकावं. नंतर दोन्ही गोष्टी वाढवता येतात, पण जास्त झालेलं रिपेअर करणं महाकर्मकठीण.

पापडाचे प्रकार लाभ

आजकाल पापड हे फक्त स्वादासाठीच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही बनवले जातात. म्हणजेच स्वादासोबतच त्यातील घटकांचे आरोग्याला कसे लाभ होतील यावर विशेष लक्ष दिलं जातं. यामुळे मार्केटमध्ये लाल-तिखटाचे पापड, जिरा पापड, ओवा पापड, लवंगाचे पापड हे देखील उपलब्ध असतात.

लाल-तिखटांच्या पापडांना वेगळं केलं तर बाकीचे सर्व पापड आरोग्यास लाभदायक ठरतात आणि जेवण पचवण्यास मदत करतात. सोबतच पोटात होणा-या गॅसची समस्या पापडामुळे दूर होते. जेव्हा कोणाला मळमळ होण्याची समस्या सतावत असेल तेव्हा पापडाचे सेवन मुड आणि पोट ठीक करण्यास फायदेशीर ठरतो. आंब्याच्या लोणच्यासोबत पापड खाणं खास करुन हॉस्टलर्सना आवडतं. काही नवीन ट्राय करायचं असेल तर तुम्हीही कधीतरी लोणच्यासोबत पापड खाऊन बघा.

ज्या मसाल्यांचा वरच्या मुद्द्यात उल्लेख केला ते मसाले खास करुन पापडातील फ्लेवरचं काम करतात. पण पापड हे मुख्यत्वे उडदाची डाळ, मसूर डाळ, मुग डाळ, चणा डाळ या डाळींपासूनच तयार केले जातात. म्हणजेच डाळ हा पापडातील मुख्य पदार्थ असतो. यामध्ये मुगाच्या डाळीपासून तयार होणारे पापड पचनक्रियेस सर्वात जास्त कारक मानले जातात. त्यामुळे मुग डाळीचे पापड ज्यामध्ये जि-याचा फ्लेवर असतो तेच जास्त खाल्ले जातात. तसं तर पापड खाण्याचा कोणताही वेळ नसतो. तुम्हाला क्रेविंग होताच तुम्ही ते भाजून किंवा तळून खाऊ शकता.

कोणता पापड कोणती पद्धत अधिक लाभदायक?

आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की अखेर पापड खाण्याची योग्य पद्धत कोणती? म्हणजेच आपण पापड भाजून खावेत की तळून तर जेव्हा तुम्हाला फक्त पापड स्वादासाठी खायचे असतील तेव्हा तुम्ही ते तळून खावू शकता. पण नियमित स्वरूपात आणि आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणा-या पद्धतीने तुम्हाला पापड खायचे असतील तर भाजलेले पापड सर्वोत्तम. या भाजलेल्या पापडांवर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला टाकून तुम्ही खाऊ शकता. असा मसालेदार पापड स्वादिष्टही असतो आणि आरोग्यदायीही.

सारांश

पापडामुळे पिढ्यान्पिढ्या आपल्या रोजच्या कामांच्या धबडग्यात, कडकजाळ उन्हाच्या देणगीचा वापर करून, धान्यं, तृणधान्य, डाळी, मसाले यामागची केमिस्ट्री समजून घेऊन, वर्षानुवर्षें सातत्यानं निरीक्षण आणि प्रयोग करून, जेवणात प्रथिनांची सोय करताना अफलातून चव आणून एकमेकींच्या सहकार्यानं सुगृहिणींनी आसेतुहिमाचल या वळवणांची जी थक्क करणारी परंपरा निर्माण केली, जपली आणि तिच्यात भर घातली आहे, ती केवळ अद्भुत आहे! आपल्याकडे इतक्या सगळ्या राज्यांमध्ये मिळून वाळवणाचे अक्षरश: शेकडो प्रकार आहेत आणि ते करण्याच्या हजारो पद्धती आहेत.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know