Translate in Hindi / Marathi / English

Thursday, 4 July 2024

कापूस उपयोग आणि उत्पादन | कापूस ज्या झाडापासून मिळतो त्याला 'कपाशी' म्हणतात | कापूस पिकाच्या अनेक जाती असून त्या 'गॉसिपियम' या वंशात समाविष्ट आहेत | आम्ही बहुतेक कापसापासून बनवलेले कपडे घालतो | हे आरामदायक, श्वास घेण्यायोग्य आणि टिकाऊ आहे | विकसित अर्थव्यवस्थांसाठी कापूस खरोखरच महत्त्वाचा आहे हे खरे आहे

कापूस

 

कापूस उपयोग आणि उत्पादन

 

कापूस ज्या झाडापासून मिळतो त्याला 'कपाशी' म्हणतात. कपाशी किंवा कापूस हे एक 'नगदी पीक' म्हणून ओळखले जाते. बांगलादेशानंतर चीन हा भारतातून कापूस आयात करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि भारतातून 80% पेक्षा जास्त कापूस आयात करतो. कापूस पिकाच्या अनेक जाती असून त्या 'गॉसिपियम' या वंशात समाविष्ट आहेत. तसेच कपाशी हे उष्ण हवामानातील पीक असून ज्या भागात 200 दिवसांपेक्षा अधिक थंडीचा कडाका नसतो, त्या भागात व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली जाते. चांगल्या प्रतीचे बियाणे, कसदार-पुरेशी ओल असलेली भारी जमीन, योग्य सरासरी तापमान, चांगले वार्षिक पर्जन्यमान, स्वच्छ ऊन, मशागत इत्यादी घटकही कपाशी पिकाच्या वाढीसाठी उत्पादनासाठी आवश्यक ठरतात.

आम्ही बहुतेक कापसापासून बनवलेले कपडे घालतो. हे आरामदायक, श्वास घेण्यायोग्य आणि टिकाऊ आहे. कापूस ही केवळ एक वस्तूपेक्षा अधिक आहे. हे नैसर्गिकरित्या घडणारे कापड जगभरातील लोकांसाठी जीवन बदलणारे उत्पादन आहे. जगभरात 286.7 दशलक्षाहून अधिक शेतकरी कापूस पिकवतात. 5 खंडांमधील 75 देशांमधील 10 कोटींहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होतो. याचा अर्थ असा की कोणत्याही सुती कापडाच्या आणि त्याच्या व्यापाराच्या साखळीमागे एक कथा दडलेली असते. विकसित अर्थव्यवस्थांसाठी कापूस खरोखरच महत्त्वाचा आहे हे खरे आहे, परंतु कमी विकसित आणि विकसनशील देशांसाठी ते सुरक्षिततेच्या जाळ्यासारखे काम करते. विशेषतः सौंदर्यप्रसाधनांच्या स्वरूपात, शरीरात ऍलर्जीन पसरविल्याशिवाय शरीर झाकणारे कापड. कापूस हा महिलांसह अनेक ग्रामीण अल्पभूधारक शेतकरी आणि कामगारांसाठी उपजीविकेचा आणि उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे, ज्यामुळे जगातील काही गरीब ग्रामीण भागात रोजगार आणि उत्पन्न मिळते.

वस्त्रप्रावरणाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या धाग्यासाठी उपयुक्त असलेली कापूस ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या बोंडातून मिळणाऱ्या पांढऱ्या 'तंतुमय' भागालाही कापूस असे म्हणतात. कापसामध्ये जवळपास 95% सेल्युलोज असते.

कापसाचा रंग

आपण 'कापसाचा रंग पांढरा' असे मानतो आणि बोलतोही. परंतु काही कापसांना तांबूस विटकरी रंग नैसर्गिकदृष्ट्या येतो. भारताच्या आंध्रप्रदेशातील 'गुंतूर' नावाने बाजारात येणारा कापूस तसेच इजिप्तच्या काही भागात 'ब्राऊन इजिप्शियन' या नावाने ओळखला जाणारा कापूस अशा भिन्न रंगाचे असतात. सर्वसाधारणपणे हा कापूस अपवादात्मक मानला जातो.

कापसाची उत्पत्ती

आज निरनिराळ्या देशांमध्ये कापसाचे पीक घेतले जात असले तरी असे मान्य करण्यात आले आहे की कापसाचा मूळ उगम आपल्या 'भारत' देशातच झाला. त्या काळातील कापूस इतका सुंदर होता की त्यापासून जी वस्त्रप्रावरणे बनवली जात, ती मौल्यवान वस्तूंनी मढवून अधिक आकर्षक किमती बनवली जात असत. ही वस्त्रप्रावरणे परदेशात 'हिरक वस्त्र', 'मणीचिरा' अशा रचनात्मक नावांनी राजेरजवाड्यास भारतीयांची भेट म्हणून पाठविली जात. कापूस कापसाचा सुती वस्त्रांसाठी होणारा उपयोग याविषयीचे ज्ञान भारतीयांना फार पूर्वीपासून होते.

भारतातूनच कापसाचा कापड विणण्याच्या कलेचा भूमध्य समुद्रालगतच्या देशात आणि युरोप खंडात प्रसार झाला. भारतातील कापूस सुती कपड्यांविषयी स्वतः अलेक्झांडर प्रभावित झाला होता. विशिष्ट रानटी झाडे फळांऐवजी लोकर देतात आणि या लोकरीचे सौंदर्य प्रत मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे. भारतातील लोक त्यापासून तयार केलेले कपडे घालतात, असा उल्लेख अलेक्झांडर यांनी केला होता. इतकेच नव्हे, तर त्यांनी भारतातून परततांना येथील कापूस ईजिप्त, ग्रीस इतर भूमध्य समुद्रालगतच्या देशांमध्ये नेला. गंगेच्या खोऱ्यातील उत्कृष्ट मलमलीला ग्रीकांनी गंगेवरून 'गँजिटिकी' असे नाव दिले आहे.

कापसाचे उपयोग

कापसाचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे सूत काढणे त्यापासून कापड तयार करणे हा आहे. याचा वापर कॅनव्हास, डेनिमसह विविध प्रकारच्या विणलेल्या कापडांमध्ये केला जातो.

कापसावर विविध प्रकारच्या प्रक्रिया सुलभतेने करता येतात. त्यामुळे त्याच्यापासून आवश्यक गुणधर्माचे कापड उदा. टी-शर्ट, ब्लु जीन्स इत्यादी बनवता येतात.

वस्त्रांव्यतिरिक्त मोटरगाड्यांचे तसेच सायकलचे टायर्स कापसाचे सूत वापरूनच बनवतात.

जगाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 80% एवढा कापूस कापडनिर्मितीसाठी वापरला जातो.

हातमोजे, पायमोजे, बेडशीट, टेनिस शू वगैरे वस्तूही कापसाच्या सुतापासून बनतात.

उन्ह पाऊस या विषम हवामानातून सुटका करून घेण्यासाठी ज्या छत्रीचा उपयोग केला जातो, ती छत्रीही कापसाच्या सुताच्या आधारेच बनवली जाते.

टायरमधील कॉर्ड, विविध प्रकारचे पट्टे, पादत्राणे, गाळण्याचे कापड, दोरा दोर, जखमांवर लावण्यात येणारा निर्जंतुक कापूस या वस्तूंच्या उत्पादनात कापूस वापरला जातो. गाद्या, उशा इत्यादी भरण्यासाठी प्रक्रिया करून तयार करण्यात येणाऱ्या गन कॉटन, रेयॉन . तसेच लिनोलियम, प्लास्टिक यासाठीही कापसाचा उपयोग करतात.

भारतात वाती, फुलवाती, जानवी इत्यादी धार्मिक बाबीत कापसाचा उपयोग करतात.

कापूस खूप मऊ असतो. तसेच कापसाला पाण्याचे आकर्षण असते. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणून उष्ण कटिबंधातील लोक सुती कपडे प्राधान्याने वापरतात. अंतर्वस्त्र, टॉवेल्स तत्सम उत्पादनात हे एक चांगले फॅब्रिक आहे.

कापसाच्या बियांना 'सरकी' म्हणतात. सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबण तसेच अन्य व्यवसायात वापर होतो. सरकी पासून दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त पेंड किंवा ढेप अति पोषक असे अन्न ठरते.

वस्त्रोपयोगी कापूस जसा भारत देशात पिकतो तसा आजकाल परदेशातही मुबलक प्रमाणात पिकतो. कापूस ही वस्त्र उद्योगातील अत्यंत महत्वाची वस्तू आहे. विविध उपयोगामुळेच कापसाला 'पांढरे सोने' म्हटले जाते. वस्त्रोत्पादनाच्या दृष्टीने कपाशी किंवा कापसास 'तंतुमय पदार्थांचा राजा' हा बहुमान प्राप्त झाला आहे.

कापूस लागवडीसाठी आवश्यक हवामान

1. कापसाचे पिक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशी शेतीसाठी कोरडे आणि स्वच्छ उबदार हवामान लागते.

2. बियाण्यांच्या उगवणीसाठी 18 ते 20 अंश सेल्सिअस तापमान लागते. अधिक वाढीसाठी 20 ते 27 अंशाचे तापमान आवश्यक असते.

3. हवेतील आद्रता 75 टक्के पेक्षा कमी असावी लागते. चांगली बोंडे भरण्यासाठी आणि उमलण्यासाठी उष्ण दिवस आणि थंड रात्र उपयुक्त असते.

कपाशीची शेती साठी आवश्यक जमीन

1. कपाशीची शेती करण्यासाठी योग्य जमिनीची निवड करणे खूप गरजेचे असते.

2. कपाशी लागवड करण्यासाठी काळी, मध्यम ते खोल आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होणारी जमीन निवडावी.

3 जमिनीचा सामू साधारणपणे 6 ते 8.5 पर्यंत असावा.

4. कपाशी लागवड करण्याआधी एक खोल नांगरट आणि 2 ते 3 कुळवाच्या पाळी देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे, पाला आणि इतर कचरा गोळा करून तो जाळावा आणि शेत स्वच्छ करावे. हेक्टरी शेणखत 15 ते 20 टन वापरावे.

कापूस पेरणीचा योग्य हंगाम

1. शेतकऱ्यांना कपाशीची लागवड करण्यासाठी जून महिन्याचा पहिला आठवडा हा योग्य कालावधी समजला जातो.

2. या कालावधीत पेरणी केल्यास कीड रोगाचे प्रमाण कमी होते.

कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात करावी. तर कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मान्सूनचा तीन-चार इंच पाऊस पडल्यानंतर करावी. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.

सारांश

कापसाला पांढरे सोने म्हटले जाते, याच कारण म्हणजे कापसाला आलेला भाव आणि त्याने मिळून दिलेले भरपूर आर्थिक उत्पन्न होय. विदर्भ मराठवाडा आणि सध्या पश्चिम महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून शेतकरी कापूस लागवडीकडे वळला आहे. कापूस पिकाचे अधिक उत्पादन घ्यावयाचे असल्यास जमिनीची मशागती पासून काढणी पर्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यास नक्कीच जास्तीत जास्त उत्पादन घेता येइल.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know