कॉलरा
पावसाळ्यातील धोकादायक आजार कॉलरा
पावसाळ्यात
वातावरण
अत्यंत
आल्हाददायक
असते,
मात्र
याच
ऋतूमध्ये
सर्वात
जास्त
सूक्ष्म
जीवांमुळे
आजार
पसरतात.
पावसाळ्यातील
वातावरण
या
सूक्ष्म
विषाणूंसाठी
अधिक
सोयीस्कर
ठरते.
फंगस,
यीस्ट,
मॉल्ड
इत्यादी
अत्यंत
वेगाने
पावसाळ्यात
वाढत
असून
माणसावर
त्याचे
संक्रमण
त्वरीत
होते.
यापैकीच
एक
आहे
व्ही
कॉलरी
बॅक्टेरिया.
कॉलराचा हा बॅक्टेरिया
जेव्हा
शरीरात
प्रवेश
करतो
तेव्हा
आतड्यामध्ये
त्वरीत
पसरतो
आणि
काही
तासातच
शरीरातील
पूर्ण
पाणी
शोषून
घेतो.
हाच
आजार
म्हणजे
कॉलरा.
काही
वेळाच्या
आत
यावर
उपचार
केला
न
गेल्यास,
रूग्णाचा
मृत्यू
निश्चित
आहे.
काय आहे कॉलरा आजार?
कॉलरा हा विषारी रोग असून शरीरातील पाणी अत्यंत वेगाने जंत शोषून घेतात आणि संपूर्ण पाणी शरीराबाहेर
निघते.
संक्रमित
अन्न
वा
पाणी
पिण्यामुळे
१२
तासापासून
ते
५
दिवसात
अचानक
कॉलराची
लक्षणं
दिसू
लागतात
आणि
हे
त्वरीत
तीव्र
होते.
वर्ल्ड
हेल्थ
ऑर्गनायझेशन
नुसार,
साधारण
१३
ते
४०
लाख
कॉलरा
रूग्ण
संपूर्ण
जगात
होत
असून
२१
हजारापासून
१.४३ लाख इतके मृत्यू या आजारामुळे
होतात.
लक्षणे
दिसताच
त्वरीत
उपाय
न
केला
गेल्यास,
मृत्यूसाठी
कारणीभूत
ठरतो.
कसा पसरतो कॉलरा
कॉलराचे बॅक्टेरिया
हे
खराब
पाण्यातून
जे
साधारण
जमीन,
रस्त्यावर
असते
त्यातून
अथवा
रस्त्यावरील
अन्न,
कच्ची
फळं
आणि
भाज्यांमधून
पसरतो.
सदर
माध्यमातून
कोणत्याही
स्वरूपात
बॅक्टेरिया
माणसाच्या
शरीरात
घुसतो
आणि
आतड्यापर्यंत
पोहचून
माणसाला
आजाराने
संक्रमित
करतो.
जिथे
अधिक
घाण
आणि
अस्वच्छता
असते
तिथे
अधिक
प्रमाणात
हा
आजार
पसरतो.
कॉलरा धोकादायक आहे का?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या
मते,
कॉलरा
हा
व्हिब्रिओ
कोलेरी
बॅक्टेरियाने
संक्रमित
असल्याने
हा
आजार
अन्न
आणि
पाण्याच्या
वापरामुळे
होणारा
अतिसार
संसर्ग
आहे.
हा
आजार
मुले
आणि
प्रौढ
दोघांनाही
प्रभावित
करू
शकतो.
त्यामुळे
सर्वांनी
आवश्यक
ती
खबरदारी
घ्यावी.
हा
आजार
लवकर
होत
असल्याने
काळजी
घेणं
गरजेचं
आहे.
कॉलराची लक्षणे कधी दिसतात
अनेकदा कॉलराचा बॅक्टेरिया
शरीरात
गेलाय
याबाबत
त्वरीत
कळत
नाही.
याची
लक्षणे
७
ते
१४
दिवसात
दिसू
लागतात.
पण
या
व्यक्तीमुळे
अर्थात
त्याच्या
मलत्याग
अथवा
लघ्वीवाटे
कॉलरा
अधिक
पसरू
लागतो.
अशी
व्यक्ती
इतर
व्यक्तींनाही
संक्रमण
देते.
कॉलराची लक्षणे
डायरिया वा जंत - बॅक्टेरिया
आतड्यामध्ये
पसरतो
आणि
त्यामुळे
रूग्णाच्या
शरीरातून
तरल
पदार्थ
निघू
लागता.
एक
तासाच्या
आत
१
लीटर
फ्लुईड
शरीरातून
बाहेर
निघते.
उलटी वा मळमळ - कॉलराची सुरूवात ही सतत मळमळ अथवा उलट्यांन होते. पण एका तासातच हगवण सुरू होते आणि शरीरातून पाणी निघू लागते.
डिहायड्रेशन - कॉलरा संक्रमणाच्या
१
तासात
डिहायड्रेशन
सुरू
होते
आणि
रूग्णाचे
वजन
१०
टक्के
कमी
होते.
चिडचिडेपणा - शरीरातून अचानक पाणी कमी झाल्याने शरीर कमकुवत होते आणि साहजिक चिडचिड होते
अधिक तहान लागणे - कॉलरा झालेल्या रूग्णाला अत्याधिक तहान लागते. तोंड आणि घसा सुकतो आणि अत्यंत थकवा येतो. त्वचा आकसते आणि लघ्वी होत नाही. ब्लड प्रेशर अचानक कमी होते.
कॉलरापासून कसा कराल बचाव
कॉलरा हा घाणेरडे पाणी आणि सॅनिटेशनमुळे
होते.
संक्रमित
माणसाच्या
शौचातून
हा
वातावरणात
प्रवेश
करतो.
शुद्ध
पाणी,
स्वच्छता,
सामाजिक
जागरूकता
करून
कॉलरा
नियंत्रणात
आणला
जाऊ
शकतो.
यासाठी
स्वच्छता
राखणे
अत्यंत
गरजेचे
आहे.
पावसाळ्यात
याची
अधिक
काळजी
घ्यायला
हवी
Ø
किमान
१५
सेकंद
साबणाने
हात
धुवावेत.
Ø
शुद्ध
आणि
ताजे
पाणी
प्यावे.
अधिक
काळ
पाणी
उघडे
असेल
तर
पिऊ
नये.
Ø
पाणी
उकळूनच
प्यावे.
Ø
अन्न
उघडे
ठेऊ
नये.
अन्न
उघडे
असेल
तर
खाऊ
नये.
Ø
कापून
ठेवलेली
फळंही
खाऊ
नयेत.
कॉलरा आजारावरील उपचार
कॉलरात जुलाब झाल्याने तसेच उलट्यांमधून
शरीरातील
पाण्याची
होणारी
झीज
भरून
काढणे
गरजेचे
असते.
दवाखान्यात
जाऊन
डॉक्टरांकडून
उपचार
करून
घ्यावेत.
शरीरातील
कमी
झालेली
पाणी
व
क्षार
घटकांची
पूर्तता
करण्यासाठी
रीहायड्रेशन
सलाईन,
झिंक
सप्लिमेंट
दिले
जाते.
तसेच
यावर
जिवाणू
कमी
करण्यासाठी
अँटीबायोटिक्स
औषधे
दिली
जातात.
पातळ शौचास व उलट्या होत असल्यास शरीरात डिहायड्रेशन
होऊ
नये
म्हणून
रुग्णाला
वरचेवर
पाणी
तसेच
नारळाचे
पाणी,
भाताची
पेज
किंवा
इतर
द्रवपदार्थ
भरपूर
द्यावेत.
जलसंजीवनी
(ओआरएस)
द्यावी.
ओआरएस
पावडर
नसल्यास
साखर,
मीठ
व
पाण्यापासून
घरीच
जलसंजीवनी
करून
रुग्णास
देता
येते.
घरीच जलसंजीवनी
करण्यासाठी
स्वच्छ
1 लिटर
पाणी,
6 चमचे
साखर
आणि
अर्धा
चमचा
मीठ
चांगले
एकजीव
करावे.
ही
जलसंजीवनी
रुग्णास
वरचेवर
थोडी
थोडी
देत
राहावी.
त्यामुळे
शरीरातील
पाणी
व
क्षार
यांचे
प्रमाण
संतुलित
राहते
व
रुग्ण
बरा
होतो.
एकदा
केलेले
मिश्रण
दुसऱ्या
दिवशी
वापरू
नये.
दुसऱ्या
दिवशी
याचे
पुन्हा
नवीन
मिश्रण
करावे
व
ते
वापरावे.
कॉलरा टाळण्यासाठी घरगुती उपाय
कॉलरा झाल्यास आल्याचा
एक
छोटासा
गोळा
घेऊन
बारीक
करून
त्यात
मध
मिसळून
दिवसातून
३
वेळा
सेवन
करावे.
याचा
फायदा
होईल.
अर्धा ग्लास पाण्यात लिंबाचा
रस
पिळून
घ्या.
त्यात
मीठ
घालावे.
कॉलरा
रुग्णांना
दिवसातून
अनेक
वेळा
दिल्यास
फायदा
होईल.
प्रथम हळद
पाण्यात
भिजवून
नंतर
उन्हात
वाळवा
आणि
पावडर
बनवा.
एक
कप
गरम
पाण्यात
मध
आणि
हळद
मिसळून
प्यायल्यास
फायदा
होईल.
कॉलरा
रुग्णाला
स्वच्छ
व
शुद्ध
अन्न
द्यावे.
पाणी
उकळून
प्यायल्यानेही
या
आजारापासून
आराम
मिळतो.
घरच्या घरी ओ आर एस
द्रावण
तयार
करा.
यासाठी
चार
कप
पाण्यात
6 चमचे
साखर
आणि
अर्धा
चमचा
मीठ
मिसळा.
हे
द्रावण
दिवसातून
अनेक
वेळा
प्या.
शक्य तितक्या द्रवपदार्थाचे
सेवन
वाढवा.
कॉलरा
रुग्णांसाठीही
ताक फायदेशीर आहे.
दही
पोटासाठी
खूप
फायदेशीर
आहे.
कॉलराच्या
रुग्णाला
केळी
दह्यात
मिसळून
दिल्यास
फायदा
होईल.
लवंग
पाण्यात
उकळवून
रुग्णाला
दिवसातून
अनेक
वेळा
प्या.
कॉलरा किंवा कॉलराच्या
रुग्णांभोवती
स्वच्छतेची
खूप
काळजी
घ्या.
त्यांना
उघड्यावर
शौचास
जाऊ
देऊ
नका.
घरगुती
उपचारांसोबतच
डॉक्टरांचा
सल्ला
घेतल्यास
बरे
होईल.
लहान मुले आणि गर्भवती महिलांना कॉलरा आजार
कॉलरा हा एक संसर्गजन्य
रोग
आहे
जो
लहान
मुलांपासून
वृद्धांपर्यंत
कोणाच्याही
आतड्यांवर
परिणाम
करू
शकतो.
जेव्हा
एखाद्या
व्यक्तीला
कॉलरा
होतो
तेव्हा
त्याला
पाणचट
जुलाब
होऊ
शकतो.
कॉलराचा
वेळेत
उपचार
न
केल्यास,
निर्जलीकरण
होऊ
शकते,
ज्यामुळे
मृत्यू
देखील
होऊ
शकतो.
गरोदर
स्त्रिया
आणि
मुलांमध्ये
हा
आजार
होण्याची
शक्यता
जास्त
असते
कारण
त्यांची
प्रतिकारशक्ती
कमी
असते.
कॉलरामुळे
माणसाच्या
शरीरातून
पाण्यासोबत
अनेक
आवश्यक
घटकही
निघून
जातात.
व्हिब्रिओ
कोलेरा
नावाच्या
जीवाणूने
दूषित
अन्न
किंवा
पिण्याच्या
पाण्यामुळे
कॉलरा
होतो.
सारांश
भारतात काही वर्षांपूर्वी अस काळ होता जेव्हा कॉलराचे नाव ऐकताच लोक घाबरायचे. 1817 मध्ये बंगालमधून सुरू झालेल्या या महामारीने भयानक रूप धारण केले होते आणि ही महामारी संपेपर्यंत अंदाजानुसार 10-20 लाख लोकांचा बळी गेला होता. मात्र आता पुन्हा त्याचा उद्रेक होताना दिसत आहे, याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार सध्या 22 देश कॉलरा महामारीचा सामना करत आहेत आणि एकूण 43 देशांमधील 100 कोटी लोकांना याचा फटका बसण्याचा धोका आहे. भारतात 2023 च्या कॉलरा प्रादुर्भावामुळे प्रभावित झाल्याच्या देशांमध्ये भारत आणि पाकिस्तानची नावे आहेत. कॉलरा हा एक बॅक्टेरियाचा संसर्ग आहे जो विषारी अन्न आणि दूषित पाण्यामुळे होतो- व्हिब्रिओ कॉलरा. उपचार न केल्यास काही तासांतच रोग्याचा मृत्यू होऊ शकतो. कॉलरा लसीकरण हा या आजारापासून बचाव करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. निरोगी व्यक्तींमध्ये नियमित वापरासाठी शिफारस केली जात नाही; केवळ त्रीव्र साथ पसरलेल्या भागात राहणाऱ्या व्यक्तींच्या लसीकरणासाठी शिफारस केली जाते.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know