Translate in Hindi / Marathi / English

Saturday, 27 July 2024

बडीशेप सामान्यत: मसाला म्हणून वापरली जाते | बडीशेपचे औषधी उपयोग | जेवण झाल्यावर अगदी हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बडीशेप अनेकांना तर चहा-कॉफी घेतल्यावरही बडीशेप खाण्याची सवय असते | शरीरासाठी आवश्यक असणारे क जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि आयर्न असे अनेक घटक बडीशेपमध्ये असतात | जेवणानंतर न चुकता बडीशेप खायला हवी

 बडीशेप



 

बडीशेपचे औषधी उपयोग

 

जेवण झाल्यावर अगदी हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बडीशेप अनेकांना तर चहा-कॉफी घेतल्यावरही बडीशेप खाण्याची सवय असते. आता मुखवास म्हणून खाल्ली जाणारी या बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत हे आपल्यातील अनेकांना कदाचित माहित नसेल. शरीरासाठी आवश्यक असणारे क जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि आयर्न असे अनेक घटक बडीशेपमध्ये असतात. त्यामुळे जेवणानंतर न चुकता बडीशेप खायला हवी. असे असले तरी ती योग्य त्या प्रमाणातच खायला हवी, फायदेशीर असते म्हणून बेसुमार खाल्ली तर ते आरोग्यासाठी हानिकारकही ठरु शकते. बडीशेप हा मसाल्याचा एक पदार्थ असून पदार्थांना स्वाद येण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो.  बडीशेपचा फायदा हा फक्त पचनासाठी देखील नाही तर आपल्या आरोग्याशी निगडित अनेक गोष्टींसाठी केला जातो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात जेवणानंतर बडीशेपचे सेवन करतो. बडीशेपमुळे आपण केलेल्या आहाराचे लवकर पचन होते.

बडीशेपचा फायदा हा फक्त पचनासाठी देखील नाही तर आपल्या आरोग्याशी निगडित अनेक गोष्टींसाठी केला जातो. उन्हाळ्यात वजन कमी करायचं असेल तर बडीशेपचं सेवन करायला हवं. बडीशेप आपली पचनक्रिया सुधारण्यास तसेच चयापचय वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात जेवणानंतर बडीशेपचे सेवन करतो. बडीशेपमुळे आपण केलेल्या आहाराचे लवकर पचन होते. पण तुम्हाला माहित आहे बडीशेपचा वापर केल्याने आपल्या आरोग्याशी निगडित अनेक समस्या दूर होतात. आजकाल प्रत्येकालाच केसगळतीच्या त्याचबरोबर त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यावर अनेक उपाय करूनही आपल्याला फारसा फरक जाणवत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का अश्या समस्यांवर बडीशेप प्रभावी पडते. त्याचेकारण म्हणजे बडीशेपही अनेक औषधी गुणांपासून समृद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया बडीशेपचे सेवन केल्याचे फायदे.

पचनसंस्था व्यवस्थित राहते: उन्हाळ्यात अनेकदा पचनाच्या समस्या उद्भवतात. अशावेळी जर तुम्ही बडीशेपचे सेवन केले तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले फायबर तुमची पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते. त्याचबरोबर याचे सेवन केल्याने पचनही योग्य होते. त्यामुळे तुम्ही दररोज याचे सेवन करू शकता.

केसगळती थांबते: बहुतेकांना केसगळतीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. वाढत्या प्रदूषणामुळे केस गळतीच्या समस्या वाढल्या आहेत. बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. बडीशेपमध्ये अँटी ऑक्सिडंट असते ते आपल्या केसांची मूळ मजबूत करतात आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळते. तुम्हाला केसगळतीची समस्या दूर करायची असेल तर बडीशेप गरम पाण्यात उकळवून घ्यावी आणि ते पाणी थंड करत ठेवावे. त्यानंतर थंड झालेल्या पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावे.

चेहऱ्यावरील मुरमे दूर होतात: बडीशेपच्या वापरामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरुमे निघून जातात. मुरमाच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी बडीशेपच्या बियांची पावडर मधात किंवा ताकात मिसळवून त्याची व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यावी. तयार झालेली पेस्ट साधारण १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावी त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

चरबी कमी होते: बडीशेपचा वापर आपल्या शरीरातील चरबी काढण्यासाठी केला जातो. बडीशेपमुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी बडीशेप पाण्यात मिसळवून त्याची पेस्ट बनवून घ्यावी जेथे अतिरिक्त चरबी आहे तेथे लावावी.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल: बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय शरीराला आजारांशी लढण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही दररोज याचे सेवन करू शकता.

चेहऱ्यावर चमक येते: चेहऱ्यावर चमक येण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपाय करतो. बडीशेपच्या साहाय्याने आपण आपल्या चेहऱ्यावरील गेलेली चमक परत आणू शकतो. आपला चेहरा चमकदार बनविण्यासाठी ओटमील आणि बडीशेप पाण्यात घालून ते गरम करावे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यावी. बनवलेली पेस्ट १० तर १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

बडीशेपची घरच्या गच्चीवर लागवड

घरगुती बागेची हौस बाल्कनीतल्या कुंड्यांमधील झाडांवर भागवताना वनस्पतींचे उपयोगही बघायला हवेत. बागेत किंवा गॅलरीत अशी झाडे लावताना निसर्ग जोपासण्याची आवड तर जपता येते, पण त्याचबरोबर रोजच्या आहारात, जीवनशैलीत त्यांचा आरोग्यदायी वापरही करून घेता येतो. भारत हा मसाल्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध देश आहे. खाण्याच्या पदार्थाची रुची, स्वाद, सुगंध खमंगपण वाढविणारे मसाल्याचे पदार्थामध्ये जिरे, ओवा, जायफळ, दालचिनी, लवंग, यासोबतच बडीशेपचे स्थानही अतिशय महत्वाचे आहे. -हास लहान वयाच्या मुलांपासून ते वयस्कर मंडळींमध्ये बडीशेप हि लोकप्रिय असून जेवण, चहापाणी, नंतर बडीशेप खाण्याची विशेष प्रथा दिसून येते. बडीशेपचे दाणे किंवा त्याचे भुकटीचा वापर विविध पदार्थाच्या सूप, लोणचे, सॉस, चॉकलेट आणि प्रामुख्याने मांसाहारी जेवणामध्ये होतो. बडीशेप हि पाचक, वायुनाहक असल्यामुळे जेवणानंतर बडीशेप खाण्याची प्रथा आहे. फुप्फुस, पित्ताशय मूत्राशय यांच्या रोगावर बडीशेप गुणकारी आहे तसेच ती कृमीनाशकसुद्धा आहे. बडीशेपचे मूळस्थान भूमध्य समुद्राजवळील प्रदेशात आहे. भारत,इजिप्त, चीन ह्या देशात बडीशेप या पिकाची लागवड करतात. भारतात उत्तरप्रदेश, पंजाब, दिल्ली, कर्नाटक,हरियाना, महाराष्ट्रात लागवड करतात. महाराष्ट्र या राज्यांत २२८९० हेक्टर क्षेत्रफळावर बडीशेपची लागवड केली जाते त्यापासून २७६०० टन बडीशेपचे उत्पादन होते. बडीशेपची निर्यात अमेरिका, जपान,इंग्लंड,मलेशिया, . आफ्रिका आणि सौदी अरेबिया या देशात होते त्यापासून सन २००६-०७ या वर्षात भारतास २१४३ लक्ष रुपयांची गंगाजळी प्राप्त झाली आहे.

सर्वसाधारणपणे सर्व जमिनीत बडीशेपची लागवड करता येते. परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी, कर्बाचे चांगले प्रमाण असणारी, कसदार मध्यम जमीन ह्या पिकास मानवते, परंतु कुठल्याही परिस्थितीत दमात ढगाळ हवामान असल्यास पिक वाढीवर विपरीत परिणाम होऊन अशा हवामानात बडीसोपवर मोठ्या प्रमाणत रोगाचा प्रादुर्भाव होतो. समुद्रसपाटीपासून २५०० मीटर उंचीपर्यंत या पिकाची लागवड करता येते. त्यामुळे उत्तर भारतीय हवामानात, खरीप हंगामात आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रात रब्बी हंगामात बडीसोपची लागवड करतात.

पेरणी बीजप्रक्रिया:

. बडीशेप हे दीर्घकाळ घेतले जाणारे पीक आहे. रब्बी हंगामाच्या सुरवातीस यापिकाची पेरणी केल्यास अधिक काळ हे पीक घेता येते.

. ऑक्टोबर महिन्यातील पहिला आठवडा या पिकाच्या पेरणीसाठी चांगला ठरतो.

. रोपवाटिका मध्ये जुलैऑगस्ट महिन्यात पेरणी केली जात असून ४५ ते ६० दिवसांनी यांची लागवड केली जाते.

. बडीशेप पिकाची लागवड डायरेक्ट तसेच रोपवाटिकेत रोप लावून देखील करता येते.

. या बियाण्याची पेरणी करण्यापूर्वी बुरशीनाशक बाविस्टीन प्रति किलो ग्रॅम प्रमाणे किंवा बुरशीनाशक ट्रायकोडर्मा प्रति किलो प्रमाणे ते १० ग्रॅम सह प्रक्रिया करून पेरणी करावी.

पाणी व्यवस्थापन:

. बडीशोप लागवड करतांना त्याचे पाणी व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करणे गरजेचे आहे.

. लागवड करतांना जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर जमीन हलकी ओली करावीत.

. वातावरणाचा अंदाज घेऊन १० ते १२ दिवसांच्या अंतराने पिकांना पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कीड रोग नियोजन:

. बडीशेप पिकावर सहसा रोग तसेच किडीचा प्रादुर्भाव होत नाही. मात्र दमट वातावरण तसेच अतिशय थंडी असल्यास मावा किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

. मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३५ % प्रवाही १० मी. ली प्रति १० लिटर पाण्यात मिसळावेत. त्यानंतर त्याची फवारणी करावीत.

. जास्त थंडी पडली असेल आणि दहिया रोग झाला असेल तर याच्या नियंत्रणासाठी गंधकाची भुकटी २० % तीव्रतेची ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळावीत. त्यानंतर याची फवारणी करावी.

काढणी:

. बडीशेपची चव त्याच्या दाण्याच्या आकारावरून ठरते.

. बडीशेप पूर्णपणे परिपक्व होण्यापूर्वी त्याची काढणी केल्यास त्याची चव गोड तसेच स्वादिष्ट लागते.

. बडीशेप फुल येणाऱ्या दिवसापासून ३० ते ४० दिवसांनी बडीशेप काढणीस तयार होते.

. बडीशेप पिवळे होण्यास सुरुवात झाल्यास उपरोक्त अवस्थेतील फांद्या तसेच त्यावरील अंबेल काढून त्यास सावलीत बांदल बांधून सुकवावेत.

सारांश

बडीशेप सामान्यत: मसाला म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर बडीशेप अन्न पचविण्यास तसेच अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. बडीशेपमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फायबर आणि मॅग्नेशियम सारखे घटक असतात. त्याचबरोबर बडीशेप थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात बडीशेपचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. बडीशेपचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि पोटाची उष्णताही शांत होते. सेवन केल्यास त्याची चव थंड असल्याने शरीर थंड होते. त्यामुळे जर तुम्हाला पोटाच्या उष्णतेचा त्रास होत असेल तर बडीशेपचे सेवन सुरू करा. त्याचबरोबर दररोज बडीशेपचे सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होते आणि रक्त स्वच्छ राहते.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावावाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know