Translate in Hindi / Marathi / English

Saturday, 6 July 2024

पावसाळा आणि आहार | सर्वांचाच मूड बदलणारा पावसाळा येताना अनेक विविध आजार घेऊन येतो | पावसाळ्यात आहार कसा असावा | पावसाळा सुरु झाला की जसे पाणी आणि अन्न या बाबतीत काळजी घ्यावी लागते | पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात | या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते | पावसाळ्यात आजारी पडण्याचेही प्रमाणही वाढत असते

पावसाळा आणि आहार

 

पावसाळ्यात आहार कसा असावा

पावसाळा सुरु झाला की जसे पाणी आणि अन्न या बाबतीत काळजी घ्यावी लागते तशीच काळजी हवे मध्ये होणाऱ्या बदलांची घ्यावी लागते. पावसाळ्यात हवा ओली थंड असते. आजूबाजूला झुडुपे वाढू लागली कि डास, छोटे कीडे,माश्या वाढू लागतात. यामुळे जंतू संसर्ग वाढू लागतो. कपडे नीट वाळत नाहीत ते दमट राहतात त्यातून बुरशी वाढते. कधी कधी कपडे ठेवतो त्या कपाटामध्ये देखील आतून बुरशी लागते तिचा संसर्ग कपड्यावर होतो. त्यामुळे अशा कपड्यांचा शरीराशी संपर्क आला की त्वचाविकार होऊ शकतात. पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते. पावसाळ्यात त्वचेच्या समस्या वाढतात. या हंगामात ओलावा असल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्याचबरोबर काही लोकांची त्वचा अधिक निर्जीव दिसते. हवामानातील बदलाचा परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो, ज्यामुळे कोरडेपणा, खाज सुटणे, पुरळ होण्याची शक्यता वाढते.

पावसाळ्यात आरोग्याची काळजी

हल्ली डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंगू सारखे आजार त्वरित पसरत आहेत. त्यामुळे ताप येणे, जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात. कधी कधी हा आजार गंभीर स्वरूपही धारण करू शकतो. यासाठी रोज घरामध्ये कडूनिम्बाची पाने,वेखंडाची पूड, ओवा, यांचा धूर करून घरात सकाळ -संध्याकाळ जाळावा. यासाठी कोळसा पेटवून त्यावर वरील द्रव्यांचे चूर्ण करून ते टाकत राहावे त्यातून होणारा धूर घरामध्ये फिरवावा. घरामध्ये हल्ली पाणी -टंचाई मुळे पाणी साठवून ठेवले जाते. त्यामध्ये डासांची अंडी राहू शकतात. म्हणून दर दिवसांनी साठवलेले पाणी वापरून टाकावे टब स्वच्छ धूउन परत पाणी भरून ठेवावे. घराबाहेर जास्त वाढलेले गवत काढून टाकावे म्हणजे किडे डास कमी होतात.

कपाटांमधून बुरशी जमा होत नाही ना हे पाहावे. कपड्यांना इस्त्री करावी. कारण त्यामुळे कपडे निर्जंतुक होतात. पाणी स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छ ताजे गरम अन्न घेणे या दोन गोष्टींची काळजी घेतली की पावसाळा आपण छान एन्जॉय करू शकतो.

पावसाळा आणि आहार

पावसाळा आला की, अनेकांना बाहेरचे पदार्थ, तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ खावेसे वाटतात. परंतु, हा आहार तुमच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. पावसाळ्यात कोणता आहार घ्यावा, व्यायाम करावा, दिनक्रम कसा असावा, हे माहीत असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात आजारी पडण्याचेही प्रमाणही वाढत असते. त्यामुळे पावसाळ्यात आहार व्यवस्थित असणे आवश्यक आहे. तसेच घरच्या घरी कोणते व्यायाम करता येऊ शकतात.

पावसाळ्यातील आहार कसा असावा?

पावसाळ्यात आहारामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि तंतुमय पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा. पावसाळ्यात पचनशक्ती वाढवणारे आणि ऊर्जा देणारे पदार्थ यांचा समावेश आहारामध्ये असणे आवश्यक आहे. तसेच पावसामध्ये डिहायड्रेशनसुद्धा होऊ शकते. त्यामुळे ऋतुमानानुसार उपलब्ध असणाऱ्या फळांचा आहारामध्ये समावेश करावा. पावसाळ्यात आहार घेताना योग्य मिश्रण करावे म्हणजेकॉम्बिनेशनयोग्य असावे. आहारात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असावा. मनुका, मध आणि खजूर यांचे सेवन करावे. सुक्या मेव्यांमध्ये ऊर्जा देणारे घटक असतात. तांदूळ, डाळ, पोळी आणि भाज्या ताज्या असाव्यात. शक्यतो अन्न शिजवल्यानंतर तासाभरातच खावे. पालेभाज्या टाळा. पावसाळ्यात साल काढता येते अशा भाज्यांचा समावेश करा. कडधान्य, क्लस्टर बीन्स, गाजर, मटार, ब्रोकोली आणि कडधान्ये यांसारख्या फायबर समृद्ध असलेल्या भाज्या घ्या. काकडी, टोमॅटो, बीन्स, भेंडी आणि मुळा यांचाही भाज्यांमध्ये समावेश होतो. या भाज्या प्रतिकारशक्ती सुधारतात. बीटरूट्सचे सेवन रक्तदाब कमी करण्यास, अशक्तपणा टाळण्यास मदत करते. पावसाळ्यात आहारामध्ये बाजरी असावी. बाजरी हा चांगला पर्याय आहे.

पावसाळ्यातील पेयांमध्ये सूपचा समावेश करावा. काळी मिरी, आले किंवा आले पूड आणि लसूण यांचा समावेश असणारे सूप घ्या. सॅलड चांगले वाफवून मगच घ्यावे. लेमन ग्रास, पुदिन्याची पाने, ताजी चहाची पाने, आले, लवंगा, तुळशीची पाने आणि सेंद्रिय गूळ यांचा आहारामध्ये समावेश करावा. यासह औषधी वनस्पतींचे मिश्रण करा. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

पावसाळ्यात व्यायाम कसा करावा?

पावसाळ्यात सर्वसाधारणतः घाम येत नाही. तसेच बाहेर जाऊन चालणे, धावणे आदी व्यायामप्रकार करता येणे शक्य होत नाही. पावसाळ्यात एकदम खूप व्यायाम करण्यापेक्षा सौम्य व्यायाम, योगासने करावीत. घरच्याघरी सूर्यनमस्कार घालू शकता. पवन मुक्तासन, सेतू बंधनासन, पश्चिमोत्तानासन आणि ताडासन यासारखी योगासनेदेखील करू शकता. अनुलोम-विलोम सारख्या प्राणायामाने व्यायामाची सुरुवात करा. भस्त्रिका आणि शवासनाने व्यायाम करणे थांबवा.

घरच्या घरी जॉगिंग, स्पॉट जम्पिंग (एकाच जागी उड्या मारणे), जिन्यावरून चढ-उतार करणे करू शकता. पावसात सायकलिंगही करू शकता. सर्वच ऋतूंमध्ये आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. ऋतुमानानुसार आहार-विहारात बदलही करावे लागतात.

पावसाळ्यात कोणती फळे खावीत?

पीच: हे पचन सुधारण्यास मदत करते. हे फळ हृदय, डोळ्यांसाठी चांगले असते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. अभ्यासानुसार, पीच किंवा पीच फ्लॉवर अर्क त्वचेला ओलावा टिकवून ठेवण्यास आणि स्थानिक पातळीवर लागू केल्यावर अतिनील हानी कमी करण्यास मदत करू शकतात.

चेरी: चेरीमधील अँटिऑक्सिडंट्स घटक असतात. चेरी कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब कमी करण्यासाठीदेखील खूप प्रभावी आहे. चेरी असणारे पदार्थही तुम्ही खाऊ शकतात.

डाळिंब: हे पावसाळ्यात मिळणारे फळ आहे. सर्दी आणि ताप आला असल्यास या पदार्थाचे सेवन करावे. डाळिंबही अँटिऑक्सिडंट् आहे. संधिवात असलेल्यांसाठी हे उपयुक्त आहेत, तसेच डाळिंबामुळे रक्तदाबदेखील नियंत्रित होतो.

मनुका: व्हिटॅमिन, लोह, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांमुळे, मनुका हे पावसाळ्यातील सर्वोत्तम फळांपैकी एक मानले जाते. हे फळ अतिसारावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, ते श्वसन समस्या दूर करण्यास मनुका उपयुक्त आहेत.

पावसाळा आणि आहार रेसिपीज

) मिक्स भाज्यांचे पॅटीस- पावसाळ्यात भाज्या सर्व प्रकारच्या भरपूर येतात. कणसाचे कोवळे दाणे, उकडलेले रताळे बटाटे, गाजर, हिरवी मिरची,आले .

कणसाचे दाणे मिक्सर मधून अगदी अर्धा मिनिट फिरवून भरड करावेत. रताळे बटाटे उकडून कुस्करावेत,गाजर बारीक किसून घ्यावे, आलेमिरची वाटून घ्यावी. सर्व एकत्र मिसळावे त्याचा गोळा बनवावा. मग त्या गोळ्याचे छोटे छोटे भाग करून तांदुळाच्या पिठीवर जाडसर थापावेत. तव्यावर ठेवून खरपूस भाजावेत. भाजताना  बाजूने थोडे थोडे तेल सोडावे. लालसर भाजले गेले की काढावेत. हिरव्या पुदिनाच्या चटणी बरोबर गरम गरम खावेत. तळलेली भाजी खाण्यापेक्षा हा प्रकार जास्त हेल्दी आहे चविष्ट लागतो.

) धान्याचे वडे तांदूळ, बाजरी, - भाग, मुगडाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ प्रत्येकी अर्धा भाग. हे सर्व तास भिजत घालावे. नंतर मिक्सर मधून भरड काढावे. त्यामध्ये भरपूर लसूण,लाल मिरची,कोथिंबीर वाटून घालावी. तीळ ओवा घालावा.चवीप्रमाणे मीठ घालावे. या पिठात चमचे तेल गरम करून घालावे. केळीच्या पानावर वडे थापून ते तव्यावर ठेवून बाजूने तेल सोडून भाजावेत.

सारांश

पावसाळा आला की सगळेच फ्रेश आणि आनंदी दिसतात. प्रत्येकालाच या दिवसात खमंग, आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते, जे आरोग्यास हानिकारक असते. सर्वांचाच मूड बदलणारा पावसाळा येताना अनेक विविध आजार घेऊन येतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात योग्य आहार घेणे आवश्यक असते. कारण या दिवसात पचनक्रिया मंद झालेली असते. तसेच पावसाळयात दूषित अन्न आणि पाण्यामुळे जुलाब, अतिसार, कावीळ असे अनेक आजार डोके वर काढू लागतात. त्यामुळे पावसाळयातील आहार परिपूर्ण असणे आवश्यक असते.


कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know