Translate in Hindi / Marathi / English

Thursday, 4 July 2024

शरीराच्या तंदुरुस्तीसाठी झोप | अनेकदा असं होतं की रात्री लवकर झोपायचा प्रयत्न केला तरी चांगली झोप येत नाही किंवा लोकांना गाढ आणि निरोगी झोप मिळत नाही | झोप ही विश्रांती तजेलेपणाबरोबरच इतर अनेक लाभ देते | आयुर्वेदिक औषधे, मसाले आणि घरगुती वस्तूंचा वापर चांगल्या झोपेसाठी केला जाऊ शकतो | लहान मुलांची भरपूर छान झोप झाल्यावर उठल्यानंतर गोड हसून छान विश्रांती मिळाल्याची पावती देतात.

झोप

 

शरीराच्या तंदुरुस्तीसाठी झोप

झोप ही विश्रांती, तजेलेपणाबरोबरच इतर अनेक लाभ देते, हे वैज्ञानिक प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे. गाढ झोपेत शरीरात वृद्धीसंप्रेरके निर्माण होतात आणि त्यामुळे वार्धक्य दूर राहते. डोपामाइन नावाचे संप्रेरक झोपेदरम्यान स्रवते, त्यामुळे वेदना कमी होतात. झोप वेदनाशामक आहे.

जागरणाचे परिणाम

आपण आपल्या आयुष्याच्या ३६% वेळ झोपेमध्ये घालवतो, म्हणजे ९० वर्षे जगलेला माणुस सरासरी ३२ वर्ष झोपलेला असतो. ६०% पेक्षा जास्त आजारांमध्ये झोप येणे हे प्रमुख लक्षण असते. अश्या या सगळ्यांच्या आवडीच्या, आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे झोप. कामाच्या शिफ्टमुळे सुद्धा झोपेवर प्रचंड परिणाम झालेला असतो. २०% लोकांना झोपेचे आजार होतात, त्यांचे शरीरातील घड्याळ हे दिवसा काम करण्यासाठी बनलेले आहे, रात्रभर काम करून जेव्हा हे दुपारी झोपायचा प्रयत्न करतात, ते झोपूच शकत नाहीत, कारण त्यांचा मेंदू सांगत असतो, अरे अजून दिवस आहे ही झोपायची वेळ नाही. प्रवासातील साधनांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे जेट लॅग सारख्या गोष्टी घडतात.

झोप नैसर्गिक प्रक्रिया

झोप ही एक स्वाभाविक शरीरक्रिया आहे. यात शरीर, मन, ज्ञानेंद्रिये, मस्तिष्क विश्रांती घेत असतात. सर्वसामान्य मनुष्य त्याच्या आयुष्याचे / आयुष्य झोपेत घालवत असतो. एक दिवस जरी आपण शांतपणे झोपेविना घालवला तर काय होतं, हे प्रत्येकानं अनुभवलंच असेल. झोपेत श्वसनाची गती कमी होते. नाडीचे ठोके मंदावतात. रक्तदाब थोडा मंदावतो. स्नायू शिथिल होतात. थोडक्यात, सर्व शरीर विश्रांती घेत असते.

झोपेच्या कमतरतेमुळे तणाव आणि वजन वाढते

झोपेच्या कमतरतेमुळे एकाग्रता कमी होते, चीडचीडेपणा वाढतो, वैचारिक ताकद कमी होते. ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे, व्यसन आणि लठ्ठपणा यातदेखील वाढ होते. कमी झोपेमुळे घेरलीन नावाचे हार्मो रक्तामध्ये सोडले जाते, त्यामुळे साखर जास्त असणाऱ्या गोष्टी खाण्याकडे आपला कल वाढतो. थकलेल्या व्यक्तींमध्ये प्रचंड स्ट्रेस असतो हे देखील आपल्याला खाण्यासाठी उद्युक्त करतात आणि वजन वाढण्यासाठी हातभार लावतात. सततचा तणाव आणि त्याबरोबर जर कमी झोप असेल तर या गोष्टी आपली रोगप्रतिकारशक्ती कमी करतात.

उशीरापर्यंत जागू नये

लवकर निजे, लवकर उठे, त्यासी धन आरोग्यसंपदा भेटे, हा मोठ्यांचा सल्ला आपल्याला आठवतो; पण बरेच पालक स्वतः उशिरापर्यंत जागतात मूलही त्यांच्याबरोबर जागंच राहतं! काही मुलं झोपेत बडबडतात, काही अंथरुणात शू करतात, तर काही भीतीदायक स्वप्न पडल्यामुळे दचकून उठतात. बहुतेक वेळा दिवसा विचार त्यांच्या मनात असतात, त्यामुळे एकटे झोपल्यामुळे, अंधाराच्या भीतीमुळे आणि काही वेळा शारीरिक तक्रारींमुळे हे घडत अस म्हणून याकडे दुर्लक्ष / टाळाटाळ करता चिकित्सा करणे योग्य ठरते.

मेंदूला विश्रांती आवश्यक

आपला मेंदू आणि शरीरातील इतर अवयवांना योग्य प्रमाणात विश्रांती मिळण्यासाठी शांत झोप घेणे अतिशय आवश्यक आहे. जेव्हा आपण गहन निद्रेमध्ये असतो, तेव्हा आपले शरीर त्यामधील घातक द्रव्ये फिल्टर करण्याचे काम करीत असते. म्हणूनच शांत, गाढ झोप लागून आपण जागे होतो, तेव्हा आपले शरीर आपल्याला हलके वाटते, आणि मनही प्रसन्न असते. उत्तम निद्रा ही केवळ शरीरातील अवयवांसाठीच नाही, तर आपल्या त्वचेसाठी देखील अतिशय आवश्यक आहे. जर झोप अपूर्ण झाली असली, तर त्याचे दुष्परिणाम सर्वप्रथम त्वचेवर दिसून येतात. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे येणे. डोळे लालसर दिसू लागणे, किंवा चेहऱ्यावर हलकी सूज दिसून येणे, ही आवश्यक तितकी झोप मिळत नसल्याची लक्षणे आहेत. अपुऱ्या झोपेचे शारीरिक नाही, तर मानसिक दुष्परिणामही होत असतात.

झोप आणि विश्रांतीला प्राधान्य द्या

झोप आणि विश्रांतीकडे सध्याच्या वेगवान जगात दुर्लक्ष केले जाते. हातातील कामे, ऑफिसमधील टार्गेट आणि इतर प्राधान्यक्रमांकडे लक्ष देताना आपले झोपेकडे अनेकदा दुर्लक्ष होतो. तथापि, तंदुरुस्ती आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी शरीराला पुरेशी म्हणजे रोज रात्री किमान सात ते आठ तास शांत गाढ झोप मिळणे आवश्यक असते. त्यासाठी तुमच्या बेडरूममध्ये शांत, शांत आणि गडद झोपेचे वातावरण ठेवा. तुमच्या शरीराला आराम करण्याची वेळ आली आहे हे सांगण्यासाठी, आरामशीर झोपण्याच्या वेळेची दिनचर्या तयार करा.

उत्तेजक पेये टाळा

झोपण्यापूर्वी, कॅफीन, उत्तेजक क्रियाकलाप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर रहा कारण ते सर्व तुमची झोप किती चांगली आहे यावर परिणाम करू शकतात. तुम्हाला झोप येण्यास किंवा झोपण्यास त्रास होत असल्यास खोल श्वास घेणे किंवा ध्यान करणे यासारख्या पद्धती वापरण्याचा विचार करा. तुम्हाला अधिक ताजेतवाने आणि उत्साही बनवण्यासोबतच, पुरेशी झोप घेतल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, तुमच्या मेंदूच्या कार्याला आणि शारीरीक मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

शांत झोपेसाठी हे आहेत उत्तम घरगुती उपाय

अनेकदा असं होतं की रात्री लवकर झोपायचा प्रयत्न केला तरी चांगली झोप येत नाही किंवा लोकांना गाढ आणि निरोगी झोप मिळत नाही. पौष्टिक आहार जसा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, तशीच पुरेशी झोपही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आरोग्य तज्ञ देखील वयानुसार पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. आपल्या वयानुसार आपण किती तास झोपले पाहिजे हे आपल्याला माहित असले पाहिजे. पण काही लोकांसाठी झोप येणे ही मोठी समस्या असते. अशा वेळी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा. पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काही घरगुती उपायही करून पाहू शकता. यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल आणि आरामदायी झोप ही मिळेल.

मसाज

जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी पायात मोहरीच्या तेलाचा मसाज करा. पायाच्या तळव्याला मसाज केल्याने ताण कमी होऊन मनाला आराम मिळतो, ज्यामुळे चांगली झोप येते.

गाढ झोपेसाठीच्या पाच बेस्ट ड्रिंक्स

1. कॅमोमाइल टी: जर तुम्हाला रात्री उशिरा उठण्याची सवय असेल तर झोपण्यापूर्वी कॅमोमाइल चहा प्या. यात असलेले अपीजेन नावाचे घटक आपल्याला आरामदायक झोप घेण्यास मदत करतात. यामुळे तुम्हाला गाढ झोप येईल.

2. गरम दूध: रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात हळद किंवा मध मिसळून प्यावे. यामुळे तुम्हाला रात्री गाढ झोप येईल. खरं तर दुधात ट्रिप्टोफेन नावाचे अमिनो अॅसिड असते, जे झोपेसाठी फायदेशीर मानले जाते.

3. तुळशीचा चहा: तुळशीचा चहा बनवून रात्री चांगल्या झोपेसाठी प्या. यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल तसेच चांगली झोपही येईल. तुळशीमध्ये असलेले अँटी-स्ट्रेस गुणधर्म आपल्याला आराम देतात. ज्यामुळे तुम्ही उशीरा उठत नाही आणि बेडवर पडताच झोपू शकता.

4. लॅव्हेंडर चहा: लॅव्हेंडर हे एक सुगंधी फूल आहे ज्याचा चहा आपल्या डोक्याला आराम देण्यासाठी बनविला जातो. रात्री झोपण्यापूर्वी हा चहा प्यावा. यामुळे आपल्या मज्जासंस्थेला शांती मिळते ज्यामुळे झोप चांगली होते.

5. अक्रोडचे दूध: तुम्ही बदाम किंवा अक्रोड दुधात मिसळून पिऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी हे दूध प्या. तुमच्या खोलीत शांततापूर्ण वातावरण निर्माण करा आणि मस्त झोप. 

सारांश

विश्रांती घेतल्याने कार्यक्षमता वाढते, कामात एकाग्रता येते, ऊर्जा मिळते आणि शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारते, कामाचा कंटाळा कमी होतो आणि काम अधिक चांगले होते. उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर लहान मुलांची भरपूर छान झोप झाल्यावर उठल्यानंतर गोड हसून छान विश्रांती मिळाल्याची पावती देतात. झोपेच्या कमतरतेमुळे लोकांना सुस्ती, अशक्तपणा, आळस आणि अस्वस्थता जाणवते. आजच्या जीवनशैलीत झोपेशी संबंधित समस्या लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे, ज्यामुळे लोकांच्या एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. ज्यांना रात्री उशीरापर्यंत सुद्धा झोप न येण्याची समस्या आहे, ते काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकतात. आयुर्वेदिक औषधे, मसाले आणि घरगुती वस्तूंचा वापर चांगल्या झोपेसाठी केला जाऊ शकतो.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know