दीप अमावस्या
दीप अमावस्या म्हणजे काय?
श्रावण महिन्याच्या अगोदर येणारी अमावस्या
म्हणजे आषाढी अमावास्येला दिव्याची अमावस्या म्हणतात. आषाढ
महिन्याच्या
शेवटच्या
दिवशी
म्हणजेच
अमावस्येला
आषाढी
अमावस्या
किंवा
दीप
अमावस्या
असे
म्हणतात.
श्रावणाचा
पवित्र
महिना
सुरु
होण्याच्या
आदल्या
दिवशी
ही
अमवस्या
येत
असल्याने
घरातील
दिव्यांची
पूजा
केली.
श्रावण
महिन्यात
वेगवेगळ्या
सणांना
वापरल्या
जाणाऱ्या
दिव्यांची
हा
महिना
सुरु
होण्याआधीच
पूजा
करण्याचा
हा
सण
आहे.
दीप अमवास्येच्या
दिवशी
भगवान
शंकर,
पार्वती,
आणि
कार्तिकेय
यांची
पूजा
केली
जाते.
या
दिवशी
भगवान
शंकराचे
काही
भक्त
व्रतही
ठेवतात.
काही
ठिकाणी
महिला
आषाढ
अमावस्येला
तुळशी
किंवा
पिंपळाच्या
झाडाला
१०८
प्रदक्षिणाही
करतात.
या
दिवशी
पितरांना
तर्पण
देत
पुरणाचा
नैवैद्य
दाखवल्यास
पितर
प्रसन्न
होतात
असं
मानलं
जातं.
गरुड
पुराणानुसार
जे
आषाढ
अमावस्या
व्रत
करतात,
पूजा
करतात
आणि
दान
करतात
त्यांना
सर्व
प्रकारच्या
दोष
व
पापांपासून
मुक्त
केले
जाते.
या दिवशी आपल्या पूर्वजांच्या
नावाने
दान
करणे
शुभ
मानले
जाते.
या
दिवशी
उपवास
ठेवल्याने
मृत
पूर्वजांच्या
आत्म्यास
शांती
मिळते
असे
मानले
जाते.
या
दिवशी
झाडं
लावून
ग्रह
दोष
शांत
होतो
असंही
सांगितलं
जातं.
या
दिवशी
पिंपळ,
केळी,
लिंबू
किंवा
तुळशीचं
रोपटं
लावलं
जातं.
या
दिवशी
गंगास्थान
आणि
देणगी
देण्यालाही
फार
महत्व
असतं.
या
दिवशी
माशांना
पीठाच्या
गोळ्या
खायला दिल्या
जातात.
या दिवशी सकाळीच घरातील, दिवे, समया, निरांजने, लामण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. दिवे चकचकीत करुन पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. पाटाभोवती
रांगोळी
आणि
फुलांची
सजावट
करुन
सर्व
दिव्यांमध्ये
तेल
वात
लावून
प्रज्वलित
करुन
ही
दीप
पूजा
केली
जाते.
काही
ठिकाणी
ओल्या
मातीचे
दिवे
करुन
त्यांचीही
पूजा
केली
जाते.
हळद,
कुंकू,
फुले,
अक्षता
वाहून
दिव्यांची
पूजा
करण्यात
येते.
अनेकजण
कणकेचे
उकडलेले
गोड
दिवे
बनवून
त्यांचा
नैवेद्यही
दाखवतात.
सायंकाळी
सर्व
दिव्यांची
आरती
केली
जाते.
अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती
ही
प्रार्थना
म्हणून
लहान
मुलांना
ओवाळलं
जातं.
लहान
मुले
ही
वंशाचा
दिवा
असल्याचं
मानलं
जातं
म्हणून
त्यांना
ओवाळण्याची
प्रथा
आहे.
हिंदू
संस्कृतीमध्ये
दिव्याला
फार
महत्वाचं
स्थान
असून
घरातील
इडापिडा
टळावी,
अज्ञानाचा
अंधकार
दूर
व्हावा
आणि
दिवा
प्रकाश
देतो
तसा
ज्ञानाचा
प्रकाश
सर्वांच्या
आयुष्यात
पडावा
या
प्रार्थनेसहीत
दिव्यांची
मनोभावे
पूजा
केली
जाते. चातुर्मासातील
पहिल्या
आषाढ
महिन्यातील
शेवटची
तिथी
म्हणजे
आषाढ
अमावास्या.
कोणत्याही
शुभ
कार्याची,
कार्यक्रमाची
सुरुवात
दीप
प्रज्ज्वलनाने
केली
जाते.
घरात
सणा-समारंभाला
समई,
नंदादीप,
दिवे,
पणत्या
प्रज्वलित
केल्या
जातात.
दीप
पूजेच्या
निमित्ताने
त्या
पुन्हा
नीट
साफ
करून
त्यांची
पूजा
करण्याची
रीत
आहे.
यासाठी
चौरंगावर
लाल
कापड
पसरून
दिवे
ठेवून
ते
प्रज्वलित
करून
पूजा
केली
जाते.
चौरंगाभोवती
फूलांची
आरास
करण्याची,
रांगोळी
काढण्याची
देखील
पद्धत
आहे.
या
निमित्ताने
पुढे
येणार्या श्रावण महिन्याचं
स्वागत
केले
जाते.
सत्कर्माचा साक्षीदार दिवा होत असतो. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते, दिवा लावला जातो आणि दान धर्म केले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. वास्तविक भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितरांचे स्मरण करून पिंडदान केले जाते. मात्र, आषाढ अमावास्येला काही ठिकाणी पित्रृ तर्पण दिले जाते. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पितरांच्या स्मरणार्थ एक दीप प्रज्ज्वलित केला जातो. पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृ तर्पण. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते. दुसरीकडे, श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो. हवा कुंद असल्यामुळे पचनशक्तीही कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पचत नाही. तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो. म्हणून मासे खाणे टाळले जाते. पावसाळ्याच्या दिवसात काळोख दाटलेला असतो. अशा काळी घरातील दिवे घासून पुसून त्यांना नीट तेलपाणी देण्यासाठी दिव्यांची आरास करून त्यांचं पूजन करण्याची रीत असावी असा जुन्या- जाणत्या लोकांचा अंदाज आहे. अमावस्येच्या दिवशी पितरांना नैवेद्य आणि दान केले जाते. आषाढ
अमावस्येला जसे दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी
वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे. या दिवशी
पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा दीप पूजा आणि पूर्वजांच्या
पूजेचा उद्देश पूर्ण करतो.
दीप अमावस्या कशी साजरी करावी?
अमावस्येच्या
दिवशी
घरात
ठेवलेले
दिवे
स्वच्छ
केले
जातात.
यानंतर,
टेबलावर
स्वच्छ
कापड
पसरवा
आणि
दिवा
ठेवा.
हे
तिळाच्या
तेलाने
किंवा
तूपाने
जाळले
जातात.
या
दिव्यांची
फुले
व
नैवेद्याने
पूजा
केली
जाते.
अनेक
घरांमध्ये
या
दिवशी
पिठाचा
दिवा
प्रसाद
म्हणून
केला
जातो.
दीपपूजनाची आख्यायिका कथा
दीपपूजनाची
आख्यायिका
पुराणात
सांगितली
आहे.
आटपाट
नगर
होते.
तिथे
एक
राजा
होता.
त्याला
एक
सून
होती.
तिने
एके
दिवशी
घरातील
पदार्थ
स्वतः
खाल्ला.
उंदरांवर
आळ
घातला
आणि
आपल्यावरील
प्रवाद
टाळला.
इकडे
उंदरांनी
आपल्यावर
उगाच
आळ
घेतला
म्हणून
तिचा
सूड
घेण्याचे
ठरवले.
सर्वांनी
मिळून
एके
रात्री
तिची
चोळी
पाहुण्यांच्या
दालनात
नेऊन
टाकली.
दुसऱ्या
दिवशी
तिची
फजिती
झाली.
सासू
आणि
दिराने
निंदा
केली.
घरातून
तिला
घालवून
दिले.
तिचा
रोजचा
नेम
असे
की,
रोज
दिवे
घासावेत,
तेलवात
करावी
आणि
स्वतः
प्रज्ज्वलित
करावे.
खडीसाखरेने
त्यांच्या
ज्योति
साराव्या.
दिव्यांच्या
अवसेच्या
दिवशी
त्यांना
चांगला
नैवेद्य
दाखवावा.
तिला
घरातून
घालवल्यानंतर
तिचा
हा
नेम
खंडीत
झाला.
पुढे
कालांतराने
दिव्यांच्या
अवसेच्या
दिवशी
राजा
शिकारीहून
येत
होता.
एका
झाडाखाली
तो
मुक्कामाला
उतरला.
तिथे
त्याच्या
दृष्टीला
एक
चमत्कार
घडला.
आपले
सर्व
गावातील
दिवे
झाडावर
येऊन
बसले
आहेत.
एकमेकांशी
गप्पा
गोष्टी
करीत
आहेत.
कोणाच्या
घरी
जेवायला
काय
केले,
कोणी
कशी
पूजा
केली
वगैरे
गोष्टी
सुरू
होत्या.
सर्वांनी
आपापल्या
घरी
घडलेली
हकीकत
सांगितली.
त्यांच्यामागून
राजाच्या
घरचा
दिवा
सांगू
लागला
की,
बाबांनो
काय
सांगू,
यंदा
माझ्यासारखा
हतभागी
कोणी
नाही.
मी
दरवर्षी
सर्व
दिव्यांत
मुख्य
असायचा.
माझा
थाट-माट जास्त व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतके म्हटल्यावर
त्याला
सर्व
दिव्यांनी
विचारले
की,
असे
होण्याचे
कारण
काय?
मग
दिव्याने
त्या
दिवशी
राजाच्या
घरी
घडलेला
सर्व
प्रकार
अगदी
सविस्तर
आणि
विस्तृतपणे
सांगितला.
म्हणून
मला
हे
दिवस
पाहायला
लागत
आहेत.
हा
सर्व
घडलेला
प्रकार
राजाने
श्रवण
केला.
आपल्या
सूनेचा
अपराध
नाही,
अशी
त्याची
खात्री
झाली.
घरी
आला.
त्या
दिवशी
झालेल्या
प्रकाराबाबत
चौकशी
केली.
तिला
मेणा
पाठवून
माघारी
आणले.
झाल्या
प्रकाराबाबत
तिची
क्षमा
मागितली.
साऱ्या
घरात
मुखत्यारी
दिली.
तिला
दिवा
पावला.
जसा
तिच्यावरील
आळ
टळला,
तसा
तुमच्या
आमच्यावरील
आळ
टळो,
ही
साठा
उत्तराची
कहाणी
पाचा
उत्तरी
सुफळ
संपूर्ण.
गटारी अमावस्या
दिव्याची अमावास्येचं
आपलं
महत्त्व
असलं
तरी
अनेक
लोकं
ही
अमावस्या
गटारी
अमावस्या
म्हणून
साजरी
करतात.
श्रावण
महिन्यात
अनेक
लोकं
मांस,
मद्य
व
इतर
अनेक
पदार्थांचे
सेवन
वर्ज्य
करतात.
हा
एक
महिना
सुरू
होण्याआधी
या
पदार्थांचे
भरपूर
सेवन
करण्याची
अनेक
ठिकाणी
परंपरा
झाली
आहे.
या
दिवशी
भरपूर
प्रमाणात
मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते. पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी
अमावस्येच्या
दिवशी
पिऊन
आणि
मांसाहार
करून
उणीव
भरून
काढण्याचा
प्रयत्न
केला
जातो.
जे
नियम
पाळत
नाही
तेही
हा
दिवस
मात्र
जोरात
साजरा
करतात.
कारण
पिण्यार्यांना
तर
पिण्याचा
बहाणा
पाहिजे.
त्यांच्यासाठी
तर
ही
एक
पर्वणीच.
मद्यसेवन
करून
गटारीत
लोळण्यासाठीच
हा
दिवस
असतो.
अर्थात
ती
साजरी
करताना
कोणीच
गटारात
वगैरे
लोळत
नाही.
सारांश
घरात
सणा-समारंभाला समई, नंदादीप, दिवे, पणत्या प्रज्वलित केल्या जातात. दीप पूजेच्या निमित्ताने
त्या पुन्हा नीट साफ करून त्यांची पूजा करण्याची रीत आहे. यासाठी चौरंगावर लाल कापड
पसरून दिवे ठेवून ते प्रज्वलित करून पूजा केली जाते. चौरंगाभोवती फूलांची आरास करण्याची,
रांगोळी काढण्याची देखील पद्धत आहे. या निमित्ताने पुढे येणार्या श्रावण महिन्याचं
स्वागत केले जाते.
गटारी अमावस्येच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह बसून भोजन करावे. या दिवशी मांसाहार करणारे लोक नक्कीच मांसाहार करतात आणि जे दारूचे सेवन करतात ते देखील या दिवशी नक्कीच दारूचे सेवन करतात. महाराष्ट्रात भगवान शिवाचा पवित्र महिना श्रावण सुरू झाला कि त्या दिवसापासून भाविकांना मांस आणि मद्य सेवन करण्यास पूर्णपणे बंदी असेल. ही अमावस्या उत्तर भारतात हरियाली अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि पितरांना तर्पण अर्पण करण्याची परंपरा आहे.
कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावावाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know