Translate in Hindi / Marathi / English

Sunday, 28 July 2024

लठ्ठपणा व वजन | वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधे खातात, डॉक्टरांकडे जातात अजून व्यायाम करतात | वजन वाढण्याची कारणे व उपाय | लठ्ठपणा वाढण्याचे सर्वात मोठे कारण फास्ट फूड आहे | स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरोन लेवल वाढते जे की लठ्ठपणा वाढण्याचे कारण होते | वजन घटवण्याचे आणि लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय | चांगला आहार घेतल्यास लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते

 लठ्ठपणा व वजन

 

 वजन वाढण्याची कारणे व उपाय

वजन लठ्ठपणा वाढण्याची समस्या आत्ताच्या काळात अधिकांमध्ये दिसून येते. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधे खातात, डॉक्टरांकडे जातात अजून व्यायाम करतात.

लठ्ठपणा ची कारणे

लठ्ठपणा वाढण्याचे सर्वात मोठे कारण फास्ट फूड आहे. आताच्या काळात बाजारात नवीन नवीन प्रकारचे फास्ट फूड येत आहे, त्याच्यामुळे शरीरातील फॅट चे प्रमाण वाढते आणि लठ्ठपणा होत जातो. कधी कधी लठ्ठपणा अनुवांशिक असू शकतो. म्हणजे ज्यांचे आई वडील लठ्ठ असतील. अन्न प्रमाणाच्या बाहेर जाऊन खाल्ल्याने सुद्धा लठ्ठपणा वाढतो. काही माणसे खाण्यासाठी कंट्रोल करीत नाही सारखे काही ना काही खात असतात. गर्भवस्था च्या दिवसांमध्ये स्त्रियांमध्ये पोलीसाइटिक ओवरी सिंड्रोम १० ते २० प्रमाणात इफेक्ट होतो, यामुळे स्त्रियांमध्ये टेस्टोस्टेरोन लेवल वाढते जे की लठ्ठपणा वाढण्याचे कारण होते. नियमित व्यायाम करणे.

वजन घटवण्याचे आणि लठ्ठपणा कमी करण्याचे उपाय

सगळ्यात पहिल्यांदा रोज सकाळी कप गरम पाणी लिंबू टाकून पिणे. याच्यानंतर दिवसभरात कधी ही जेवल्यानंतर खूप पाणी पिणे.

कधी चहा पिण्याचे मन झाले तर ग्रीन टी पिणे. दूध टाकून केलेल्या चहामध्ये अधिक प्रमाणात फॅट असते.

जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर साखरेचा प्रयोग कोणत्याही प्रकारे करणे. साखरेमध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. याच्याबरोबर पास्ता, चाईनीज खाऊ नये.

जेवढया प्रमाणात हिरव्या पालेभाज्या खाता येतील तेवड्या खाव्यात, याच्यामुळे लठ्ठपणा वाढत नाही.

दिवसभरामध्ये - पेक्षा जास्त जेवण करू नये.

संध्याकाळी वाजल्याच्या नंतर जेवण करू नये.

विविध प्रकारच्या स्ट्रेस मुळे हार्मोन्स वाढत्यात त्यामुळे लठ्ठपणा वाढत जातो.

नियमित व्यायाम करणे.

वजन कमी करणे /लठ्ठपणा घटवणे शारीरिक वर्कआऊट उदाहरणे

·      एरोबिक्स तुम्ही घरामध्ये डांस करू शकता त्याचे तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता.

·      प्राणायाम प्राणायाममध्ये कपालभाती करू शकता.

·      योगा        याच्यामध्ये सूर्यनमस्कार करू शकता, योग प्रशिक्षण घेऊन करावा.

·      जीम याच्यामुळे शरीर मजबूत बनते.

·      कार्डिओ  जीम बरोबर कार्डिओ म्हणजे रनिंग, सायकलिंग.

·      जर वजन कमी करायचे असेल तर खाणे पिण्याबरोबर शारीरिक व्यायाम जरूरी आहे.

जीवनशैलीतील चुका सुधारून कमी करा ताण लठ्ठपणा

रोजच्या कामाच्या धावपळीत व्यस्त दिनचर्येमुळे महिला नेहमीच गडबडीत खाणे, नाश्ता टाळणे, पुरेशी झोप घेणे, खराब पोश्चरमध्ये राहणे अशा चुका करीत असतात. रोजच्या कामात या चुका नकळत होत असल्या तरी त्या महिलांच्या आरोग्यास घातक ठरू शकतात.

लठ्ठपणा यामुळे महिलांमध्ये तणाव, रक्तदाब, मानसिक आरोग्य, नैराश्य आणि पोटासंबंधित अनेक आजारांचा धोकाही वाढतो. यातील बहुतेक चुका जीवनशैलीत छोटे छोटे बदल करून सुधारता येऊ शकतात. याची सोपी पद्धत या चुका ओळखून त्याकडे लक्ष देणे. यामुळे फक्त आरोग्यच उत्तम होणार नाही तर भविष्यात होणारे गंभीर आजारही टाळता येऊ शकतील.

. नाश्ता केल्यास एकाग्रता घटते: हेल्थकॅस्टल. कॉमची फाउंडर डायटिशियन ग्लोरिया त्सँगच्या मते सकाळचा नाश्ताच दिवसभर शरीराला काम करण्यासाठी भरपूर ऊर्जा पुरवतो. जेव्हा आपण नाश्ता करीत नसता तेव्हा शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी संथपणे काम करू लागते. यामुळे मेटाबॉलिज्म प्रभावित होत असते. ज्यामुळे एकाग्रता घटते. जर आपण नाश्ता करीत नसाल तर ब्लड शुगरची पातळी टिकवून ठेवण्यासाठी कार्टिसोलची पातळी वाढत राहील. जी इन्शुलिन प्रतिरोधाचे कारण होत असते. अमेरिकन जर्नल ऑफ एपिडिमियोलॉजीच्या अध्ययनात आढळले आहे की, नाश्ता करणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणाची भीती जास्त असते.

काय करावे: सकाळी उठल्यानंतर दोन तासांत नाश्ता करून घ्यावा. यात प्रोटीन, चरबी कार्बोहायड्रेटच्या पदार्थांचे मिश्रण असावे.

. अव्यवस्थित झोपेमुळे इम्यून सिस्टीम कमकुवत होते: कॅनडाच्या बेटर स्लीप काउंसिलनुसार सोफा . वर अव्यवस्थितपणे झोपणे झोपेचा क्रम बिघडवते. ज्यामुळे हार्मोन मेटाबॉलिज्म प्रभावित होत असते. इम्यून सिस्टीम कमकुवत होत असते. ज्यामुळे आजारांशी लढण्याची क्षमता कमी होते.

काय करावे: नेहमी व्यवस्थित रूपात ठराविक जागीच झोपा. झोपण्याच्या एक तास आधी टीव्ही बंद करा. घरच्यांसोबत गप्पा मारा. फिरायला जा.

. खराब पोश्चरमुळे तणाव, डोकेदुखीची समस्या: कॅनडाची क्रियोपॅक्टर रोंडा किर्कवुडनुसार डोक्याचे वजन सुमारे . किलोग्रॅम असते. जर डो खांद्यावर व्यवस्थित प्रकारे राहत नसेल तर मानेच्या स्नायूंवर जास्त ताण पडतो, ज्यामुळे तणाव डोकेदुखी होते.

काय करावे: नेहमी वजन संतुलित ठेवून बसावे. खांदे मागे राहावेत. हनुवटी खाली ठेवावी. कोपर ९० अंशांवर असावेत.

. एकटे राहिल्यास उच्च रक्तदाब मेंदूच्या समस्या: एकाकीपणा मानसिक समस्यांच्या सर्वांत मोठ्या कारणांपैकी एक आहे. वेब एमडीच्या मते दीर्घकाळपर्यंत एकटे राहिल्यामुळे महिलांमध्ये हाय ब्लडप्रेशर, नैराश्य आणि मेंदूसंबंधित आजार म्हणजेच अल्झायमर्सचा धोका वाढतो. एकटेपणामुळे झोपेवर परिणाम होत असतो ज्यामुळे इतर अनेक समस्या होत असतात.

काय करावे: जर आपल्याला एकाकी वाटत असेल तर जास्तीत जास्त अशा कामांत गुंतावे ज्यामध्ये बाहेरचे लोक सामील असतील. फिजिकली नसेल तर फोनवरून का होईना लोकांच्या संपर्कात राहा.

बालपणातील लठ्ठपणा, त्याची कारणे आणि चिन्हे समजून घेणे

बालपणातील लठ्ठपणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैद्यकीय गंभीर आजारामुळे मुले आणि किशोरवयीन मुले प्रभावित होतात. हे अधिक चिंताजनक आहे कारण बालपणातील लठ्ठपणा मुलांना वारंवार आरोग्याच्या समस्यांसाठी सेट करते.

मधुमेह

उच्च रक्तदाब

उच्च कोलेस्टरॉल

मंदी

बालपणातील लठ्ठपणामुळे मुलांमध्ये कमी आत्मसन्मान आणि नैराश्य येऊ शकते. कौटुंबिक खाण्याच्या आणि व्यायामाच्या सवयी सुधारणे हे बालपणातील लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि मुलाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

बालपणातील लठ्ठपणाची लक्षणे काय आहेत?

सर्व जादा वजन असलेल्या मुलांमध्ये शरीरात जास्त चरबी नसते; काहींचे फ्रेम आकार मोठे असू शकतात.

मुलांच्या विकासाच्या अवस्थेनुसार त्यांच्या शरीरातील चरबीची पातळी नैसर्गिकरित्या भिन्न असते.

केवळ दिसणे हे सूचित करू शकत नाही की मुलाचे वजन आरोग्यास धोका आहे की नाही.

बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) हे जास्त वजन आणि लठ्ठपणाचे स्थापित सूचक आहे, जे वजन-उंची गुणोत्तर प्रदान करते.

गरज भासल्यास अतिरिक्त चाचण्यांसह वाढीचे तक्ते आणि BMI गणने, डॉक्टरांना मुलाच्या वजनाशी संबंधित संभाव्य आरोग्य धोक्यांचे मूल्यांकन करण्यात मदत करतात.

बालपणातील लठ्ठपणाची कारणे काय आहेत?

बालपणातील लठ्ठपणाचे मुख्य कारण म्हणजे जीवनशैलीचे निर्णय. बालपणातील लठ्ठपणाची कारणे मात्र आनुवंशिक आणि हार्मोनल असू शकतात. बालपणातील लठ्ठपणाची काही महत्त्वाची कारणे आणि जोखीम घटक खालीलप्रमाणे आहेत:

आहार: फास्ट फूड, पॅक केलेले पदार्थ, भाजलेले पदार्थ, कँडीज, मिष्टान्न आणि साखरयुक्त पेये यासारखे कॅलरी असलेले पदार्थ आणि पेये

व्यायाम अभाव: टेलीव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळणे यासारख्या गतिहीन क्रियाकलाप.

कुटुंब: कुटुंबातील लठ्ठपणा आणि जास्त वजनाचा इतिहास.

मानसशास्त्रीय घटक: एक येत तणावपूर्ण वैयक्तिक, पालक किंवा कौटुंबिक जीवन; कंटाळा किंवा तणाव दूर करण्यासाठी खाणे.

सामाजिक आर्थिक घटक: संसाधनांचा अभाव, पौष्टिक आहाराचे पर्याय किंवा व्यायाम सुविधा.

डॉक्टरांना कधी भेटायचे?

मुलाचे वजन खूप वाढत असल्याची तुम्हाला काळजी वाटत असल्यास त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बालरोगतज्ञ मुलाच्या वाढीचे आणि विकासाचे पूर्वीचे नमुने, उंचीच्या वजनाचा कौटुंबिक इतिहास आणि वाढीच्या तक्त्यामध्ये मूल कुठे आहे याचा विचार करेल. यामुळे मुलाचे वजन अस्वास्थ्यकर श्रेणीत आहे की नाही हे शोधण्यात मदत होऊ शकते.

बालपणातील लठ्ठपणाचे निदान कसे केले जाते?

मूल लठ्ठ आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी, डॉक्टर मुलाच्या बीएमआयची गणना करतील, मुलाच्या टक्केवारीचे परीक्षण करतील आणि वयाच्या वाढीनुसार बीएमआयमध्ये मूल कोठे येते ते ठरवेल. मुलाचे वजन जास्त आहे की लठ्ठ आहे हे निर्धारित करण्यासाठी, डॉक्टर देखील विचारात घेतील;

मुलाची वाढ आणि विकास

खाण्याच्या सवयी

व्यायामाची पातळी

कोणतीही आरोग्य स्थिती

सायकोसोशल व्हेरिएबल्स

कौटुंबिक आरोग्य इतिहास

लठ्ठपणाशी निगडित कोणत्याही परिस्थितीसाठी तपासणी करण्यासाठी डॉक्टर निदानात्मक रक्त चाचणीचा सल्ला देखील देऊ शकतात, यासह;

उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह,

कमी व्हिटॅमिन डी पातळी

हार्मोनल असंतुलन आणि इतर

बालपणातील लठ्ठपणाचा उपचार कसा केला जातो?

मुलाचे वय आणि इतर वैद्यकीय समस्यांवर अवलंबून, बालपणातील लठ्ठपणासाठी उपचार दिले जातात. उपचारांमध्ये सामान्यत: वाढलेली शारीरिक हालचाल आणि मुलासाठी आहारातील बदल यांचा समावेश होतो.

काही किशोरवयीन मुलांसाठी वजन कमी करण्याच्या सर्वसमावेशक योजनेचा भाग म्हणून औषध कधीकधी दिले जाऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये, बालपणातील लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी वजन-कमी शस्त्रक्रिया वापरली जाऊ शकते.

बालपणातील लठ्ठपणा कसा टाळता येईल?

बालपणातील लठ्ठपणाची समस्या सहजासहजी सुटू शकत नाही. तथापि, बालपणातील लठ्ठपणा रोखण्यासाठी पालक आणि इतर प्रौढ अनेक प्रकारे योगदान देऊ शकतात. बालपणातील लठ्ठपणा थांबवण्याचे मार्ग हे आहेत:

आरोग्यदायी पद्धतींचा अवलंब करा: आरोग्यदायी पद्धतींचा अवलंब करणारे पालक बालपणातील लठ्ठपणा कमी करू शकतात. मूल तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे पालन करते. जर त्यांनी तुमचे चांगले खाणे आणि व्यायाम केले तर ते त्यांच्या सवयी बदलण्याची शक्यता जास्त असेल.

साखरेचे सेवन कमी करा: तुमच्या मुलाच्या रोजच्या 10% पेक्षा जास्त साखरेचा वाटा नसावा कॅलरीज जर ते दोनपेक्षा मोठे असतील. साखरयुक्त पेये टाळा आणि त्याऐवजी पाणी किंवा कमी चरबीयुक्त दूध द्या. दोन वर्षांखालील मुलांनी कोणतीही जोडलेली साखर अजिबात खाऊ नये.

उत्तम झोपेला प्रोत्साहन द्या: सहा ते बारा वयोगटातील मुलांना प्रति रात्र नऊ ते बारा तासांची झोप लागते आणि १३ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांना रात्री अंदाजे आठ ते दहा तासांची झोप लागते. कमी झोपेमुळे मुलांना जास्त खाण्याची आणि कमी सक्रिय होण्याची इच्छा निर्माण होऊन लठ्ठपणा येऊ शकतो.

सारांश

लठ्ठपणा कमी करण्याठी अनेकजण विविध उपाय करतात. काही लोक जीममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करून आरोग्यावर लक्ष देतात. तर काही जण गरम पाणी पितात. इतकेच नाही तर जेवण सोडून सॅलेड खाण्यावर भर देतात. पण असे करूनही वजन कमी होत नाही. उलट अधिक मानसिक, शारीरिक त्रास होतो. पण, लठ्ठपणा तुमच्या जनुकांमध्ये असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे. लंडनमध्ये झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की 74 अनुवांशिक म्यूटेशनमुळे तुम्हाला लठ्ठपणाचा धोका संभवतो. म्हणजेच लठ्ठपणा हा केवळ व्यायामाचा अभाव किंवा अति खाण्याने होतो असे नाही. संशोधन स्पष्टपणे सांगते की चांगला आहार घेतल्यास लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावावाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know