Translate in Hindi / Marathi / English

Friday, 5 July 2024

अळू खाल्ल्याने फायदे | अळूची पात्तळ भाजी अळूच फतफत | भरपूर पाण्यामुळे कोकणातल्या आळवाची पान जरी मोठी असली तरी ते खूपच कोवळं आणि मऊ असतं त्यामुळे त्याची भाजी छान मिळून येते आणि चवीला ही सुंदर लागते | अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते | कुरकुरीत खमंग अळूवड्या

पौष्ठिक अळूची माहिती

 

अळू खाल्ल्याने फायदे

कोकणात प्रत्येकाच्या आगरात अळू, केळी आणि कर्दळी असतातच. उन्हाळयात पाण्याच्या कमतरतेमुळे जरा कोमेजल्या तरी तग धरून असतात. पावसाला सुरुवात झाली की मात्र भरपूर पाण्यामुळे अगदी तरारून येतात. केळी साठी नाही पण अळू आणि कर्दळी साठीमाजणेहा खास शब्दप्रयोग ही वापरात आहे.

पावसाळ्यात अळू अक्षरशः फोफावत, त्याची पान ही अगदी हत्तीच्या कानाइव्हढी मोठी होतात, देठी चांगली जाडजूड होते. आळवाचा दळा इतका भरगच्च होतो की भाजीसाठी अळू कापायला जाताना ही किरडू मारडू निघेल की काय अशी भीती वाटते. शहरात मिळत तस तळहाता एवढ्या पानांचं आणि सुतळी सारख्या देठांचं अळू खर तर घेववत ही नाही हातात पण नाईलाज असतो. इकडे शहरात मिळतं तस वडीचं किंवा भाजीचं असं सेपरेट अळू नसतं कोकणात आमच्याकडे. पांढऱ्या देठाचं आणि कमी डार्क पानांचंच अळू असत आमचं आणि आम्ही त्याच्याच वड्या आणि पात्तळ भाजी असं दोन्ही करतो.

अळूची पातळ भाजी अळूच फतफत

पूर्वी कोकणात मार्केट हा प्रकारचं नव्हता, घरात जे पिकेल तेच आणि फक्त तेच खावं लागे. त्यामुळे पावसाळ्यात आठवड्यातून तीन वेळा तरी अळूची पात्तळ भाजी होत असे. तिलाफतफतहा खास शब्द ही आहे पण का कोण जाणे इतक्या चवदार भाजीला मला तो शब्द वापरणे आवडत नाही. तसं ही कोकणात आमच्याकडे फ़दफद किंवा पात्तळ भाजी यापैकी काही ही म्हणता नुसतंअळूच फतफत म्हटलं जातं अळूच्या पात्तळ भाजीला. भरपूर पाण्यामुळे कोकणातल्या आळवाची पान जरी मोठी असली तरी ते खूपच कोवळं आणि मऊ असतं त्यामुळे त्याची भाजी छान मिळून येते आणि चवीला ही सुंदर लागते. चिंच, (आळवाच्या कोणत्याही पदार्थात काही तरी आंबट घालावं लागतंच नाहीतर घशाला खवखवत ) गूळ, दाणे, आठळ्या, खोबऱ्याच्या कातळ्या आणि काजूगर घातलेली ती भाजी घरात सगळ्यांनाच प्रिय. वरण भात आणि अळूची भाजी हा फेवरेट मेन्यू. त्याचा दुसरा फायदा म्हणजे त्या दिवशी वेगळी भाजी नाही केली तरी चालत असे. अर्थात हे मी पन्नास साठ वर्षांपूर्वीच लिहितेय, आता कोकण ही बदललं आहे. असो. कधी कधी उपासाचं अळू ही करतो. त्याला थोडं दाण्याचं कूट, जिरं आणि हिरवी मिरची वाटून लावतो म्हणजे छान मिळून येतं.

कुरकुरीत खमंग अळूवड्या

कधी तरी क्वचित सणावाराला अळू वड्या ही होतात ह्याच आळवाच्या. अश्या कुरकुरीत खमंग अळूवड्या मी इतर कुठे ही खाल्ल्या नाहीयेत. परंतु कोकणातल्या माणसांना तळलेल्या गोष्टींपेक्षा उकडलेले पदार्थ जास्त आवडतात त्यामुळे अळूवड्यांची भाजीच बरेच वेळा केली जाते. म्हणजे वड्यांसारखे उंडे करून ते उकडून गार झाले की त्याच्या चौकोनी फोडी करायच्या छोट्या छोट्या आणि त्या तीळ आणि थोडं जास्त तेल घातलेल्या फोडणीत हलक्या हाताने परतायच्या. वरून भरपूर ओल खोबरं घातलं की भाजी तयार. ही भाजी चवीला खूप छान लागते आणि भाजी सारखी पोळीला लावून खाता येते आणि पुन्हा कमी तेलकट. अर्थात उंडे करण्याचा व्याप मात्र आहे. कधी कधी अळूवड्या तळता नारळाच्या रसातल्या अळूवड्या ही करतो. मीठ, तिखट वैगेरे घातलेल्या नारळाच्या रसात अळूवड्या थोड्या शिजवल्या की ही सात्विक चवदार भाजी तयार होते.

आरोग्यासाठी अळूची पाने

आपल्या आरोग्यासाठी अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते, परंतु पाहिजे तितक्या प्रमाणात ही भाजी लोकप्रिय नाही. अळूच्या पानांमध्ये , बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांपासून जर सुटका हवी असेल तर या पानांचे सेवन करणे कधीही चांगले असते.

) ब्लड प्रेशर: आहारात अळूच्या पानांचा समावेश केल्याने या पानांमधील पोषक तत्वे शरीरातील रक्तदाब नियंत्रित करतात. या पानांचे सेवन केल्याने तणावाची समस्या देखील होत नाही. अळूच्या पानांमधील पोषक तत्वे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

) डोळ्यांची दृष्टी: व्हिटॅमिनअळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात असते, जे की डोळ्यांसाठी अधिक फायदेशीर आहे. तसेच डोळ्यांच्या मांसपेशी यामुळे मजबूत होतात.

) पोटाच्या विकारांवर फायदेशीर: जर तुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या असतील तर अळूच्या पानाच्या सेवनामुळे पोटाचे त्रास थांबतात, तसेच पचनक्रिया देखील सुरळीत होते.

) सांधेदुखी: जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असेल, तर दररोज अळूच्या पानांचे सेवन केल्याने सांधेदुखी थांबू शकते. या पानांच्या सेवनामुळे सांधेदुखीवर आराम मिळतो.

) वजन कमी करण्यासाठी फायदेशीर: वजन कमी करण्यासाठी अळूची ही खूप फायदेशीर असतात. या पानांमधले फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. यामध्ये अस्तित्वात असलेलं फायबर मेटाबॉलिज्मला सक्रिय करतं. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

६) पूरळ दूर करण्यासाठी गुणकारी: जर तुमच्या शरीरावर कुठेही पूरळांची समस्या जाणवत असेल आणि त्यावर उपचार करून कोणताही फायदा होत नसेल तर एकदा अळूची पानं वपरून पहा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यासाठी अळूची पानं जाळून त्यांची राख नारळाच्या तेलामध्ये मिक्स करून लावा. त्यामुळे पूरळ नाहीसे होण्यास मदत होईल.

ऋषी पंचमी भाजी

ऋषी पंचमीच्या भाजीत ही घरच्या भेंडी, भोपळा, माठ, पडवळ , काकडी दुधी, सुरण ह्या बरोबर अळू लागतंच. श्राद्ध किंवा पक्ष असेल घरात तर अळू करावंच लागत. श्रद्धा चा स्वयंपाक अळू शिवाय अपूर्णच असतो. काही ठिकाणी तर त्यामुळेच शुभ कार्याच्या मेन्यूमध्ये अळूचा समावेश नसतो. अळू निषिद्ध मानलं जातं. दिवाळीच्या सुमारास वरची पानं सुकली की तिथे खणून खालती लागलेल्या आळकुडया काढल्या जातात. मीठ आणि कोकम घालून उकडल्या की मस्तच लागतात. उत्तर प्रदेशात आणि सिंधी समाजात ह्या आळकुडया म्हणजे आर्वी फार पॉप्युलर आहे. ते ह्यांची चमचमीत सुखी करतात पण आम्ही उकडून खाण्याशिवाय जास्त काही करत नाही.

अळूच्या पानांचे प्रकार

अळूच्या पानांची पातळ भाजी फदफदं म्हणून हिणवली जात असली तरी लग्नाच्या जेवणाच्या पंगतीत मात्र भलताच भाव खाऊन जाते. वापरलेल्या पाण्यावर वाढणारे हे अळू बीटा कॅरोटिन, फॉलेट, रिबोफ्लोवीन अणि थायमिनने समृद्ध आहे. एखाद्या पाणीदार भाजीचा उल्लेख 'फदफदं' म्हणून तुच्छतेनं केला जात असला, तरी अळूच्या खरोखरच्या फदफद्याची चव काही न्यारीच. अळूच्या वड्या तर त्याहूनही अधिक स्वादिष्ट. सर्वसामान्यतः बाजारात अळूचा एकच प्रकार उपलब्ध असतो. मात्र या रुचकर, चवदार अळूचेही कितीतरी प्रकार असतात. अळूची भाजी किंवा अळूची वडी ही महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची खास ओळख. अनेक घरांच्या परसबागेत ही अळू सहजपणे वाढते. अळूसाठी जमिनीत नेहमी ओलावा लागतो किंवा दलदलीची जमीन लागते. अळूमध्येही अनेक प्रकार असतात, हे क्वचितच माहीत असतं. रानअळू, गावठी अळू, तेराअळू, पत्राभजी, ब्रह्मराक्षस, रुखाळू. असे विविध प्रकार या अळूच्या भाजीचे आहेत. या भाजीची पानं, खोड आणि कंद यांचा वापर खाद्य म्हणून केला जातो. कोकणात नागपंचमीला घरी जी नागोबा मूर्ती आणली जाते ती अळीच्या पानावरूनच आणली जाते.

सारांश

अळूच्या पानांच्या वड्या आणि भाजी अनेक लोकं आवडीनं खातात. अळूची पानं फक्त चवीलाच चांगली नसून ती आरोग्य चांगलं राखण्यासाठीही फायदेशीर ठरतात. अळूच्या पानांना औषधी मानलं जातं. आयुर्वेदातही त्यांचे अनेक फायदे सांगण्यात आलेले आहेत. यामध्ये व्हिटॅमिन , बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अॅन्टी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात याचा समावेश केल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून सुटका होण्यास मदत होते. बाजारात सहज उपलब्ध होणारी ही भाजी फारशी लोकप्रिय नाही. परंतु या भाजीचे फायदे जाणून घेणं गरजेचं आहे.


कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know