हातांच्या बोटांनी जेवण
हातांनी जेवण जेवण्याचे फायदे
प्राचिन काळापासून भारतीय परंपरेत हातांनी जेवण्याची पध्दत आहे. पाश्चमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे चमच्याने खाण्याची पध्दती वाढली आहे. काही लोक हातांनी जेवण करण्याला अनहायजेनिक मानतात. हात स्वच्छ धुवून हातांनी जेवण केल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. आयुर्वेदात म्हटले आहे की, आपण पंचतत्त्वांनी बनलो आहोत. ज्याला जीवन ऊर्जा देखील म्हटले जाते. ही पाच तत्त्वे आपल्या हातात असतात. आपला अंगठा अग्निचे प्रतीक आहे, तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या बाजूचे बोट हवेचे प्रतिक आहे. मध्यमा बोट आकाशाचे प्रतिक, अनामिका बोट पृथ्वीचे आणि सर्वात लहान बोट हे पाण्याचे प्रतिक आहे. यामधील एकाही तत्त्वाचे असंतुलन आजाराचे कारण होऊ शकते.
जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा आपण सर्व बोटे एकत्र करून जेवण करतो. विज्ञानात सांगितले आहे की, ही मुद्रा शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळेच आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा या सर्व तत्त्वांना एकत्र करतो. यामुळे भोजन ऊर्जादायक होते.
वजन
कमी होते
तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही नक्की हा प्रयोग करून पाहा. काट्याचमच्याने खाण्याऐवजी तुम्ही हाताने जेवणं सुरू करा. आयुर्वेदानुससार, जेव्हा तुम्ही जेवणाचा घास घेण्यासाठी बोटं एकमेकांच्या जवळ आणता तेव्हा त्याची योगिक मुद्रा तयार होते. ही मुद्रा तुमचे सेन्सरी ऑर्गन्स ऍक्टिव्हेट करण्यासाठी उपयोगी ठरते. तुमची बोटं ही पाच तत्वांचं रूप असते असं म्हटलं जातं. बोटाचा अंगठा आकाश, तर्जनी अर्थात पहिलं बोट हे हवा, मध्यमा अर्थात मधलं बोट हे आग, अनामिका अर्थात रिंग फिंगर हे पाणी आणि सर्वात लहान बोट अर्थात करंगळी हे जमिनीचं प्रतिनिधित्व करत असतं. त्यामुळे तुम्ही हाताने जेवल्याने तुमच्या शरीरावर चांगले परिणाम होतात.
मन
लावून खाणे
हाताने जेवण करताना आपल्याला जेवणावर लक्ष द्यावे लागते. यामध्ये आपल्याला जेवणाला पाहावे लागते, जे आपल्या तोंडात जात आहे त्याकडे पाहावे लागते. याला माइंडफुल ईटिंग म्हटले जाते. हे चमच्याने जेवण करण्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. माइंडफुल ईटिंगचे अनेक फायदे आहेत. यामधील सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे यामुळे जेवणातील पोषकतत्त्व वाढतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आरोग्य चांगले राहते.
अन्नाची ऊर्जा
हाताने खाण्याचे फायदे अन्नाला ऊर्जा देतात - हाताने खाल्ल्याने अन्नाला उर्जा मिळते. हाताने खाणे हा एक संवेदी अनुभव आहे जो भावना आणि उत्कटतेला जागृत करू शकतो. आयुर्वेदानुसार हाताची प्रत्येक बोट पाच तत्वांचा विस्तार आहे. विशेषतः
अंगठा जागेशी संबंधित आहे.
तर्जनी हवेशी संबंधित आहे.
मधले बोट अग्नीशी संबंधित आहे.
अनामिका पाण्याशी संबंधित आहे.
करंगळीचा संबंध पृथ्वीशी आहे.
जेव्हा आपण आपल्या हातांनी आपल्या अन्नाचा आनंद घेतो, तेव्हा संपूर्ण प्रक्रिया या पाच घटकांना उत्तेजित करते आणि आपण खाण्याचा विचार करत असलेले अन्न सक्रिय करण्यास मदत करते. सर्व घटक संतुलित ठेवणे आणि निरोगी राहणे महत्वाचे आहे.
याव्यतिरिक्त, स्पर्श, गंध, श्रवण, दृष्टी आणि चव या संवेदना अधिक सक्रिय होतात. पाच इंद्रियांच्या उत्तेजनामुळे तुम्हाला अन्नाची चव, पोत आणि सुगंध याची जाणीव होते.
हाताने खाणे नैसर्गिक उपाय म्हणून काम करते
जेव्हा तुम्ही चमच्याने किंवा काट्याने खाता तेव्हा तुम्ही तुमचे अन्न थेट तोंडात टाकता. अशा प्रकारे तुमचे मन अन्नाचे तापमान किंवा पोत समजू शकत नाही. म्हणूनच जेव्हा तुम्ही खूप गरम अन्न तोंडात घालता तेव्हा तुमची जीभ भाजते.
परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या हातांनी खाता तेव्हा मज्जातंतूंच्या टोकांना तुमच्या बोटांद्वारे अन्नाचे तापमान जाणवते, ज्यामुळे तुमची जीभ जळण्यापासून रोखते. मज्जातंतूचा अंतही तुमच्या मेंदूला तुम्ही काय खाणार आहात याबद्दल सिग्नल पाठवतो. हे तुमच्या अन्नाची चव चांगली ठेवण्यासाठी योग्य पाचक रस आणि एन्झाईम सोडते.
चांगले पचन होण्यासाठी हाताने खा
तुमच्या हाताच्या तळवे आणि बोटांवर "चांगले" आणि "वाईट" बॅक्टेरिया देखील असतात. चांगले बॅक्टेरिया वातावरणात असलेल्या अनेक हानिकारक जंतूंपासून तुमचे रक्षण करतात. जेव्हा तुम्ही चमच्याने आणि काट्याने खातात तेव्हा हे बॅक्टेरिया तुमच्या पोटात पोहोचत नाहीत. ते पोटात निरोगी पचन वाढवतात आणि आतड्यांमध्ये हानिकारक जीवाणू तयार होण्यास प्रतिबंध करतात. याव्यतिरिक्त, जेव्हा तुम्ही तुमच्या हातांनी अन्नाला स्पर्श करता तेव्हा मेंदूला पाचक रस आणि एंजाइम सोडण्यासाठी सिग्नल पाठविला जातो. तुम्ही जेव्हा तुमच्या हाताने जेवता तेव्हा तुमची बोटं त्या खाण्याला लागतात. त्या खाण्याचं टेक्स्चर, स्वाद या सगळ्याची तुम्हाला जास्त जाण होते. तसंच तुम्ही जेव्हा हाताने जेवता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये सिग्नल अधिक जलदगतीने मिळतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील पचनक्रिया योग्य प्रकारे होते. तुमची पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी तुम्ही हाती जेवायला हवं. तसंच हाताने जेवल्यामुळे प्रत्येक पदार्थाची चव ही तुम्हाला जिभेवर पटकन कळते. अन्नाच्या प्रकारानुसार, मेंदू चयापचय क्रिया व्यवस्थित करतो जे चांगल्या पचनासाठी आवश्यक असते. निरोगी शरीर आणि मनासाठी निरोगी पाचन तंत्र महत्वाचे आहे.
इन्फेक्शनपासून होते सुटका
सहसा चमचा घेऊन खाताना आपण पहिले धुवून घेत नाही. पण हाताने खात असतो तेव्हा कायम हात धुवूनच जेवायला बसतो. त्यामुळे चमच्यावर असलेले किटाणू अथवा अन्य गोष्टींमुळे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. पण हाताने खाताना आपण अधिक काळजी घेतो. त्यामुळे इन्फेक्शनचा धोकाही टळतो. त्याशिवाय तुमच्या हातांना व्यायामाचीही सवय लागते. सहसा हाताने खाण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी. तुम्हाला जर काहीच पर्याय नसेल तर तुम्ही काटा आणि चमच्याचा वापर करा. पण जिथे जमत असेल तिथे तुम्ही हातानेच खाण्याचा प्रयत्न करा.
मधुमेह टाळण्यासाठी हाताने खा
काटा आणि चमचा वापरून खाणे सोपे आणि जलद असू शकते परंतु यामुळे शरीरात रक्तातील साखरेचे असंतुलन देखील होऊ शकते आणि शेवटी तुम्हाला टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
युरोपियन सोसायटी ऑफ एंडोक्रिनोलॉजीने प्रकाशित केलेल्या 2012 चा अभ्यास असे सुचवितो की जे लोक पटकन जेवण करतात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता 2.5 पट जास्त असते.
त्यामुळे पटकन खाल्ल्याने तुमचा मधुमेहाचा धोका वाढतो, परंतु तुम्ही हाताने खाल्ल्याने तुमचा मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. आपले हात वापरताना, आपण आपल्या तोंडात कमी अन्न ठेवता. हळूहळू खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते आणि तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखे वाटते आणि कमी खाता येते.
कटलरीसोबत खाणे ही एक प्रकारची यांत्रिक प्रक्रिया आहे आणि तुम्ही काय खात आहात किंवा किती खात आहात याकडे तुम्ही फारसे लक्ष देत नाही. याव्यतिरिक्त, तुम्ही जेवताना मल्टीटास्किंग सुरू करू शकता, जसे की टीव्ही पाहणे, तुमचा मोबाइल फोन तपासणे किंवा वर्तमानपत्र वाचणे. खाण्याकडे पूर्ण लक्ष न देणे म्हणजे तुम्ही अति खात आहात.
सारांश
अनेक ठिकाणी मॅनर्स आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे काटे आणि चमच्यांनी खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. पण पूर्वीपासून आपण सगळे हाताने जेवत आलो आहोत. आताही बऱ्याच ठिकाणी घरी हातानेच जेवलं जातं. त्याची काही महत्वाची कारणं आणि फायदे आहेत. तुमच्या रोजच्या आयुष्यात तुम्ही ही गोष्ट अंगिकारली तर तुमच्या शरीराला त्याचा नक्की फायदा होईल. हाताने जेवायला लाज वाटायची अजिबातच गरज नाही. तुमच्या शरीराला त्यामुळे फायदा होणार असतो हे नक्की लक्षात ठेवा. आधुनिकीकरणामुळे आपल्या बऱ्याचशा परंपरा या हल्ली गायब होत आहेत असं म्हटलं जातं. पण यापैकी काही परंपरांना शास्त्र आहे आणि त्यामुळेच त्या पाळायला हव्यात असंही म्हटलं जातं. अगदी डॉक्टरही बऱ्याचदा आपल्याला जेवण हे हाताने जेवण्याचा सल्ला देतात. आमटी, कढी यासारखे पदार्थ आपण हाताने खाऊ शकत नाही. पण ताटात वाढलेले अन्य पदार्थ आपण नक्कीच हाताने मोडून खाऊ शकतो.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know