Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 24 January 2024

ओव्याचे आरोग्यासाठी फायदे | ओवा चवीने तिखट व कडू असतो | ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो | ओव्यामध्ये शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर टाकण्यास मदत करणारी, तसेच पोटातील जळजळ रोखणारी तत्वे असतात

ओवा

 

ओव्याचे आरोग्यासाठी फायदे

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोणाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला, तर थोडासा ओवा गरम करून खावयास देणे, हे तर आजीच्या बटव्यातले पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पण केवळ पोटदुखीवरच नाही, तर सर्दी-पडसे, शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही ओवा घेतल्याने फायदा होतो. ओव्यामध्ये शरीरातील हानिकारक तत्वे बाहेर टाकण्यास मदत करणारी, तसेच पोटातील जळजळ रोखणारी तत्वे असतात. तसेच छातीमध्ये जमलेला कफ निघून येण्यासाठी देखील ओव्याचा उपयोग होतो. सायनसचा त्रास असणाऱ्या व्यक्तींकरिताही ओवा गुणकारी आहे.

गुणकारी ओवा

पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी आहे. ओव्याचे सेवन केल्याने पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त, या विकारांमध्ये आराम मिळतो. पोटाशी संबंधित विकारांवर ओव्याचे सेवन करण्याकरिता ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर करावी. हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांच्या त्रासामध्ये लगेच गुण दिसून येतो. तसेह अपचन झाले असेल, तर ओवा थोडा तव्यावर शेकून घेऊन चावून खावा. त्याने अपचन दूर होण्यास मदत होईल.

वजन घटविण्यासाठी देखील ओवा उपयुक्त आहे. ओवा घालून ठेवलेले पाणी प्याल्याने शरीराची चयापचय शक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील चरबी घटू लागते. हा उपाय करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवावा. सकाळी या पाण्यामध्ये एक चमचा मध घालून हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे. जर आवडत असेल, तर हे पाणी आधी ओव्यासकट उकळून घेऊन मग गाळून घ्यावे आणि थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून प्यावे. जर खूप दिवस सतत खोकला येत असेल, तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर पाणी गाळावे, त्यामध्ये थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे.

जर सतत गुडघे दुखत असतील, तर ओवा गरम करावा, एका रुमालात बांधून घेऊन, त्या पुरचुंडीने गुडघ्यांना शेक घ्यावा. अर्धा कप ओव्याच्या पाण्यामध्ये सुंठीची पूड घालून या पाण्याचे सेवन केल्याने ही सांधेदुखीमध्ये आराम पडतो. कधी कुठल्या इन्फेक्शन मुळे हिरड्यांना सूज येते, अश्यावेळी ओव्याच्या तेलाचे काही थेंब कोमट पाण्यामध्ये घालून, या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय ओवा भाजून घेऊन त्याची पूड करावी, ही पूड वापरून हिरड्यांवर हलक्या हाताने मालिश करावी. या उपायाने देखील हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.

काही महिलांना मासिक पाळीच्या वेळी कंबरदुखी आणि पोटदुखीचा अतिशय त्रास होतो. अश्या वेळी थोडासा ओवा, गरम पाण्याबरोबर घेतल्याने कंबरदुखी आणि पोटदुखी कमी होते. पण ओवा उष्ण असल्याने ज्या महिलांना मासिक पाळी मध्ये रक्तस्राव जास्त होतो, त्यांनी ह्या उपयाचा अवलंब करताना काळजी घावी. ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर सतत मुरुमे पुटकुळ्या येत असतील, त्यांनी ओव्याची पूड करून घेऊन, ही पूड दह्यामध्ये मिसळावी, चेहऱ्यावर लावावी. जेव्हा हा लेप सुकेल, तेव्हा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाकावा. काही दिवसातच चेहऱ्यावर मुरूमे येणे बंद होईल.

ओव्याचे २५ उपयोग

स्वयंपाकात उपयोग होणा-या मसाल्याला औषधी महत्व खुप असते . याचे योग्य उदाहरण म्हणचे ओवा. ओव्याचा वापर हजारो वर्षांपासुन आजारांवर घरगुती उपाय म्हणुन केला जातो. ओव्याचे वनस्पतिक नाव ट्रेकीस्पर्मम एम्माई आहे. आयुर्वेदानुसार ओवा पचनक्रीया सुधारते. हे कफ, पोट, छाती चे दुखणे आणि कीटकांचे रोगांसाठी फायदेशीर आहे. यासोबतच उचकी, ढेकर या आजारांसाठी फायदेशीर असते.

ओव्यामध्ये 7 टक्के कोर्बोहायड्रेट, 21 टक्के प्रोटीन, 17 टक्के खनिज, 7 टक्के कॅल्शियम, फॉस्फोरस, लोह, पोटॅशियम, सोडियम, रिबोफ्लोविन, थायमिन, निकोटिनिक अॅसिड कमी प्रमाणात, थोड्या प्रमाणात आयोडिन, साखर, सेपोनिन, टेनिन, केरोटिन आणि 14 टक्के तेल असते. यामध्ये मिळणारे सुगंधीत तेल 3-4 टक्के असते, 5 ते 6 टक्के मुख्य घट थाइमोल असते.

1. पोट बिघडल्यावर ओवा चावुन खावा. यानंतर एक कप गरम पाणी प्या.

2. 10 ग्रॅम सुंठ, 5 ग्रॅम काळे मीठ, 2 ग्रॅम जीरे चांगल्या प्रकारे मिश्रण करा. या मिश्रणातील 3 ग्रॅम प्रमाण कोमट पाण्यत टाकुन दिवसातुन 4-5 वेळा घ्या. पोट दुखी होणार नाही.

3. पोटात जंतु असतील तर काळ्या मीठासोबत अर्धा चमचा ओवा खा. हे काही वेळा नियमित खाल्ल्याने पोटातील जंत नष्ट होतील.

4. 3 ग्रॅम ओवा आणि अर्धा ग्रॅम मीठ खाल्ल्याने हृदयाचे रोग दुर होतील.

5. गॅस झाल्यावर थोडी हळद, ओवा आणि एक चिमुट काळे मीठ मिळवुन खा. यामुळे लवकर आराम मिळेल.

 6. 5 ग्रॅम ओवा पाण्यात टाकुन सेवन करा. महिन्यातुन पाच वेळा असे केल्याने मुतखडा कधीच होणार नाही आणि असेल तर निघुन जाईल.

7. तोंडले, ओवा, अद्रक आणि कापुर यांना समान प्रमाणात घेऊन कुटून घ्या. एका सूती कपड्यात गुंडाळुन थोडे गरम करा सुजलेल्या भागावर हळु-हळू शेकल्यामुळे सुज कमी होईल.

8. दारुची सवय मोडण्यासाठी दिवसातुन प्रत्येक दोन तासाला ओवा चावण्यास द्या. लवकर परिणाम दिसेल.

9. ओवा भाजुन बारीक करा. या मिश्रणाने रोज दोन- तीन वेळा दात घासा. तुमचे दात मजबुत आणि चमकदार होतिल. दात दुखत असल्यास ओवा पाण्यात उकळुन कोमट पाण्याने गुळण्या करा. दात दुखणे थांबेल.

10. आजवान बारीक करुन खोब-याच्या तेलात टाका आणि हे तेल कपाळावर लावा , डोके दु:खी थांबेल.

11. ओवा भाजुन एका कपड्यात गुंढाळा आणि रात्री झोपतांना उशा जवळ ठेवा, दमा, सर्दी, खोकला असणा-या लोकांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

12. दम्याच्या रोग्यांना रोज ओवा आणि लवंगच्या समान प्रमाण असलेले चुर्ण रोज दिले तर फायदा होतो. ओवा एखाद्या मातीच्या भांड्यावर जाळुन त्याचा धुर केला तर दम्याच्या रोग्यांना श्वास घेण्यास अडचण येणार नाही.

13. ओव्याच्या रसामध्ये दोन चिमुट काळे मीठ मीळवुन सेवन करा आणि नंतर गरम पाणी प्या. खोकला बरा होईल.

 14. कोरड्या खोकल्यापासुन त्रस्त असाल तर ओव्याचा रस मधात मिळवुन दिवसातुन 2 वेळा एक-एक चमचा सेवन करा.

15. गळ्यात खाज असेल तर बोराचे पाने आणि ओवा हे सोबत एकाच पाण्यात उकळा आणि गाळुन हे पाणी प्या.

16. अद्रकच्या रसामध्ये थोडे चूर्ण आणि ओवा मिळवून खाल्ल्याने खोकल्यापासुन आराम मिळेल.

17. ओवा विड्याच्या पानामध्ये ठेवून चावा. असे केल्याने कोरड्या खोकल्यापासुन आराम मिळेल. याव्यतिरिक्त ओवा खाल्ल्याने गळ्याची सूज आणि दुखणे थांबेल.

 18. नाक बंद झाल्यावर ओव्याला बारीक करुन कपड्यात गुंडाळुन वास घ्या, आराम मिळेल.

19. जेवणा नंतर ओवा आणि गुळ सोबत खाल्ल्याने सर्दी आणि अॅसिडिटीपासुन आराम मिळेल.

20. 2 ते 3 ग्रॅम ओवा दिवसातुन तीन वेळा घ्या. सर्दी आणि डोकेदुखीपासुन आराम मिळेल.

21. पानच्या पाणांसोबत ओवा चावा, गॅस, पोटातील मुरडा आणि अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

 22. 1 ग्रॅम भाजलेला ओवा पानमध्ये टाकुन जावल्याने अपचन पासुन आराम मिळेल. हिवाळ्यात शरिराला थोडी गर्मी देण्यासाठी थोडा ओवा चावा आणि पाण्यासोबत सेवन करा.

23. 1 चमचा ओवा आणि एक चमचा जीर एकसोबत भाजुन घ्या. मग हे पाण्यात उकळुन गाळुन घ्या. या पाण्यात साखर मिळवून प्यायल्याने अॅसिडीटीपासुन आराम मिळेल.

24. कॉलरा झाल्यावर कापुर सोबत ओवा मिळवून खाल्ल्याने आराम मिळेल. झोप येण्याची समस्या असेल तर 2 ग्रॅम ओवा पाण्यासोबत

सेवन करा. झोप चांगली येईल.

25. खाज येत असेल किंवा कुठे जळाले असेल तर, ओवा बारीक करुन तेथे लावा आणि 4-5 तास लावुन ठेवा. यामुळे फायदा होईल.

सारांश

ओवा पचनाला मदत करतो, अग्नीला प्रदीप्त करतो, वेदना कमी करतो. ओवा वात, तसेच कफदोष कमी करणारा असला, तरी अति प्रमाणात सेवन केला असता शुक्रधातू कमी करतो. उदर, आनाह, गुल्म, प्लीहा, जंत अशा रोगांत हितावह असतो. ओव्याचे तीन-चार फूट उंचीचे झुडूप असते. त्याला पांढरी फुले येतात. यातूनच पुढे ओवा तयार होतो. ओवा आकाराने इतका बारीक असतो, की तो स्वयंपाकात सहसा अख्खाच वापरला जातो. तीव्र गंध तिखट चव ही ओव्याची दोन वैशिष्ट्ये होत. नुसता ओवा खाल्ला तर जिभेची आग झाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक स्वयंपाकघरात ओवा असतोच त्याचे अनेक औषधी गुण असतात. ओवा चवीने तिखट कडू असतो, उष्ण वीर्याचा असतो, तीक्ष्ण तसेच लघू गुणांनी युक्ती असतो, पचनाला मदत करतो, रुचकर असतो, अग्नीला प्रदीप्त करतो, वेदना कमी करतो. ओवा वात तसेच कफदोष कमी करणारा असला, तरी अति प्रमाणात सेवन केला असता शुक्रधातू कमी करतो. उदर, आनाह, गुल्म, प्लीहा, जंत अशा रोगांत हितावह असतो.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.



No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know