Translate in Hindi / Marathi / English

Friday, 19 January 2024

होमिओपॅथीचा शोध साधारणपणे दोनशे वर्षाच्या आधी लागला | होमिओपॅथी म्हणजे अल्प मात्र निर्धारित उपायांनी रोगावर उपचार | होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल हॅनेमन यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी १० एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो | रोगांवर उपचार करताना होमिओपॅथ डायनामा झेशन किंवा पोटेटेझेशन सारख्या प्रक्रिया वापर वापरतो | होमिओपॅथिक औषधांचा मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो

होमिओपॅथी

 

होमिओपॅथी उपचार पद्धती

होमिओपॅथी हा शब्द ग्रीक शब्दाच्या दोन शब्दापासून बनलेला आहे होमीओज म्हणजे सारखा आणि पयथोज म्हणजे पीडित सोप्या भाषेत होमिओपॅथी म्हणजे अल्प मात्र निर्धारित उपायांनी रोगावर उपचार जे निरोगी व्यक्तीने घेतल्यास रोगाची लक्षणे उत्पन्न करण्यास सक्षम आहे. गेल्या एक शतकापासून होमिओपॅथी भारतात वापरत आहे. ती देशाच्या मुळात आणि संस्कृतीत मिसडून गेली आहे की ती आता एक राष्ट्रीय औषध संस्था म्हणून ओळखली जाते, आणि मोठ्या संख्येने लोकांना आरोग्य देखभाल प्रधान करून फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी १० एप्रिल रोजी साजरा केला जातो. होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल हॅनेमन यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी १० एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो. होमिओपॅथीचा स्पष्ट प्रभाव दिसून येते कारण ती आजारी व्यक्तीबद्दल संवर्धनाच्या माध्यमातून समग्र दृष्टीकोन ठेवून त्याच्या मानसिक,भावनात्मक अध्यात्मक आणि भौतिक स्तरावर आंतरिक संतुलन ठेवते.

आज होमिओपॅथी वेगाने वाढणारी आणि जगात सर्वत्र वापरली जाणारी संस्था आहे. हळुवारपणे होणाऱ्या प्रभाव आणि सुरक्षित गोळ्यांमुळे होमिओपॅथीचा वापर भारतात घरोघरी दिसतो. साधारण अभ्यासाने असे लक्षात येते की भारतीय लोकसंख्येपैकी दहा ते अकरा टक्के लोक आपल्या आरोग्यासाठी पूर्णपणे होमिओपॅथी वर अवलंबून आहेत.डॉक्टर सॅम्युअल हायनमानयांनी दोन दशकाच्या सुरुवातीला याला एक वैज्ञानिक आधार दिला. दोन शतकांपूर्वी पासून ही एक ही पीडित मानवांची सेवा करीत आहे दीर्घ काळाच्या कसोटीला उतरली आहे आणि कालांतराने चिकित्सा पद्धती म्हणून उदयास आली आहे. वैज्ञानिक हायनमन यांनी मांडलेले सिद्धांत नैसर्गिक आणि ठोस आहेत.

होमिओपॅथी उपाय

होमिओपॅथिक चिकित्सा उपाय करताना दोन प्रकारच्या संदर्भावर अवलंबून राहावे लागते एक म्हणजे औषधे वितरण आणि दुसरी म्हणजे प्रश्नावली.

होमिओपॅथिक औषधे वितरण म्हणजे ज्यात वेगवेगळ्या लक्षण स्वरूपांचे त्यांच्या व्यक्तिगत उपायांसह औषधांच्या चित्रांचा समूह उपयांसह वर्ण माले नुसार रचलेला असतो होमिओपॅथिक रिपोर्टज म्हणजे रोगांच्या लक्षणांचे अनुक्रमणिका ज्यात विशेषता लक्षण आणि उपायांचे सूची दिलेली असते.उपाय हा होमिओपॅथिक तांत्रिक शब्द असून त्यांने रोगावरील उपचाराच्या एक विशिष्ट पद्धतीने तयार केलेला पदार्थ दर्शवला जातो ह्याचा अर्थ साधारण भाषेत वापरात असलेल्या शब्दाचे लावू नये जो म्हणजे औषध किंवा चिकित्सा जाने रोग बरे होतात किंवा दुःख कमी होते.

होमिओपॅथी रचना


रोगांवर उपचार करताना होमिओपॅथ डायनामा झेशन किंवा पोटेटेझेशन सारख्या प्रक्रिया वापर वापरतो ज्यात पदार्थ अल्कोहोल किंवा डिस्टिल्ड वॉटर मध्ये पातळ केला जातो आणि मग दहा वेळा जोराने तो घुसडला जातो. या प्रक्रियेला सकक्शन म्हणतात हायनमान यांच्या सल्ल्याने असे पदार्थ वापरण्यात आले की ज्याने रोगावरील इलाज केल्याची लक्षणे दिसून येतील.पण असे आढळले की त्यात पदार्थाची तीव्र लक्षणे दिसून येता अवस्था अजून खराब होते आणि कधीकधी घातक विषारी लक्षणे आढळून आले. म्हणून त्यांनी हे पदार्थ पातळ करून वापरावे असे सांगितले.हायनमान असे मानायचे की स्कक्शन मुळे पातळ पदार्थात महत्त्वपूर्ण ऊर्जा वाढते आणि ते जास्त मजबूत बनते.

होमिओपॅथी कसे काम करते

अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक रोगांवर किंवा प्रकृती बिघडले सर्व होमिओपॅथी मध्ये उपचार करता येतात. होमिओपॅथीमध्ये औषधांचा विचार अगदी वेगळ्या प्रकारे केला जातो. हायमेन नावाच्या एका विद्वान डॉक्टरांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी या उपचार पद्धतीचा शोध लावला त्या काळी तापाकरता विशेष हिवातापाकरता कवीनाईन हे औषध खूप वापरले जाईल. हे औषध विषारी असल्याने त्याचे दुष्परिणाम ही प्रचंड प्रमाणात दिसून येत असते. या उपचार पद्धती मागे विचार हायनमान यांना ढोबळ वाटला रुग्ण वेगवेगळे लक्षणे सांगत असताना क्विनाईन आणि इतर पारा गंधक इत्यादी त्यांच्या औषधांवर काम भागवणे योग्य नाही असे त्यांना वाटले. त्यांनी निरोगी अवस्थेत स्वतःहून डोस घेऊन त्याचा काय परिणाम होतो हे पाहण्याचे ठरविले.

या प्रकारामुळे असेच झाले की त्यांच्या स्वतःच्या शरीरामध्ये काही लक्षणे उद्भवली ती लक्षणे त्यांनी नोंदवून ठेवली आणि त्याचा पूर्णपणे अभ्यास केला आणि त्यांना अशी खात्री पटली की मलेरिया झालेला रुग्ण जी लक्षणे सांगतो आहे त्याच्याशी ही लक्षणे अतिशय मिळतीजुळती आहेत हे घटना त्यांनी अनेक वेळा तपासून पाहिले त्यांनी स्वतः औषध अनेक वेळा वेगवेगळ्या मात्र घेतले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की मात्रा बदलणे लक्षणांच्या प्रकारात फारसा पळत नाही. त्यावेळी त्यांच्या हे लक्षात आले कि कितीही कमी मात्रा घेतली तरी निरोगी माणसाच्या शरीरामध्ये ठराविक लक्षणे निर्माण करण्यासाठी पुरेशी असते. होमिओपॅथीमध्ये रुग्णांच्या तक्रारी शक्यतोवर त्यांच्या शब्दात लिहून घ्या.

रुग्णास मनमोकळेपणाने बोलू द्या.नंतर त्यांच्यासोबत आलेल्या जवळच्या माणसाकडे रुग्णांच्या लक्षणांची चौकशी करावी. रुग्ण सांगतो ते लक्षण केवळ त्याची भावनिक वस्तुस्थिती आहे हे ठरवावे लागते. उदाहरणार्थ ताप आल्यासारखे वाटते किंवा गरम वाटते असे रुग्ण म्हणतो, पण ताप खरोखर येतो किंवा नाही हे ठरवणे महत्त्वाचे आहे. याकरता तापमापक याचा उपयोग करावा रुग्णाचे नीट निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या हालचाली हावभाव पाहून आपल्याला अनेक गोष्टी कळतात.उदाहरणार्थ दवाखान्यात पंखा असेल तर रुग्णाचे प्रतिक्रिया काय होते हे पहावे.

तसेच उन्हाळ्यात स्वेटर घालून येणारा किंवा एवढ्यात कारण कपड्यांना लागणारा रुग्णाला वेगवेगळ्या औषधांना प्रसिद्ध प्रतिसाद देतो. एखाद्या रोग लक्षण जर आढळले तर त्यांनी लिहून घ्यावेत म्हणजे त्या लक्षणांचा आपण मात्र मार्गदर्शक म्हणून औषध शोधण्यास उपयोग करणार, ती वेगळे लिहून काढावेत अशा नेत्यांना तीन-चार तरी लक्षणे आवश्यक असते. प्रत्येक मार्गदर्शक लक्षणा पुढे त्या लक्षणांनी सुचवली जाणारी औषधे लिहावीत. जेव्हा बरीच लक्षणे असतात तेव्हा त्यामधील कोणती लक्षणे औषध शोधण्याकरता वापरायचे हे निवडावे. मानसिक लक्षणे आणि संपूर्ण शरीरासंबंधी विधान करणारी लक्षणे महत्त्वाची असतात.

ती लक्षणे औषधे वेगळं वगळण्याकरिता वापरावेत. नंतर विशिष्ट रोग म्हणजे कावीळ,डांग्या खोकला याकडे लक्ष द्यावे किंवा नंतर विशिष्ठ कडे वळावे जोपर्यंत रुग्णाने सांगीतलेली लक्षणे किंवा त्यातील बरीच लक्षणे एका औषध सापडत नाही तोवर हा शोध चालू ठेवावा. औषधाची निवड औषधांच्या लक्षण वर्णनावरुन करायची असते निवडलेली लक्षणे योग्य त्या वर्णनाने या औषधाच्या लक्षणांमध्ये आढळतील ते औषध म्हणजे होमिओपॅथिक औषध होईल.

होमिओपॅथिक औषध

होमिओपॅथीची औषधे आज सहज उपलब्ध होतात. ती सहज उपलब्ध घेण्यास सोपी असतात.शिवाय ते रोग्याच्या लक्षणाचे जडणारे नेमके औषध निवडल्यास दुष्परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र नेमके औषध काळजीपूर्वक निवडले पाहिजे. प्रखर प्रकाश किंवा उष्णता,तीव्र वास यापासून मात्र औषधाचे रक्षण करणे आवश्यक आहे. बाजारात औषध ठेवण्यास योग्य अशा बाटल्या,लाकडी पेट्या इत्यादी उपलब्ध आहेत. रोज चार गोळ्या तीन वेळा अशा मात्रेत घेतल्या तर सुमारे पंधरा दिवस पुरतात. संधिवात, दमा अशा जुनाट प्रकारच्या रोगा करता योग्य औषध निवडून ते रोज एक मात्रा याप्रमाणे दिले जावे.

एक मात्रा म्हणजे नंबर 30 आकाराच्या चार गोळ्या. औषध घेण्याआधी नंतर सुमारे एक तास पर्यंत काही खाणेपिणे बंद ठेवावे म्हणजे औषधांचा चांगला उपयोग होतो. रोग लक्षणे तीव्र असताना औषध दिवसातून तीन ते चार वेळा घ्यावे. लक्षणांची तीव्रता कमी होईल अशा औषधांच्या मात्रा कमी कराव्या. रोज दोन वेळा हे रोज एक वेळ असे करीत औषध बंद करावे. होमिओपॅथीचे औषध चालू असताना कोणत्याही खास आहाराविषयी आहार-विहाराचे गरज नसते. गरज असते ते खाणे-पिणे, झोपणे,व्यायाम करणे,काम करणे इत्यादी कोणताही अतिरेक उपचारांचा अडथळाच ठरू शकतो.

उदा.दारू,तंबाखू, तीव्र वासाचे पदार्थ,मसालेदार जेवण, जागरण करणे हे कटाक्षाने टाळले गेले पाहिजे.होमिओपॅथीच्या योग्य औषधांची निवड होमिओपॅथीच्या शास्त्रातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे.योग्य औषध निवड करताना गरज असते ते मुख्यतः औषधांच्या लक्षणांची. कोणकोणत्या औषधाचा खालील लक्षणांमध्ये सदर लक्षणे आहेत याची माहिती होमिओपॅथी औषध निवडीसाठी लागते. हे लक्षणे लक्षात ठेवा जेव्हा रुग्णाच्या लक्षणांचे आपण ताडून पाहतो,तेव्हा नेमके औषधाचे नाव आपल्याला समजते जी होण्याची लक्षणे असतात. त्याच्या साह्याने आपण तात्काळ उपाययोजना करू शकतो.

होमिओपॅथीमध्ये अनेकदा शारीरिक लक्षण पेक्षा मानसिक लक्षणांना अधिक महत्त्व असते.होमिओपॅथी ने कोणत्या अवस्थेतील रुग्ण बरा होऊ शकतो. कोणत्या अवस्थेत ला होत नाही याला होमिओपॅथी काही पडतात मर्यादा आहेत.यातील मानसिक लक्षणे फार उपयुक्त असतात. चिडखोरपणा, रडकेपणा,खोटारडेपणा अति संवेदनशीलता,ही सर्व लक्षणे औषध शोधण्याकरता आपण वापरू शकतो. कारण औषध सिद्ध करणाऱ्यांनी त्याच्या मनात निर्माण केलेली लक्षणे स्वप्न,संवेदना या प्रत्येक गोष्टीची नोंद करून ठेवलेली आहे.ह्यानंतर एक एका वयात होणारे लक्षणे लक्षात घेऊन औषध सूचक का चा उपयोग करून एकदा आपण एका औषधाच्या गटा पर्यंत येतो,नंतर शेवटचा महत्त्वाचा भाग म्हणजे एका औषध निश्चित करण्याचा याकरता औषध नियम याचा वापर करता येईल सर्व किंवा बहुतेक सांगितलेली लक्षणे आपण शोधलेल्या औषधा खाली सापडतात. तेव्हा आपण खात्रीने ते औषध रुग्णाला देऊ शकतो.

होमिओपॅथी उपचाराचे फायदे

होमिओपॅथीचा शोध साधारणपणे दोनशे वर्षाच्या आधी लागला. होमिओपॅथी उपचार पद्धती घराघरात पोहोचलेली आहे. होमिओपॅथिक औषधे साबुदाण्यात सारख्या दिसणाऱ्या गोळ्यांवर टाकून रुग्णांना दिल्या जातात. मात्र होमिओपॅथी कडे रुग्ण आकर्षित होण्यामागे अनेक कारणे आहेत. होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचा समूळ उच्चाटन होतं.तात्पुरता उपचार मिळत नाही तेव्हा होमिओपॅथीचे उपचार घेताना संयम ठेवणे, फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. होमिओपॅथीचा कोणत्याही साईड इफेक्ट नाही. डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीने सेवन केल्यास होमिओपॅथी औषधांचे कुठलीही साईड इफेक्ट होत नाही.

त्यामुळे रुग्णांसाठी हे महत्त्वाचं ठरतं. वेदनाशामक औषधांचा व्यसन लागलेल्या अनेक घटना समोर येतात.मात्र होमिओपॅथी औषधांच्या बाबतीत हा धोका नसतो. उपचारांनी आराम मिळाल्यानंतर रुग्ण औषधाच्या आहारी जात नाही.औषध सेवन करताना गरोदर महिलांनी काळजी घेणे गरजेचे असतो. कुठलेही औषधाचा सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो. याशिवाय काही औषधे गरोदरपणात घ्यायला टाळायचे.मात्र होमिओपॅथीचे उपचार गरोदरपणात ही केले जाऊ शकतात. होमिओपॅथ मध्ये लहान मुलं तसेच नवजात बालकावर देखील सुरक्षित उपचार केले जाऊ शकतात. लहान मुलांना औषध देणारा जिकिरीचं काम असतं त्यांच्या वयाला अनुसरून औषधाचे डोस देणे गरजेचे असतात. नवजात बालकांनाही हे लागू होतं.

औषधांचे सेवन करताना घ्यावयाची काळजी

ही काळजी घेणं गरजेचं असतं. होमिओपॅथीची औषधे उघडे ठेवू. कोरड्या आणि थंड जागेत औषधे ठेवावे.औषध घेतल्यानंतर बाटलीचे झाकण आठवणीने बंद करा. औषध घेताना त्यांना स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. बाटलीचा झाकण्या पासून सरळ तोंडात औषध घ्या. द्रव स्वरूपात औषध असल्याने ड्रॉपर चा वापर करा. त्वचेच्या संपर्कामुळे होमिओपॅथिक औषधांचा प्रभाव कमी होतो. होमिओपॅथी औषध घेण्याच्या अर्धा तास आणि अर्धा तास नंतर काही खाने किंवा पिने टाळा.याला अपवाद फक्त साध्या पाण्याचा आहे. सध्या पाण्याशिवाय कुठलाही पदार्थाचा सेवन करता कामा नये.

हे सगळ्यात महत्त्वाचं होमिओपॅथीच्या प्रभावी परिणामांसाठी धूम्रपान, दारू,तंबाखू,यासारखे व्यसन दूर ठेवणे गरजेचे आहे. होमिओपॅथीचे उपचार घेताना तीव्र गंध असलेले पदार्थ टाळणे सोयीचे जसे आले कांदे कॉफी यासारखे पदार्थ ना तीव्र गंध असतो. यामुळे होमिओपॅथी औषधांचा परिणाम कमी होतो काही नवीन संशोधनानुसार अर्ध्या तासाचा नियम पाडल्यास त्या पदार्थांचा दुष्परिणाम होणार नाही.यासंदर्भात आपल्या डॉक्टरांकडून एकदा खात्री करून घ्या. होमिओपॅथी औषध घेत असताना ऍलोपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर टाळा. कुठले औषध घेण्याआधी किंवा सोडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सारांश

अनेक लोकांना होमिओपॅथिक औषधे घेणे आवडते. कारण ती अगदी लहान तर असतातच पण पटकन गिळता येतात. त्यामुळे असे पटापट औषध घेता येत असल्याने लहान मुलांना तर ती घेणे खूप आवडते. महत्वाचे म्हणजे होमिओपॅथिक औषधे शारीरिक समस्या दूर करण्यास खूप महत्वाची असतात. होमिओपॅथिक औषधांमध्ये वनस्पती आणि खनिज या नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जातो. यापासून लहान आकाराची औषधे तयार केली जातात. ही औषधे जिभेवर ठेवून चघळायची असतात. पण असे का केले जाते याविषयी तुम्हाला माहिती आहे का? यासाठी होमिओपॅथीचे तज्ज्ञ विज्ञानाच्या तर्काचा आधार देतात. होमिओपॅथिक औषधांचा मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो. जिभेतूनच ती मज्जासंस्था सक्रिय करते, असे तज्ज्ञ सांगतात.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know