सैंधव मीठ
सैंधव मिठाचा इतिहास
हिमालयन मीठ (सैंधव) हे मिठाच्या खाणींमधून मिळवले जाते. हे मीठ ज्याप्रकारे पृथ्वीवर निर्माण झाले, ती अतिशय रोचक भौगोलिक घटना आहे. पाचशे दशलक्ष वर्षांपूर्वी समुद्र आटल्यानं प्रचंड मिठागरं तयार झाली. पृथ्वीवर जी प्रचंड उलथापालथ त्या काळात झाली, त्यात या मिठागरांच्या आजूबाजूचे मोठाले दगड त्यावर येऊन मिठागरं त्या पर्वताखाली दाबली गेली. त्यातूनच आजच्या मिठाच्या खाणी तयार झाल्या. या खाणींचा शोध पाकिस्तानातील एका प्रांतात अलेक्झांडरच्या सैनिकांना लागला. या सैनिकांना काही घोडे मिठाचा अंश असलेले दगड चाटत असताना दिसले. त्यावरून तिथल्या मिठाच्या खाणींचा अंदाज आला. अकबराच्या काळात त्यानं मिठाचं प्रमाणीकरण केलं. खेवरा त्याचं नाव. त्यानंतर मिठाची खरेदी-विक्रीही सुरू झाली. नंतरच्या काळात ब्रिटिशांनीदेखील खाणींमधून मीठ बाहेर काढायच्या पद्धती विकसित केल्या. 1827 साली ‘रूम आणि पिलर’ या पद्धतीनं मिठाचं उत्पादन आणि काढणी सुरू केली. अकबर आणि ब्रिटिशांच्या काळात मीठ काढण्याची जी कौशल्यं रुजली त्यानुसार आजही मीठ काढलं जातं. आता उत्तर पाकिस्तानात असलेल्या झेलम ते सिंधू नदीच्या 186 मैल परिसरात या मिठाच्या खाणी सापडतात. हिमालयाच्या या रांगांत या भागात सहा मुख्य खाणी आहेत, त्यातलं मीठ हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, वेगळं आणि शुद्ध असतं. मीठ काढण्याच्या या अनेकविध पारंपरिक ज्ञानावर आधारित पद्धतीनं मिठाची शुद्धता अबाधित राहिली. आजही त्याच प्रकारे या खाणींचं उत्खनन होऊन सैंधव मीठ मिळवलं जातं.
आरोग्याला हितकारक सैंधव मीठ
या संपूर्ण हिमालयन भागात प्रचंड मोठय़ा प्रमाणात मिठाचे साठे आहेत. या मिठामध्ये झिंक, लोह, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजं असल्यामुळे हे आरोग्याला अतिशय हितकारक मानलं जातं. अर्थात या मिठात आयोडिनचं प्रमाण कमी आहे, मात्र त्यात अनेकविध खनिजं भरपूर प्रमाणात सापडतात. सर्वजण उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर करतात. सैंधव मीठ खाणे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे जेवणात मिठाचा वापर अधिक करणे शरीरासाठी नुकसानदायक असते. अनेक आजारांचे कारण ठरु शकते. मात्र आयुर्वेदात सैंधव मीठाचे अनेक फायदे सांगितलेत. सैंधव मीठातील मिनरल्स शरीरासाठी फायदेशीर असतात.
सैंधव मीठातील मिनरल्स
सर्व प्रकारच्या मीठांमुळे शरीराचा पीएच संतुलित राहणे,गॅस व जळजळ कमी करणे,पचनाला चालना देणे हे फायदे होतात. पण हिमालय मीठामुळे अन्नाला अधिक चांगली चव येते.याचे कारण असे की फक्त याच मीठात ११८ मिनरल्सपैकी ८४ ते ९२ मिनरल्सचे घटक आढळतात.तसेच ते १०० टक्के नैसर्गिक असते.ते अनरिफाईंड असल्यामुळे त्यात प्रदुषित व सोडीयम घटक कमी असतात.हे मीठ मेडीकल थेरपी साठी देखील वापरण्यात येते.यात जवळपास सर्वच प्रकारची मायक्रोन्युट्रीयन्टस आहेत बाजारातून हीच जर विकत आणायची ठरवली तर हजारो रुपये लागतील.या मिठाला पहाडी मीठ असे ही म्हटले जाते. या मिठामुळे असलेल्या इतर तत्वांमुळे या मिठाचा रंग शुभ्र दिसत नाही.पूर्वीच्या तुलनेत आता लोकांमध्ये स्वत:च्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यायामासोबतच आहाराकडेही जरा बारकाईनं पाहिलं जात आहे. स्वयंपाकात मीठ हे लागतंच. पण मिठाच्या कमी जास्त प्रमाणाचा आरोग्यावर चांगला वाईट परिणाम होतो. म्हणूनच आता मीठ घेतानाही लोक जास्तच जागरूक झाले आहेत. आणि म्हणूनच मिठामध्ये अनेक प्रकार असले तरी आरोग्याचा विचार आला की सैंधव मिठाला प्राधान्य दिलं जातं. या मिठाच्या अन्न पदार्थांमधील वापरामुळे शरीरातील रक्तदाब स्थिर ठेवून शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन साधलं जातं. यात पोटॅशिअमची मात्रा जास्त असते, तर सोडिअमची मात्रा त्यामानानं कमी असते. म्हणूनच सैंधव मीठ दोषशामक मीठ असल्याचं मानलं जातं.पण दिवसाला सहा ग्रॅमपेक्षा जास्त मात्रेत हे मीठ खाऊ नये. कोणत्याही मिठाचा जास्त प्रमाणात वापर झाल्यास ते शरीराला अपायकारक ठरतं. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हे मीठ वापरताना अतिशय काळजीपूर्वक वापरावं. सैंधव मीठ हे मात्रेनुसारच वापरतो आहोत ना याकडे लक्ष ठेवावं.
सैंधव मीठाचे फायदे
१. सैंधव मीठामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल कऱण्यास मदत होते. तसेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
२. तणाव कमी करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते. सैंधव मीठ सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हार्मोन्सचे बॅलन्स राखण्याचे काम करते. यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते शांतपणे झोप येते.
३. पित्त झाल्यावर आलं लिंबू आणि सैंधव मिठाचे चाटण थोडं थोडं खाल्यास पित्त मुळे आणि इतर कारणांमुळे होणारी उलटी थांबते
४. अंगदुखी कमी करण्यासही सैंधव मिठाचा वापर होतो.
५. सायनसचा त्रास असलेल्यांनी सैंधव मीठाचे सेवन करणे गरजेचे असते. मुतखड्याचा त्रास असल्यास सैंधव मीठ आणि लिंबू पाण्यात मिक्स करुन प्यायल्यास काही दिवसांत फरक पडतो.
६. अस्थमा, डायबेटीज आणि आर्थराइटिसच्या रुग्णांनी नियमितपणे सैंधव मिठाचे सेवन करावे.
७. कॅल्शियम आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते त्यामुळे याच्या सेवनाने स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
८. आयरनचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यास उपयुक्त असते.
९. सैंधव मीठ त्वचेसाठी अतिशय फायद्याचं आहे. मृत त्वचा या मिठानं निघून जाते. त्वचा पेशी मजबूत होऊन त्वचा तजेलदारदेखील दिसते.
१०. काही आजारपणामुळे, विकारांमुळे नखांच्या खाली जे पिवळसर डाग पडलेले असतात, ते काढण्यासाठीदेखील सैंधव मिठाचा उपयोग होतो.
११. केसांसाठी कंडिशनर म्हणून सैंधव मिठाचा वापर शाम्पू सोबत करता येतो. केस गळती, केसांचं तुटणं कमी होतं.
१२. सैंधव मिठाच्या पाण्यानं गुळण्या केल्यानं टॉन्सिल्सवर आराम पडतो.
१३. श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, सर्दी, डोकेदुखी, खोकला वगैरे लहान-मोठय़ा शारीरिक समस्यांवर सैंधव मीठ अतिशय गुणकारी आहे.
१४. हे मीठ रेचक म्हणून पोटाच्या आरोग्यासाठी आणि त्याच्या पाण्याची वाफ श्वसनसंस्थेच्या लहान-मोठय़ा कुरबुरींसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.
१५. सैंधव मीठ संधिवातावर, काही कीटक चावल्यावर जखम बरी करण्यासाठीदेखील वापरलं जातं.
१६. स्ट्रेस अर्थात ताणतणाव हल्ली फार सर्वसामान्य आजार झाला आहे. कारण अगदी क्षुल्लक असतं मात्र त्यातून अनेकदा चिडचिड, अस्वस्थता, डिप्रेशन, भूक न लागणे असे आजार डोकं वर काढतात. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सेंधा मिठाचं सेवन शरीर आणि मनाला स्वस्थता देते. शांत होण्यास मदत करते.
१७. साध्या पाण्यात घालून या मिठाचं सेवन करता येतं. ते रोज खाल्लं तर अस्वस्थता आणि ताणतणाव कमी व्हायला मदत होऊ शकते. गरम पाण्यात हे मीठ टाकून अंघोळ केल्यासही ताण कमी होतो आणि ताजतवानं वाटतं.
१८. वातावरणातील प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. गाड्या, बसेसच्या धुराने होणारे वातावरणातले प्रदूषित घटक शोषून घेण्याची क्षमता या मिठात आहे. निसर्गाचा तोल सांभाळण्याचं कामही मीठ करतं.
१९. या मिठाच्या सेवनानं चरबी कमी होते. या मिठातल्या खनिज तत्त्व इन्शुलिनला रिअँक्टिव्ह असल्यानं साखर खाण्याची किंवा गोड खाण्याची इच्छा कमी होते. हे मीठ वजन वाढीवर नियंत्रण ठेवायलाही मदत होते.
२० रक्तदाब स्थिर ठेवणं, चयापचय क्रिया नियंत्रित करणं, वायुसरणावर नियंत्रण आणि भूक वाढ यासाठीही या मिठाचा उत्तम उपयोग होऊ शकतो.
किती मीठ खावे
वर्ल्ड हेल्थ ऑरर्गनाजेशनच्या सल्लानूसार आपण योग्य प्रमाणातच मीठ सेवन केले पाहीजे.त्यांनी सांगितलेले योग्य प्रमाण म्हणजे दिवसभरात २ ग्रॅम मीठ सेवन करणे कारण मानवी शरीराला दिवसभर फक्त ५०० ग्रॅम सोडियमची गरज असते जी यातून भागविली जाऊ शकते.एक चमचा हिमालय मीठामध्ये ४०० मिग्रॅ सोडियमचे घटक असतात
एका ऑस्ट्रेलियन कंपनीच्या संशोधनानूसार भारतीय ब्लूएचओ ने दिलेल्या प्रमाणापेक्षा ११९ टक्के अधिक मीठ सेवन करतात.असे आढळले आहे की भारतीय लोक दिवसभरात १०.९८ ग्रॅम मीठाचे सेवन करतात जे दिलेल्या योग्य प्रमाणाच्या पाचपट अधिक अाहे.एक चमचा मीठ म्हणजे ६ ग्रॅम मीठाचे प्रमाण ज्यामध्ये २३०० मिग्रॅ सोडियम घटक असतात.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात अर्धा चमचा मीठाचे सेवन करणे योग्य असू शकते हे मात्र लक्षात ठेवा.
सारांश
सैंधव मीठाला रॉक मीठ असे देखील म्हणतात. हे मीठ नैसर्गिकरित्या पूर्णपणे शुद्ध मानले जाते. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. याव्यतिरिक्त सैंधव मीठामध्ये कमी खारटपणा आणि आयोडीनचे प्रमाण कमी असते, यामुळे उच्च रक्तदाब आणि डोळ्यांच्या सूजची समस्या नियंत्रित होते. सैंधव मीठामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ करण्यात येत नाही. म्हणूनच उपवासाच्या दिवशी हेच मीठ खाल्ले जाते. याशिवाय, या मीठामध्ये भरपूर पोषक घटक असतात. सैंधव मीठामध्ये लोह, झिंक, मॅग्नेशियम यासह अनेक पौष्टिक पदार्थ असतात. म्हणून हे मीठ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know