शनीची वक्र दृष्टी व साडेसाती
शनी कर्मफल दाता
शनी प्रकोप शांत करण्यासाठी निळ्या रंगाचे 'हे' उपाय ठरतात फायदेशीर ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफल दाता म्हणतात.
शनी प्रकोप शांत करण्यासाठी उपाय:
ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफल दाता म्हणतात. शनीची वक्र दृष्टी पडली की, जीवनात अनेक क्लेष वाढतात असे म्हटले जाते. शनी दोष असणाऱ्या व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. ज्यांच्या पत्रिकेत हा दोष आढळतो त्यांना कमी आयुष्य, आजारपण, दुःख, शारीरिक-मानसिक त्रास, गरिबी, मृत्यू, नोकरी संदर्भात अडचणी, जेल जाण्याचे प्रसंग ओढावू शकतात. शनी देवाचे रुप काळ्या रंगात आहे असे मानले जाते. पण त्यांना निळ्यारंगाशीदेखील जोडलं जातं. निळ्यारंगाच्या उपायांनी शनीदेव शांत होतात असे मानले जाते. त्यासाठी कही ठळक आणि सोपे उपाय सांगत आहोत, ज्यामुळे शनी प्रकोप कमी होऊ शकतो.
निळ्या रंगाचा रुमाल: शनी प्रकोप कमी करण्यासाठी कायम निळ्या रंगाचा रुमाल स्वतःसोबत बाळगावा.
निळे फुल: निळ्यारंगाचे फुल शनीदेवाला प्रिय आहे असे मानले जाते. त्यामुळे शनिवारी निळे गोकर्ण शनीदेवाला वाहणे शुभ मानलं जातं.
शनि
स्तोत्र:
शनिवारी म्हणा शनि स्तोत्र; शनिचा कोप कायमचा दूर होणार
निळ्या रंगाची सजावट: ज्या कुटुंबातील प्रमुखाला शनीदोष असेल त्यांनी घराच्या भिंतींना फिकट निळा रंग द्यावा. पडदे निळ्या रंगात असावे. शिवाय घर, शाळा, ऑफिस अशा ठिकाणीही निळ्यारंगाची सजावट करावी.
निलम खडा: जर तुम्हाला शनी दोष, साडेसाती असेल तर तुम्ही निळ्या रंगाचा निलम खडा तज्ज्ञांच्या सल्ल्याने धारण करणे फायदेशीर ठरते.
शनीचे दान: शनिवारी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे, चपला-बुटं, फुलं, वस्तू यांचे दान करणे उपयुक्त ठरते.
शनीची साडेसाती म्हणजे नेमके काय असते?
काय होतात याचे परिणाम? शनिदेव जेव्हा चंद्र राशीतून पारगमन करतात तेव्हा ती साडेसाती मानली जाते, त्याचा प्रभाव तीस महिन्यांपूर्वीपासून ते तीस महिन्यांपर्यंत आपल्या राशीत प्रवेश केल्यानंतर जाणवतो.
ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीचे तीन प्रकार आहेत, पहिला लग्नाशी संबंधित आहे, दुसरा चंद्र लग्न किंवा राशीशी संबंधित आहे आणि तिसरा सूर्य लग्नाशी संबंधित आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी शनीची साडेसाती आणि धैयाचा सामना करावा लागतो. जर व्यक्तीचे कर्मे चांगले असतील आणि त्यांच्या कुंडलीत शनी अशुभ नसेल तर ठीक आहे. अन्यथा शनी भयंकर संकट देतो. यामुळेच शनीच्या साडे सातीचे नाव ऐकताच लोक घाबरतात. सध्या 3 राशींमध्ये शनीची साडेसाती सुरु आहे. साडेसतीचे पहिले, दुसरे आणि तिसरे असे तीन टप्पे आहेत. या तीन चरणांमध्ये शनिदेव वेगवेगळ्या प्रकारे संकटे देतात. जाणून घ्या कोणत्या राशींना शनीच्या साडेसातींना तोंड द्यावे लागत आहे आणि शनीच्या प्रकोपापासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय आहेत.
साडे सातीचा दुसरा टप्पा सर्वात वेदनादायक
शनीच्या साडे सातीच्या तिन्ही चरणांमध्ये शनीचा जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडतो. यामध्ये तिसरा टप्पा सर्वात कठीण मानला जातो. यामध्ये शनीच्या प्रकोपाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनि साडे सातीच्या पहिल्या चरणात आर्थिक स्थितीवर, दुसऱ्या चरणात कौटुंबिक जीवनावर आणि तिसऱ्या चरणात आरोग्यावर शनीचा सर्वाधिक प्रभाव पडतो. उत्तर भारतात चंद्रावरून शनीची साडेसाती काढण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. यानुसार शनिदेव जेव्हा चंद्र राशीतून पारगमन करतात तेव्हा ती साडेसाती मानली जाते, त्याचा प्रभाव तीस महिन्यांपूर्वीपासून ते तीस महिन्यांपर्यंत आपल्या राशीत प्रवेश केल्यानंतर जाणवतो. साडेसातीच्या वेळी, शनी एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूतकाळातील कर्माचा हिशोब घेतो, ज्याप्रमाणे घराची संपूर्ण जबाबदारी घेणार्या व्यक्तीला काही काळानंतर हिशेब मागितला जातो आणि चूक केल्याबद्दल त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा मिळते असेच काहीसे साडेसातीच्या काळात घडते.
साडेसातीत केवळ त्रासच होतो हा केवळ गैरसमज
साडेसातीमुळे केवळ दुःख किंवा त्रासच होतो असे नाही, तर या काळात फक्त कर्माचे फळ मिळत असते. ज्यांनी भूतकाळात सत्कर्म केले आहे, लोकांची मदत केली आहे, कुणाचेच वाईट केलेले नसेल त्यांंच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ असतो. राजा विक्रमादित्य, राजा नल, राजा हरिश्चंद्र अशी शनीच्या साडेसातीची अनेक उदाहरणे आहेत. साडेसाती तीस वर्षांतून एकदा प्रत्येक माणसावर नक्कीच येते. धनु, मीन, मकर किंवा कुंभ राशीत असेल तर त्रास कमी होतो, पण चौथ्या, सहाव्या, आठव्या, बाराव्या राशीत असेल तर मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास होतो. मात्र हे सर्वस्वी प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून असते.
कोणतेही नवीन काम, नवीन उद्योग साडेसात वर्षांत करणे टाळावे, कोणतेही काम करण्यापूर्वी जाणकार ज्योतिषाकडून माहिती घ्यावी. असे देखील आढळून आले आहे की जेव्हा जेव्हा शनि चतुर्थ, सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरात प्रवेश करतो तेव्हा व्यक्तीच्या मूळ संपत्तीचा नाश होतो. म्हणूनच शनीच्या या मुहूर्ताचा अगोदरच विचार करावा जेणेकरुन धनाचे रक्षण करता येईल.
शनीचा प्रकोप कसा टाळावा
पंडित आणि ज्योतिषांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने जप, तपश्चर्या आणि जे काही नियम सांगितले आहेत ते साडेसाती सुरू होण्यापूर्वी करावे. शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी रावणाने आपल्या बंदिवासात पाय बांधून आपले डोके खाली ठेवले होते जेणेकरून शनिदेवाची वक्र दृष्टी रावणावर पडू नये. आजही जाणूनबुजून किंवा नकळत रावणाप्रमाणे अनेक लोकं प्रतिकात्मकरीत्या शनीचे रूप धारण करतात. जर तुम्ही पौराणिक मान्यता आणि विद्वानांच्या सूचनांचे पालन केले तर या काळात हनुमानजींची पूजा करणे खूप फायदेशीर आहे, कारण शनिदेवाने त्यांना वचन दिले होते की हनुमान भक्तांना शनीच्या वाईट नजरेचा त्रास होणार नाही.
शनीच्या साडेसातीचा लहान मुलं आणि गरिबांवर परिणाम
चांगले कर्म करणार्यांना शनिदेव नेहमी शुभ फळ देतात आणि व्यक्तीला यश आणि उंचीवर घेऊन जातात. दुसरीकडे, वाईट कर्म करणार्यांना शनिदेव अशुभ फळ देतात आणि अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. यासोबतच ते साडेसाती दोषही देतात. पण शनिदेव कधीच मुलांवर आणि गरिबांवर साडेसातीचा परिणाम होऊ देत नाही.
शनिचे नाव ऐकताच लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते, पण शनिदेव कधीही अशुभ परिणाम देत नाहीत. शनिदेव हा न्याय आणि कृतीचा देव आहे आणि माणसाला कर्मानुसार फळ देतात. चांगले कर्म करणार्यांना शनिदेव नेहमी शुभ फळ देतात आणि व्यक्तीला यश आणि उंचीवर घेऊन जातात. दुसरीकडे, वाईट कर्म करणार्यांना शनिदेव अशुभ फळ देतात आणि अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. यासोबतच ते साडेसाती दोषही देतात. पण शनिदेव कधीच मुलांवर आणि गरिबांवर साडेसातीचा परिणाम होऊ देत नाही.
पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने आणि ऋषी पिप्पलाद यांचे नामस्मरण केल्याने शनिदोष होत नाही अशी आख्यायिका आहे. शनिदेव मुलांवर आणि गरीबांवर कधीही त्याचा अशुभ प्रभाव टाकत नाहीत, त्यामागे एक पौराणिक कथा आहे. पौराणिक कथेनुसार, महर्षी दधिची यांनी प्राचीन काळी देवांनी व्रजाची निर्मिती केली होती. ही बातमी ऐकून महर्षी दधिचींची पत्नी सुवर्णा अतिशय अस्वस्थ झाली आणि तिने आपल्या पतीसोबत सती जाण्याचा आग्रह धरला. तेव्हा एक आकाशवाणी आली की महर्षी दधीची तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेईल, त्यामुळे तू सती होऊ शकत नाहीस. तसेच, मुलाला जन्म दिल्यानंतर सुवर्णा देवी आपल्या पतीसह सती झाली होती आणि बाळाचे नाव पिप्पलदा होते. ऋषी पिप्पलादचा जन्म पिंपळाच्या झाडाखाली झाला आणि ते फक्त पिंपळाची फळे खात मोठे झाले. पिप्पलादने भगवान शंकराची घोर तपश्चर्या करून ब्रह्मदंडाची प्राप्ती केली होती. यानंतर त्यांनी सर्व देवतांना विचारले की त्यांनी असे कोणते पाप केले होते, ज्यामुळे ते अनाथ झाले. हे शनिदेवामुळेच झाल्याचे समजल्यावर त्याने शनिदेवाला शिक्षा देण्याचे ठरवले. पिप्पलाद ऋषींनी रागाने शनिदेवाला ब्रह्मदंड दिला आणि सांगितले की शनिदेव इतके क्रूर का आहेत की ते मुलांनाही सोडत नाहीत. ब्रह्मदंडामुळे शनिदेवाचा एक पाय कमकुवत झाल्याचे सांगितले जाते. सर्व देवांनी मिळून पिप्पलाद ऋषींना समजावून सांगितले की, शनिदेव हे न्याय आणि कृतीचे देवता आहेत. कर्माच्या जोरावरच ते लोकांना फळ देतात. त्यांच्यासोबत जे काही घडले ते तुमच्या केलेल्या कृतीचे फळ आहे. खूप दिवसांनी जेव्हा ऋषी पिप्पलाद यांनी शनिदेवाला क्षमा केले तेव्हा ते म्हणाले की आजपासून १६ वर्षाच्या मुलांवर शनिदेवाचा कोप होणार नाही. तसेच जे पिंपळाच्या झाडाची पूजा करतात आणि दररोज पाणी अर्पण करतात त्यांना शनिदेव कधीही त्रास देणार नाहीत. तेव्हापासून पिंपळाला पाणी अर्पण करणे आणि ऋषी पिप्पलाद यांचे नामस्मरण करणे ही मान्यता सुरू झाली असे म्हणतात. तसेच, शनिदेव दुर्बल, गरजू आणि गरीब लोकांचे प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे शनिदेवाचा त्यांच्यावर अशुभ प्रभाव पडत नाही.
सारांश
शनि ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षे लागतात. याला शनीची साडेसाती म्हणतात. ही एका राशीतून उतरते आणि दुसऱ्या राशीतून चढते. शनीची साडेसात वर्षे टिकणारी ग्रहदशा साडेसाती म्हणून ओळखली जाते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शनीची साडेसाती येते. त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. शनि ही न्यायी देवता आहे, तुम्ही आयुष्यात जे काही केले असेल तेच फळ तुम्हाला मिळते. शनीच्या साडेसातीचे तीन टप्पे असतात. यांना पहिलं, दुसरं आणि तिसरं अडीचकं म्हटलं जातं. यालाच उदय टप्पा,शिखर टप्पा आणि अष्ट टप्पा म्हणूनही ओळखलं जातं. शनि ग्रह न्यायदेवता
मानला जातो. त्यामुळे तो रागावला तर जीवनात अडचणी येऊ शकतात. प्रत्येकजण शनिदेवाला
खूप घाबरतो.शनिची साडेसाती म्हणजे जणू सत्वपरिक्षाच.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know