Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 17 January 2024

कोकणातील पारंपारिक पदार्थ | कोकणातील काही खास गोड स्वादिष्ट पदार्थ पदार्थ | सातकापी घावण | आंबोळ्या | शिरवळ्या आणि नारळाचा रस | काकडीचे धोंडस | गूळ पोहे | पातोळ्या | पुरणपोळी | आत्मीयतेने भरलेला कोकणी माणसाचा पाहुणचारही आहे

कोकणातील पारंपारिक पदार्थ

 

कोकणात बनवतात हे स्वादिष्ट पदार्थ

कोकणातील काही पदार्थांची चव ही नेहमीच खास असते म्हणा. काही सण असेल तर कोकणात वेगळ्या पद्धतीचे गोड पदार्थ बनवले जातात. हल्ली मिठाईची दुकाने सगळीकडे जरी असली तरी काही सणांना पारंपरिक पदार्थ खाण्याची चव ही वेगळीच असते. तुम्ही कोकणातले असाल किंवा कोकणातले जेवण तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला कोकणात बनवले जाणारे काही पदार्थ नक्कीच खायला आवडत असतील.जाणून घेऊया कोकणातील काही खास गोड पदार्थ.

सातकापी घावण

तांदूळाच्या पीठापासून तयार केले जाणारे घावण अनेकांच्या आवडीचे आहेत. खास भिड्याच्या तव्यावर जाळीदार घावण सोडले जातात. भाकरीच्या पिठापेक्षा थोडे जाडसर पीठ यासाठी वापरले जाते. पाण्यात अगदी पातळसर कालवून ते भिड्यावर सोडतात पण ते सोडताना त्याची छान जाळी पडावी म्हणून भिड्याला तेल लावतात. अगदी काहीच मिनिटांत तयार होणारा हा झटपट प्रकार आजही अनेक घरांमध्ये चटणीसोबत खायला दिला जातो. आता तांदूळाचे उत्पन्न जास्त असल्यामुळे प्रत्येक घरात तांदूळाचे घावण आलेच. पण सोबत नारळही खूप असल्यामुळे या पासून एक छान गोडाचा प्रकार बनवला जातो. तो म्हणजे ‘सात कापी घावण. नारळ खवून ज्या पद्धतीने मोदकाचे सारण बनवले जाते. तसे गुळ- खोबरं- वेलदोडे घालून सारण बनवले जाते. तयार घावणावर हे सारण पसरवले जाते. या घावणाचे आणि सारणाचे थर रचले जातात. हे साधारण सात थर असतात म्हणून त्याला सातकापी घावण/ सातकप्पी घावण असेही याला म्हटले जाते.

घावण बनविण्यासाठी साहित्य:

१) १ वाटी साधे तांदूळ

२) पाणी

३) मीठ

४) १/२ वाटी तेल

सारण बनविण्यासाठी साहित्य:

१) १ वाटी ओल खोबर

२) पाउन वाटी किसलेला गूळ

३) जायफळ पूड

४) मीठ चविनुसार

५) १ छोटा चमचा तूप

सारण बनविण्याची कृती:

वर दिलेले सरणाचे सर्व साहित्य एका भांडयात घ्यावे व हाथाने गुळ कुस्करून घ्यावा.

हे   सारण शिजविण्याची अवश्यक्यता नसते.

घावण बनविण्याची कृती:

तांदूळ स्वच्छ धुवून ६-७ तास भिजू घालावे सकाळी करायचे असल्यास रात्री भिजू घालावे.

सकाळी पाण्यतून उपसून मिक्सरला लावून बारिक वाटून घ्यावे व पाणी घालून पीठ करून घ्यावे.

मीठ घालून ढवळून घ्यावे.

घावण्याचे पीठ आंबोळी च्या पीठापेक्ष्या पातळ असावे.

भिड गरम करावे व त्यावर थोडेसे तेल पसरून घ्यावे.

त्यावर पीठ घालून घावण तयार करावा.

थोडासा शिजला की लगेचच नारळाचे तयार सारण एका बाजूला घालावे.

अर्ध्या बाजूने परतवा व पुन्हा एकदा घावण्याचे पीठ भिडयावर घालावे.                                                                                                             

अश्याप्रकारे अजून ७ वेळा घावण करून घ्यावे व सात पदरी घावण तयार करून घ्यावा.

वरुण साजूक तुपाची धार सोडावी व गरमा गरम खावयास दयावे.

कोकण स्पेशल आंबोळ्या

आंबोळ्या ह्या कोकण स्पेशल पाककृती पैकी एक म्हणाव्या लागतील. काही लोक धिरडे, घावण आणि आंबोळी एकच समजतात. पण तस नाही आहे. निदान आमच्या कोकणात तरी धिरडे, घावण आणि आंबोळी हे तीन वेगळे पदार्थ आहेत. घावणे फक्त तांदुळाच्या पिठापासून व पीठ न आंबवता केले जातात तर धिरडे बनवताना पिठात ताक, मिरची वै. घातली जाते आणि आंबोळ्या कश्या करायच्या ते पहा.

खर तर तुम्हांला साहित्य वाचून अस वाटेल कि हे तर डोश्याच साहित्य आहे. अगदी बरोबर पण याची करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळेच ते डोश्यापेक्षा वेगळे लागतात. आंबोळी डोश्याप्रमाणे पातळ व क्रिस्पी नसते तर जाडसर आणि मऊ असते. आंबोळीला छान जाळी पडते.

आंबोळीचे पीठ:

भाकरीचे जाडे तांदूळ- ५०० ग्रॅम·

उडीद डाळ- ५० ग्रॅम·

मेथी दाणे - १/२ टीस्पून

गिरणीतून जाडसर रवाळ / खसखशीत दळून आणावे.

साहित्य:

आंबोळीचे पीठ- १ कप

मीठ - चवीनुसार

पाणी- अंदाजे १ + १/४ कप (थोडस कमी-जास्त, डोश्याच्या मिश्रणाप्रमाणे हव.)

कृती:

पिठात पाणी मिसळून सरसरीत भिजवावं व सर्व गुठळ्या मोडून घ्याव्यात.

हे मिश्रण एका डब्यात भरून उबदार जागी रात्रभर ठेऊन द्यावे.

करतेवेळी मीठ घालून छान ढवळून घ्यावे.

नॉन-स्टीक तवा किंव्हा बीडाची "कावील" गरम करावी.

चमच्याने किंव्हा कांदा अर्धा कापून, त्याने तव्याला तेल लावावं. ऑईल स्प्रेचा सुद्धा वापर करता येईल. (माझी आई नारळाच्या शेंबीने कावीलला तेल लावायची.) तवा चांगला गरम झाला कि वाटीने किंव्हा पळीने तव्याच्या कडे पासून मध्यापर्यंत हे मिश्रण गोलाकार ओतावे.

झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजू द्यावे. कडा सुटताच उलटे करावे व १-२ मिनिटे शिजू द्यावे.

आंबोळी तयार.

मटण रस्सा / कोंबडी रस्सा किंव्हा काळे वाटाणे आमटी/ चणे आमटी

सोबत खा. नारळाच्या चटणीसोबत पण मस्त लागते.

झटपट आंबोळ्या बनवायच्या असतील तर:

१/२ कप जाडे तांदुळ, १ टेबलस्पून उडीद डाळ आणि चिमुटभर मेथीदाणे ४-५ तास भिजत घाला आणि वाटा. रात्रभर आंबू द्या.

१ टेबलस्पून उडीद डाळ आणि चिमुटभर मेथीदाणे २ तास भिजत घाला आणि वाटा. त्यात १/२ कप तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करा. रात्रभर आंबू द्या.

मी हे कमीत कमी प्रमाण दिले आहे ज्या प्रमाणात हवे त्या प्रमाणात गुणुन वाढवावे.

शिरवळ्या आणि नारळाचा रस

हल्ली हा प्रकार कोकणात फारच कमी केला जातो. कारण हा पदार्थ करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते.  तांदूळ आणि नारळापासून तयार करण्यात आलेला हा प्रकार तुम्ही कधीच खावून पाहिला नसेल तर तो खावून पाहा. तांदूळाचे पीठ विशिष्ट पद्धतीने उकडून पारंपरिक शेवयांच्या भांड्यांमधून शेवया काढल्या जातात. या शेवया काढण्याची पद्धत जमली तरच या शेवया नरम नरम होतात. त्याच्यासोबत नारळाचा रस्सा खाण्यासाठी दिला जातो. नारळाचे दूध काढण्यासाठी खवलेला नारळ, थोडसं भाजलेलं जिरं, वाटले जाते. त्यात रंगासाठी थोडीशी हळद घातली जाते. वाटलेल्या नारळातून रस काढला जातो. त्यामध्ये चवीनुसार गूळ घातले जाते आणि नारळाचे दूध मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवले जाते. गुळ वितळले की हा नारळाचा रस तयार होतो. हा रस आणि शिरवळ्या म्हणजेच गरम गरम शेवया दिल्या जातात.

घटक:

शेवया साहित्य:

1 कप तादळाचे पीठ

1 कप नाचणीचे पीठ

2 कप पाणी

1/2 वाटी तेल

चवीनुसार मीठ

रस साहित्य:

दीड नारळाचे खोबरे

1 कप गूळ

1 छोटा चमचा वेलची पूड

कुकिंग सूचना

प्रथम नारळ किसून घ्या. किसलेलं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.

बारीक वाटलेले खोबरे एका सुती कापडामध्ये घेऊन चांगले पिळून त्याचे दूध काढून घ्या. वाटले तर परत एकदा तो किस मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि त्याच पद्धतीने नारळाचे दूध काढून घ्या. कारण शेवयांसाठी नारळाचा रस भरपूर प्रमाणात लागतो. आता नारळाच्या दूधामध्ये वेलची पावडर आणि गूळ घाला आणि मिक्स करून बाजूला ठेवून द्या. गूळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमीजास्त करू शकता.

आता तांदळाच्या पीठाची उकड काढून घ्या. मोदकासाठी करतो तशी. उकड काढण्यासाठी १ कप पिठाला १ कप पाणी असे प्रमाण घ्या. उकड घेताना पाण्यात थोडे मीठ घाला. उकड घेतल्यानंतर पीठ मळून घ्या आणि त्याचे साच्यामध्ये बसतील असे गोळे करून घ्या.

एका जाळीदार प्लेटला तेल लावून त्याच्यावर साच्याने शेवया पाडून घ्या. कूकरमध्ये ठेवून ७ ते ८ मिनिटे वाफवून घ्या. थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या. आता नाचणीच्या पीठाची ह्याच प्रकारे उकड काढून घ्या.

नाचणीचे पीठ मळून अशाच प्रकारे शेवया पाडून कूकरमध्ये ७ ते ८ मिनिटे वाफवून घ्या. थंड झाल्यावर प्लेटमध्ये काढा. प्लेटमध्ये सर्व्ह करताना आधी शेवया आणि वरती रस टाकून खायला द्या.

प्लेटमध्ये सर्व्ह करताना आधी शेवया आणि वरती रस टाकून खायला द्या.

गूळ पोहे

गूळ पोह्यांबद्दल आपण या आधीही बोललो आहेच. कोकणात प्रत्येक घरात अगदी आवर्जून हा पदार्थ केला जातो. करायला अगदी सोपा आणि चविष्ट असा पदार्थ आहे. गावी मिळणारे पोहे, त्यामध्ये किसलेले गूळ, खवलेलं ओलं खोबरं घालून हा पदार्थ खायला दिला जातो. कोणतीही फोडणी न देता किंवा गॅसचा वापर न करता हा पदार्थ केला जातो. त्यामुळे करायला झटपट असा हा पदार्थ आहे. फक्त तुम्हाला यासाठी खास लाल पोहे हवे. जे हल्ली अनेक दुकानांमध्ये तुम्हाला मिळतात.

घटक:

2 वाट्या पोहे

1 वाटी किसलेला गूळ

1/4 टीस्पून मीठ

2 टीस्पून तूप

1 टीस्पून वेलची पावडर स्वादासाठी

2-3 टीस्पून ओले खोबरे

कुकिंग सूचना:

स्टेप 1

सर्व साहित्य घेवू.

स्टेप 2

पोहे भिजवून घेवू.एका भांड्यात ओले खोबरे, गूळ, मीठ, तूप, वेलची पावडर, मिक्स करून घेवून व्यवस्थित कुस्करून घ्यायचे. आता त्यात भिजवलेले पोहे घालू. आणि व्यवस्थित एकजीव करू.

स्टेप 3

ह्या मध्ये केळे पण घालू शकता.

पातोळ्या

हळदीच्या पानात बनवल्या जाणाऱ्या पातोळ्या कोकण वगळताही अनेकांच्या आवडीच्या आहेत. मोदकाचेच एक वेगळे व्हर्जन म्हणायला या रेसिपीला काहीच हरकत नाही. तांदूळाचे पीठ भागवून ते चांगले मळले जाते. हळदीच्या पानांवर ते थापले जाते. त्यावर मोदकासारखे सारण मधोमध भरुन करंजीप्रमाणे ते दुमडले जाते. त्यानंतर त्या उकडीच्या मोदकाप्रमाणे उकडल्या जातात. हळदीच्या पानांचा स्वाद पातोळ्यांमध्ये उतरल्यामुळे ते अधिक चविष्ट लागतात. नागपंचमी, गणपतीच्या दिवसांमध्ये हा पदार्थ केला जातो.

घटक:

 1 कप नारळ

गुळ

1 टीस्पून वेलची पावडर

1/2 कप तांदळाचे पीठ

पाणी

3-6 हळदीची पाने

कुकिंग सूचना:

1: कढईत थोडे पाणी घया त्यात तांदळाचेपिठघालून उकड बनवा थोडा वेळ झाकून ठेवा.

2: दुसऱ्या कढईमध्ये नारळाचा चव गुळ एकत्र करून सारण बनवुन घेणे त्यात वेलची पूड घालणे.

3: हळदीची पाने घेउन पानांवर मळून घेतलेली उकडिचाछोटा गोळा थापून घेणे नंतर त्यात सारण भरणे वाफवून घेणे.

पुरणपोळी

'होळी रे होळी पुरणाची पोळी' अस समीकरणं असलं तरी खरतरं इतरही बऱ्याच सणावारी आपल्याकडे पुरणपोळी करायची पद्धत आहे. पण प्रत्येक ठिकाणाची पुरणपोळी करायची पद्धत वेगळी आहे. देशावर जास्तकरून पूर्णपणे कणिक वापरूनच पोळी केली जाते. काही ठिकाणी अर्धी कणिक आणि अर्धा मैदा वापरून पोळ्या बनवतात. काही ठिकाणी तेल पोळ्या तर काही ठिकाणी खापरावरच्या पोळ्या. काही ठिकाणी साखर वापरतात तर काही ठिकाणी गुळ. मुख्यत्वे पुरणासाठी चणाडाळच वापरली जाते पण काही ठिकाणी तुरीच्या डाळीचेही पुरण बनवतात. माझ्या माहेरी पुरणपोळी साठी पूर्ण मैदाच वापरला जातो. मैद्यामुळे पोळी अगदी लुसलुशीत आणि मऊ होते, तोंडात विरघळते जणु.

साहित्य: पुरणासाठी-

चणाडाळ २५० ग्रॅम

गुळ किसुन- २५० ग्रॅम (यातील टेबलस्पून गुळ काढून त्याऐवजी तेवढीच साखर घालावी. चांगली चव येते.)

साखर- टेबलस्पून

हळद- चिमुटभर

मीठ- चिमुटभर किंवा चवीनुसार

वेलची पूड - / टीस्पून

जायफळ पूड - / टीस्पून

पोळीसाठी-

मैदा- २५० ग्रॅम

हळद- चिमुटभर

मीठ- चिमुटभर

पाणी - अंदाजे / कप

तेल- / कप

तांदुळाचे पीठ- जरुरीनुसार (नसेल तर मैदाच वापरा. पण तांदूळ पीठाने पोळ्या सरसर लाटता येतात.)

साजुक तूप- जरुरीनुसार

कृती: पुरणासाठी-

डाळ स्वच्छ धुवून पुरेश्या पाण्यात अर्धा तास भिजवावी.

चिमुटभर हळद मीठ टाकुन कुकरला शिजवून घ्या. कुकरच्या भांड्यात ठेवा, म्हणजे खालून करपायची भीती नाही. बाहेर शिजवतो त्यापेक्षा डाळीत पाणी कमी ठेवावे. शिट्ट्या घ्याव्या. (बाहेर शिजायला अंदाजे ४०-५० मिनिटे लागतात. सारखे लक्ष ठेवावे लागते.) डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे अन्यथा पुन्हा शिजवावी पण वरणासाठी करतो तसा गाळ व्हायला नको. अख्खीच दिसली पाहिजे पण बोटाने दाबल्यास फुसकन तुटली पाहिजे.

डाळ शिजल्यावर सर्व पाणी गाळुन काढून बाजूला ठेवावे. (हेच पाणी वापरून कटाची आमटी करतात.) 

जाड बुडाच्या भांड्यात गुळ टाकुन थोडा विरघळला की शिजवलेली डाळ टाकावीगुळ विरघळेपर्यंत चांगली परतून घ्यावी. मिश्रण एकजीव झाले की गरम असतानाच पुरण यंत्रावर किंवा पाट्यावर वाटावे. फुड-प्रोसेसरवर पण वाटता येते. (वाटून झाल्यावर पुरण फारच सैल वाटत असेल तर स्वच्छ सुती कपड्यावर पसरावे. कपडा पाणी शोषून घेतो पुरण कोरडे होते.)

पुरण वाटून झाल्यावर वेलची पूड जायफळ पूड टाकावी आणि पुन्हा छान मळून घ्यावे.

पोळीसाठी- मैदा चाळून घ्यावा. साधारण त्यातील / कप मैदा बाजूला काढून ठेवा.

मैद्यात चिमुटभर हळद मीठ टाकून मिक्स करा.

आता मैद्यात हाताने मिक्स करत करत हळूहळू पाणी घालत घ्या. अगदी चमच्याने घातलेत तरी चालेल. अंदाजे / कप म्हणजे साधारण अर्धी वाटी पाणी लागेल. खूप चिकट होतो. (म्हणूनच थोडा मैदा बाजूला काढून ठेवावा, जर भिजवलेले पीठ खूपच सैल वाटले तर वरून मैदा घालता येतो.) हाताला थोडेसे तेल लावून त्याचा गोळा करून साधारण / कप म्हणजे साधारण एक वाटी तेलात ते तास भिजत ठेवावा. एवढ्या वेळात मैदा त्यातील तेल शोषून घेतो.

पोळ्या करायला घेताना हा मैद्याचा गोळा परातीत घेवून पुन्हा चांगला मळून घ्या. थोडेफार जे तेल उरलेले असते ते पण तो मैद्याचा गोळा शोषून घेतो. अगदी त्या गोळ्याला तन्यता येईपर्यंत मळायचे आहे.

पुराणाचे समान आकाराचे गोळे करून घ्यावेत. याचे २० गोळे होतात.

छोट्या लिंबाएवढ्या आकाराचा मैद्याचा गोळा घेऊन हातानेच दाबून पुरीसारखा आकार करून त्यात पुरणाचा गोळा भरून तो सर्व बाजुंनी सारख्या प्रमाणात ताणत ताणत नेवुन त्याची टोक जुळवून टाकावीत. वर आलेले जास्तीचे कणिक पिळुन काढून टाकावे.

पोळपाटावर तांदुळाचे पीठ भुरभुरून हलक्या हाताने पुरणपोळी लाटावी. लाटताना मध्यभागीच जोर देऊ नये, नाहीतर पुरण मध्येच राहत आणि नुसती मैदाची पोळी बाजूनी वेगळी होते. कडा जाड लाटू नये, चिवट लागतात.

तवा व्यवस्थित गरम करून घ्या. शक्यतो नॉन-स्टिक तवाच वापरा, पोळी चिकटण्याची शक्यता कमी असते.

पोळीवरील जास्तीचे पीठ स्वच्छ रुमालाने हलकेच झटका. हलक्या हाताने पोळी उचलून तव्यावर टाका. मध्यम ते मंद आचेवरच भाजा, हलक्या हाताने उलटा. भाजताना दोन्ही बाजूंनी तूप लावा.

गरमागरम पोळीवर साजुक तुपाची यथेच्छ धार सोडा आणि दुधासोबत किंवा कटाच्या आमटीसोबत वाढा. कोकणात काही वेळा गुळवणी (गोड नारळाचे दुध) सोबत पुरणपोळी वाढतात. देशावर काही ठिकाणी बासुंदी सोबत तर काही ठिकाणी आमरसासोबत पुरणपोळी वाढतात.

डब्यात भरताना पोळ्या थंड झाल्यावरच भरा.

काकडीचे धोंडस

काकडीचे धोंडस हा प्रकारही तुम्ही आतापर्यंत नक्कीच ऐकला असेल. यालाच काही जण टोपातलं असं म्हणतात. एक प्रकारे पाहायला गेलं तर हा केकचाच प्रकार. पण कोकणातला पौष्टिक केक बरं का. यामध्ये मुख्य चव असते ती म्हणजे काकडीची.काकडी,गूळ, खोबरं,तांदूळाचा रवा( तांदूळ भिजत घालून ते कोरडे करुन वाटले जातात.) एका भांड्यात  सगळे साहित्य करुन हे सगळं शिजवलं जातं. हे धोंडस टोपाचा आकार घेते. त्याचे काप काढून ते खाल्ले जाते.

घटक:

2 वाटी तवशी किस

1 वाटी गूळ

1 वाटी केशरी रवा

3 टीस्पून तूप

1/4 वाटी शेंगदाणे

1 टीस्पून वेलची पूड

कुकिंग सूचना:

तवशे किसून घेवू पाणी पण ठेवावे

एका कढईत 2 टीस्पून तूप घालून केशरी रवा खमंग भाजून घेवू.

तसेच 1 टीस्पून तूप घालून तवश्याचा किस पाणी काढून परतून घ्यावा थोडा नरम होईल येवढाच. पाणी बाजूला ठेवावे.

त्यात आता गूळ घालून थोड शिजवावे किस गळून पाणी ठेवले होते ते घालावे, त्यात शेंगदाणे, वेलची पूड घालून परतणे.

त्या नंतर त्यात भिजलेला केशरी रवा घालून थोडे शिजवून. गॅस बंद करावा आणि 15-20 मिनिट सर्व मिश्रण पुरवण्यास ठेवू.

एका जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून व्यवस्थित पसरून घेवू आता त्यात मुरलेले मिश्रण घालून माध्यम आचेवर 1/2 तास शिजवून घेवू केक प्रमाणे. तळ खरपूस होई पर्यंत ठेवू.

असे करत असताना मध्ये 10 मिनिटांनी बंद करून पुन्हा गॅस सुरू करावा म्हणजे तळात जास्त लागत नाही आणि छान धोंडस तयार होते.

लहान मोठ्या आकारात तुकडे करून सर्व्ह करा.

सारांश

कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे. त्यामुळेच कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही कायमच रमणीय असते. कोकणावर निसर्गाची जितकी किमया आहे, तितकाच आत्मीयतेने भरलेला कोकणी माणसाचा पाहुणचारही आहे. कोस्टल महाराष्ट्र, ज्याला कोकण म्हणून ओळखले जाते, हे शाकाहारी तसेच मांसाहारी लोकांसाठी स्वादिष्ट अन्नासाठी मक्का आहे. राज्याच्या या किनारपट्टीला सुपीक काळी माती आणि दमट हवामान आहे, जे उष्णकटिबंधीय फळे आणि भाजीपाला उत्पादनासाठी अनुकूल आहे. जर तुम्ही एप्रिलच्या उन्हाळ्याच्या महिन्यांत ते जूनच्या सुरुवातीस या स्वर्गाला भेट देण्याचे ठरविले, तर तुमच्यावर रहिवाशांचे लक्ष वेधून घेणार्या स्थानिक पाककृतींचे पालन केले जाईल. चांगली बातमी अशी आहे की, हे स्वयंपाकासंबंधीचे आनंद सर्व वापरून आणि सेंद्रिय घटकांपासून बनवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही अपराधीपणाची भावना बाळगता, तुम्हाला हवे तितके ते खाऊ शकता.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know