Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 31 January 2024

गिफ्ट द्या अन् मोठा आनंद मिळवा | जितका आनंद भेट मिळाल्याने होतो, तितकाच भेट दिल्यानेही मिळेल | दिवाळीत भेट दिल्याने कोणाचेही मन जिंकता येऊ शकते | भेट दिल्याने नाती बळकट होतात | मुलांना भेट देण्याआधी त्यांचे वय लक्षात घ्या | लोकांना भेटवस्तू हव्या आहेत ज्या त्यांना नातेसंबंधाची आठवण करून देतात

गिफ्ट

 

गिफ्ट द्या अन् मोठा आनंद मिळवा

जेव्हा सण-समारंभच आनंद देण्याचा आणि घेण्याचा असेल, तेव्हा भेट देण्यापेक्षा जास्त चांगले काय असेल? जितका आनंद भेट मिळाल्याने होतो, तितकाच भेट दिल्यानेही मिळेल.

दिवाळी भेट कशी असावी?

दिवाळीत भेट देण्यास कोणी भाग पाडत नाही. पण भेट दिल्याने कोणाचेही मन जिंकता येऊ शकते. भेट अशी असावी, ज्यामुळे कोणाचेही मन आनंदी होईल आणि तुमचा खिसा सुद्धा रिकामा होणार नाही. बजेट जर कमी असेल तर ज्या भेटी तुम्हाला मिळाल्या आहेत, त्यांच्यापैकीच काही पुढे दिल्या जाऊ शकतात. फक्त या गोष्टीकडे लक्ष द्या की, भेट कोणाला दिली जात आहे आणि त्यांचे वय काय आहे?

कुटुंबासाठी भेट वस्तू

हँडमेड साबण किंवा त्यांच्या आवडीच्या कंपनीकडून पूर्ण कॉस्मेटिकचा सेट, पश्मिना शाल, सलवार-कमीज, काश्मीरी स्कार्फ, किंवा डिझायनर घड्याळे, मुलींना खूप आवडतात. या सर्व गोष्टी तुमच्या बजेटमध्ये सुद्धा येतील. जर थोड्या कमी किंमतीत काम चालवू इच्छित असाल तर चॉकलेटचा सुद्धा आधार घेऊ शकता.

मुलांना गॅजेट्स खूप आवडतात. भेट म्हणून देताना तुम्ही त्यांना मोबाइल हँडसेट, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, जीपीएस सिस्टिम, एमपी३ प्लेयर, हेडफोन इत्यादी देऊन खूश करू शकता. जर त्यांना किचनची आवड असेल तर त्यांना एखादे आधुनिक उपकरण देऊ शकता. कोणाला फोटोग्राफीचा छंद असेल तर त्यांना कॅमेरा भेट देऊ शकता. बहुतांश पुरुषांना घड्याळांचा छंद असतो. तुम्ही घड्याळही देऊ शकता. सासऱ्यांना जर तरुण दिसण्याचा छंद असेल तर त्यांना चांगल्या ब्रँडचा टी-शर्ट आणि चष्मा भेट देऊ शकता. तुम्हाला हवे तर आपल्या सासू आणि सासऱ्यांना एकत्र गिफ्ट देऊ शकता. जसे दोघांसाठी घड्याळ, फिल्मची तिकिटे, कुठे बाहेर जाण्यासाठी प्रवासाची तिकिटे इत्यादी.

आपल्या शेजाऱ्यांना द्यावयाच्या भेटवस्तू

भेट दिल्याने नाती बळकट होतात. आपल्या शेजाऱ्यांना बांबू स्टिक, विंडचाइम्स, लाफिंग बुद्धा इत्यादी देऊ शकता. सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या भिंतीवरील घड्याळांना शेजाऱ्यांसाठी नावासह तयार करून भेट देऊ शकता.

मुलांसाठी द्यावयाच्या भेटवस्तू

मुलांना भेट देण्याआधी त्यांचे वय लक्षात घ्या. एकच गिफ्ट दरवर्षी देणे वाईट आयडिया आहे. असे काही द्या ज्याला मुलगा त्याचवेळी वापरू शकेल. गिफ्ट बरोबर चॉकलेट देण्यास विसरू नका. जर त्याला फटाके वाजविण्यास आवडत असेल तर फटाके देऊ शकता. व्हिडिओ गेम, चॉकलेट हॅम्पर आणि पुस्तके सुद्धा मुलांना आवडतात.

गिफ्टचे पॅकिंग शानदार असावे भेटींना आपण सर्वजण भावनांशी जोडून पाहतो. म्हणून त्याचे पॅकिंग सुद्धा चांगल्या प्रकारे असायला हवे. आजकाल बाजारात विविध प्रकारचे पॅकिंग पेपर उपलब्ध असतात. डिझायनर डब्यांनी सुद्धा गिफ्टची सजावट करता येऊ शकते. जर पॅकिंगवर जास्त मेहनत करायची नसेल तर, ते बाहेरून पॅक करून घ्या. भेटी अशा दुकानांमधूनच खरेदी करा, जी तुमचे काम हलके करतील.

मित्र आणि नातेवाईकांना द्यावयाच्या भेटवस्तू

मित्र आणि नातेवाईकांना भेट देण्याआधी त्यांचे वय आणि आवड यांच्याकडे लक्ष द्या. जर कोणी मित्र जवळचा असेल तर त्याला सण-समारंभाच्या प्रसंगी कुर्ता किंवा कुर्ती देऊ शकता. कमी किंमतीत ते बाजारात उपलब्ध असतात.

जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना तुम्ही साडी किंवा कमीज भेट देऊ शकता. मित्र आणि नातेवाईकांना ट्रॅडिशनल गिफ्ट्स सुद्धा दिल्या जाऊ शकतात. जसे, चॉकलेटची टोपली, मेकअपच्या वस्तू, ड्राय फ्रूट्स, बॅग, फोटो फ्रेम, मिठाई, सजावटीचे सामान, मूर्ती इत्यादी.

भेट वस्तू कशी असावी?

भेट अशी असावी, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाला दिली जाऊ शकेल. दिवाळी सारख्या सणाच्या प्रसंगी अनेक वस्तूंवर एकाबरोबर एक फ्रीची ऑफर सुद्धा मिळते. अशा वेळी तुम्ही एखादे इलेक्ट्रॉनिक सामान सुद्धा गिफ्ट देऊ शकता.

ऑफिसातील सहकारी आणि बॉस गोष्ट जेव्हा ऑफिसची असते तेव्हा तुम्ही विचार करता. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज सुद्धा येऊ शकतो. बेकरी बिस्किट, केक किंवा पेन इत्यादी तुम्ही आपल्या बॉसला देऊ शकता. बॉसना चांगल्या पॅकिंगचे गिफ्ट द्या. एखादे चांगले पेंटिंग किंवा फेंगशुईची भेट देऊ शकता. जर बॉस टेक्नो फ्रेंडली असतील तर त्यांना मोबाइल अॅप्लीकेशन देऊ शकता. मिठाईसाठी लो-कॅलरी मिठाईची निवड करा. सहकाऱ्यांनाही काही गिफ्ट देऊ शकता. जर खूप जास्त बजेट नसेल, तर लक्ष्मी-गणेश यांची मूर्ती किंवा राधा-कृष्ण यांची मूर्ती भेट देऊ शकता. तुम्ही आपल्या सहकाऱ्यांना सुगंधी मेणबत्त्या किंवा क्रॉकरी देऊ शकता.

भेटवस्तूंसाठी टिपा

वास्तू शास्त्रामध्ये अशा काही वस्तूंचा उल्लेख करण्यात आलाय ज्या भेटवस्तू गिफ्ट्स म्हणून दिल्याने तुमच्या प्रियजनांचं भाग्य उजळण्यास मदत होईल.

वास्तू शास्त्रामध्ये अशा काही वस्तूंचा समावेश करण्यात आलाय. ज्या भेट म्हणून दिल्याने समोरील व्यक्तीला त्या नक्कीच आवडतीलही, शिवाय तिच्यासाठी त्या लकी ठरू शकतील. म्हणूनच तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा कुटुंबातील व्यक्तींना तुम्ही त्यांच्या खास दिवशी या वस्तू त्यांना गिफ्ट करू शकता.

अनेकजण खास करून गृहप्रवेश किंवा लग्नामध्ये भेटवस्तू म्हणून वेगवेगळ्या देवदेवतांचे फोटो आपल्या प्रियजनांना देत असतात. यामध्ये तुम्ही श्रीगणेशाचा फोटो भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

गणपतीचा फोटो भेटवस्तू म्हणून देणं शुभ मानलं जातं. यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही हा फोटो देत आहात, त्याच्या जीवनातील अनेक संकट दूर होण्यास मदत होते. तसंच त्याच्या घरामध्ये सुख-शांती नांदते.

यासाठीच तुम्ही एखादी सुंदर गणेशाच्या मूर्तीची फोटो फ्रेम गिफ्ट म्हणून देऊ शकता.

हत्तीची मूर्ती- तर काहीवेळी गिफ्ट म्हणून आपण एखादी शोभेची वस्तू किंवा मूर्ती देणं पसंत करतो. एखादी वस्तू भेट म्हणून दिल्यास ती व्यक्ती घरामध्ये ही वस्तू कायम ठेवेल, या उद्देशाने आपण शोभेच्या वस्तू देत असतो. अशा वेळी तुम्ही हत्तीची मूर्ती गिफ्ट म्हणून देऊ शकता. हत्तीला श्रीगणेशाचं रुप मानलं जातं. त्यामुळे हत्तीची मूर्ती भेट म्हणून देणं शुभ ठरतं. अलिकडे बाजारात अनेक शोभेच्या नक्षीकाम केलेल्या रंगीत हत्तीच्या मूर्ती पाहायला मिळतात. मात्र ही मूर्ती देताना ती चांदी, पितळ किंवा लाकडी असावी. शिवाय जर हत्तीची जोडी भेट म्हणून दिली तर व्यक्तीचं भाग्य उजळण्यास मदतत होते.

चांदीच्या वस्तू द्या भेट- जर तुम्ही एखाद्याला धातूची वस्तू भेट म्हणून देत असाल, तर चांदीची वस्तू भेट म्हणून देणं शुभ मानलं जातं. वास्तू शास्त्रामध्ये चांदी या धातूला शुभ मानलं गेलंय. चांदीमध्ये लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं असं मानलं जातं. यासाठीच तुम्ही लग्नकार्यात किंवा गृहप्रवेश, बारसं, पूजा अशावेळी चांदीची एखादी देव-देवतेची मूर्ती किंवा नाणं भेट म्हणून देऊ शकता. यामुळे त्या व्यक्तीवर लक्ष्मीचा आशीर्वाद राहिल.

फोटो करा गिफ्ट- एखादी फोटोफ्रेम भेट म्हणून आपण अनेकदा देत असतो. अलिकडे अनेक फोटोंचं कोलाज देणं किंवा त्याच व्यक्तीचा फोटो भेट म्हणून तिला देण्याचा ट्रेंड आहे. मात्र, जर तुम्हाला एखादा खास फोटो भेट म्हणून द्यायचा असेलच तर तुम्ही सात धावणाऱ्या घोड्यांची फोटोफ्रेम भेट म्हणून देऊ शकता. यामुळे समोरच्या व्यक्तीचं भाग्य उजळण्यास मदत होईल. तसचं तुम्ही मातीचे काही शोपीस भेट म्हणून देऊ शकता. यामुळे घरात धनलाभ होतो.

घरासाठी भेट वस्तू- जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याच्या नव्या घरासाठी भेटवस्तू देत असाल तर तुम्ही श्रीगणेशाती मूर्ती किंवा हत्तीच्या मूर्तीसोबतच कासवाची मूर्ती किंवा लाफिंग बुद्धाची मूर्ती भेट म्हणून देऊ शकता. तसचं तुम्ही पाण्याच्या कारंजाचं एखादं शोपीस तसचं मनी प्लांट किंला तुळशीचं रोपही भेट म्हणून देऊ शकता. अशा प्रकारे हे काही भेटवस्तूचे असे पर्याय आहेत ज्यामुळे वास्तूशास्त्रानुसार भाग्य उजळण्यास मदत होईल शिवाय ते समोरच्या व्यक्तीला आवडतीलही.

कोणत्या वस्तू गिफ्ट करू नये

आमच्या जोडीदाराला आनंद देण्यासाठी आम्ही त्याला काही सुंदर वस्तू भेट देतो. पण तुम्हाला माहित आहे का की या भेटवस्तूंसोबत तुमचे नशीबही जोडलेले आहे. होय, आम्ही तुम्हाला सांगतो की कधीकधी असे होते की आपण आपल्या जोडीदाराला किंवा प्रियकराला काही वस्तू गिफ्ट करू नये. पण अनेकदा आपण त्यांना या गोष्टी गिफ्ट करतो आणि नकळत आपल्या नात्यात कटुता वाढवतो. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगतो की काही भेटवस्तू आहेत जी तुम्ही चुकूनही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा प्रेयसीला देऊ नये. जर आपण वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवला तर यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. चला तर मग आम्ही तुम्हाला अशा भेटवस्तू सांगू ज्या तुम्ही तुमच्या पार्टनरला कधीही गिफ्ट करू नये.

घड्याळ भेट म्हणून देऊ नका

ज्योतिषी मानतात की जेव्हा तुम्ही एखाद्याला घड्याळ भेट देता तेव्हा तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ त्या व्यक्तीला देत असतो.

हातरुमाल

तुम्ही तुमच्या जोडीदाराला रुमाल भेट देऊ नये. त्यामुळे या जोडप्यामधील प्रेमसंबंध कमी होऊ लागतात. वास्तूनुसार, रुमाल गिफ्ट केल्याने दोन व्यक्तींमधील वाद वाढतो.

शूज

जर तुम्ही तुमच्या प्रेयसीसाठी किंवा प्रियकरासाठी शूज खरेदी केले तर असे मानले जाते की ते ब्रेकअपचे एक कारण असू शकते, कारण शूज गिफ्ट केल्याने जोडप्यामध्ये तेढ निर्माण होते.

काळे कपडे

तुमच्या जोडीदाराला कधीही काळे कपडे देऊ नका, कारण काळा रंग रंगहीन असतो आणि शोक व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्याला काळे कापड दिले तर तुम्ही त्या व्यक्तीपासून आपोआप दुरावू शकता.

परफ्यूम

चुकूनही तुमच्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडला परफ्यूम देऊ नका. भेट म्हणून परफ्यूम दिल्याने तुमचे प्रेम एखाद्या परफ्यूमच्या सुगंधाप्रमाणे कमी होऊ शकते जे कालांतराने कमी होते, म्हणून तुम्ही तुमच्या प्रियजनांना परफ्यूम किंवा देव किंवा सुगंधी वस्तू कधीही भेट देऊ नका.

सारांश

वाढदिवस, लग्न किंवा कोणत्याही सणाला कुणाला कोणती भेट द्यायची, अनेकदा ही गोष्ट त्रास देते. काय द्यायचे हे समजत नसेल तर ते सोपे काम नाही हे समजून घ्या. भेटवस्तू देणे हे एक शास्त्र आहे. भेटवस्तूंचा एकमेकांच्या संबंधांवर दीर्घ परिणाम होतो. त्या दुरावा मिटवितात. भेटवस्तूंची बाजारपेठ हजारो कोटींची आहे. लोकांना अशा भेटवस्तू द्या ज्या हृदयस्पर्शी असतील. त्या कायमसाठी जतन केल्या जातील. वापरल्यानंतर फेकून देण्यायोग्य वस्तू देऊ नका. जर्नल ऑफ कंझ्युमर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, लोकांना भेटवस्तू हव्या आहेत ज्या त्यांना नातेसंबंधाची आठवण करून देतात, जसे की एकत्र चित्र, अल्बम, जे नातेसंबंध जोडून ठेवतात.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know