देवघर
घरात देवघर नेमके कुठे असावे?
घर असावे घरासारखे, असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो वा खरेदी करत असतो. प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते. सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृहसजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे, कुठे असावे, याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो. देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे. घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते.
देवघरात मूर्तीची प्रतिष्ठापना कधी करावी?
तुम्ही कोणत्याही दिवशी घरातील मंदिरात मूर्तीची स्थापना करू शकता, परंतु मंगळवारी तुम्ही हे काम टाळावे. तुम्ही शनिवारी शनिदेव आणि हनुमानजींच्या मूर्तीची स्थापना करू शकता, तुम्ही नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना करू शकता. बसंत पंचमीच्या दिवशी घरातील मंदिरात देवी सरस्वतीची प्रतिष्ठापना करता येते. त्याचबरोबर दिवाळीत लक्ष्मी, कुबेर देवीच्या मूर्तीची स्थापना करता येते. कोणत्याही देवतेची किंवा देवतेची मूर्ती स्थापित करण्यापूर्वी पंडितजींकडून शुभ मुहूर्त घ्यावा. मलमास महिन्यात मंदिरात स्थापना करू नये, घरातील मंदिरात मूर्तीची स्थापना करू नये. बृहस्पति किंवा शुक्र अस्त किंवा चंद्र अशक्त असताना देखील मंदिरात किंवा घराच्या मंदिरात मूर्तीची स्थापना टाळावी.
घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच; परंतु देवघर आणि देव्हारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेकजण घेत असतात. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा. घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो की मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे? देवघरासाठी योग्य दिशा कोणती?
घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य (पश्चिम-दक्षिण) कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे, जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरांमध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते, त्या घरांमधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्य प्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते, असे सांगितले जाते. पूजा घरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. पूजा घरात पांढऱ्या, पिवळसर रंगाची संमगरवरी फरशी जरुर बसवावी.
देवघराची स्थापना केव्हा करावी?
चैत्र, फाल्गुन, वैशाख, माघ, ज्येष्ठ, सावन आणि कार्तिक हे मंदिर स्थापनेसाठी सर्वोत्तम हिंदी महिने आहेत. या सर्व महिन्यांत तुम्ही तुमच्या घरात मंदिर स्थापन करू शकता. घरात मंदिर स्थापनेसाठी केवळ महिनाच नाही तर दिवसही महत्त्वाचा असतो. सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी तुम्ही घरामध्ये मंदिराची स्थापना करू शकता. केवळ मंगळवार, शनिवार आणि रविवारी घरात मंदिराची स्थापना करू नये. याशिवाय घरातील मंदिराची स्थापना नेहमी अभिजीत मुहूर्तावर करावी. सकाळी किंवा रात्री कधीही घरात नवीन मंदिराची स्थापना करू नका. मंदिराची स्थापना करण्यासाठी तुम्ही नवरात्री, रामनवमी, जन्माष्टमी, सावन, दिवाळी इत्यादी सण देखील निवडू शकता. एवढेच नाही तर मंदिराच्या स्थापनेच्या दिवशी शुभ नक्षत्राची काळजी घ्यावी. पुष्य, उत्तरा फाल्गुनी, उत्तरा आषाढ, रेवती, रोहिणी, अश्विनी, श्रावण आणि पुनर्वसु नक्षत्र हे मंदिर स्थापनेसाठी अत्यंत शुभ मानले जातात.
देवघर कसे असावे?
देवघर लाकडाचे किंवा संगमरवरी दगडाचे असावे किंवा लाकडाच्या वरती पत्र्याची नक्षी केलेला असला तरी चालेल. घरातील मंदिर कमीत-कमी दिड फुट उंच, एक फुट खोल आणि दिड फुट रुंद असावे. मंदिरावर कळशाच्या खालील भाग असावा परंतु कळस नसावा. मंदिरात पायऱ्या १, ३, ५ अशा असाव्यात. मंदिर भिंतीवर अडकवून ठेवू नये. भिंतीवर जर मंदिर लावायचे असल्यास अगोदर भिंतीत एक लादी लावावी आणि त्यावर मंदिर ठेवावे. मंदिरात लुखलुखता बल्ब लावू नये, शुभ्र पांढरा प्रकाशाचा बल्ब लावावा. शक्यतो मंदिर जमिनीवरच ठेवावे, पूजा चांगली होते. जमिनीवर पाठ ठेवून मंदिर त्यावर ठेवावे. मंदिर घरात पूर्वं ईशान्य, उत्तर किंवा पश्चिम दिशेला येईल असेच लावावे, चुकुनही घराच्या आग्नेय, दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला मंदिर ठेवू नये.
नवीन मंदिर घेताना शुभ दिवस बघुनच मंदिर घ्यावे. मंदिरातील देव-देवतांची पूजा घरातील कर्त्या पुरुषानेच करणे गरजेचे आहे. पूजा करताना आपलं तोंड पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशेला आलं पाहिजे, चुकुनही दक्षिण दिशेला येता कामा नये. मंदिरात आपल्या डाव्या हाताला दिवा लावावा, दिव्यात दोन वातीची एक वात आणि तिळाचे तेल किंवा तूप वापरावे. घरात पूजा झाल्यानंतर एकूण ४ अगरबत्ती लावाव्यात. दोन मंदिरात आपल्या उजव्या हाताला, एक तुळशीत आणि एक मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर. मंदिराला दररोज एक चांगला हार लावावा. प्रत्येक फोटो-मूर्तीला फुले वाहावीत. पूजा झाल्यानंतर आठवणीने शंख वाजवावा.
देवघरातील मूर्ती
देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत. देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य माळा असू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळही नसावी. प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात. कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंच धातूची असावी. देव्हाऱ्यातील सर्व मूर्ती तोंडे पश्चिमेस असावी. म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल, अशा पद्धतीने मांडणी करावी. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे करुन ठेवावे. पूजाघराला तोरण असावे, उंबरठा असावा.
देवघरात शिवलिंग ठेवावे का?
देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेऊ नये, जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकराएवढे असावे, असे सांगितले जाते. तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे. अन्य देवी-देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात. घरामध्ये ज्या ठिकणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल-बूट घेऊन जाऊ नये. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे, असे सांगितले जाते.
देवघरात काय करू नये?
देवघरात महादेव शंकराची मूर्ती अगर फोटो पूजले जाऊ नयेत, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. देवघरात शनीची पूजा करू नये. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवघरात ठेवू नये, असे म्हटले जाते. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. गुरू व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये, असे सांगितले जाते. देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर मांडावीत. एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. एकाच देवतेची मूर्ती व तसबीर (फोटो) असेल तर हरकत नाही. देवघरात स्टोअरेज करताना तेल, वाती, अगरबत्ती, तूप या साहित्याचा विचार करून कप्पे बनवावे. शिवाय हात पुसायला रुमाल लागतात. देवाचे वस्त्र असतात. ताम्हण, तांब्या अशा वस्तूंसाठी पण नीट जागा हवी. देवघरातील सजावटीचे सामानपण तिथेच राहील, याची काळजी घ्यावी. काही घरांमध्ये अगदीच कमी जागा असते. तिथे देवघर भिंतीवर अडकवावे लागते आणि उभ्यानेच पूजा करावी लागते. अशा ठिकाणी पूजेचे साहित्य अन्य ठिकाणी पण पटकन हाताला लागेल असे ठेवावे. योग्य त्या प्रकाशव्यवस्थेमुळे देवघराचे सौंदर्य वाढते. योग्य प्रकाशव्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भरच घालते. देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहाण्याचा विचारही महत्त्वाचा आहे, असे सांगितले जाते.
सारांश
हिंदू कुटुंबात घरात मंदिर असण्याचे वेगळे महत्त्व आहे. लोक आपल्या श्रद्धेनुसार घरात विविध प्रकारची मंदिरे बांधतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की घरात मंदिर स्थापन करण्याचे काय नियम आहेत? वास्तविक नवीन घर बांधले की, तिथे राहण्यापूर्वी आम्ही गृहप्रवेश पूजा करतो. नवीन गाडी घेताना त्याचीही आधी पूजा केली जाते. दुसरीकडे, जेव्हा नवीन दुकान किंवा घर बांधले जाते, तेव्हा हिंदू धर्मात, प्रथम पाया घातला जातो आणि जमिनीची पूजा केली जाते. या सर्वांसाठी शुभ दिवस आणि मुहूर्त निवडला जातो. अशा वेळी घरात मंदिराची स्थापना करतानाही काही नियमांचे पालन करणे आवश्यक ठरते. विशेषत: मंदिराची स्थापना केव्हा करायची आहे हे ध्यानात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know