ताडगोळे ताड झाडाचे फळ
ताडगोळ्यांचे फायदे
आईस अँपल हे नाव ऐकून कदाचित तुम्हाला सफरचंदाचा हा कोणता नवा प्रकार
आहे का असा प्रश्न पडू शकतो. मात्र ताडगोळा हा शब्द एकताच तुमच्या डोळ्यासमोर लगेचच
थंडगार, रसाळ आणि गुबगुबीत असलेलं फळ दिसू लागेल. ताडगोळ्यालाचा इंग्रजीमध्ये आईस अँपल
म्हणातात. ताडगोळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्व आढळतात.
यामध्ये कार्बोहायड्रेट, फायटोन्यूट्रिएंट्स, कॅल्शियम तसंच फायबर मुबलक
प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे यात प्रोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि ई
देखील उपलब्ध असतात.
ताडगोळ्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात कॅलरीज असतात. तसंच यात आयर्न, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजंदेखील असल्याने हे फळं आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
शरीर हायड्रेट ठेवतं- ताडगोळा फळामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण असल्याने शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते. यासाठीच खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताडगोळ्याचं सेवन फायदेशीर ठरतं. तसंच शरीर नैसर्गिकरित्या थंड राहण्यासाठी देखील मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते- शरीरात थकवा आल्यास किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास शरीराला बळकट बनवण्यासाठी आणि इस्टंट एनर्जीसाठी ताडगोळ्याचं सेवन उपयुक्त ठरतं. ताडगोळा फळामध्ये असलेल्या व्हिटॅमिन्स आणि खनिजांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसंच या फळाच्या सेवनामुळे एनर्जी बुस्ट होण्यास मदत होते.
पचन आणि पोटाचे विकार होतील दूर- जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील. तसंच बद्धकोष्ठता, मळमळ, पोटात सूज अशा पोटाच्या समस्या असतील तर ताडगोळ्याचं सेवन केल्यास तुम्हाला आराम मिळू शकतो. पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय म्हणून ताडगोळ्याचं सेवन उपयुक्त ठरतं.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त- जर तुम्ही वजन कमी करण्याठी प्रयत्न करत असाल, तर तुमच्या डाएटमध्ये आईस अॅपल म्हणजेच ताडगोळ्याचा समावेश करा. ताडगोळ्यामध्ये असलेल्या पाण्याचं जास्त प्रमाण तसंच फायबरमुळे तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्हाला सतत भूक लागत नाही.
यकृत निरोगी ठेवण्यासाठी- ताडगोळ्यामुळे लिव्हर म्हणजेच यकृत निरोगी राहण्यास मदत होते. या फळामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे यकृताच्या समस्या दूर होण्यास मदत होते. तसंच यकृत डिटॉक्स करून यकृताचं आरोग्य चांगलं राखण्यास ताडगोळा उपयुक्त आहे.
मधुमेही रुग्णदेखील करू शकतात सेवन- ताडगोळ्याचं संतुलित प्रमाणात सेवन करणं मधुमेही रुग्णांसाठीदेखील फायद्याचं ठरू शकतं. ताडगोळा फळाचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
त्वचेसाठी फायदेशीर- ताडगोळा फळाचे त्वचेलाठी देखील फायदे आहेत. खास करून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर पुरळ येतं. अशावेळी पुरळ आलेल्या ठिकाणी तुम्ही ताडगोळा स्क्रब करू शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. तसंच ताडगोळ्याच्या सेवनामुळे शरीरात पाण्यांच प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी त्वचादेखील हायड्रेट राहून सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.
अशा प्रकारे ताडगोळ्याचे शरीरासाठी अनेक फायदे असले तरी ताडगोळ्याचं सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा काही समस्या निर्माण होवू शकतात.
तसंच ताडगोळ्यामध्ये कॅलरीचं प्रमाण अत्यल्प असून मोठ्या प्रमाणात पोषक तत्व उपलब्ध असतात. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यासोबत आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होता.
वाढत्या उकाडयामुळे सध्या सारेच हैराण झाले आहेत. घशाला पडणाऱ्या कोरडवर उपाय म्हणून कोणी बाजारातल्या शीतपेयांचा आधार घेतंय, तर कोणी बर्फाच्या गोळयांवर ताव मारतंय. पण या कृत्रिम थंडाव्यापेक्षा ताडगोळयांसारखा नैसर्गिक उपाय केव्हाही चांगलाच परिणामकारक ठरतो.
कोकण किनारपटटीवर नारळी पोफळी प्रमाणेच ताडाची झाडंही मोठया संख्येनं आहेत. त्याला येणाऱ्या छोटया नारळासारख्या फळांना ताडगोळे म्हणतात. या फळांतला गर पाणीदार आणि चवदार असतो. उंच झाडावर चढून ताडगोळे काढण्या एवढाच कस, फळातला गर काढण्यासाठी लागतो. उन्हाळयाच्या दिवसात येणाऱ्या या ताडगोळयांना, बाजारात चांगलीच मागणी असते.
उन्हाळ्याच्या दिवसांत अंगाची लाही होत असताना, बच्चे कंपनी हातगाडीवरच्या बर्फाच्या गोळयांवर ताव मारतात किंवा कृत्रिम शीतपेयांकडे वळतात. त्यामुळे अनेकदा आजारांना निमंत्रण मिळतं. अशा वेळी नैसर्गिक थंडावा देणारे ताडगोळे शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवतात. अंगातली उष्णता कमी करणाऱ्या ताडगोळयांचे आयुर्वेदातही अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. उन्हाच्या दाहकतेवर ताडगोळे हा नैसर्गिक रामबाण उपाय आहे. कोकणात पिकणारे पण फारसे न खाल्ले जाणारे आणखी एक फळ म्हणजे ताडगोळा. उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात गाड्यांवर हे फळ दिसतं पण आपण ते फारसं खात नाही. मात्र पाणीदार असलेलं हे फळ उन्हाळ्यात आवर्जून खायला हवं. किडणीचं आरोग्य चांगले राहण्यासाठी हे फळ उपुयक्त ठरते.
ताडगोळे खाण्याचे आयुर्वेदिक फायदे
१. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत
नैसर्गिक कूलंट म्हणून काम करणारे ताडगोळे उन्हाळ्यात आवर्जून खायला हवेत. शरीराचे वाढलेले तापमान कमी करण्यासाठी या फळाचा चांगला फायदा होतो. उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास त्याचा चांगला फायदा होतो.
२. पोषक तत्वांनी समृद्ध
ताडगोळ्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे सूक्ष्म घटक असतात. ज्यामुळे शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाईटसचे संतुलन राखण्यास मदत होते. उन्हाळ्यात डीहायड्रेशन होऊ नये आणि थकवा दूर व्हावा यासाठी ताडगोळे आवर्जून खायला हवेत.
३. त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर
ताडगोळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजनची निर्मिती करण्यासाठी उपयुक्त असते. यामध्ये असणारे प्रोटीन त्वचेचा आकार आणि रचना चांगली राखण्यास मदत करते. फ्रि रॅडीकल्समुळे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठीही व्हिटॅमिन सीचा चांगला उपयोग होतो.
४. कमीत कमी कॅलरीज
आपल्याला सतत वजन वाढण्याची चिंता असते. त्यामुळे कमीत कमी कॅलरी असलेला आहार घेण्याला अनेकदा आपण प्राधन्य देतो. ताडगोळे हे त्यादृष्टीने अतिशय उपयुक्त असे फळ आहे. १०० ग्रॅमच्या एका या फळात केवळ ४३ कॅलरीज असतात. त्यामुळे आरोग्याच्यादृष्टीने हे फळ अतिशय उपयुक्त असते. उन्हाळ्याच्या दिवसांत हे फळ आवर्जून खावं, कारण या दिवसांत काही जणांना उन्हाळे लागतात, ही जळजळ कमी होते. हे फळ या दिवसांत फ्रीजमध्ये साठवून ठेवावं. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतं. त्यामुळे त्याची साल न काढता फ्रीजमध्ये साठवून ठेवल्यास दीर्घकाळ टिकतं. सुट्टीच्या दिवसांत मुलं अधिक वेळ घराबाहेर असतात, अशा वेळी त्यांना हे फळ खाऊन मगच बाहेर पडायला सांगावं.
5.ताडगोळ्याचा फेसपॅकही
अतिशय उत्तम आहे. चंदनाची साल उगाळून घ्यावी. त्यात थोडं नारळपाणी आणि ताजा ताडगोळा कुस्करून घालावा. याची चांगली पेस्ट तयार करून ती चेह-याला लावावी. फ्रेश वाटतं आणि उन्हामुळे रापलेली त्वचा उजळते.
6.किडणीच्या आरोग्यासाठी
अतिशय उपयुक्त असून शरीराला नको असलेली द्रव्यं याच्या सेवनाने बाहेर फेकली जातात. याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
7.कांजण्या
आलेल्या रुग्णांनी हे फळ खावं म्हणजे कांजण्यांमुळे अंगाला येणारी खाज कमी होते. शरीरातील साखरेची पातळी संतुलित राहते. याचं सेवन केल्यावर अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
ताडगोळ्याचं सेवन करताना घ्या ही काळजी-
- ताडगोळ्याचं अतिप्रमाणात सेवन केल्यास पोटदुखीची समस्या निर्माण होवू शकते.
- पचनाच्या समस्या असलेल्यांनी ताडगोळ्याचं नियंत्रणात सेवन करावं.
- ताडगोळा खाल्यानंतर पाणी पिऊ नये.
- गरोदर महिलांनी ताडगोळ्याचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सारांश
आकाशाला भिडायला निघालेली, सरळ उंच वाढलेलं खोड त्यावर झुबकेदार टोकेरी पात्यांची भारदस्त झाडे म्हणजे ताड. ताडापासून ताडीही काढली जाते. असा हा ताड आपल्या अनेक प्रकारे माणसाला पुरेपूर उपयोगी पडणारा. ठोस उत्पन्नाचे साधन नसल्याने ह्या झाडांकडे आता समाजात दुर्लक्ष होत आहे.
सार्वजनिक रस्त्यावर होणार्या विदेशी पाम ट्री च्या ऐवजी अशी बोरससूस फ्लॉबेल्लीफेर हे शास्त्रिय नाव असणारी ताडाची वा नारळाची झाडे लावावीत ज्याने शहरांच नंदनवन होईल. ताडाच्या झाडांना वसंत ऋतूमध्ये ताडगोळे येतात. या ताडगोळ्यांची विक्री करुन येथील अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे ताडाच्या झाडाची लागवड आणि ताडगोळ्यांची विक्री हा सध्या शेतीला पूरक आणि पर्यायी व्यवसाय बनला आहे. ताडाची झाडे ही विशेषत: कोकण, गोवा दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आढळून येतात. मात्र मुंबई, ठाण्यासारखी महानगरं जवळ असल्याने इथे पालघरमधून मोठ्या प्रमाणावर ताडगोळ्याची आयात होते.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know