शिंक
आपल्याला शिंक का येते
एखाद्या व्यक्तीला शिंका येणे ही सामान्य बाब आहे. कोणालाही कधीही शिंका येऊ शकते. सर्दी आणि फ्लू दरम्यान शिंका येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीला खूप शिंक येत असेल तर ती समस्या असू शकते. आयुर्वेदानुसार, जास्त शिंका येणे हे अनेक गंभीर आजारांशी जोडलेले आहे. शिंकल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचा घसा आणि नाक खूप स्वच्छ राहते. शिंका या एखाद्या व्यक्तीला अनेक प्रकारच्या अॅलर्जीपासून वाचवते.
शिंकण्यापूर्वी आपल्या नाकात विशिष्ट प्रकारची संवेदना जाणवतात. त्यानंतर जोरदार शिंक येते आणि जरा बरं वाटतं. पण प्रश्न पडतो की आपण का शिंकतो? तुमच्या लक्षात आले असेल की शिंकल्यानंतर आपली एक विचित्र प्रकारची चिडचिड दूर होते. शिंका येणे हा तुमच्या शरीरातील दृश्यमान, मायक्रोस्कोपिक अॅलर्जी, विषाणूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग आहे असे म्हटले जाते.
शिंक का येते
कधी-कधी नाकात धुळीचे कण जातात. त्यामुळे नाकात एक वेगळ्या प्रकारची संवेदना जाणवते. त्यातून चिडचिड, अस्वस्थ वाटू लागते. नाकातील हे कण, विषाणू बाहेर काढण्यासाठी शिंक येते. अनेकदा अॅलर्जीमुळेदेखील शिंक येते. उदाहरण म्हणजे काहींना परफ्यूमच्या तीव्र सुगंधामुळे, धुळीमुळे शिंक येते. कधी-कधी तीव्र प्रकाशामुळे डोळ्याची रेटिना आणि मेंदूकडे जाणार्या ऑप्टिक नसा सक्रिय होतात, ज्यामुळे शिंका येतो.
कधी शिंक येते
नाकात (श्लेष्मा) नावाचा पातळ पडदा असतो. ज्यांच्या पेशी आणि ऊती अतिशय संवेदनशील असतात. जेव्हा कोणतीही धूळ किंवा कण येतो आणि या ऊतींमध्ये किंवा पेशींमध्ये चिकटतो तेव्हा शिंका येतो. नाकाबाहेरील हवेतील कण किंवा धूळ नाकात अडकताच नाकात जळजळ सुरू होते आणि लगेच मेंदूला संदेश जातो. मग ही धूळ लवकर बाहेर काढण्यासाठी मेंदू स्नायूंना सिग्नल देतो. ज्यानंतर शिंका येतात.
शिंका येण्याचे हे असू शकतात कारणं
हवामान बदलामुळे
जेव्हा हवामान बदलते तेव्हा शिंका येणे सहसा येतात. जर तुम्ही बेड किंवा उशी किंवा टेबल साफ केले नसेल आणि जर त्यावर बराच वेळ धूळ साचली असेल तर त्यामुळे शिंका येऊ शकतो.
एसी मुळे येऊ शकते शिंक
घरातील, ऑफिसमधील एसीमुळे नाक कोरडे होण्याची समस्या उद्भवू शकते. एसीमध्ये बराच वेळ राहिल्यानंतर शिंका येणे सामान्य आहे.
सायनसच्या कारणाने शिंक
सायनसच्या रुग्णाला खूप शिंका येते. त्यात नाकाच्या आत एक अस्तर असते. ज्याला अनुनासिक अस्तर म्हणतात. त्यातच त्रास सुरू होतो. त्यानंतर नाकातून श्लेष्मा बाहेर येतो. सौम्य वेदना होतात. आणि हे शिंकण्याचे कारण देखील असू शकते.
उपचार
शिंक ही शरीरात शिरलेले त्याज्य पदार्थकण बाहेर फेकत असल्याने त्याचा उपचार करण्याची गरज नसते; परंतु सार्वजनिक कार्यात काम करणार्या व्यक्तींना शिंका सतत येत राहिल्यास अवघडल्यासारखे होऊ शकते. अशा प्रसंगी औषधोपचार करावा लागतो.
प्रतिबंधक उपायात ज्या गोष्टींनी शिंका येतात त्या टाळणे महत्त्वाचे असते. ज्यांना धुळीचा त्रास होतो त्यांनी जाजमे, पडदे स्वच्छ ठेवणे, स्वतः धुळीत काम न करणे जसे महत्त्वाचे आहे तसेच धुळीशी निगडित काम करावे लागत असेल उदा. घर किंवा अंगण झाडून काढणे, तर नाकाला स्कार्फ किंवा फडके बांधावे. ज्यांना जंतुसंसर्गाचा त्रास होत असेल अशांनी त्यावर डॉक्टरी सल्ल्याने उपचार करणे आवश्यक असते. ज्यांना थंड हवेचा त्रास होतो त्यांनी त्याला सामोरे जाऊ नये. _बाजारात मिळणारी अँटिहिस्टॅनिमिक वर्गातील औषधे परस्पर दुकानातून घेऊन तात्पुरता इलाज करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. घरगुती उपचार करायला हरकत नाही; पण त्यामुळे मूळ त्रास बाजूला राहण्याची शक्यता असते. ज्यांना ऍलर्जी आहे त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची ऍलर्जी आहे याच्या शास्त्रशुद्ध तपासण्या करू न उपचार घ्यावेत. त्यानुसार ज्या गोष्टींचा त्रास आहे, त्याच गोष्टीतील सूक्ष्म कणांपासून बनवलेले सौम्य स्वरुपातले इंजेक्शन घेतल्यास हे त्रास कमी होऊ शकतात.
ज्या व्यक्तींना विषाणू संसर्गामुळे शिंका येत असतील, त्यांनी त्वरित औषधोपचार करावा. स्वाइन फ्लूसारख्या आजारात तर ही उपाययोजना वेळ न दवडता केली तर पुढील गंभीर त्रास टळू शकतो. शिंका आल्यावर अँटिबायोटिक घेण्याची अजिबात गरज नसते. त्याऐवजी ताप असल्यास तो कमी करणारी औषधे, नाकात फवारण्याचे नेझल स्प्रे, अँटिव्हायरल औषधे, पूर्ण विश्रांती घेणे जास्त महत्त्वाचे असते.
शिंकेवरील घरगुती उपचार
लिंबू:
शिंकांवर लिंबूने उपचार करण्यासाठी, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध एका ग्लास कोमट पाण्यात मिसळा आणि जेव्हाही तुम्हाला पुन्हा पुन्हा शिंका येऊ लागेल तेव्हा त्याचे सेवन करा. असे केल्याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.
दालचिनी:
जर तुम्ही वारंवार शिंकण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर दालचिनी तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात अर्धा चमचा दालचिनी आणि एक चमचा मध मिसळा. आता या मिश्रणाचे सेवन करा, शिंक येण्याच्या समस्येपासून लवकरच सुटका मिळेल.
पुदिना:
पुदिन्याच्या पानांनी अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. जर तुम्हाला सतत शिंका येत असेल तर दररोज काही पुदिन्याची पाने चावून खाल्ल्याने तुम्हाला शिंकण्यापासून आराम मिळेल. त्याच वेळी, तुम्ही पुदिन्याची पाने घेऊन चहा बनवा आणि ते बारीक करा, यामुळे तुमच्या शिंका येणे देखील थांबेल.
सारांश
नाक आणि तोंडातून फुफ्फुसातील हवा स्फोटकापणे बाहेर फेकली जाण्याच्या क्रियेला आपण शिंक म्हणतो. शिंक ही मानवी शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया आहे. थंड पाणी किंवा थंड हवा, तपकिरीची, मिरचीची किंवा अन्य पदार्थाची भुकटी, खूप धूळ, तीव्र वास आणि वेळप्रसंगी काही जंतू अशा गोष्टींच्या संपर्कात आल्यावर आपल्याला शिंका येतात. या गोष्टींमधील सूक्ष्म कण नाकात जाऊन त्यांचा नाकाच्या आतील अस्तरासारख्या आवरणाशी (म्यूकस मेंब्रेन) संपर्क होतो. त्यातून ते आवरण उद्दीपित होतं. या गोष्टीचा संदेश मेंदूकडे जातो. मेंदूच्या मुळाशी (ब्रेन स्टेम) असलेल्या शिंका नियंत्रित करणाऱ्या केंद्राकडे हा संदेश जातो. तिथून छातीच्या स्नायूंना प्रसारण पावून मोठा श्वास घेण्याची आणि घशाच्या स्नायूंना शिथिल होण्याची आज्ञा दिली जाते आणि शिंक येते.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know