हिवाळ्यातील सर्दी खोकला कफ
हिवाळ्यात सर्दी, खोकला, कफ होणे ही सामान्य समस्या आहे. त्याशिवाय हिवाळ्यात सर्वांत जास्त समस्या निर्माण होते, ती म्हणजे घसा आणि छातीत चिकट कफ तयार होतो. कफामुळे घशास त्रास होतोच; पण इतरही काही त्रास होत राहतात. कफाच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी अनेक प्रकारची औषधे आणि सिरप यांचे सेवन केले जाते. काही वेळा आराम मिळतो; पण काही वेळा मात्र लवकर आराम मिळत नाही.
सतत कोरड्या खोकल्याने हैराण
कोरडा खोकला सहजपणे बरा होत नाही, म्हणून यामध्ये त्या व्यक्तीस खूप त्रास होतो. कोरड्या खोकल्यामुळेही किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्रास होत असेल, तर येथे नमूद केलेले काही घरगुती उपचार तुमच्या उपयोगात येऊ शकतात. आयुर्वेदात खोकल्याचे कारण वात, पित्त आणि कफाचे असंतुलन असल्याचे मानले जाते. खोकला एखाद्या व्यक्तीला दोन प्रकारे त्रास देऊ शकतो. प्रथम थुंकीचा खोकला, ज्यामध्ये त्या व्यक्तीस भरपूर प्रमाणात श्लेष्मा होतो. दुसरा म्हणजे कोरडा खोकला, ज्यामध्ये श्लेष्मा नसतो, परंतु घश्यात वेदना होण्यापासून ते जळजळ होण्यापर्यंत त्रास होऊ शकते. बर्याच वेळा, खोकल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या बरगड्या देखील दुखू लागतात.
कोरडा खोकला सहजपणे बरा होत नाही, म्हणून यामध्ये त्या व्यक्तीस खूप त्रास होतो. कोरड्या खोकल्यामुळेही किंवा इतर कोणत्याही कारणामुळे त्रास होत असेल, तर येथे नमूद केलेले काही घरगुती उपचार तुमच्या उपयोगात येऊ शकतात. चला तर, खोकल्याचे कारण आणि नैसर्गिक उपाय जाणून घ्या.
कोरडा
खोकला संभाव्य
कारणे
नाक आणि घशात तेलकट किंवा इतर कोणत्याही पदार्थामुळे कोरडा खोकला होऊ शकतो. याशिवाय प्रदूषित वातावरण, धूळ किंवा मातीचे कण, टीबी, दमा, फुफ्फुसांचा संसर्ग इ. ही सामान्य कारणे आहेत. कधीकधी फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या बाबतीतही कोरड्या खोकल्याची समस्या उद्भवू शकते.
जाणून घ्या घरगुती उपचार कोरड्या खोकल्यावर
मध कोरड्या खोकल्यावर खूप आराम देतो. म्हणून, जेव्हा जेव्हा कोरडा खोकला येतो, तेव्हा दिवसातून दोन ते तीन वेळा मध घ्या. झोपेच्या वेळी कोमट दुधात मिसळून मध प्या. पण, मध हा शुद्धच असला पाहिजे.
शुद्ध तूपात मिरपूड पावडर मिक्स करुन त्याचे चाटण तयार करा. कोरड्या खोकल्याच्या समस्येतून आराम मिळेल.
तुळशीची पाने आणि आल्याचा रस मधात मिसळून दिवसातून 4 ते 5 वेळा सेवन करा. यामुळे दिलासा मिळेल.
एक चमचा मधात एक चमचा आले रस मिसळून चाटण बनवा, याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो.
सकाळी व संध्याकाळी पाण्यात सैंधव मीठ घालून पाणी त्या कोमट पाण्याने गुळण्या करा. यामुळे देखील भरपूर आराम मिळेल. यामुळे घाश्यातील जळजळ आणि संक्रमण देखील निघून जाईल.
दोन मोठे चमचे जेष्ठमधाचे चूर्ण 2-3 ग्लास पाण्यात उकळा आणि 10-15 मिनिटे त्याने वाफ घ्या. यामुळे खोकल्यामध्ये मोठा आराम मिळतो. जेष्ठमध श्वसनमार्गाची जळजळ कमी करण्यासाठी मदत करतो.
गिलोय, तुळशीचा काढा बनवून सकाळी व संध्याकाळी प्या. याने फक्त कोरडा खोकलाच नाही तर, तीव्र खोकला देखील नाहीसा होतो.
डाळिंबाची साले उन्हात ठेवा आणि वाळवा. याचा प्रत्येक तुकडा तोंडात ठेवून चघळत राहा. कोरड्या खोकल्यातून यामुळे मोठा आराम मिळतो.
लक्षात ठेवा जर, खोकला सामान्य कारणांमुळे झाला असेल, तर सुरुवातीच्या काळात हे घरगुती उपचार केल्यास आराम मिळू शकेल. परंतु यासह, खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे फार महत्वाचे आहे, अन्यथा या उपचारांचा काही उपयोग होणार नाही. सामान्यत: 8-10 दिवसांच्या आत घरगुती उपचार केल्यामुळे सामान्य खोकला बरा होतो, परंतु त्यानंतरही आराम मिळाला नाही तर, हे गंभीर समस्येचे लक्षण देखील असू शकते. या प्रकरणात, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
खोकला व त्यावरील प्रभावी उपाय
खोकल्याचं विषारी सिरप बंद करा, सुका व ओला खोकला मिनटात गुल करणारे हे घरगुती उपाय करा, छाती-घशातील कफही होईल साफ. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे संसर्ग आणि आजारी पडण्याचा धोका
वाढतो. सर्दी-खोकला किंवा घसादुखीसाठी औषधांचा वारंवार वापर केल्याने तुमच्या अंतर्गत
अवयवांचे नुकसान होऊ शकते आणि ठराविक कालावधीत तुमची प्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते.
हे टाळण्यासाठी तुम्ही सर्दी आणि खोकल्यासाठी आयुर्वेदिक उपचारांचीही मदत घेऊ शकता.
01. हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारीक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्या. असे केल्याने कफ मोकळा होतो व बाहेर पडतो. खोकला बरा होतो.
02. आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो.
03. लसुण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात ॲन्टीबॅक्टेरियल गुण असतात, लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात व गरम गरम खाव्यात, याने गळ्याला शेक बसतो व बरं वाटतं.
04. काळे मिरे, जायफळाची पूड व मध एकत्र करून घेतल्यास लवकर फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.
05. पिंपळी गाठ कुटून घ्यावे व मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास खोकला बरा होतो.
06. खोकला बरा होत नसेल, तर नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब नारळाच्या तेलात मिसळून मग याने छातीला मालिश करा, याने कफ मोकळा होतो व बरं वाटते.
07.ज्येष्ठमध हे एक उपयुक्त औषध आहे. खोकल्याची उबळ आली की, ज्येष्ठमध काडी चघळल्यास ढास जाते, बरं वाटते, किंवा ज्येष्ठमध व मध यांचे मिश्रण करून हे चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
08. पुदिना पाने व तुळस. या दोन्ही गोष्टी खोकला बरा करण्यासाठी उपयोगी आहेत. १०-१५ पुदिन्याची पाने व १५-१६ तुळशी ची पाने एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळून अर्ध झाले की एक छोटा गुळाचा खडा टाकून गरम गरम प्यावे. याने कफ मोकळा होतो व बरं वाटतं.
09. लवंग व मध खोकला आल्यावर नुसती लवंग व मध खाण्यापेक्षा दोन्ही एकत्र करून याचे चाटण दिवसभर घेतल्यास आराम मिळतो. बरेच वेळा रात्री ढास लागते. झोप लागत नाही. अशा वेळी पाव चमचा जिरेपूड + पाव चमचा सुंठ पावडर एकत्र करून घेतल्यास उबळ जाते. मध मिसळून द्यावे.
10. सर्दी व खोकला झाल्यास मूठभर कडुनिंब पाने धूवून घ्या व एक चमचा ओवा त्यात घालून बारीक वाटावे व हा लेप कानशिलाला लावा. संक्रमण दूर होतील.
11. खोकला बरा होत नसेल, तर चार वेलदोडे व तितकीच सुंठ पावडर एकत्र करून मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
12. नुसती कोरडी ढास लागली असेल, तर दोन वेलदोडे तव्यावर भाजून घ्या. पावडर करून त्यात तुप व खडीसाखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
13. सारखा खोकला येत असेल, किंवा श्वास लागत असेल तर एक ग्लास पाण्यात एक चमचा धने व एक तुकडा ज्येष्ठ मध टाकून उकळून घ्यावे, आटवून अर्धा करा. मग कोमट करून घ्या. याने आराम मिळतो.
14. खोकला, कफ, सर्दी वर रोज विड्याचे पान दिवसातून दोन वेळा खावे.
15. खोकल्यावर सुंठीची पावडर अर्धा चमचा + पिंपळी चूर्ण + बेहडा चूर्ण पाव चमचा हे एक चमचा मधात मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
16. खोकला झाल्यास बडीशेप व खडीसाखर खावी.
17. एक चिमूटभर काताची पावडर घेऊन त्यावर गरम पाणी प्यावे. बरं वाटते.
18. खोकल्यातून रक्त येत असल्यास ओले खोबरे पाव वाटी घेऊन त्यात पाच, सहा मनुका घालून खावे.
19. खोकला आल्यावर चिकणी सुपारी खावी.
20. खोकला बरा होत नसेल, तर तुळशीच्या पानांचा रस दोन चमचे घेऊन त्यात थोडी खडीसाखर घालून घ्यावे. दिवसातून तीन, चार वेळा घ्यावे. असे तीन दिवस घ्यावे.
21. कोरडा खोकला झाल्यास खसखशीची खीर खावी. मुठभर खसखस तुपात भाजून घ्या. मग दूधामध्ये शिजवून घ्या व गरम गरम प्या. साखर आवडीनुसार मिसळून घ्यावे.
22. डांग्या खोकल्यावर तुरटी कुटून गरम करून घ्या. मग त्यात पाणी मिसळून ती बशी उन्हात ठेवावी. पाणी निघून जाते. व शुद्ध तुरटी शिल्लक राहते. त्यात एक चमचा मध मिसळून घ्यावे.
23. तिळाचे तेल कोमट करून प्यावे.
24. बकुळीची फुले ओंजळभर + सोनचाफ्याची ओंजळभर फुले + दोन तांबे पाणी घेऊन खडीसाखर घालून काढा करावा व दिवसातून पाव वाटी घ्या.
25. अडुळसा पाने वाफेवर उकडून, त्याचा रस काढून घ्यावा व थोडा गूळ घालून पाव कप रस घ्यावा.
26. एक कप दूधामध्ये लसणाच्या चार पाकळ्या उकळून घ्यावे.
27. ज्येष्ठ मध + खडीसाखर चघळावी.
28. कोरफडीची पाने भाजून घ्या. त्यांचा रस काढून घ्यावा. एक चमचा रस घेऊन त्यात मध मिसळून घ्यावे.
29. भिमसेन कापूर व एक चमचा खडीसाखर मिसळून चाटण म्हणून घेतल्यास आराम मिळतो.
30. खोकला झाल्यास तुळशीची पाने ठेचून व गरम करून या पोटीसने छाती शेकावी.
सारांश
खोकला ही एक सामान्य समस्या आहे परंतु उपचार न केल्यास ती गंभीर होऊ शकते आणि तुम्हाला त्याचा आणखी त्रास होऊ शकतो. खोकल्याच्या उपचारासाठी तुम्ही कोणतेही कफ सिरप वापरत असाल तर काळजी घ्या. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कोल्ड आऊट, भारतात बनवलेले कफ सिरप बद्दल धोक्याचा इशारा जाहिर केला आहे. हे औषध कमी दर्जाचे असून विषासमान असल्याचं सांगितलं आहे. ते इराकमध्ये वापरले जात होते. याआधीही देशात बनवलेल्या अनेक कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. इम्म्युनिटी पॉवर कमकुवत झाल्यामुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होऊ लागते. जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, तुम्हाला सर्दी, खोकला किंवा हवामानात बदल होताच संसर्ग होत असेल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत झाली आहे. साहजिकच खोकल्यामुळे तुमच्या दैनंदिन कामावर वाईट परिणाम होऊ शकतो. याशिवाय सारखा खोकला होतो किंवा संसर्ग होतो म्हणून त्यासाठी तुम्ही सारखी औषधे घेत असाल तर त्यामुळे देखील शरीरावर विविध दुष्परिणाम होऊ शकतात. अशावेळी तुम्हाला औषधांपेक्षा घरगुती उपायांची जास्त गरज असते ज्यांचे फार कोणते साईड इफेक्ट नसतात. त्यामुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यासाठी अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know