Translate in Hindi / Marathi / English

Saturday, 9 December 2023

आरोग्यदायी नाचणी | नागली / नाचणी खाण्याचे फायदे | नाचणीमध्ये विशेषतः कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक कॅरोटिन तसेच थायमीन व तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते | नाचणीला नागली, रागी इ. नावाने ओळखले जाते

आरोग्यदायी नाचणी

 

नागली / नाचणी खाण्याचे फायदे

नाचणीमध्ये शरीराला आवश्यक असणारी महत्त्वाची अशी आमिनो आम्ले आहेत. नाचणीला नागली, रागी . नावाने ओळखले जाते. नागलीचे शास्त्रीय नाव इलुसाईन कोराकाना असून भारतात तसेच आफ्रिका, मलेशिया चीन जपान या देशांमध्ये नागलीचे पीक घेतले जाते.

 डोंगरदऱयात राहणाऱ्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नाचणी पिकविल्या जाते आदिवासी लोकांचे मुख्य अन्न म्हणून ही नाचणी ओळखली जातेनाचणीमध्ये शरीराला आवश्यक असणारी महत्त्वाची अशी आमिनो आम्ले आहेत. नाचणीला नागली, रागी . नावाने ओळखले जाते. नागलीचे शास्त्रीय नाव इलुसाईन कोराकाना असून भारतात तसेच आफ्रिका, मलेशिया चीन जपान या देशांमध्ये नागलीचे पीक घेतले जाते.

 डोंगरदऱयात राहणाऱ्या आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणात नाचणी पिकविल्या जाते आदिवासी लोकांचे मुख्य अन्न म्हणून ही नाचणी ओळखली जाते. नाचणी ही चवीला मधुर तुरट कडवट असते. आरोग्याच्या दृष्टीने नाचणी खूप उपयुक्त आहे.

नाचणी ही आजारातून उठणाऱ्या व्यक्तीकरिता पचावयास हलके म्हणून उत्कृष्ट अन्न आहे. नाचणी खाऊन अपचन, अजीर्ण, पोटात वायू धरणे, पोटदुखी, आमांश या तक्रारी केव्हाही होत नाही. त्याचबरोबर नाचणीच्या नियमित वापराने वजनही वाढत नाही.

नाचणी पोटाला त्रास देता पिष्टमय पदार्थ शरीराला पुरविते. नाचणी पित्तशामक, थंड, रक्तातील उष्ण हे दोष कमी करते. स्थूल व्यक्तींनी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणीचा आहारात समावेश करावा.

नाचणीमध्ये असणाऱ्या पोषक घटकामुळे नाचणीला आज खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रथिने खनिजे इतर धान्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आहे. नाचणीमध्ये इतर धान्याच्या तुलनेत सर्वांत जास्त तंतुमय पदार्थ आहे. (. ग्रॅम). तंतुमय पदार्थामुळे पोट साफ ठेवण्यास तसेच अन्नप्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत होते. तसेच पोटाचे विकार तंतुमय पदार्थामुळे होत नाही. नाचणीमध्ये कबोंदकाचे प्रमाण ७२ टक्के असून ते नॉनस्टॉरच्या स्वरूपात असते. तंतुमय पदार्थाचे नाचणीतील प्रमाण जास्त असल्यामुळे ते रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी करण्यास मदत करते त्यामुळे मधुमेह व्यक्तीसाठी नाचणी ही उत्तम समजल्या जाते.

नाचणीमध्ये सर्वांत जास्त कॅल्शियम (३४४ मि.प्रॅ./१०० ग्रॅम) हे पोषकद्रव्य आहे. कॅल्शियम हे हाडे मजबूत होण्यासाठी उपयोगाचे असतात. गर्भवती महिलेसाठी तिच्या बाळांची हाडे मजबूत होण्यासाठी नाचणी उपयोगाची ठरते. नाचणी पचण्यास हलकी असल्यामुळे सर्व वयोगटातील व्यक्ती नाचणीचे सेवन करू शकतात.

आदिवासी भागातील महिलांसाठी नाचणी हे तर वरदानच आहे. नाचणीच्या सेवनाने ओस्टेओपोरोसीस हा हाडाचा रोग होत नाही.

भात, गहू मका या धान्यापेक्षा जास्त प्रमाणात नाचणीमध्ये लोह हे पोषणद्रव्य (. मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) आहे. नाचणी हे नैसर्गिक लोह मिळविण्याचे एक चांगले साधन आहे. नाचणीच्या सेवनाने रक्तक्षय कमी होण्यास मदत होते. गरोदर काळात गभाचा विकास होण्यासाठी तसेच स्तनदा मातेसाठी लोहाची खूप आवश्यकता असते अशा वेळेस नाचणी हा लोहाचा उत्तम स्रोत आहे.

नाचणीमध्ये शरीराला आवश्यक असणारी महत्त्वाची अशी आमिनो आम्ले आहेत. ज्या व्यक्ती पूर्णतः शाकाहारी आहेत अशा व्यक्तीच्या आहारात या वॅलिन हे आवश्यक अमिनो अँसिड आहे.

पेशींची दुरुस्ती, चयापचय क्रियेसाठी तसेच शरीरातील नायट्रोजनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम वॅलिन हे आम्ल करते. वॅलिनचा वापर करून मानसिक थकवा कमी करून मज्ञासंस्थेचा जोम वाढविता येतो.

शरीरातील झीज भरून काढण्यासाठी उपयुक् आयसोल्युसिन आम्ल शरीरात रक् तयार होण्यासाठी आवश्यक असते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवून मधुमेहावर नियंत्रण ठेवते. तसेच नाचणीतील आयसोलेसिन आम्ल शरीरातील स्नायुंच्या पेशींची दुरुस्ती त्यांना निरोगी ठेवण्याचे काम करते. आयसोलोसिन मांसपेशी तंदुरुस्त, रक् गठन, हाडांची शक्ती आणि त्वचा सुधारण्यास मदत करते.

थ्रेओनीन हे आम्ल शरीरातील प्रथिनांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम करते. दातावर चकाकी आणण्यासाठी याचा उपयोग होतो. यकृतामध्ये स्निग्ध पदार्थ तयार होऊ नये यासाठी मदत करते.

ट्रिप्टोफॅन मानवी शरीरातील काळजी, ताण निद्रानाश यांच्या विरुद्ध हे आम्ल काम करते. त्याचबरोबर तीव्र डोकेदुखीवर या आम्लाचा वापर होतो.

मेथीओनीन हे आम्ल त्वचा केसांचे आरोग्य संतुलित ठेवण्याचे काम करते. रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी या आम्लाचा उपयोग होतो. शरीरामध्ये गंधक उपलब्ध करण्यासाठी उपयुक्.

प्रत्येकाला आपल्या आहारात नाचणीचा समावेश करून समृद्ध सुटूढ आयुष्य जगात येऊ शकते. अशा पोषणद्रव्याने समृद्ध असणाऱ्या नाचणीचा उपयोग आरोग्य सुधारणे साठी नक्कीच करता येऊ शकतो. प्रत्येकाला आपल्या आहारात नाचणीचा समावेश करून समृद्ध सुटूढ आयुष्य जगात येऊ शकते. नाचणी हे तृणधान्य पोषणसमृद्ध आहे. राष्ट्रीय पोषण संस्था, हैदराबादच्या संदर्भानुसार १०० ग्रॅम नाचणीमध्ये . ग्रॅम प्रथिने, . ग्रॅम स्निग्ध पदार्थ, . ग्रॅम तंतुमय पदार्थ, ७२ ग्रॅम कर्बोदके, . ग्रॅम एकूण खनिजद्रव्ये, ३४४ मि.ग्रॅ. कॅल्शियम, . मि.ग्रॅ. लोह, १३७ मि.पॅ. मॅग्नेशिअम, ११ मि.ग्रॅ. सोडियम, ४०८ मि.ग्रॅ. पोटेशियम, . मि.ग्रॅ. झिंक, .४२ मि.ग्रॅ. थायमिन, .१९ मि.पॅ. रायबोफ्लोविन, . मि.ग्रॅ. नायसिन, . मायक्रोग्रॅम फॉलिक अँसिड असते.

नाचणीचे विविध पदार्थः

) भाकरीः नाचणीच्या पिठामध्ये गरम पाणी मिसळून मऊ तिंबून घ्यावे आणि पातळ भाकरी थापून ज्वारीच्या भाकरीसारख्या भाजून घ्याव्यात.

) पराठेः गव्हाच्या पिठात ५० टक्के नाचणीचे पीठ टाकून मेथी किंवा पालक अथवा इतर कोणतीही पालेभाजी मिसळून पराठे तयार करता येतात.

) लाडूः नाचणीच्या पिठात थोडेसे सोयाबीन आणि गव्हाचे पीठ मिसळावे. याचबरोबरीने मूगडाळ आणि हरभराडाळीचा रवाळ रवा मिसळून नाचणीचे लाडू तयार करता येतात.

) पापडः नाचणीचे पीठ किलो, पापड खार ३० ग्रॅम, टीस्पून (लहान चमचा) हिंग, पाऊण वाटी मीठ यापासून नाचणीचे पापड तयार करता येतात. नाचणी पापडाला चांगली मागणी आहे.

) डोसाः दीड वाटी नाचणी पीठ, अर्धी वाटी उडीदडाळ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, एक चमचा मेथीचे दाणे, कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, चवीसाठी मीठ इत्यादी साहित्यातून अतिशय चवदार उत्तम डोसा तयार करता येतो.

) नाचणीचे गोळे:  नाचणीचे पीठ गरम पाण्यामध्ये उकड काढून घ्यावे. या पिठाचे मोठ्या लाडू एवढे गोळे बांधून घ्यावेत. मिक्स भाजी तसेच सांबरा सोबत हे गोळे खातात. हा पदार्थ विशेष करून कर्नाटक राज्यामध्ये रोजच्या आहारात प्रचलित आहे.

७) नाचणीचे सत्व अथवा पेज: नाचणीचे सत्व लहान मुलांच्या वाढ आणि विकासासाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे घरातील वृद्ध आणि  आजारी लोकांना तुम्ही हे सत्त्व नक्कीच देऊ शकता.

साहित्यअर्धी वाटी नाचणी, गूळ आणि मीठ.

कृतीनाचणी रात्री भिजत घालून सकाळी मिक्सरमध्ये जाडसर वाटावी. वाटलेले मिश्रण गाळून घ्यावे आणि त्यात गरजेनुसार पाणी, मीठ आणि चवीपुरता गूळ टाकून शिजवून घ्यावे. नाचणीचे सत्त्व गरम असतानाच घेतलं तर अगदी चविष्ठ लागते. नाचणी थंड असल्यामुळे उन्हाळ्यात असे सत्व पिण्याने उष्णतेचा त्रास कमी होतो.

नाचणीचे आप्पे

साहित्यनाचणी, रवा, गूळ, मीठ,नारळाचे दूध, वेलचीपूड, आप्पेपात्र

कृतीनाचणी धुवून जाडसर दळून घ्यावी. त्यात बारीक रवा, गूळ, चिमूटभर मीठ, नारळाचे दूध आणि वेलचीपूड टाकून मिश्रण एकजीव करावे. आप्पेपात्राला थोडे तेल लावून त्यात एक एक चमचा हे मिश्रण सोडावे. दोन्ही बाजूने आप्पे शिजले की ते सर्व्ह करावेत.

सारांश

नाचणीच्या पोषणमूल्याचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की नाचणीमध्ये गहू, तांदूळ आणि ज्वारीच्या तुलनेत खनिजद्रव्ये विशेषतः कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक कॅरोटिन तसेच थायमीन तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. कॅल्शियम आणि फॉस्फरस ही खनिजे हाडेआणि दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती..


No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know