हस्तमुद्रा विज्ञान शास्त्र
हस्तमुद्रा विज्ञान शास्त्र
मुद्रा हा शब्द संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजेच ‘आनंदित होणे’ यापासून तयार झाला आहे. ‘शारदातिलक’ या ग्रंथात ‘मुदमानन्दं ददाति इति मुद्रा’ असा उल्लेख आहे. आनंद देणारी कृती म्हणजे ‘मुद्रा’. केवळ शारीरिक आणि मानसिक नव्हे,
तर आत्मानंद, परमानंद इथे अभिप्रेत आहे. घेरंडसंहिता तसेच हठप्रदीपिका या ग्रंथांमध्ये
मुद्रांचे योगशास्त्रीय दृष्टिकोनातून विस्तृत वर्णन केले आहे. मुद्रा ही केवळ कृती
किंवा सिद्धता नसून, हा साधनेचा विषय आहे.
आरोग्य ध्येय
हस्तमुद्रा विज्ञान हा आपल्या खऱ्या सनातन (हिंदू) धर्माच्या आरोग्यावर सखोल संशोधन करणाऱ्या ऋषींचा शोध आहे. आणि निरोगी राहण्यासाठी, जगातील कोणताही नागरिक, मग तो कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असो, तो त्याचा 'आरोग्य ध्येय' साध्य करण्यासाठी वापरू शकतो.
योगशास्त्र, नृत्य आणि धार्मिक क्रियांमध्ये हस्तमुद्रांचे अनन्यसाधारण स्थान आढळते. चित्तशोधन, चित्ताची एकाग्रता, मनोविजय तसेच वायूवरील नियंत्रणासाठी योगशास्त्रात मुद्रांचे महत्त्व सांगितले आहे. शरीरशास्त्राच्या दृष्टीने पाहता हातांचे महत्त्व असाधारण आहे. मानवी हात, हातांची बोटे ही अत्यंत क्लिष्ट क्रियाही सहजपणे करू शकणारे, परिपूर्ण असे नैसर्गिक साधन होय. बोटांच्या हालचाली एकमेकांच्या सुसंबद्ध सहकार्याने चालत असतात. बोटे असंख्य संवेदनांचे ग्रहण करून त्या संवेदना मज्जासंस्थेच्या मोठ्या भागाकडे पोहचविणाऱ्या अनेक मज्जातंतूंनी युक्त असतात. सूचिचिकित्सेचे (ॲक्युपंक्चरचे) चौदापैकी सहा बिंदू बोटांच्या अग्रभागी आहेत. हस्तमुद्रांच्या सहाय्याने ही केंद्रे उद्दीपित केली जाऊन त्या त्या इंद्रियाचे वा अवयवाचे कार्य नियंत्रित करून आरोग्य प्राप्त करता येते.
हस्तमुद्रा पंचतत्त्वांचे नियमन
योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून हस्तमुद्रा ह्या पंचतत्त्वांचे नियमन करणाऱ्या मुद्रा म्हणून ओळखल्या जातात. ब्रह्मांड हे पंचतत्त्वांनी (जल, अग्नी, वायू, आकाश व पृथ्वी) युक्त असून आपला देहदेखील त्याच पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. आपल्या हाताची पाचही बोटे त्या पाचतत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. अंगठा अग्नि तत्त्वाचे, तर्जनी वायु तत्त्वाचे, मध्यमा आकाश तत्त्वाचे, अनामिका पृथ्वी तत्त्वाचे, तर कनिष्ठिका जल तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. पंचतत्त्वांमधील समस्थिती देह निरोगी ठेवण्यासाठी, तर विषमस्थिती अनारोग्यासाठी कारणीभूत ठरते. हस्तमुद्रांच्या साधनेमुळे त्या त्या तत्त्वांशी निगडित असलेले शरीरांतर्गत अवयव व ग्रंथी प्रभावित होतात व त्यांचे कार्य नियंत्रित होते. बोटांच्या अग्रभागातून सूक्ष्म रूपात प्राण-ऊर्जा सतत बाहेर पडत असते. हस्तमुद्रांच्या सहाय्याने ही क्रिया अवरुद्ध करून ती सर्व शक्ती शरीराकडेच वळविली जाते. ह्या क्रियेत मेंदूकडून हातांकडे संक्रमित होणारी शक्ती बोटांची टोके जुळविलेली असल्याने पुन्हा मेंदूकडेच वळविली जाते. हस्तमुद्रेच्या क्रियेकडे केंद्रित झालेली संपूर्ण जाणीव वा चित्ताची एकाग्रता ध्यान साधनेसाठी उपयुक्त ठरते. तसेच साधनेच्या विकसित टप्प्यावर साधकाला सूक्ष्म प्राणशक्तीच्या प्रवाहावर जाणीवपूर्वक नियंत्रण प्राप्त करून देते. अशा रितीने हस्तमुद्रांमुळे शरीरातील सुप्त प्राणशक्ती जागृत केली जाऊ शकते; ती शरीराच्या विशिष्ट भागाकडे वळवून त्या त्या ठिकाणचे आजार दूर केले जाऊ शकतात. हस्तमुद्रेद्वारा प्राणशक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे वळवून तिचेही आजार दूर करता येतात. हस्तमुद्रा शरीरावर त्वरित परिणाम साधतात. ज्या हाताच्या सहाय्याने ह्या मुद्रा केल्या जातात त्याच्या विरुद्ध बाजूच्या शरीराच्या भागावर त्यांचा परिणाम होतो. फक्त हातांशी संबंधित असल्याने कधीही, कोठेही वा कोणत्याही स्थितीत, चालता-फिरतानाही त्या करता येतात. अर्थात विशिष्ट आसनस्थितीमध्ये विशेषत: वज्रासन वा पद्मासन असल्यास जास्त व्यापक परिणाम साधला जातो. मुद्रा, आसने व बंध ह्यांची एकत्रित साधना अतिशय प्रभावी ठरते. योगशास्त्रातील हस्तमुद्रा साधकाच्या अंतर्मनातील आध्यात्मिक भावावस्थेचे आविष्करण करतात.
ज्ञान मुद्रा
तर्जनी आणि अंगठा या दोन्हींची अग्रे किंचित दाब देऊन जुळवावी आणि बाकीची बोटे सरळ ठेवावीत. अंगठा अग्नतित्वाचे तर तर्जनी वायुतत्त्वाचे प्रतनिधित्वि करते. अंगठा बुद्धीचे केंद्र मानले जाते आणि तर्जनी मनाचे. या मुद्रेमुळे मनशांती लाभते. मज्जासंस्थेवर उत्तम परिणाम होतो. ताण नष्ट होतो, राग शांत होतो. आनंदाची भावना नर्मिाण होते. स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते. नसा बळकट होतात. कंपवात, चेहऱ्याचा पक्षाघात, अर्धांगवायूसारख्या विकारांमध्ये चांगला फायदा होतो. मन, भावनांवर नियंत्रण येते. अंतःस्रावी ग्रंथीची संपूर्ण रचना नियंत्रित होते. पिट्यूटरी ग्रंथी, थायरॉईड ग्रंथी सक्षम होतात. मानसिक मरगळ, विस्मरण, अस्वस्थता, भीती, न्यूनगंड आणि नैराश्यासारख्या मानसिक आजारांमध्ये ही मुद्रा हितकर ठरते. शांत झोपेसाठी या मुद्रेचा फायदा होतो.
आकाश मुद्रा
मधलं बोट म्हणजे मध्यमा व अंगठा यांचा अग्रभाग जुळवावा व थोडा दाब द्यावा. बाकी सर्व बोटे सरळ ठेवावी. ही मुद्रा कितीही वेळ केली तरी चालते. मध्यमा आकाशतत्त्वाचे प्रतीक असल्याने शरीरातील आकाशतत्त्वाच्या असंतुलनामुळे होणारे रोग म्हणजे शरीर पोकळीतील भागांच्या आजारांवर या मुद्रेने परिणाम होतो. ही मुद्रा ध्यानात मदत करते. भावना आणि विचार शुद्ध करते. अर्धशिशी किंवा कवटीच्या पोकळीमधील वेदना या मुद्रेमुळे दूर होतात. कानातील आणि छातीतील संसर्गदोष, दमा इ. बरे होण्यास मदत होते. हाडे बळकट होतात. हृदयविकारात होणाèया वेदना दूर करते, हृदयाच्या ठोक्यांचे नियमन करते, तसेच उच्च रक्तदाब नियंत्रित करते. (हृदय प्रसरण पावलेल्या व्यक्तींनी मात्र ही मुद्रा करू नये.)
पृथ्वी मुद्रा
अनामिका आणि अंगठा याची टोके जुळवून किंचित दाब द्यावा. बाकीची बोटे सहज सरळ ठेवावी. अंगठा अग्नितत्त्वाचे तर अनामिका पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. पृथ्वीतत्त्वाचे अस्तित्त्व मुख्यत्वे हाडे, स्नायू, कुर्चा, त्वचा, चरबी इ.मध्ये असते. पृथ्वी मुद्रेमुळे शरीरास बळकटी मिळते. ही मुद्रा शरीरातील पृथ्वीतत्त्व आणि अग्नितत्त्व संतुलित करते. याला अग्निशामक मुद्राही म्हणतात. जीवनशक्ती वाढवणारी मुद्रा. हातापायांचा अधूपणा, अर्धांगवात यांसारख्या आजारांमध्ये कमजोर झालेल्या अवयवांत पुन्हा ताकद येते. अस्थिवेष्टन झिजले असेल तर दुरुस्त होण्यास मदत होते. हाड मोडल्यास हाडांची जुळणी लवकर होते. जखमा भरून येण्यास फायदेशीर. वजन वाढते. सहनशक्ती वाढते. त्वचा निरोगी आणि कांतिमान होते. केस गळणे, अकाली केस पिकणे या साठीही उपयुक्त ठरते.
जल मुद्रा
करंगळी व अंगठा यांची टोके जुळवून बाकीची तीन बोटे सहज सरळ ठेवावी. ही मुद्रा जलतत्त्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे शरीरातील मलद्रव्य बाहेर टाकण्याच्या क्रियेसंबंधित इंद्रिये व्यवस्थित कार्यरत होऊन मलनिस्सारण चांगले होते. ही मुद्रा केव्हाही, कुठेही व कितीही काळ केली तरी चालते. कोरडी त्वचा, भेगा, भाजणे तसेच कोणतेही त्वचाविकार बरे होतात. पित्त कमी होते, तोंडाची गेलेली चव परत येते. मूत्र विसर्जन व्यवस्थित होते. वंगण कमी झाल्यामुळे निर्माण झालेली सांधेदुखी, हाडांची झीज भरून येते. रक्तशुद्धीसाठी फायदेशीर आहे. डोळे कोरडे पडणे, कोरडा खोकला, पचनमार्ग शुष्क होणे या त्रासांवर गुणकारी ठरते. गॅस्टड्ढोसारख्या रोगात उपयुक्त.
प्राण मुद्रा
पंचप्राणांपैकी प्राण हा वायू स्वस्यंत्राखाली व डायफ्रामच्या वरील छातीच्या भागात कार्यरत असतो. हृदय, फुप्फुसे यांना सक्रिय ठेवतो. कनिष्ठिका आणि अनामिकांची टोके अंगठ्याच्या टोकाला जोडावी. पृथ्वी, जल आणि अग्नी एकत्र आल्यामुळे ही मुद्रा एक जोमदार ऊर्जाप्रवाह निर्माण करते. जुनाट थकवा, अशक्तपणा, असहनशीलता दूर होते. प्रतिकारशक्ती वाढते. मानसिक ताण, राग, अस्वस्थता, मत्सर, गर्व, चिडचिड दूर होते. मूत्रविसर्जन करताना अडणे आणि दाह होणे. आग होणारे लाल शुष्क डोळे, मोतीबिंदू, डोळ्यांच्या सर्व तक्रारी दूर होऊन डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हितकर. शुष्क लाल, दाह करणारी सुरकुतलेली त्वचा, पुरळ, लाल चट्टे पडणे, महारोग यांसाठी अत्यंत परिणामकारक. रक्तवाहिन्यांतील अडथळे, अशुद्धता दूर होऊन रक्ताभिसरण सुधारते.
अपान मुद्रा
पंचप्राणांपैकी अपान हा वायू नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागात कार्यरत असतो. मोठे आतडे, मूत्रपिंड, गुदद्वार आणि जननेंद्रियांना ऊर्जा देतो. यामुळे शरीरातील त्याज्य पदार्थांचे उत्सर्जन होते. कृती – मध्यमा आणि अनामिकेचे टोक अंगठ्याला सली जोडून ही मुद्रा होते. मध्यमा म्हणजे आकाशतत्त्व अनामिका म्हणजे पृथ्वीतत्त्व आणि अंगठा म्हणजे अग्नीतत्त्व. या तीन तत्त्वांचा समन्वय येथे साधला जातो. लाभ : १ अपान मुद्रेमुळे मल, मूत्र, रज/शुक्र, पोटातील वात विसर्जनाचा प्रवाह नियमित होतो. २ पोटात दुखणे, उलट्या, उचक्या, अस्वस्थता यांसारख्या पोटाच्या तक्रारी नियंत्रित होतात. ३ दातांचे दुखणे थांबते. दातांचे आरोग्य टिकते. ४ मधुमेहाचा विकार या मुद्रेच्या सरावाने नियंत्रित होतो. (अपान मुद्रा आणि त्यानंतर प्राण मुद्रा करावी.)
समान मुद्रा
पंचप्राणांपैकी समान हा वायू हृदय व नाभी यामध्ये कार्यरत असतो. यकृत, आतडे, स्वादुपिंड आणि पोट यांस ऊर्जा पुरवितो. पाचकप्रणाली सक्रिय आणि नियंत्रित करणे, शारीरिकदृष्ट्या पोषक द्रव्याचे समाकलन आणि वितरण करणे ही याची मुख्य कार्ये आहेत. हाताच्या पाचही बोटांची टोके एकत्र जुळवावी व ती आकाशाच्या दिशेने करावी. यामुळे पंचत्त्वांचे संतुलन होते. मनातील क्रोध नष्ट होतो. मन शांत होते. स्वादुपिंड, यकृत, प्लीहा यांची कार्ये सुरळीत झाल्याने पचनक्रिया चांगली राहते. आतड्यांमधून पोषक द्रव्यांचे शोषण आणि वितरण सुरळीत झाल्यामुळे शरीराचे योग्य पोषण होते. सर्वसमावेशक आरोग्य मिळते. दुखावलेल्या भागावर ही मुद्रा ठेवल्यास त्वरीत आराम मिळतो. लचक बरी होते.
उदान मुद्रा
पंचप्राणांपैकी उदान हा वायू डोक्यापासून गळ्यापर्यंतच्या भागात कार्यरत असतो. येथे ऊर्जादेहातीलआज्ञा आणि विशुद्धी चक्राचे स्थान आहे. उदान वायू डोळे, जीभ, नाक आणि कान या ज्ञानेंद्रियांना आणि मनाला सक्रिय करतो. तर्जनीचे टोक हुलकेच दाब देऊन अंगठ्याच्या टोकावर जोडावे. मध्यमेचे टोक तर्जनीच्या नखावर ठेवावे. अनामिक आणि कनिष्ठिका सरळ ठेवावी. तर्जनी म्हणजे वायूतत्त्व, मध्यमा म्हणजे आकाशतत्त्व आणि अंगठा म्हणजे अग्रीतत्त्वाचे प्रतीक. मध्यमा तर्जनीवर ठेवल्यामुळे आकाश तत्त्वाने भारीत वायूतत्त्व अग्रीने उत्तेजित होऊन शरीरातील पोकळ अवयवांना कार्यक्षम करते. स्वर रज्जू म्हणजेच आवाजासाठी लाभदायक आहे. आवाजातील कंप किंवा घोगरेपणा जातो. वास न येणे, श्वसनास त्रास इ. मध्ये गुण येतो. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत करते.
व्यान मुद्रा
पंचप्राणांपैकी व्यान हा वायू संपूर्ण शरीर व्यापून टाकतो. सर्व नसांमधून, धमन्यांमधून वाहणारा हा वायू संपूर्ण शरीराच्या हालचाली नियमित आणि नियंत्रित ठेवतो. शरीरातील व्यान वायूच्या गतीवर रक्तदाब अवलंबून असतो. कृती – तर्जनी आणि मध्यमेची टोके टोकाशी जोडून ही मुद्रा होते. अंगठ्याच्या वायू आणि आकाशतत्त्वातून वात निर्माण होतो असे आयुर्वेद सांगते. या मुद्रेमुळे शरीरातील वात संतुलित होतो. उच्च अथवा कमी रक्तदाब नियंत्रित आणि संतुलित होतो. कोणत्याही गोष्टीसाठी पुढाकार न घेणे, उत्साह नसणे, विचारप्रक्रिया मंद होणे आणि आकलन न होणे इ. मानसिक विकारांना ही मुद्रा सुधारते. ग्लानी किंवा अतिझोपेवर मात करता येते.
वायू मुद्रा
अंगठ्याच्या तळाला तर्जनीचे टोक ठेवावे आणि तर्जनीवर अंगठा हलकेच टेकवावा. बाकीची बोटे ताठ ठेवावीत. शरीरातील वात जेव्हा एकाच भागात अडकतो, तेव्हा तिथे तीव्र वेदना होतात. अडकलेला वायू रक्ताभिसरणात अडथळे निर्माण करतो. वायू मुद्रेमुळे शरीरातील अतिरिक्त वायुतत्त्वाचा नाश होतो. रक्ताभिसरण सुरळीत होऊन वेदना शमतात. कंपवात, अर्धांगवायू, मानेचा स्पॉन्डिलिसिस, पाठ आणि पायातील वेदना आणि गुडघेदुखीसारख्या वायुदोषांवर, वायू मुद्रेच्या नियमित सरावाने मात करता येते. संधिवातावर या मुद्रेच्या सरावाने उपचार करता येतो. (वायू मुद्रा त्यानंतर वरुण मुद्रा आणि शेवटी प्राण मुद्रा करावी.)
अपान वायू मुद्रा
कोणाही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्यापासून वाचविणारी ही मुद्रा आहे. अपानवायू मुद्रा वायू मुद्रा आणि अपान मुद्रा या दोन मुद्रांचा मिलाफ आहे. अंगठ्याच्या तळाला तर्जनीचे टोक टेकवावे आणि मध्यमा आणि अनामिकेच्या टोकाला अंगठ्याचे टोक जोडावे. ही मुद्रा केली असता वायू मुद्रा आणि अपान मुद्रा या दोन्हींचाही एकत्रित लाभ होतो. शरीरात मुख्यत्वे छातीत दाटलेला वायू मुक्त होतो आणि हृदयाकडील रक्ताभिसरण सुरळीत होते. यामुळे वेदना त्वरीत नष्ट होतात आणि हलकेपणा येतो. पोटातील अतिरिक्त वायू कमी होतो. हृदयाचे स्नायू बलवान होऊन हृदयक्रिया सुधारते. छातीत दुखणे, घाम आणि थकवा दूर होतो. हृदयाचे अनियमित ठोके नियमित होतात. रक्ताभिसरणातील अडथळे दूर होतात. पित्तामुळे होणारी जळजळ शांत होते. मलावरोधावर उपयुक्त मुद्रा.
शून्य मुद्रा
अंगठ्याच्या तळाशी मध्यमेचे टोक टेकवावे आणि मध्यमेवर अंगठा हलकेच टेकवावा. या मुद्रेमुळे शरीरातील अतिरिक्त आकाशतत्त्वाचा नाश होतो. कानातून आवाज येणे, कान दुखणे, बहिरेपणा तसेच मुकेपणा बरा होतो. झोप न येण्यावर उपयुक्त. डोके, छाती, पोट यातील बधिरपणा दूर होतो. शून्य मुद्रा केल्याने भोवळ थांबते.
शून्य वायू मुद्रा
तर्जनी आणि मध्यमा दोन्हीची टोके अंगठ्याच्या तळाशी टेकवावीत आणि अंगठा हलकेच दोन्ही बोटांवर ठेवावा. शून्य मुद्रा आणि वायू मुद्रा यांच्या मिलाफाने शून्य वायू मुद्रा होते. शून्य मुद्रेमुळे अतिरिक्त आकाशतत्त्व आणि वायुतत्त्वाचे प्रमाण घटते. निद्रानाशात उपयोगी मुद्रा. मनाची ताकद वाढते. सांध्यातील करकर आवाज, सांधेदुखी बरी होते. पार्किन्सन्स, तोल जाणे, गिडिनेस, व्हर्टिगो, ‘ज्जासंस्थेशी निगडित आजारांमध्ये गुणकारी. अनियमित मासिक पाळी, स्पॉन्डीलाङ्मसिस, सततच्ङ्मा शारीरिक ताणतणावांमुळे निर्माण होणारी अकडन, स्नायूंचा कडकपणा इ. विकारांवर ही मुद्रा उपयुक्त ठरते. कर्कश आवाज, तोतरेपणा, तीव्र डोकेदुखी, कानदुखी, दातदुखी, घसादुखी, सांधेदुखी या सर्व दुखण्यांसाठी शून्य वायू मुद्रा लाभदायी ठरते.
सूर्य मुद्रा (लठ्ठपणा घालवणारी मुद्रा)
सूर्य मुद्रा सूर्याप्रमाणे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते. या मुद्रेमुळे आपल्या शरीरातील पृथ्वीतत्त्व घटते आणि अग्नितत्त्व वाढते. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया उत्तेजित होते. कृती – अनामिकेचे टोक अंगठ्याच्या तळाला टेकवा आणि अंगठा अनामिकेवर हलकेच टेकवावा. सूर्य मुद्रेमुळे शरीरात वाढलेले अनावश्यक पृथ्वीतत्त्व कमी होते, अग्नितत्त्व वाढते. अग्नितत्त्व हे दृष्टीशीही संबंधित आहे. (अशक्त व्यक्तींनी ही मुद्रा करू नये.) अनावश्यक थंडी वाजणे किंवा कुडकुडणे थांबून शरीराचे तापमान संतुलित होते. खोकला, नाक चोंदणे, फुप्फुसांमध्ये पाणी किंवा संसर्ग, दमा इ. दूर होतात. भूक न लागणे, अपचन आणि मलावरोध यासारखे त्रास बरे होतात. चयापचय क्रिया सुधारल्यामुळे वजनवाढीला आळा बसतो. रक्तातील कोलेस्टड्ढॉल पातळी घटवण्यास मदत होते. मोतीबिंदू विकारात उपयुक्त मुद्रा.
रुक्ष मुद्रा (जलोदरनाशक मुद्रा)
अंगठ्याच्या तळाशी करंगळीचे टोक ठेवावे आणि अंगठा करंगळीवर हलकेच टेकवावा. कनिष्ठिका जलतत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. पोटातील अतिरिक्त जलतत्त्वाचे नियंत्रण जलोदरनाशक मुद्रा करते. शरीरातील अतिरिक्त जलतत्त्वाचा नाश या मुद्रेमुळे होतो. ‘जलोदरङ्क म्हणजे ‘लिव्हर सिरॉसिसङ्क या आजारात लिव्हरचे कार्य व्यवस्थित होत नसल्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. पोटात अती प्रमाणात पाणी साठते. जलोदरनाशक मुद्रेमुळे या आजारात आराम पडतो. संसर्गामुळे फुप्फुसांमध्ये किंवा सांध्यांमध्ये पाणी होणे बरे होते. शरीराच्या कोणत्याही भागात आलेली सूज बरी होते. हत्तीरोग बरा होतो. डोळ्यातून तसेच नाकातून पाणी वाहणे, जुलाब होणे, लघवीला वारंवार होणे इ. नियंत्रित होते. मासिक पाळीच्या वेळी होणारा अतिरिक्त रक्तस्राव आटोक्यात येतो.
लिंग मुद्रा
ही मुद्रा अग्नीतत्त्वाला प्रभावित करून शरीराचे तापमान वाढविण्याचे काम करते. जर व्यक्ती पित्ताप्रकोप, ताप, पोटातील अल्सर यांनी ग्रस्त असेल तर ही मुद्रा करू नये. कृती – दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये अडकवावित आणि एक अंगठा (डावा किंवा उजवा) ताठ उभा ठेवावा. ही मुद्रा शरीरातील अग्नी प्रज्वलित करते. 43 विरामय (लिंग मुद्रेमुळे शरीरातील तापमान वाढते. त्यामुळे ही मुद्रा 15 मि. पेक्षा जास्त वेळ करू नये. आजार बरा झाल्यावर या मुद्रेचा सराव थांबवावा.) लाभ: 1. हायपो थर्मिया, हवेने होणारी सर्दी आणि कुडकुडणे लिंग मुद्रा ताबडतोब नियंत्रित करते. 2. ओला खोकला, सर्दी, कफ, नाक चोंदणे यांसारखे अतिरिक्त स्राव पाझरल्यामुळे निर्माण झालेले आजार बरे होतात. 3. दमा, अस्थमा, कफाने छाती भरणे, क्षयरोग, फुफ्फुसांमध्ये पाणी साचणे यांसारखे आजार बरे होतात. फुफ्फुसे कार्यक्षम होतात. 4. वातानुकूलित खोलीत येणारा अस्वस्थपणा, अति थंडी वाजणे, कापरे भरणे, जड होणे बरे होते. 5. शरीरात उष्णता निर्माण होऊन रोगनिवारण होते. 6. अनावश्यक चरबी कमी होते. 7. कफ प्रवृत्तीच्या मंडळींनी ही मुद्रा साधारणपणे थंडीच्या दिवसात करावी. सर्दी झाली असता सकाळ-संध्याकाळ पंधरा मिनिटे करावी. 8. नाभी केंद्र हलल्यास अपचनाचे, जुलाबाचे त्रास उद्भवतात. या मुद्रेने नाभीकेंद्र जाग्यावर येते.
शंख मुद्रा
कृती – डाव्या हाताच्या अंगठ्याभोवती उजव्या हाताची चारही बोटे गुंडाळावीत. त्यावर डाव्या हाताची चार बोटे सरळ ताठ ठेवावीत. उजव्या हाताच्या अंगठ्याचे वरचे पेर, डाव्या हाताच्या तर्जनीवर टेकवावे. या मुद्रेचा आकार शंखासारखा दिसतो म्हणून या मुद्रेला शंख मुद्रा म्हणतात. लाभ: 1. या मुद्रेमुळे आद । सुधारतो. ज्यांना सतत बोलावे लागते अशांसाठी उपयुक्त. 2. अन्नपचन व्यवस्थित होते. 3. बद्धकोष्ठतेचा त्रास बरा होतो. शौचास सुलभ होते. 4. थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुधारते. सहज शंख मुद्रा कृती – दोन्ही हात जोडून बोटे एकमेकात गुंतवा आणि हाताचे तळवे एकमेकांवर दाबावेत. दोन्ही अंगठे एकमेकांशी समांतर ठेवावेत. अंगठ्यांनी तर्जनीवर दाब द्यावा. ही आहे सहज शंख मुद्रा. ही मुद्रा करताना वज्रासनात बसावे. योगिक शरीरशास्त्रानुसार शरीरातील दहा मुख्य नाड्या प्रभावित होतात. या मुद्रेमुळे शरीर बलशाली बनते. दहा मुख्य म्हणजे सुषुम्ना, इडा, पिंगला, गांधारी, हस्तिजिव्हा, पूषा, यशस्विनी, आलंबुसा, कुहू आणि शंखिनी. लाभ: 1. पाठीचा कणा ताठ होऊन त्यात लवचिकता येते. स्लिपडीस्कसारख्या त्रासांमध्ये प्रभावी. 2. प्रजनन संस्थेशी संबंधित विकार नष्ट होतात. 3. उतारवयात अंग बाहेर येणे, लघवी किंवा शौचावर नियंत्रण नसणे अशा तक्रारी बळावतात, त्यासाठी उपयोगी मुद्रा. यामुळे गुदाचे स्नायू बळकट होतात. 4. जीभ जड असणे, बोलताना अडखळणे, पहिला शब्द बाहेर न पडणे अशा तक्रारी दूर होतात.
सहज शंख मुद्रा
कृती – दोन्ही हात जोडून बोटे एकमेकात गुंतवा आणि हाताचे तळवे एकमेकांवर दाबावेत. दोन्ही अंगठे एकमेकांशी समांतर ठेवावेत. अंगठ्यांनी तर्जनीवर दाब द्यावा. ही आहे सहज शंख मुद्रा. ही मुद्रा करताना वज्रासनात बसावे. योगिक शरीरशास्त्रानुसार शरीरातील दहा मुख्य नाड्या प्रभावित होतात. या मुद्रेमुळे शरीर बलशाली बनते. दहा मुख्य म्हणजे सुषुम्ना, इडा, पिंगला, गांधारी, हस्तिजिव्हा, पूषा, यशस्विनी, आलंबुसा, कुहू आणि शंखिनी. लाभ: 1. पाठीचा कणा ताठ होऊन त्यात लवचिकता येते. स्लिपडीस्कसारख्या त्रासांमध्ये प्रभावी. 2. प्रजनन संस्थेशी संबंधित विकार नष्ट होतात. 3. उतारवयात अंग बाहेर येणे, लघवी किंवा शौचावर नियंत्रण नसणे अशा तक्रारी बळावतात, त्यासाठी उपयोगी मुद्रा. यामुळे गुदाचे स्नायू बळकट होतात. 4. जीभ जड असणे, बोलताना अडखळणे, पहिला शब्द बाहेर न पडणे अशा तक्रारी दूर होतात.
मेरुदंड मुद्रा
मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा. ही मुद्रा केली असता पाठीत या मुद्रेत दोनही हातांनी जाणवणारा ताण नष्ट होतो. वेगवेगळ्या पद्धतीने या मुद्रा केल्या जातात. कृती – उजवा हात – अंगठा, मध्यमा आणि कनिष्ठिका या तीनही बोटांची टोके एकमेकांना जोडावीत. तर्जनी आणि अनामिका ही बोटे सरळ ठेवावीत. डावा हात – तर्जनीच्या नखावर अंगठ्याचा मधला जोड बिंदू ठेवावा. इथे लक्षात घ्यावे की अंगठ्याचे टोक नाही. अवकाश आणि जलतत्त्वाची योग्य संतुलन साधले जाते. त्यामुळे पाठीच्या कण्यातील मणके वायूतत्त्वाच्या मदतीने लवचीकरीत्या हलू शकतात. मुद्रा करताना जेव्हा तर्जनीचे टोक अंगठ्याच्या जोड बिंदूवर ठेवले जाते तेव्हा वायूतत्त्वाची पातळी योग्य प्रमाणात कमी केली जाते. लाभ: 1.साफसफाई, बागकाम, वजन उचलणे तसेच संगणकावर खूप वेळ काम केल्याने पाठीवर ताण येतो. मेरुदंड मुद्रेमुळे पाठीवरील ताण दूर होऊन वेदनामुक्ती होते. 2.मणक्यात गॅप, गादी सरकणे (स्लिपडीस्क), नस दाबली जाणे (सायटिका) इ. मुळे पाठ, कंबरेत वेदना होतात. सातत्याने मेरुदंड मुद्रा करीत राहिल्यास दुखण्यातून मुक्ती मिळते. दररोज 30 मिनिटे मेरुदंड मुद्रा आणि त्यानंतर 10 मिनिटे प्राण मुद्रा करावी.
सारांश
योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून हस्तमुद्रा ह्या पंचतत्त्वांचे नियमन करणाऱ्या मुद्रा म्हणून ओळखल्या जातात. संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांनी (जल, अग्नी, वायू, आकाश व पृथ्वी) युक्त असून मानवी देहदेखील त्याच पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. आपल्या हाताची पाचही बोटे त्या पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. अंगठा अग्नितत्त्वाचे, तर्जनी वायुतत्त्वाचे, मध्यमा आकाशतत्त्वाचे, अनामिका पृथ्वीतत्त्वाचे, तर कनिष्ठिका जलतत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. हस्तमुद्रांच्या साधनेमुळे त्या त्या तत्त्वांशी निगडित असलेले शरीरांतर्गत अवयव व ग्रंथी कार्यान्वित होतात.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know