Translate in Hindi / Marathi / English

Monday, 11 December 2023

नैसर्गिक फायदेशीर आरोग्यदायी मध | मध औषधांचा आधार | मध सर्वात फायदेशीर नैसर्गिक संयुगांपैकी एक आहे । शतकानुशतके मधांचा वापर स्वयंपाकातच नव्हे तर औषधासाठीही केला जात आहे, तसेच मध खाण्याने शरीरात शक्ती येते | मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे

 मध औषधांचा आधार

नैसर्गिक फायदेशीर आरोग्यदायी मध

थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी असेही म्हटले आहे कीजर मधमाश्या पृथ्वीवरून संपून गेल्या तर मानवी प्रजाती जास्तीत जास्त 4 वर्षे जगू शकतील.”

मधमाश्या मध का व कसा बनवतात

मधमाश्या मध का बनवतात, जिवंत राहण्यासाठी!! मधमाश्यांच्या पोळ्याची लोकसंख्या हि एका छोट्या खेडेगावाएवढी असते. एका पोळ्यात ६० ते ७० हजार मधमाश्या असतात. यातल्या कामगार मधमाश्यांचे काम असते ते म्हणजे त्यांच्या पोळ्यापासून - किमी. च्या परिसरात असणाऱ्या फुलातून मकरंद काढून आणणे.

मधमाशी जेव्हा एका फुलातून मकरंद काढून आणते, तो मध नसतो. मकरंद म्हणजे फुलांनी मधमाशा, भुंगे आणि फुलपाखरे याना दिलेली लाच असते. मकरंद घेताना यांच्या पायाला, शरीराला, फुलांचे पुंकेसर अथवा स्त्रीकेसर चिकटतात आणि त्यातूनच फुलांच्या परागीभवनाला मदत मिळते. जेव्हा हा मकरंद मधमाशीच्या तोंडात असतो, तेव्हा तिच्या तोंडातून एक विशिष्ट प्रकारचे वितंचक (Enzyme) स्रवते, जे या मकरंदासोबत मिसळते. या वितंचकाचे काम असते मकरंदाला जास्तीतजास्त शुद्ध करणे. म्हणजे जेव्हा मध पूर्ण तयार होतो तेव्हा त्यात अगदी थोडे पाणी आणि खूप जास्त साखर उरते. शुद्ध मधाचे गुणोत्तर हे १७% पाणी ८३% साखर असते. मधमाशी जेव्हा मकरंद आणते तेव्हा ती मधमाशी पोळ्यात येऊन दुसऱ्या मधमाशीला तो देते, ती मधमाशी अजून एक तिसऱ्याच मधमाशीला तो देते. असे हे चक्र साधारण -१० मधमाश्या झाल्यावर थांबते. प्रत्येक मधमाशी या मकरंदामध्ये आपल्या तोंडातील वितंचक मिसळत असते. त्यामुळे मध लवकर तयार होतो. जेव्हा हा मध साठवला जातो तेव्हा पोळ्यात असणाऱ्या मधमाश्या सारखे आपले छोटे पंख हलवून या मधला वारा घालत असतात, जेणेकरून त्यातील पाणी उडून जावे आणि साखरेचे प्रमाण जास्त असावे!

परंतु, सगळ्याच मकरंदाचा मधच होतो असे नाहीये. यातून थोडा भाग हा पोळ्यासाठी लागणारे मेण तयार करण्यासाठी वापरला जातो. मेणसुद्धा मधमाश्यांच्या शरीरात असणाऱ्या एका छोट्या घटकातून स्त्रवत असतो, जो या मकरंदाच्या संपर्कात आला कि मऊ होतो.

आता हे सर्व उपद्व्याप करण्याचे कारण म्हणजे हिवाळ्यात आणि ऐन उन्हाळ्यात फुलांची संख्या खूपच कमी असते. त्यामुळे साधारण - महिने या मधमाश्या अहोरात्र कष्ट करतात आणि नंतर - महिने मध खात आरामात दिवस काढतात.

मधाचा वापर

शतकानुशतके मधांचा वापर स्वयंपाकातच नव्हे तर औषधासाठीही केला जात आहे, तसेच मध खाण्याने शरीरात शक्ती येते. हे सर्वात फायदेशीर नैसर्गिक संयुगांपैकी एक आहे, जे परिष्कृत साखरेच्या जागी वापरले जाते. जर आपण परिष्कृत साखरेऐवजी शुद्ध मध वापरत असाल तर ते खूप आरोग्यदायी ठरू शकते.

हे असे खाद्यपदार्थ आहे ज्याबद्दल कोणालाही माहिती असेल, जे सहज उपलब्ध आहे आणि जवळजवळ प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आढळते. हे आरोग्यासाठी उपयुक्त असेच एक सर्वाधिक लोकप्रिय आणि व्यापकपणे वापरले जाते. एक स्वीटनर आहे. याचा उपयोग जगभरातील बर्याच संस्कृतींमध्ये वापर केला जातो, तसेच अनेक पारंपारिक औषधांचा आधार म्हणून, विशेषतः आयुर्वेदात. मधाचे फायदे शतकानुशतके मौल्यवान आहेत.

निःसंशयपणे, मध हे अमृतसारखे पौष्टिक आहार आहे. मधाचा गोडपणा आणि पौष्टिकता समान आहे. कदाचित याच कारणास्तव जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व धार्मिक समारंभात मध वापरली जाते. असे म्हणतात की माणसाने खूप प्राचीन काळापासून मध वापरण्यास सुरवात केली आहे. एवढेच नव्हे तर जगातील सर्व राष्ट्रांनी मधाला एक महत्त्वपूर्ण स्थान दिले आहे. चिनी, मिस्त्री, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन बौद्ध, हेबरू इत्यादी सर्व जातींनी मधाला पवित्र मानले आहेत. आयुर्वेदिक ग्रंथात मधांची विस्तृत चर्चा आढळते.

मधाचे अनेक फायदे आहेत. अगदी सौंदर्यापासून ते आरोग्यापर्यंत अनेक फायदे आपल्याला मधापासून मिळत असतात.

मधाचे आरोग्यवर्धक ठळक फायदे

. वजन कमी करण्यासाठी

. खोकलया साठी

. स्मरणशक्ती वाढण्यासाठी

. पचनशक्तीती वाढिण्याकरिता

. अल्सरवर उपोयोगी आहे

मधाचे सौंदर्यवर्धक फायदे

. त्वचा तरुण दिसते

. चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी

. डोळ्यांखाली काळे डाग कमी करण्यासाठी

. त्वचा अधिक मॉईस्चराईज ठेवण्याकेसंती

. केसातील कोरडा काढण्यासाठी.

.नैसर्गिक कंडिशनर

. केसातील चमक वाढवण्यास.

मधाचे विस्तृत फायदे पुढील प्रमाणे:

) मधामध्ये व्हिटामीन , बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.

) कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.

) उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.

) रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.

) हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.

) रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.

) मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.

) उन्हाळ्यात रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.

) पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो.

१०) चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल.

११) रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.

१२) मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे.

१३) टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो.

१४) मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.

१५) मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.

सारांश

मध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वजन वाढवतेही. मध हा जर औषधाप्रमाणे घेतला तर काहीही त्याने मधुमेहींना त्रास होऊ शकत नाही. म्हटल्याप्रमाणे तो चमचा किंवा दोन चमचे दिवसभरात घेतला तर फायदाच होतो. परंतु ही बाब ज्यांना फार उच्च कोटीचा मधुमेह आहे त्यांना लागू नाही. ज्यांची ब्लडशुगर अडिचशे किंवा त्यावर असते त्यांनी मात्र सेवन डॉक्टरांच्या सहमतीनेच करावे.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.



No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know