Translate in Hindi / Marathi / English

Tuesday, 12 December 2023

कापूर विषयी माहिती | कापूर हा एक प्रकारचा गोठलेला तेलकट पदार्थ | कापूर म्हणजे काय | केमिकल कापूर म्हणजे काय | नैसर्गिक कापूरला भीमसेनि कापूर म्हणतात तो कृत्रिम कापूर पेक्षा जड असतो | कापूराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते

कापूर विषयी माहिती

 

आपल्या आयुष्यात कापूराचे बरेच फायदे आहे पण आपल्याला माहित नाही कापूर म्हणजे काय? आणि केमिकल कापूर म्हणजे काय?

कापूर म्हणजे काय?

कापूर हा एक प्रकारचा गोठलेला तेलकट पदार्थ आहे. प्रामुख्याने दोन प्रकारचे कापूर वापरले जातात. एक झाडापासून मिळवले जातो.आणि दुसरे रासायनिक प्रक्रियेद्वारे कृत्रिम रित्या तयार केले जातो. नैसर्गिक कापूरला भीमसेनि कापूर म्हणतात .आणि तो कृत्रिम कापूर पेक्षा जड असतो .त्यामुळे तो पाण्यात लवकर बुडतो. कापूर हा विशिष्ट झाडापासून मिळणाऱ्या मेणासारखा पांढरा किंवा पारदर्शक पदार्थ आहे.

जो कापूर आपण पूजेत वापरतो तो रासायनिक रित्या बनवलेला असतो. बाजारात स्वस्त मिळणारा कापूर हा एक प्रकारचा मेनचट आणि पांढरे प्रकारचा रासायनिक प्रकार असतो. कापूर हा आशिया खंडाच्या जंगलात सापडणाऱ्या झाडात तसेच लोटेल कुटुंबीय झाडांच्या सालीमध्ये आढळतो.

कापूराचे झाड कसे दिसते?

आशिया खंडातल्या पूर्वेकडच्या काही देशांमधील जंगलामध्ये एक सदाहरित झाड आढळते. सुमात्रा, इंडोनेशिया आणि बोर्निओया जंगलात साधारण 80 ते 1000 फूट वाढणाऱ्या ही झाडे आहे.ही झाडे जशी मोठी होत जातात तसतसे यांच्या खाच्यामध्ये कापुराची निर्मिती होते .कापूर याची उत्पत्ती कमी असल्याने हा कापूर महाग आहे.

भीमसेनी कापूर आपले जीवन आनंदी करू शकतो .बहुउपयोगी कापूर आपल्या घरात असतोच. भीमसेनी कापूर असेल तर ते आयुर्वेदिक असतो. आणि वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा ही असतो.

देवपूजा साठी वापरला जाणारा कापूर अतिशय उपयुक्त आहे. कापूरचा उपयोग पूजेसाठी करण्यात येतो. कापूर दोन प्रकारचा असतो ,एक जो देवाच्या पूजेसाठी वापरला जातो आणि दुसऱ्या कपड्यांमध्ये ठेवला जातो . हा कापूर नैसर्गिक रित्या उपलब्ध होत असल्याने त्याची किंमत जास्त असते. रासायनिक कापूर खाण्यास योग्य नसतो. त्याचे सेवन झाल्यास अनेक घातक परिणाम होऊ शकतात.

कपूराचे फायदे

तुम्ही तुमच्या घरात कापूर जाळत असाल. कारण कापूर जाळल्याचे अनेक फायदे आहेत .अनेक घरांमध्ये खोबरेल तेल आणि कापूर एकत्र करून वापरला जातो. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कापूर हा एक उत्कृष्ट एंटी ऑक्सीडेंट म्हणून वापरला जाऊ शकतो. कापूर मध्ये अशा घटकांची गणना उत्तेजकांच्या श्रेणीमध्ये केली जाते, ज्यात शरीराच्या मज्जा संस्था सुधारण्याची क्षमता असते.

अँटीसेप्टिक म्हणजे जिवाणू आणि सूक्ष्मजीवांनू पासून संरक्षण करणे.

नारळाच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने स्नायू दुखणे आणि पेटके येण्यापासून आराम मिळतो.

डोकेदुखीला कापूरच्या खूप फायदा होतो. सुंठ,लवंग ,कापूर, अर्जुनाची साल आणि पांढरे चंदन समप्रमाणात बारीक करून घ्या. आणि ते मिश्रण डोक्याला लावल्याने डोकेदुखी लवकर बरी होते.

कापुराचे दुष्परिणाम

कापूराच्या वापरामुळे मळमळ होणे, उलट्या होणे, डोकेदुखी, चक्कर येणे ज्यांना आलर्जी आहे त्यांना हा त्रास होतो. कापूर चा जास्त वापर केल्यामुळे खाज सुटणे आणि जळजळ होणे. शिंकताना नाकात खास सुटले जळजळ होणे हा त्रास होतो .

भीमसेनी कापूर चे औषधी गुणधर्म

भीमसेनी कापूर हा कापराचा एक शुद्ध प्रकार आहे. हा कपूर सामान्य कापरा पेक्षा वेगळा असतो.सामान्य कापरात मेण असते. त्यामुळे सामान्य वापरातील कापूर आकार घेतो.

भीमसेनी कापुर आयुर्वेदिक गुणधर्म

हा कापूर कुठल्याही विशिष्ठ आकारात येत नाही. स्फटीकासारखा येतो , ह्याचे गोल, चौकोनी वडीत रुपांतर करता येत नाही कारण नेहमीच्या कापराप्रमाणे ह्यात मेण नसते.

सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा वाफारे घ्यावेत, नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.

रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.

पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात किंवा उंचावर चढताना श्वास लागत असल्यास कापुर हुंगावा.

केसातील कोंड्याकरीता तसेच सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे.

तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी.

नेहमीच्या कापरात मेण असते, पण या भीमसेनी कापूर मध्ये मेण नसते. त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा.

आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना भीमसेनी कापूर मिश्रीत वीडा देतात तो हाच कापूर, दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात, श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो.

दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो लाळ पोटात गेल्यास काही अपाय होत नाही.

खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात.

संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही.

कापराचे इतर ही काही उपयोग आहेत

प्रवासी बॅग / कपडे साठवण्याची बॅग मध्ये कपूर ठेवला तर कुबट वास किंवा ठेवणी चा वास येता एक छान सुगंध येतो, कपड्यांना कसर झुरळ लागत नाही.

पावसाळ्यात विशेषत: कपडे चांगले सुकत नाहीत ओलसर राहतात मग असे कपडे बॅग मध्ये भरले की त्यांना कुबट वास येतो तो कापूर ठेवल्या जातो.

डास चावू नयेत म्हणून रात्री आपल्या सभोवती ठेवा डास फिरकत नाहीत शिवाय इतर कीटक, उंदीर वगैरे लांब राहतात.

कधी शेकोटी किंवा चूल पेटविणे जर त्रासदायक असेल तर काही कापराच्या वड्या ते काम सोपे करतात.

रुमालात काही कापुराचे खडे रबर किंवा दोऱ्याने बांधून ठेवलेत तर रुमालाला सुगंध येतोच पण तो कापूर हुंगायला पण सोपे पडते. आणि चुकून रुमाल धुवायला गेला तरी हरकत नाही डाग नाही पडत आणि साबणाने तो विरघळत पण नाही.

गुड नाईट किंवा इतर मॅट जाळायच्या यंत्रात गुडनाईट वडी किंवा लीक्वीड ऐवजी त्या वर कापूर ठेऊन चालू करा तो कापूर विरघळून हवेत सुगंध पसरेलच पण डास पण पळून जातील आणि गुड नाईट पेक्षा जास्त सुरक्षित.

भीमसेनी कापूर पायमोज्यात घालून ठेवा त्याचा कुबट वास आणि त्या मुळे पायाला येणारा कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्या मुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल.

कापुर पवित्र का मानला जातो?

शास्त्रानुसार देवी- देवतांनसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते. ज्या घरात नियमितपणे कापूर जाळला जातो, तेथे पितृदोष किंवा इतर प्रकारच्या दोषाचा प्रभाव रहात नाही.

भीमसेनी कापूर लावल्याने घरातील वातावरण पवित्र आणि सुगंधित होते. अशा पवित्र वातावरणात देवता लवकर प्रसन्न होतात. कापराच्या प्रभावाने घरातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्या सुगंधाने आपल्या विचारातही सकारात्मकता येते.

कापराचे वैज्ञानिक महत्व

भीमसेनी कापराच्या सुगंधाने जीवाणू, विषाणू, लहान किटक नष्ट होतात. आणि वातावरण शुद्ध राहते आजार दूर रहातात.

सर्दि-पडस व्हायची लक्षणे आसताना एका रूमालात - कापूर एकत्र करून त्याचा वास घेतल्याने सर्दि-पडसे होत नाही

कापूराचा सुगंध व्यवस्थित श्वासावाटे आत घेतल्याने तोंडाला घाण वास येत असल्यास निघून जातो.

कपूराच्या वासाने आपल्या मेंदूतील लेकवस् नामक रसायन अधिक सक्रीय होते. याचा उपयोग आपल्याला निर्णयक्षमतेत होतो.

कापूराचा रोज वेळा सुवास घेतल्याने आपल्या नाकाची वास ओळखायची क्षमता वाढते.

घरात कापूर रोज लावल्यावे ऑक्सिजन ९-११% टक्के ईतका वाढतो.

मुठभर कापूर तव्यावर ४० सेकंद तापवून ते एका रूमालात बांधून त्याचा शेक गळ्याला दिल्यास , घसा बसला असेल तर बरा होतो. तसेच हा शेक भुवयांच्या वर दिल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते.

मुठभर कापूर + दालचीनी + लसूण एकत्र एका सुती कपड्यात बांधून गाडीच्या बोनेट च्या आत ही पूडी ठेवल्याने काही वेळ तरी उंदीर घूशी येत नाही.

गरम पाण्यात मीठ बराच कापूर टाकून त्यात पाय बुडवून ठेवल्याने पाय दुखणे कमी होते फुगलेल्या शीरा खाली बसतात. (५०शी ओलांडलेल्यांना अधिक उपयोगी)

सारांश

कापूराच्या सुगंधाने मनात एक नवचैतन्य निर्माण होते. आपल्या देशात कापूरचा दर्जा खूप वरचा आहे आणि तो पुजा-हवन इत्यादींमध्ये वापरला जातो. नकली कापूर हा खऱ्या कापूरपेक्षा हलका असतो आणि त्यामुळे ते हवेत लवकर बाष्पीभवन होऊन हवेत त्याचसोबत  पाण्यात देखील  खूप लवकर विरघळते. त्याऐवजी भीमसेनी कपूर याच्या अगदी उलट आहे काही लोक त्याचे आयुर्वेदिक फायदेही सांगतात आणि औषध म्हणूनही खाता येतात. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवंग आणि कापूरच्या पिशव्या सोबत ठेवण्याची चर्चा होती, पण तुम्हाला माहित आहे का की सामान्यतः उपलब्ध असलेला कापूर बनावट आणि रासायनिक आहे. नैसर्गिक कापूरला भीमसेनी कापूर म्हणतात ज्याला आयुर्वेदात मोठा दर्जा देण्यात आला आहे. अनेक संशोधनांचा असा विश्वास आहे की त्याचे फायदे केवळ आरोग्यासाठीच नाही तर हवा शुद्ध करण्याचे कामही करू शकतात.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.



No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know