गुलाब फूलाचे औषधी उपयोग
गुलाब. हे फूल कोणाला आवडत नाही, असे कोणीच नाही. गुलाबाचे फूल हे सर्वांनाच आवडते. विशेष म्हणजे गुलााचे फूल ही प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जाते. विविध रंगांची गुलाबाची फुले पाहिली का मन अगदी प्रसन्न होते. गुलाबाचे फूल आणि त्याचा सुगंध सर्वांनाच आवडतो. गुलाब Rosaceae कुटुंबाशी संबंधित एक कोमल फुल आहे. याचे वैज्ञानिक नाव Rosa आहे. गुलाब दिसण्यात खूप सुंदर असते. हे फुल अनेक रंगांमध्ये आढळते. ज्यात लाल, गुलाबी आणि काळ्या रंगाचा समावेश आहे. परंतु भारतात लाल गुलाब मोठ्या प्रमाणात आढळते. गुलाबाच्या पाकळ्या चारही बाजूंना उघडलेल्या असतात. गुलाबाला फुलांचा राजा असेही म्हणतात. गुलाबाचे फूल जितके दिसायला सुंदर आहे तितके त्याचे फायदे देखील खूप आहेत. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर गुलाब एक उत्तम औषध म्हणून कार्य करते. गुलाबाकडे पाहिल्याने तणाव दूर होतो. त्याचप्रमाणे गुलाबाचा प्रभाव थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. सुगंधित फूल असल्याकारणाने गुलाब पूजेसाठी वापरले जाते. याशिवाय घरात येणाऱ्या पाहुण्यांचे तसेच, सत्कार करताना अभिनंदन म्हणून गुलाब दिले जाते. काही स्त्रिया आपल्या केसांमध्ये गुलाब लावतात. गुलाब पासून गुलाब जल, गुलकंद, अत्तर, शरबत, तेल इत्यादी गोष्टी बनवल्या जात. याशिवाय काही आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी देखील गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या जातात. याव्यतिरिक्त गुलाबाचे अजून कोणते फायदे आहेत.
वजन कमी करण्यास उपयुक्त
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये आढळणारे घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास तसेच चयापचय वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. जर माणसाला वारंवार भूक लागत असेल तर गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते. त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन करणे फायदेशीर आहे.
हाडे होतात मजबूत
गुलाबामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात आढळतात. जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेल्या गुलकंदच्या स्वरूपातही गुलाबाचे सेवन करू शकता.
लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी फायदेशीर
कुणी प्रेम व्यक्त करताना गुलाबपुष्प देऊनच करतो हे अनेकदा आपण पाहिले आहे. एवढेच नाही तर गुलाब माणसाला लैंगिकदृष्ट्या सक्रिय बनवते. यामुळे मूड सुधारतो. रोमान्सची मजा दुप्पट होते. त्यामुळे लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी गुलाब फायदेशीर ठरते.
तणाव दूर करण्यास होते मदत
जर एखाद्या व्यक्तीला थकवा, नैराश्य आणि तणावामुळे झोपेचा त्रास होत असेल तर आपल्या पलंगावर काही गुलाब ठेवा. गुलाबाच्या सुगंधानेही मन शांत होते आणि तणाव दूर होण्यास मदत होते.
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये आढळणारे घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास तसेच चयापचय वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. जर माणसाला वारंवार भूक लागत असेल तर गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते. त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन करणे फायदेशीर आहे.
जास्वंद फूलाचे औषधी उपयोग
इतर भाषांतील नावे: जास्वंद (मराठी), हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपा(संस्कृत), अरुणा, जासूद (हिंदी), Shoeflower, Hibiscus (इंग्रजी)
अन्य नावे - जासुम, जवाकुसुम, रोझेला, जमेका सॉरेल, वगैरे. "शू-फ्लॉवर' हे नाव असल्याचे कारण जास्वंदीची फुले काळ्या चामडी बुटांवर घासली तर पॉलिश केल्याप्रमाणे बूट चकाकतात.
जास्वंद ही एक फुले देणारी वनस्पती आहे. भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुपस्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीमध्ये एक हजार सूक्ष्म रंगछटा आहेत. नजरेत भरणारा रंग आणि पाच पाकळ्यांनी मनोहारी बनलेल्या जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्यां, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते.
जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणार्यात "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाचा कच्चा माल आहे. काही प्रकारांमधील फुलांना मंद सुगंध असतो. तागाच्या वनस्पतीचे जसे तंतू निघतात, त्याप्रमाणे "हिबिस्क्स सब्दारिफा' या वाणाचेही शोभिवंत धागे निघतात. काही देशांमध्ये त्याचा स्कर्ट बनवतात. तसेच धाग्यांचा उपयोग केसांचा टोप बनविण्याकरितादेखील केला जातो.
जास्वंदीच्या फुलांचा उपयोग
जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. जास्वंदीच अर्क घातलेले केशतेल जबाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणूनही उपयोगात येते. नायजेरियात पोट साफ करण्यासाठी, तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी किंवा जाम-जेलीसारख्या खाद्यपदार्थांमध्येही वापरतात. काही फुलांचा रंग उकळत्या पाण्यात बाहेर पडतो. मेक्सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केला जातो.
जास्वंदाचा समावेश असलेल्या चहाच्या डिप-डिप पुड्या हा एक फार मोठी जागतिक बाजारपेठ लाभलेला व्यवसाय आहे. चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. याचे रंगीत पेय हे शीत किंवा गरम पेय म्हणून वापरता येतं. या गरम पेयामार्फत सूक्ष्म प्रमाणात लोह, ताम्र, जस्त (झिंक), ब-१, ब-२ आणि क ही जीवनसत्त्त्वे शरीराला मिळू शकतात. या पेयाच्या सेवनामुळे अपायकारक लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते आणि हितकारक हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल वाढते. तसेच रक्तशर्करा, रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. हे पेय पाचक आहे. ज्याला तीव्र उदासीनतेची बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी जास्वंदयुक्त चहा गुणकारी असल्याचे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. जास्वंदीच्या फुलांचे असे काही गुणधर्म आधीपासूनच माहिती झालेले असले, तरी त्यासंबंधीचे सखोल संशोधन चालूच असते. जास्वंदीमुळे चहाला लाल किंवा पिवळसर रंग येण्याचे कारण म्हणजे फुलात असलेली फ्ल्याओनाईड, डेल्फिनिडिन, सायनिडिन, अन्थोसायनिंस ही सेंद्रिय द्रव्ये. शरीरातच तयार होणारी फ्री-रॅडिकलवर्गीय रसायने निष्प्रभ करणे गरजेचे असते. त्याकरिता हिबिस्कसच्या चहात जे प्रोटोकॅटेचुइक आम्ल असते, ते ॲन्टि-ऑक्सि डन्ट म्हणून उत्तम कार्य करते.
आपण बऱ्याच काळापर्यंत तरूण दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, आजकालची खराब लाईफस्टाईल वेळेच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या घेऊन येते. पण, तुम्हाला माहीत आहे का? जास्वंदीची पानं ही अँटीएजिंग (Anti-Ageing) समस्येवर औषधाप्रमाणे काम करतात. वास्तविक जास्वंदीची पानांमध्ये फ्री रेडिकल्स (Free Radicals) काढून टाकण्याची क्षमता असते. ज्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया हळू होते आणि आपली त्वचा तरूण दिसते.
जास्वंदीच्या फुलांचा भौतिक शास्त्रात उपयोग
भौतिकीशास्त्रामध्ये फोटॉनिक्सग, ऑप्टो-इलेक्टॉ्निक्सण किंवा ऑप्टिक्स. (प्रकाशकी) या शाखांचे महत्त्व वाढत आहे. ऑप्टिकल फायबरमार्फत टेलिकम्युनिकेशन, माहिती-तंत्रज्ञान संकलन, होलोग्राफी, रोबोटिक्सक, शस्त्रक्रिया (उदाहरणार्थ डोळ्यांचा नंबर कमी करणे) अशा अनेक उपयोगांसाठी त्याचा थेट संबंध आहे. त्यासाठी लागणाऱ्या अनेक उपकरणांमध्ये प्रकाशाचा विशिष्ट वक्रीभवनांक (नॉन-लिनिअर रिफ्रॅक्टिठव्ह इंडेक्सा) असलेले रंगद्रव्य आवश्यशक असते. सध्या त्यासाठी बहुधा कृत्रिम असेंद्रिय रसायने वापरली जातात. पण ती यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी उच्च क्षमतेच्या महागड्या लेसर किरणांची आवश्यवकता असते. हा अडथळा दूर करण्यासाठी योग्य अशाच वक्रीभवनांकाचे स्वस्त, पण मस्त असे "मटेरियल' जास्वंदीच्या पानांनी क्लोयरोफिल आणि कॅरोटेनॉईडच्या स्वरूपात रंगद्रव्ये प्राप्त करून दिले आहे. जास्वंदीचे फूल एखाद्या कागदाच्या कपट्यावर चिरडले की लिटमस पेपरचा गुणधर्म असलेला निळा पेपर तयार होतो. आम्लधर्मी पदार्थात बुडवला की तो लाल होतो.
सदाफुली फूलाचे औषधी उपयोग
भारतामध्ये सहज सापडणारी सदाफुली बहुतेक सगळीकडेच आढळते. सदाफुली हे एक अस फुलझाड आहे जे सुंदर व मोहक आहे अपवाद सुवासिकता.परंतु तरीही सदाफुली "पहिल्या १०" च्या यादीत येत नाही.
सदाफुली बऱ्याच रंगात उपलब्ध आहे. सदाफुलीला वर्षभर बहर असतो (नावातच अर्थ दडला आहे). सदाफुलीच्या पूर्णतः पांढऱ्या फुलांना औषधी महत्त्व आहे. छोट्याश्या छोट्या कुंडीतही सदाफुलीची रोपटी तग धरून फुलं येतात. अगदी एका बाटलीतही ह्याच रोपट छान वाढत.दररोज किंवा एक दिवसाआड पाणी द्याव लागतं (मातीत ओलावा कायम राहिला पाहिजे). प्रखर ते मध्यम सूर्यप्रकाश चालतो. सदाफुलीचे रोप जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्येही लावता येऊ शकते. हे फुलझाड भारतामध्ये सर्रास आढळणारे असले, तरी हे मूळचे दक्षिण आफ्रिकेतील मॅडगास्कर प्रांतातील आहे. उष्ण प्रदेशांमध्ये उगविणारे हे फुलझाड आहे. या फुलझाडाचे वैज्ञानिक नाव ‘catharanthus roseus’ असे असून हिंदीमध्ये या फुलाझाडाला ‘सदाबहार’, इंग्रजी भाषेमध्ये ‘पेरीविंकल’, तर मराठी भाषेमध्ये ‘सदाफुली’ या नावाने ओळखले जाते. हे फुलझाड जास्तीत जास्त एक मीटर उंचीपर्यंत वाढू शकते. या फुलांचा रंग गुलाबी, बैंगणी किंवा पांढरा असतो. हे फुलझाड बियांपासून किंवा कटिंगद्वारेही लावता येऊ शकते. हे फुलझाड वर्षभर बहरणारे आहे. याच्या पानांची चव कडवट असल्याने वन्य पाणी हे झाड खात नाहीत. या झाडावर कीड दिसून येत नाही, तसेच साप, विंचू, इत्यादी या झाडाचा आसपास येत नाहीत. या झाडाची पाने गळून पडल्यानंतर विघटीत होऊन मातीतले हानिकारक घटक नष्ट करतात.
सदाफुलीच्या मुळ्यांवरील साल औषधी मानली गेली आहे. यामध्ये विविध प्रकारचे क्षार असून, ‘एजमेलिसीन’ आणि ‘सरपेंटीन’ हे दोन क्षार सर्पगंधा समूहाशी संबंधित आहेत. सदाफुलीच्या मुळ्या शरीरातील रक्त शर्करा कमी करण्यास सहायक आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये या फुलझाडाचा उपयोग मधुमेहावर पारंपारिक उपचारपद्धतीच्या अंतर्गत केला जात आला आहे. मधमाशी किंवा इतर किड्यांच्या डंखावर या झाडाच्या पानांचा रस गुणकारी असल्याचे म्हटले जाते.
महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव प्रमाणाबाहेर जास्त होत असल्यास या झाडाच्या मुळ्यांचा वापर औषध म्हणून केला जातो. या झाडाच्या मुळ्यांच्या सालीचा वापर उच्चरक्तदाब, अनिद्रा आणि नैराश्य, चिंतारोग (anxiety) यांसारख्या काही मानसिक विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. ही साल वेदनाशामकही आहे. या झाडाच्या पानांमध्ये जीवाणूनाशक तत्वे आहेत. त्यामुळे अनेक तऱ्हेच्या संक्रमणांवर उपचार म्हणून पानाच्या रसाचा वापर करण्यात येत असतो.
सारांश
सामान्यपणे फळांचे औषधी गुणधर्म आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असता. किंवा एखाद्या झाडाच्या पानांचा औषधी उपयोगही काहीजणांना ठाऊक असतो. मात्र अनेक फुलांमध्येही औषधी गुणधर्म असतात हे खूप कमी लोकांना ठाऊक असते. फार पूर्वीपासून फुलांचा वापर पूजा, सण आणि सजावट यासारख्या धार्मिक कार्यांच्या किंवा कार्यक्रमाच्या दिवशी वापर केला जात आहेत. पण आजच्या काळात लोक फुलांशी निगडीत हेल्थ बेनिफिट्स मध्ये देखील रस दाखवत आहेत. फुलांमध्ये कॅरोटीनोईड्स, फ्लाव्हानोइड्स, फिनोलिक अॅसिड, अँथोसॅनिन्स आणि फ्लेव्होनोल्स असे पोषक घटक पुरेशा प्रमाणात आढळतात. फुलांच्या या गुणधर्मांमुळेच त्यामध्ये अँटिऑक्सिडेंटची क्षमता असते.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know