Translate in Hindi / Marathi / English

Tuesday, 12 December 2023

विड्याचे पान | नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे | विड्याचे पान खाण्याचे फायदे | जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात | पान खाण्याचे खुप फायदे आहेत. फक्त पान तम्बाखु असलेले नसावे. पान खाणे आपल्या शरीरासाठी खुप फायदेशीर आहे.

 

विड्याचे पान

विड्याचे पान खाण्याचे फायदे

सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात, त्यामुळे तोंडाची चव वाढते. पान खाल्ल्याने की तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच दात पोकळी, दात किडणे यांचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात. आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते. या छोट्या पानांचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चाविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते.

पानांमध्ये मधुमेह-विरोधी, हृदय रक्तवाहिन्यासंबंधी, दाहक-विरोधी, व्रण-विरोधी आणि संसर्ग-विरोधी गुणधर्म असतात. सुपारीच्या पानात 1.3 मायक्रोग्रॅम आयोडीन, 4.6 मायक्रोग्रॅम पोटॅशियम, 1.9 मोल्स किंवा 2.9 एमसीजी व्हिटॅमिन , 13 मायक्रोग्राम व्हिटॅमिन बी1 आणि 0.63 ते 0.89 मायक्रोग्राम निकोटीनिक ऍसिड प्रति 100 ग्रॅम असते.

आपल्यापैकी अनेकजण पान खाण्याचे शौकीन असतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. पान तयार करण्यासाठी ज्या वेलीची पानं वापरण्यात येतात त्यांना नागवेल असंही म्हटलं जातं. आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमुद करण्यात आले आहेत. अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानांचा आवर्जुन समावेश करण्यात येतो. या पानांची मुळ चव ही तिखट स्वरूपात असते, परंतु यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे पान तयार करण्याचीही एक वेगळी पद्धत असते. या पानामध्ये गुलकंद, वेलची, सुपारी, कात, चुना यांसारखे अनेक मसाले टाकले जातात. त्याचप्रमाणे पानामध्ये टाकण्यात येणाऱ्या मसाल्यांनुसार त्यांना वेगवेगळी नावंही देण्यात आली आहेत. त्यामध्ये गोड पान, साधं पान, बनारसी पान यांसारखे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या या पानांसोबत अनेक नवनवीन प्रयोगदेखील करण्यात येत आहेत. या पानांमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स अॅड करण्यात येता. त्यात चॉकलेट पान, चंदन पान, स्ट्रॉबेरी पान यांसारखे असंख्य प्रकार पाहायला मिळतील.

अनेकदा पान खाणं ही वाईट सवय समजली जाते. कारण अनेक लोकं व्यसन म्हणून पान खातात. त्यामध्ये शरीराला हानिकारक अशा पदार्थांचा समावेश करण्यात येतो. असे केल्याने पानामधील शरीराला आवश्यक असणारी सर्व तत्व नष्ट होतात. त्यामुळे असे करता त्यामध्ये शरीराला आवश्यक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करून खाणं फायदेशीर ठरतं. पान खाल्याने तोंडाची दुर्गंधी, दातांमध्ये लागलेली किड, भूक वाढवणं त्याचप्रमाणे पचन क्रियादेखील सुरळीत होण्यास मदत होते

विड्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे

विड्याचे पान उष्ण असल्यामुळे वात आणि कफ विकारांमध्ये ते उपयोगी आहे.

घशामध्ये कफ साठून आवाज खरखरतो किंवा बसतो. अशा वेळी ज्येष्ठमध पावडर, कंकोळ, मिरी, कात घातलेले विड्याची पाने चावून चघळून खावीत. त्यामुळे घसा, कंठ साफ होतो.

डोके जड होणे, दुखणे, सतत शिंका येऊन सारखे नाक गळणे अशा सर्दीमध्ये विड्याची दोन पाने, चहाची पाती, धणे, आले, मिरी यांचा काढा तयार करावा.

विड्याची पाने देठासकट खावीत. याने पोट साफ होते.

विड्याचे पान अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. जे शरीरातील पीएच पातळी सामान्य करण्यात, पोटॅशियम संबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यास मदत करतात. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर हे पान रामबाण -उपाय म्हणून मानला जातो. यासाठी सुपारीचे पान बारीक पेस्ट करून, रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्या.

सुपारीच्या पानांमध्ये अनेक जीवाणूनाशक गुणधर्म असतात, जे श्वासाची दुर्गंधी, दात पिवळे होणे, प्लेक आणि दात किडणे यापासून आराम देतात. जेवणानंतर सुपारीची पाने चघळल्याने फायदा होतो.

खोकला, ब्राँकायटिस आणि दमा यांसारख्या श्वसनविषयक आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदात सुपारीची पाने विशेषतः वापरली जातात. पानांमध्ये आढळणारी संयुगे रक्तसंचय दूर करण्यास आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत करतात.

पिंपल्स दूर होतील. विड्याच्या पानामध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात. यासाठी तुम्ही काही विड्याची पाने घ्या आणि त्यांची पेस्ट बनवा. आता त्यात 2 चिमूटभर हळद आणि कोरफडीचे जेल मिक्स करा. आता ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा धुवा. पिंपल्स कमी होऊ लागतील.

चेहऱ्यावरील डाग दूर करते. डाग घालवण्यासाठी विड्याच्या पानाचाही वापर करता येतो. मात्र, तुमची त्वचा अधिक संवेदनशील असल्यास हे वापरू नका. विड्याची पाने सुकवून पावडर बनवू शकता. ते पावडरच्या स्वरूपात दीर्घकाळ साठवले जाऊ शकते आणि आवश्यकतेनुसार वापरले जाऊ शकते. डाग घालवण्यासाठी एक चमचा पावडर घेऊन त्यात गुलाबजल मिसळून पेस्ट बनवा. आता ते चेहऱ्यावर लावा.

चेहऱ्यावर चमक आणते

विड्याच्या पानांचा फेस पॅक अनेक प्रकारे वापरला जातो. विड्याच्या पानांच्या पेस्टमध्ये 1 चमचे तांदळाचे पीठ त्याच्या पेस्टमध्ये मिसळा. ते चेहऱ्यावर लावा आणि थोडे कोरडे होऊ द्या. कोरडे होताच आपले हात ओले करा आणि गोलाकार हालचालींनी मालिश सुरू करा. 4 ते 5 मिनिटे स्क्रब केल्यानंतर, साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. 4 ते 5 दिवसात तुम्हाला स्वतःहून फरक दिसू लागेल.

सुपारीच्या पानांमध्ये अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म असतात जे साखर नियंत्रित ठेवण्याचे काम करतात. सुपारीची पाने रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढण्यापासून रोखतात. टाईप 2 मधुमेह असलेल्यांना सकाळी रिकाम्या पोटी त्याची पाने चावून खाल्ल्याने फायदा होतो.

सारांश

भारतीय समाजात पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर अनेक वर्षांपासुन केला जात आहे. आजही पानाचा उपयोग केला जातो. परंतु पान फक्त तोंडाचा रंग आणि चव बदलत नाही तर, आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. पानला भारतीय समाजात सभ्यता आणि संस्कृतीच्या हिशोबाने शुभ मानले जाते. पान खाण्याचे खुप फायदे आहेत. फक्त पान तम्बाखु असलेले नसावे. पान खाणे आपल्या शरीरासाठी खुप फायदेशीर आहे.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.



No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know