शंकराला प्रिय बेलपत्र आणि बेलफळ
बेल वृक्षाची माहिती
भारतीय संस्कृतीत बेल वृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बेल पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली आहे. बेलपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्व आणि सुगंध पसरला जातो. वेळोवेळी अंगाला स्पर्श करण्यामुळे शरीरावर आक्रमण करणारे विषाणू मरण पावतात. शेकडो रोगांना नष्ट करण्याची क्षमता असणाऱ्या ह्या दिव्य वृक्षाची प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून, त्याला पुजेतही स्थान देऊन त्याचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेला.
बेल हा पानझडी वृक्ष रूटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ईगल मार्मेलॉस आहे. लिंबू व संत्रे या वनस्पतीही रूटेसी कुलातील आहेत. बेल हा वृक्ष मूळचा उत्तर भारतातील असून नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान, बांगला देश, कंबोडिया, थायलंड इत्यादी देशांत निसर्गत: आढळतो. भारत, श्रीलंका, जावा, फिलिपीन्स व फिजी या देशांत बेलाची लागवड करतात. ईगल प्रजातीत बेलाची ईगल मार्मेलॉस ही एकमेव जाती आहे. भारतात तो रुक्ष ठिकाणी, जेथे अन्य वृक्ष वाढत नाहीत अशा जागी, कमी पावसाच्या प्रदेशात वाढलेला दिसतो.
बेल (ईगल मार्मेलॉस): (१) पाने, (२) फूल, (३) फळ. बेल वृक्ष ८–१४ मी. उंच वाढत असून त्यावर काटे असतात. खोडाचा घेर १–१·५ मी. असून राखाडी रंगाचा असतो. साल मऊ असून तिचे खवले निघतात. पाने संयुक्त, हिरवी, त्रिपर्णी व एकाआड एक असून पानांच्या बगलेत सरळ व मोठे काटे असतात. पानांवर तेलाचे ठिपके दिसतात. मार्च–एप्रिल महिन्यांत पाने गळून पडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी पुन्हा पालवी येते. फुले लहान, हिरवट-पांढरी व सुगंधी असून ती गुच्छात येतात. मृदुफळ जाड सालीचे, गोलसर, पिवळे व कठीण असून पावसाळ्यात येते. फळ पिकायला साधारणपणे ११ महिने लागतात. त्यात घट्ट, गोड, सुवासिक, नारिंगी व श्लेष्मल गर असतो. गरामध्ये लोकरीसारखी लव असलेल्या चपट्या बिया असतात. फळाचे कवच कठीण असते.
बेलाची पाने औषधी असून खोकल्यावर व नेत्रविकारावर उपयुक्त आहेत. फुलांपासून अत्तर बनवितात. कच्चे फळ पाचक व भूक वाढविणारे असल्याने अतिसारावर ते गुणकारी असते. कच्च्या फळाच्या सालीपासून काढलेला रंग कापड रंगविण्यासाठी वापरतात. बेलाच्या पिकलेल्या फळातील गर सुगंधी, शीतल व सारक असतो. त्यात मार्मेलोसीन हा घटक असून तो सारक व मूत्रल आहे. फळांपासून सरबत करतात. मलावरोध व बद्धकोष्ठता यावर हे सरबत उपयोगी आहे. बेलाच्या झाडाचा डिंक उपयुक्त असतो. फळे कठीण आणि जाड असल्यामुळे झाडाला लागलेली फळे अंगावर पडून एखाद्याला इजा होण्याचा धोका असतो.
फळीतील मगज सुगंधी, शीतकर (थंडावा देणारा) व सारफ असतो; त्याचे सरबत जुनाट मलावरोध व अग्निमांद्य यावर देतात. अपक्व फह स्तंभक (आकुंचन पावणारे), पाचक, दीपक, (भूक वाढविणारे) असल्याने अतिसार व आमांशात गुणकारी असते. बेलफळाचा मुरंबा त्यादृष्टीने उपयुक्त असतो. कोवळ्या फळांचे लोणचे घालतात. उत्तर बिहारातील पगडा विभागातील बेलफळे पातळ सालीची असून त्यांचा मगज स्वादिष्ट असतो. पंजाबात फळांच्या मगजामध्ये दूध, साखर व कधी चिंचही घालून सरबत करतात. धातूपुष्टतेस गाईच्या दुधात बेलाच्या सालीचा रस जिऱ्याची पूड टाकून घेतात.
बेलाची पाने आणि फळाचे औषधी उपयोग
फळांमध्ये `मार्मेलोसीन' हे क्रियाशील घटकद्रव्य असून ते सारक व मूत्रल
(लघवी साफ करणारे) असते; त्यामुळे थोडा निद्रानाश होतो व घाम कमी येतो; अधिक प्रमाणात
घेतल्यास हृदयक्रिया मंदावते. बेलफळात ४-६ टक्के साखर; मगजात ९ टक्के व सालीत २० टक्के
टॅनीन असते. बियातून ११.९ टक्के कडूतेल मिळते, ते रेचक असते. मुळाची साल व कधी खोडावरचीही
साल पाळीच्या तापात देतात, तिच्या `अंबेलिफेरॉन' हे द्रवय असते. मुहाची साल मत्स्य
विष आहे. पानांत बाष्पनशील तेल असते. फळातील मगज काढून टाकून कवचाचा उपयोग डबीप्रमाणे
करतात. कोवळी लहान फळे रूद्राक्षाबरोबर माळांमध्ये घालतात.
जर तुम्ही प्री-डायबेटिक व्यक्ती असाल तर तुम्ही नियमितपणे बेलाची पानं खायला सुरू करू शकता. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.
बेल वृक्ष हा आयुर्वेदिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे. बेलाच्या झाडाची फक्त मुळच नाही तर साल, फळे, बिया आणि पानं देखील विविध रोगांच्या उपचारांसाठी वापरली जातात.
काही औषध पद्धतीमध्ये बेल फळे आणि बेलाच्या पानांचे नाव औषध म्हणून आधी येते. बेलपत्रांच्या मदतीने त्वचारोग, टायफॉइड, पोटदुखी, अल्सर तसेच अगदी डायबिटिसवरही उपचार केले जातात. ही उपयुक्तता लक्षात घेऊन आजकाल मेट्रो शहरांमध्येही निवासी सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेलाची झाडं लावली जात आहेत. बेलाची पानं नियमित खाल्ल्यास रक्तातील साखरेवर नियंत्रण राहतं आणि डायबिटिसपासून बचाव होतो. असं बरेच चिकित्सक सांगतात.
प्री डायबेटिक म्हणजे काय?
जर रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्यपेक्षा जास्त असेल, परंतु मधुमेहाच्या उंबरठ्यावर (80-120 mg/dL) पोहोचला नसेल, तर त्याला प्री-डायबेटिस म्हणतात. प्री-डायबेटिसच्या रुग्णांनी खाण्याच्या सवयी आणि नियमित व्यायाम न केल्यास 1-2 वर्षात मधुमेह होऊ शकतो.
बेलाच्या पानांबद्दल संशोधन
बेल आणि बेलाच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म खूप जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे. ही पांन व्हिटॅमिन, खनिजे आणि अनेक अँटिऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे अँटी डायबिटीक, अँटीहिस्टामाइन, कर्करोग-विरोधी, कार्डिओ-संरक्षणात्मक, अँटी इन्फ्लेशनरी, अँटिबायोटिक आणि अँटीव्हायरल सुद्धा आहे.
बेलाची पानं पौष्टीक असतात
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी-1, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन, अमिनो ॲसिड, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस देखील बेलाच्या पानांमध्ये असतात, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासोबतच पचनसंस्थेच्या समस्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही हे खाल्लं जातं.
बेल पान मधुमेह विरोधी आहे
आयुर्वेद आणि फार्मसीमधील इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्चमधील अभ्यासानुसार, बेलाची पानं इंसुलिन उत्पादनात मदत करू शकतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. मजबूत फायटोकेमिकल्स देखील त्यात आढळतात. हे लिपिड, कोलेस्टेरॉल आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव पातळी देखील कमी करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
बेलाच्या पानांमधील अँटी-ऑक्सिडेटिव्ह घटक देखील पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण करते. हे फ्री रॅडिकल्स देखील काढून टाकते. आयर्नमध्ये भरपूर असल्याने, बेलाच्या पानांचे दररोज सेवन केल्याने ॲनिमियाची समस्या देखील दूर होते आणि तुम्हाला एनर्जेटिक वाटतं.
कसं वापरायचं हे औषधी बेलाचं पान
रिकाम्या पोटी बेलाचं पान चावा
बेलाच्या पानांचे नियमितपणे रिकाम्या पोटी दररोज खा.
बेलाची ३-४ पानं चावून खाऊ शकता.
बारीक वाटून खा.
बेलाची पानं पाण्यात मिक्सरमध्ये बारीक करा.
ही पेस्ट १ कप पाण्यात विरघळवून रिकाम्या पोटी प्या.
तुळशी सोबत खा
बेलाची २-३ पानं आणि तुळशीची काही पानं रिकाम्या पोटी चावा. यामुळे रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही नियंत्रित राहतील.
काळी मिरी सोबत खा.
बेलाची पानं काळी मिरी मिसळून बारीक करा. ते 1 कप पाण्यात मिसळून प्या.
बेल पानांची पावडर
बेलाची पानं वाळवून पावडर बनवतात.
हे रिकाम्या पोटी देखील सेवन केले जाऊ शकते.
ही खबरदारी घ्या
तुम्हाला डायबिटिस असल्यास, तुम्ही एलोपेथिक औषधासोबत बेलाच्या पानांचं सेवन करू शकता. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहायला मदत होईल. तुम्ही गर्भवती असाल किंवा प्लॅनिंग करत असाल तर बेलाची पानं खाऊ नका.
सारांश
बेलपत्राचा उपयोग भगवान शंकराच्या पूजेसाठी केला जातो. बेलपत्र आपल्या शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. बेल पत्राचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या सहज दूर होतात. कारण यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. बेलपत्राचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यास सोबतच शरीरातील अनेक आजार दूर होतात. त्याचबरोबर बेलाच्या पानांचा रस अनेक गंभीर समस्यांसाठी एक रामबाण उपाय ठरू शकतो. बेल पानांच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला फायदे मिळतात.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know