Translate in Hindi / Marathi / English

Friday, 24 November 2023

रोगप्रतिकारक खजूर | आकारने लांब आणि गडद रंगाच्या खजूर खायला एकदम कुरकरीत आणि एकदम गोड असतात | थंडीच्या दिवसांत सुकामेवासोबत दररोज एक किंवा दोन खजूरही खायलाच पाहिजेत | खजूर मिल्क शेक | खजूर ड्रायफ्रुट लाडू

रोगप्रतिकारक खजूर

 

हिवाळ्यात रोज खजूर खाण्याचे फायदे

खजूर आणि त्याच्या पौष्टीक तत्वांबाबत मानवाला हजारो वर्षांपासून माहित आहे आणि विज्ञानाने देखील हे सत्य मान्य केले आहे. खजूराची मूळ निर्मिती इराकमध्ये झाली होती असे मानले जाते, पण इटलीच्या लोकांचे म्हणने आहे की, त्याच्या आधीपासून इटलीमध्ये खजूरांपासून वाईन बनवली जाते.

दुसऱ्या देशांसोबत होणाऱ्या व्यापारमार्फत खजूर दक्षिण पश्चिम अशियामधून स्पेन, उत्तर अफ्रिका आणि त्यानंतर मेक्सिको आणि साऊथमध्ये पोहचला. आज मध्य पूर्वभागातील कित्येक पदार्थांमध्ये खजूर हा महत्वपूर्ण पदार्थ आहे. जगभरात ३० प्रकारचे खजूर मिळतात पण शक्यतो त्याचे वर्गीकरण सुकलेले आणि अर्धवट सुकलेले असे केले जाते आणि हा फरक मुख्यत: ग्लूकोज, सुक्रोज आणि फ्रुक्टोज या तीन गोष्टी लक्षात ठेवून केला जातो. यामध्ये एक उत्तम दर्जाचे खजूर गाझा पट्टीमध्ये आढळते. याशिवाय इजिप्तमध्ये जॅगलोलमध्ये उत्तम प्रतीच्या खजूर मिळतात. आकारने लांब आणि गडद रंगाच्या खजूर खायला एकदम कुरकरीत आणि एकदम गोड असतात. सौदी अरेबियामध्ये मिळणाऱ्या शुक्करे जगातील सर्वात महागड्या खजूर आहेत. या खजूर भुऱ्या रंगाच्या आणि एकमद मऊ असतात. त्यानंतर अरब लोकांना खाद्रावी जोकि प्रिय असलेले अतिशय मऊ आणि गोड खजूर असतात. इराकमध्ये खुजराच्या १०० प्रकार आहे असे म्हटले जातात.

थंडीच्या दिवसांत संसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढलेलं असतं. कोरोनामुळे तर संसर्गजन्य आजार, त्यापासून स्वत:चा आणि कुटूंबाचा बचाव, त्यासाठी इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची गरज यासगळ्या गोष्टी आपण अगदी जवळून अनुभवतो आहोत. इम्युनिटी वाढविण्यासाठी हिवाळ्यात आपल्याकडे डिंक, सुकामेवा, उडीद, मेथ्या अशा पदार्थांचा वापर करून पारंपरिक लाडू बनविण्यात येतात. हे लाडू खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, शिवाय आपले शरीरही आतून उबदार होण्यास मदत होते. अशाच पद्धतीचं काम खजूर देखील करतात. म्हणूनच थंडीच्या दिवसांत सुकामेवासोबत दररोज एक किंवा दोन खजूरही खायलाच पाहिजेत.

थंडीच्या दिवसांत खजूर खाण्याचे  फायदे

प्रोटीन्सचा उत्तम पर्याय

शाकाहारी लोकांना प्रोटीन्स मिळण्याचे खूप मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत. यापैकीच एक पर्याय म्हणजे  खजूर. खजूरामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्यामुळे प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी दररोज खजुराच्या - बिया खाणं गरजेचं आहे. शरीराचे स्नायू मजबूत होण्यासाठी प्रोटीन्स खूप जास्त गरजेचे असते.

हाडे होतात मजबूत

खजूरांमध्ये सेलेनियम, मँगनीज, कॉपर, मॅग्नेशियम ही खनिजे खूप मोठ्या प्रमाणावर असतात. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमप्रमाणेच ही सगळी खनिजेही अतिशय गरजेची आहेत. त्यामुळेच हाडे ठिसूळ होऊ नयेत, यासाठी खजूर आपल्या आहारात नियमितपणे असायला पाहिजेत. हाडांच्या संबंधित असणारा osteoporosis (हाडे ठिसूळ होणे) या आजाराचा धोकाही खजूर खाण्यामुळे कमी होतो.

व्हिटॅमिन्ससाठी उत्तम

खजूर खाल्ल्यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन B1, B2, B3, B5, A1 आणि C मिळते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नियमितपणे खजूर खाणं गरजेचं आहे. खजूर खाल्ल्यामुळे शरीराला ग्लूकोज, सुक्रोज, फ्रुक्टोज या नॅच्युरल शुगर मिळण्यास मदत होते. त्यामुळे तुमची उर्जा वाढते.

पचनसंस्थेसाठी उपयुक्त

पचन संस्थेचे कार्य मजबूत करण्यासाठी खजूर खाणे अतिशय फायदेशीर ठरते. ज्यांना अपचन, ॲसिडीटी असा त्रास वारंवार होत असेल त्यांनी खजूर नियमितपणे खावा. यामुळे पचन शक्ती चांगली होऊन पचन संस्थेचे कार्य उत्तम होते.

वेटलॉसासाठी उपयुक्त

जे लोक वेटलॉससाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी आवर्जून खजूर खायला हवेत. कारण खजूर हे एक लो फॅट डाएट म्हणून ओळखले जाते. तसेच खजूरामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टरॉलची पातळी संतूलित ठेवण्यास मदत होते. त्यामुळे हृदयाचे कार्य चांगले ठेवण्यासाठीही खजूर उपयुक्त ठरतात.

खजूर खाण्याचे उपफायदे

खजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. जगभरात तीस प्रकारचे खजूर मिळतात. खजुराचे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. खजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. जगभरात तीस प्रकारचे खजूर मिळतात. खजुराचे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते.

हिवाळ्यात उपयोगी: हिवाळ्यात खजुराचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. दोन-तीन खजूर, थोडी काळीमिरी आणि वेलची पावडर हे मिश्रण गरम पाण्यात उकळा. हे मिश्रण रात्री झोपण्याच्या आधी प्यावे.

कफ कमी होतो: खजुरामध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) असते. त्यामुळे पचनक्रिया नीट रहाते. खजूर खाल्ल्याने कफ कमी होतो. पोटाचे आजारही कमी होतात. म्हणून हिवाळ्यात रोज खजूर फायदेशीर.

संधिवातमध्ये आरामदायी: बदलत्या हवामानामुळे अनेक लोकांना संधिवाताचा त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते खजुरामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. हिवाळ्यात खजूर सेवन केल्याने संधिवातच्या वेदना कमी होतात.

दम्यामध्ये प्रभावी: हिवाळ्यात अनेक लोकांमध्ये दम्याचे प्रमाण वाढते. सकाळी एक-दोन खजूर खाल्यामुळे शरीरात उष्णता वाढते. दम्याच्या अॅटॅकचा धोका कमी होतो.

रक्तदाब नियंत्रणात येतो: खजुरात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होते. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी दररोज - खजुराचे सेवन करावे.

हृदयासाठी फायदेशीर: हिवाळ्यात रोज खजूर खाल्ल्याने हृदयाचे ठोके सामान्य राहतात. हार्ट अटॅकची येण्याची शक्यता कमी होते. खजुरातील फायबरमुळे शरीरात असलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाणही कमी होते.

एनर्जी बूस्टर: खजुरात नैसर्गिक साखर असते. ज्यामुळे शरीराला तत्काळ उर्जा मिळते. व्यायामानंतर लगेच खजूर खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

रोज किती खजूर खावेत?

खजूरमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे आरोग्याला हानी पोहोचत नाही. अनेकांना मिठाई पुन्हा पुन्हा खाणे आवडते, अशा परिस्थितीत खजूराचे सेवन फायदेशीर ठरते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही रोज सकाळी नाश्त्यात किमान 2 खजूर खाऊ शकता. यामुळे स्त्री-पुरुषांच्या शरीरात ऊर्जेची कमतरता भासणार नाही.

रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे फायदे

) रक्त कमी होणार नाही: खजूर शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवून अॅनिमियाच्या समस्येपासून आराम देतात.

) पोटाचा त्रास दूर होईल: खजूर फायबरचा समृद्ध स्रोत आहे, ज्यामुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर होते.

) वजन कमी करण्यात उपयुक्त: खजूर खाल्ल्याने भूक कमी होते आणि जास्त खाणे टाळले जाते.त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

) रक्त पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येत नाही: खजूरमध्ये असलेले लोह शरीरात रक्तपुरवठा करते. खजूरमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जी गर्भवती महिलांसाठीही महत्त्वाची असतात.

पुरुषांसाठी खजूर का फायदेशीर आहे?

आयुर्वेदात खजूर औषधी म्हणून वापरतात. खजूर आणि दूध एकत्र सेवन केल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता वाढते. दुधात दोन-तीन खजूर शिजवून रोज प्यायल्याने शक्ती आणि शुक्राणूंची संख्या वाढते. एवढेच नाही तर यामध्ये आढळणारे मॅग्नेशियम तुमच्या शरीरातील साखर नियंत्रित करते, ज्यामुळे तुम्ही मधुमेहासारख्या समस्या टाळू शकता.

खजूराच्या या दोन सोप्या रेसिपी करून बघा.

. खजूर मिल्क शेक

सकाळी नाश्त्यानंतर खजूर मिल्क शेक घेणे उत्तम ठरते. एका व्यक्तीसाठी खजूर मिल्क शेक करायचा असेल तर दोन खजूर वाटीभर दूधात भिजत घालावे. खजूर तीन ते चार तास भिजल्यानंतर त्यातील बिया काढून टाकाव्या आणि भिजलेले खजूर आणि दूध एकत्रितपणे मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. यानंतर यात आणखी वाटीभर दूध आणि चवीनुसार साखर टाकावी. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे. खजूर मिल्क शेक झाला तयार. साखर नको असल्यास यात मधही टाकू शकता किंवा साखर, मध असे काहीही टाकताही पिऊ शकता.

. खजूर ड्रायफ्रुट लाडू

या प्रकारात खजूर बिया काढून सोलून घ्या. यासाठी कडक खजूर नको. अतिशय मऊ आणि गर असलेले जे खजूर मिळतात, ते वापरावे. खजूराचा गर काढून घ्यावा. काजू, बदाम, अंजीर, अक्रोड, पिस्ते असे तुमच्या आवडीचा सुकामेवा घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत. खजूराचा गर, हे तुकडे आणि साजूक तूप हे मिश्रण एकत्र करून व्यवस्थित कालवून घ्यावे आणि त्याचे पेढ्याच्या आकाराचे छोटो छोटे पौष्टिक लाडू बनवावे.

सारांश

खजूरमध्ये भरपूर पोषक असतात, म्हणून ते एक आश्चर्यकारक फळ देखील मानले जाते. खजूरमध्ये लोह, खनिजे, कॅल्शियम, अमीनो अॅसिड, फॉस्फरस आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे तुमचे आरोग्य तर राहतेच पण त्याचबरोबर तुमचे सौंदर्यही वाढते. खजूर हा ग्लुकोज आणि फ्रक्टोजचा खजिना आहे जो मधुमेहावर मदत करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतो.त्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसते आणि एक खजूर 23 कॅलरीज पुरवतो. यासोबतच हे सेल डॅमेज, कॅन्सर आणि हृदयाशी संबंधित समस्यांपासून बचाव करण्यासाठी खूप प्रभावी आहे. खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रक्टोज आणि सुक्रोज पुरेशा प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्याचे सेवन झटपट ताकदीसाठी खूप फायदेशीर आहे. दोन ते चार खजूर खाल्ल्याने तुम्हाला झटपट ताकद मिळेल.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know