औषधी वनस्पती ‘ब्राह्मी’
ब्राह्मी ही एक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीस मेंदूची कार्यक्षमता वाढवणारी वनस्पती म्हणून मानले जाते. ब्राह्मीचे वैज्ञानिक नाव ‘सेंटेला असायटिका’ असे आहे. तर सामान्यतः ही वनस्पती ‘मण्डूकपर्णी’ आणि ‘जल ब्राह्मी’ या नावाने ओळखली जाते. कित्येक आजार दूर करण्यासाठी ब्राह्मीचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये उपयोग केला जातो.
केसांसाठी ब्राह्मीचे बरेच फायदे तुम्ही ऐकले असतील. ब्राह्मीच्या तेलाचा वापर केसांसाठी फायदेशीर असतो पण, पानांचीही उपयोग होतो. केसांना लांब आणि दाट बनवायचं असेल तर केसांना ब्राह्मीची पेस्ट लावता येते. पण चांगल्या आरोग्यसाठीही ब्राह्मीचा वापर करता येतो. याबद्दल अनेकांना काहीच माहिती नसतं.
ब्रम्हीचे शास्त्रीय नाव सेंटेला आस्टीटिका आहे. नावावरून ती आशियातली आहे हे सरळच आहे. पण सध्या ती जगात अनेक ठिकाणी लावली जाते. आपल्याकडे तिला मंडुकपर्णी, उंदीरकानी अशीही नावे आहेत. तेलगू भाषेत तर तिला सरस्वतीचेच नाव दिले आहे.
वास्तविक ब्राह्मी केवळ केसांसाठीच फायदेशीर नाही तर बर्याच प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या कमी करण्यात देखील चांगली भूमिका बजावते. ब्राह्मीला आयुर्वेदात मेंदूची ताकद वाढवणारी औषधी वनस्पती म्हणून महत्व आहे.
तणाव मुक्ती
ब्राह्मीचं सेवन केल्याने मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. ब्राह्मी हार्मोनल बॅलन्स करते आणि तणाव कमी करण्यात मदत करते. यात कॉर्टिसोलची पातळी कमी करण्याची क्षमता आहे जी स्ट्रेस हार्मोन म्हणूनही ओळखली जाते. ब्राह्मीच्या तेलाने मॉलिश केल्यास डोक शांत होतं.
मेंदूची ताकद वाढवते
ब्राह्मीच्या सेवनाने मेंदूची ताकद वाढते. यामुळे बुद्धी तल्लख होतो आणि एकाग्रताही वाढवते. ब्राह्मीच्या अर्काचं दररोज सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते. ब्राह्मीमध्ये एमिलॉईड असतं. जे अल्झायमरच्या त्रासात उपयोगी आहेत.
रोग प्रतिकारशक्ती वाढते
ब्राह्मीचं सेवन केल्याने शरीर मजबूत होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी होतो. यातील अँटी-ऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
पचनशक्ती सुधारते
ब्राह्मीच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते. त्यातील फायबर आतड्यांमधून हानिकारक पदार्थ काढून पचनशक्ती मजबूत करते.
ब्लड शुगर कंट्रोल
दररोज ब्राह्मीचं सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते आणि हायपोग्लाइसीमियाची समस्या कमी करण्यात मदत करते.
आपल्या सर्वांच्या परिचयाची ब्राम्ही, तिचे कार्य मेंदुवर होते व बुद्धि व स्मरणशक्ती वाढवायला हिचा उपयोग होतो हे आता सगळ्यांनाच माहीत आहे. तरी तिचे अजुन काही उपयोग आहे का ते देखील आपण जाणून घेणे गरजेचे आहे. ब्राम्हीचे जमिनीवर पसरणारे क्षुप असते.ह्याची पाने अखंडधार युक्त व मांसल असतात. ती मऊ व गुळगुळीत असतात. तसेच त्यावर सुक्ष्म काळे ठिपके असतात. ह्याला जांभळी, पांढरी किंवा गुलाबी फुले येतात.
ह्याचे उपयुक्तांग आहेत पाने. ब्राम्ही चवीला कडू, तुरट, गोड असून थंड गुणाची व हल्की असते. हिचा प्रभाव मानस रोगांवर चांगला होतो. ब्राम्ही त्रिदोषशामक आहे.
१) आमवातावर ब्राम्हीचा रस सांध्यांवर लावतात.
२) मानस रोगात ब्राम्हीचा रस उपयुक्त आहे.
३) ब्राम्हीचे चुर्ण मधासोबत घेतल्यास बुद्धि व स्मरण शक्ती वाढते.
४) डांग्या खोकल्यात ब्राम्हीचा अवलेह उपयुक्त आहे.
५) ब्राम्ही शरीरातील सात ही धातुंचे पोषण करते व रसायन कार्य करते.
६) या वनस्पतीचा स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये अधिक प्रमाणात वापर केला जातो. ब्राह्मीपासून तयार करण्यात येणाऱ्या क्रीमचे नाव 'सिका क्रीम' असे आहे. या औषधी वनस्पतीचा क्रीम, लोशन आणि सीरम यासारख्या ब्युटी प्रोडक्टमध्ये उपयोग केला जातो. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ‘सिका क्रीम’ चेहऱ्यावर लावल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.
ब्राह्मीचे तोटे किंवा ब्राह्मीचे दुष्परिणाम
कोणत्याही हर्बल सप्लिमेंटचा दीर्घकाळ वापर करणे ही सहसा चांगली कल्पना नसते आणि हेच ब्राह्मीला लागू होते. 12 आठवडे नियमितपेक्षा जास्त वापरण्याची शिफारस केलेली नाही, म्हणून जेव्हा आपल्याला त्याची आवश्यकता असेल तेव्हाच ते वापरावे, जसे की लक्षण किंवा रोगापासून मुक्त होण्यासाठी.
या व्यतिरिक्त, जर तुम्हाला दमा, मूत्रमार्गात संसर्ग, कमी हृदय गती किंवा हायपरग्लायसेमियाचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृदय गती कमी होत असल्यास (ब्रॅडीकार्डिया) वापर टाळा. संवेदनशील पोट किंवा अल्सर असलेल्या लोकांना ते चांगले सहन होत नाही. ते तुपासोबतच घ्यावे.
ब्राह्मी वनस्पतीवर बरेच संशोधन झालेले आहे, आणि तिचे अनेक उपयोग लक्षात आले आहेत. पायात रक्त साचल्याने पायाला आलेल्या सुजेवर हिचा उपयोग होतो. जखमांवर पोटीस म्हणून देखील हि वापरता येते. मानसिक ताणतणाव, निद्रानाश यावर तर आपण याचे तेल वापरतोच. बुद्धी चांगली होण्यासाठी पण हिचा उपयोग होतो, तरीही अगदी लहान मुलांना ही देऊ नये, असे एक मत आहे. सहसा हिचे दुष्परिंणाम होत नाहीत, पण अतिसेवनाने लिव्हरवर ताण पडू शकतो. आपल्याकडेहि बहुदा सांडपाण्याच्या संगतीने वाढलेली दिसते, त्यामूळे ती पाने वापरताना काळजी घेणे
आवश्यक आहे. पण जर स्वच्छ जागी हिची लागवड केली असेल, तर ही पाने चटणी, कोशिंबीरीत वापरता येतील. या पानांना स्वत:चा असा फारसा स्वाद नसतो. चव पण फारशी तीव्र नसते, त्यामूळे मूळ पदार्थाच्या चवीवर फारसा परिणाम होत नाही.
सारांश
निसर्गाने आपल्याला अशा अनेक नैसर्गिक गोष्टींचे वरदान दिले आहे, ज्या आरोग्य गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. ब्राह्मी ही एक औषधी वनस्पती आहे जी जमिनीवर पसरते आणि वाढते. त्याची देठ, पाने आणि फुले आरोग्याच्या फायद्यासाठी वापरली जातात. ब्राह्मी (ब्राह्मी हेल्थ बेनिफिट्स) 'ब्रेन बूस्टर' म्हणूनही ओळखले जाते, ब्राह्मी अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वापरली जाऊ शकते. आयुर्वेदानुसार, ब्राह्मी बौद्धिक वर्धक, पित्तशामक, स्मरणशक्ती मजबूत करते, शीतलता देते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. ब्राह्मीमध्ये अँटी-ऑक्सीडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-डायबेटिक गुणधर्म आढळतात. आयुर्वेदात अनेक वर्षांपासून ब्राह्मीचा औषधी म्हणून वापर होत आहे. ब्राह्मीच्या पानांचे चूर्ण मानसिक आजारांवर फायदेशीर मानले जाते.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know