Translate in Hindi / Marathi / English

Thursday, 23 November 2023

आरोग्य आणि सौंदर्यरक्षक गाईचे तूप | गायीच्या तुपात नैसर्गिक स्वरुपातील चांगली चरबी तसेच अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडेंट्स हे घटक देखील असतात | दुधामध्ये मुलतानी माती मिसळून चेहरा व शरीरावर लेप करण्याने थंडावा मिळतो

गाईचे तूप

 

आरोग्य आणि सौंदर्यरक्षक गाईचे तूप

गाईचे दूध आणि तूप शारीरिक स्वास्थ्य तसेच सौंदर्य उजळविण्यासाठी सर्वांत सोपा स्वस्त उपाय आहे. स्वास्थ्याच्या दृष्टीने गाईचे दूध पुढीलप्रकारे उपयोगी आहे. एक ग्लास दुधामध्ये एक चमचा मध मिसळून पिण्याने रक्त शुद्ध होते आणि चेहऱ्यावर लाली येते. दुधामध्ये साखरेऐवजी खडीसाखर मिसळून पिण्याने पोट आणि गळ्याचा दाह शांत होतो. दुधामध्ये हळद मिसळून पिण्याने शरीराच्या मारामध्ये सुजेमध्ये आराम मिळतो. थकवा जाणवत असेल, चक्कर येत असेल तर ग्लास दूधामध्ये एक चमचा तूप तसेच एक चमचा खडीसाखर मिसळून पिण्याने लाभ होतो. आयुर्वेदातील माहितीनुसार, गायीच्या दुधामध्ये तूप मिक्स करून प्यायल्यास आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात पोषक तसंच औषधी गुणधर्मांचा पुरवठा होतो. कारण गायीच्या तुपात नैसर्गिक स्वरुपातील चांगली चरबी तसेच अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडेंट्स हे घटक देखील असतात. दूध आणि तूप एकत्र करून प्यायल्यास शरीराच्या अंतर्गत पेशींना देखील पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो.

दुधामध्ये मुलतानी माती मिसळून चेहरा शरीरावर लेप करण्याने थंडावा मिळतो आणि घामोळ्या निघत नाहीत. डोळ्यांचा थकवा आग दूर करण्यासाठी गाईच्या दुधात कापसाचे बोळे भिजवून डोळ्यांवर ठेवण्याने आराम मिळतो. गाईच्या दुधामध्ये सूंठ घालून माथ्यावर लेप करण्याने डोकेदुखी शांत होते. गर्भावस्थेच्या दरम्यान गाईचे दूध पिण्याने अशा महिलेला कमजोरी येत नाही. गायीच्या दुधामध्ये तूप मिक्स करून प्यायल्यास आपल्या शरीराची चयापचयाची क्षमता वाढण्यास मदत मिळते. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. शरीरामध्ये ऊर्जा असल्यासच आपले अवयव लवचिक राहू शकतात. यासाठी पौष्टिक आहारासह नियमित व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी योगासने, व्यायाम प्रकारांचा सराव करावा. कच्च्या दुधामध्ये मैदा मिसळून, लेप बनवावा. हा लेप चेहरा मानेवर चोळावा, याने हिवाळ्यात त्वचेला येणारी शुष्कता दूर होते. दुधामध्ये तुळशीची पाने वाटून चेहऱ्यावर लावण्याने त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात.

फिटनेस आणि सडपातळ बांध्यासह शरीर लवचिक असावे, अशीही प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येक जण काही- - काही उपाय करत असतो. जेणेकरून दैनंदिन जीवन जगण्यासह डान्स आणि आपल्या लाइफस्टाइलचाही योग्य पद्धतीने आनंद घेतला जाईल. शरीर लवचिक राहावे, यासाठी तुम्ही देखील भरपूर कष्ट घेत आहात का? तर मग यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये तुपाचा समावेश करून पाहा.

तुपाचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक

तुपाचे सेवन करणं आरोग्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकते. तुपाच्या सेवनामुळे तुम्हाला अन्य शारीरिक फायदे सुद्धा भरपूर प्रमाणात मिळतील. नियमित योग्य प्रमाणात तूप खाल्ल्यास आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते, असे म्हणतात. आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, शुद्ध तूप हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.

आयुर्वेदानुसार गायीचे तूप आपल्या शरीराच्या आतील अवयवांनाही खोलवर पोषक घटकांचा पुरवठा करण्याचे कार्य करते आणि आपल्या मेंदूची कार्यप्रणालीही चांगली ठेवण्यात मदत करते. तसेच गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप नैसर्गिक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असते. यामध्ये अतिशय मर्यादित प्रमाणात आणि पौष्टिक चरबीचा समावेश असतो. म्हणूनच गायीच्या तुपामुळे मेंदू आणि शरीराला नैसर्गिक स्वरुपात पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. शरीरामध्ये लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी गरम दुधासह गायीच्या तुपाचे सेवन करावे. पण हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

गायीचे तूप कार्यक्षमता वाढण्यासाठी पूरक

गायीच्या दुधात तूप मिक्स करून प्यायल्यास शरीराची क्षमता आणि सहनशक्ती दोन्ही वाढते. सोबतच यामुळे स्ट्रेचिंग पावर देखील वाढण्यास मदत मिळते. म्हणजे तुम्ही शरीराचे योग्य प्रकारे स्ट्रेचिंग आणि हालचाल करू शकता. पण यासाठी नियमित व्यायाम करणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे. व्यायाम आणि आहाराचे काटेकोरपणे पालन केल्यास शरीर लवचिक होण्यास नक्कीच मदत मिळेल.

तुपाचे नियमित सेवन केल्यास केसांना मजबुती आणि चमकदार बनण्यासाठी फायदेशीर ठरते. रोज सकाळी तूप खाल्यास नर्व्हस सिस्टीमला उत्तेजन देण्याचे काम करते. जाणून घेऊया इतर फायदे.

 लहान मुलांच्या वाढीसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी तूप आरोग्यवर्धक मानले आहे. यामध्ये ओमेगा फॅटी अॅसिड असल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळेच संधिवातामध्ये तुपाचे सेवन फायदेशीर ठरते.

 तुपाचे नियमित सेवन केल्यास त्वचेचा पोत सुधारून त्वचा चमकदार बनते.

 त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकून ठेवण्यास मदत मिळते. चेहरा टवटवीत / फ्रेश दिसतो. चेहऱ्यावरील येणारे फोड किंवा मुरूम यामुळे नाहीसे होतात. चेहऱ्यावर झालेले डाग किंवा खोलगट भाग तुपाच्या नियमित सेवनाने नाहीसे होतात. म्हशीच्या तुपापेक्षा गायीच्या दुधापासून बनवलेले तूप आरोग्यास खूप लाभदायक ठरते.

 सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने मेंदूच्या नसांना चालना मिळते. स्मरणशक्ती तल्लख राहण्यास, आकलनक्षमता सुधारण्यास मदत होते. नियमित तूप खाल्ल्याने अल्झायमरसारख्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

केसगळतीचा त्रास कमी होतो. केस मजबूत आणि घनदाट होतात.

दरम्यान,दुसरीकडे म्हशीच्या दुधापासून तयार केलेल्या तुपाचे सेवन केल्यास शरीरामध्ये चरबी वाढण्यास सुरुवात होते.

सारांश

शरीर लवचिक राहण्यासाठी आपल्या स्नायूंना आवश्यक प्रमाणात नैसर्गिक स्वरुपात पोषण तत्त्वांचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सोबतच आपले हाडे देखील मजबूत असणं गरजेचं आहे. शरीराच्या या दोन्ही गरजा पूर्ण करण्यामध्ये तूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. पण गायीच्या दुधापासूनच तयार केलेल्या तुपाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. आपल्या आहारामध्ये कोणत्याही गोष्टीचा समावेश करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ तसंच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याचप्रमाणे योगासने किंवा व्यायामांचा सराव करण्यापूर्वी देखील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. शारीरिक दुखापत तसंच नुकसान टाळण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीकोनातून या गोष्टींची काळजी घ्यावी.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.

 




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know