Translate in Hindi / Marathi / English

Friday, 10 November 2023

आपल्याला उचकी का येते | उचकी लागणे कारणे | उचकी थांबवण्यासाठी | स्वर यंत्रातील स्वरतंतू | उचकीचा दुष्परिणाम | सततचा तणाव आणि चिंता

 

उचकी

आपल्याला उचकी का येते?

उचकी ही आपल्या शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे जी कोणालाही होऊ शकते, मग ती लहान असेल किंवा वृद्ध व्यक्ती. हिचकी येण्यामागील कारण म्हणजे जेव्हा आपला डायाफ्राम अचानक आणि अनियंत्रितपणे आकुंचन पावतो तेव्हा आपल्या व्होकल कॉर्ड्स बंद होतात आणि उच्च-उच्च आवाज निर्माण होतो.

डायाफ्राम म्हणजे काय?

डायाफ्राम हा एक स्नायू आहे जो आपली छाती आणि पोट वेगळे करतो. हे श्वासोच्छवासात महत्वाची भूमिका बजावते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा डायाफ्राम छातीचा आकुंचन आणि विस्तार करतो, फुफ्फुस हवेने भरतो. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा डायाफ्राम आराम करतो आणि छातीला त्याच्या सामान्य स्थितीत परत येऊ देतो.

स्वरयंत्रात असलेली नळी म्हणजे काय?

स्वरयंत्राच्या नळ्या या आपल्या घशाच्या मागील बाजूस असलेल्या दोन लहान पडद्या आहेत. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा स्वरयंत्र उघडे राहते ज्यामुळे हवा फुफ्फुसात जाऊ शकते. जेव्हा आपण बोलतो तेव्हा स्वरयंत्राची नळी कंपन करते आणि आवाज निर्माण करते.

उचकी लागणे कारणे

आपण लहान असताना आपली आजी आजोबा वगैरे जुने लोक सांगायचे की उचकी आली की कोणीतरी व्यक्तीने आपली आठवण केली आहे. परंतु तसे म्हणण्या मागे विनोदा व्यतिरिक्त दुसरे काही नव्हते. कारण उचकी लागण्याचे शास्त्रीय कारण पुढीलप्रमाणे आहे, छाती पोट यामध्ये एक पडदा असतो, तो पडदा आणि बरगड्या मधील स्नायू यांचे आकुंचन होते त्याच वेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतू एकमेकांजवळ येतात या होणाऱ्या कार्याला उचकी येणे असे म्हणतात. उचकी वर घरगुती उपाय केल्याने देखील तुमची उचकी लगेच थांबेल.

दीर्घकाळ सतत उचकी लागल्याने उद्भवणारे दुष्परिणाम

) सततच्या उचकी मुळे तुमचे वजन काही दिवसात कमी होऊ शकते.

) दिवसेंदिवस जर हा त्रास अंगावर काढला तर तुम्हाला थकवा जाणवेल, त्यामुळे याच्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.

) सतत उचकी येत असल्यास तुमची भूक मोड देखील होऊ शकते.

) निद्रानाश हा देखील सतत येणार्या उचकीचा दुष्परिणाम आहे.

) सारख्या येणार्या उचकी मुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते त्यामुळे तुमच्या शरीरावर विविध दुष्परिणाम होऊ शकतात.

उचकी येण्याची कारणे

उचकी येण्याची कारणे ही प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळी असू शकतात. पण जर बर्याच दिवसांपासून तुम्हाला उचकी चा त्रास जाणवत असेल तर त्याची कारणे खालील प्रमाणे असू शकतात:-

) सततचा तणाव आणि चिंता या गोष्टी देखील उचकी येण्यास कारणीभूत असू शकतात.

) तुम्हाला हल्लीच न्युमोनिया झालेला असेल तरी असा त्रास जाणवू शकतो.

) गरोदर असल्याने देखील बहुदा सतत उचकी लागते.

) अलीकडच्या काळात तुमच्या पोटाची शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा तुम्हाला भूल दिलेली असल्यास देखील उचकी लागण्याचा त्रास जाणवू शकतो.

) कर्करोग (कॅन्सर) हे देखील सततच्या उचकीचे कारण असू शकते.

) तुम्हाला जर यकृत,डायफ्राम किंवा पोटाची काही समस्या असेल तर ते देखील उचकी येण्याचे कारण असू शकते.

) उचकी येणाची कारणे मध्ये मज्जासंस्थेच्या इतर समस्यां किंवा मज्जातंतूची विकृती यांचा देखील समावेश होतो,त्यामुळे देखील उचकी लागण्याचा त्रास जाणवू शकतो.

) सततचे मद्यपान हे देखील उचकी येण्यामागचे कारण असू शकते.

उचकी वर घरगुती उपाय

थंडगार पाणीउचकी थांबवण्यासाठी उत्तम उपाय

उचकी लागणे उपाय म्हणून सर्वत्र सहसा एक ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उचकी थांबवण्यासाठी हा सर्वात प्राथमिक आणि गुणकारी असा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही उचकी आल्यास थंडगार पाणी प्यावे आणि साधारणपणे एकावेळेस एक ग्लासभरच पाणी प्यावे.याने तुमची उचकी थांबण्यास नक्कीच मदत होईल आणि उचकी लागणण्याच्या या त्रासापासून तुम्हाला त्वरित आराम मिळेन.

श्वसनाचा व्यायामउचकी बंद होण्यासाठी गुणकारी घरगुती उपाय

बर्याचदा उचकी/गुचकी आल्यावर पाणी पिले तरी देखील उचकी थांबत नाही आणि उचकी सारखी सारखी येत असेल तर एकदा काही सेकंदासाठी श्वास थांबवावा नंतर एक लांब म्हणजेच दीर्घ श्वास घ्यावा परत तसेच दोन ते तीन वेळा करावे म्हणजे उचकी थांबण्यास मदत होईल आणि तुमचा त्रास कमी होईल. श्वसनाचा हा व्यायाम केल्याने त्याचे इतर ही बरेच फायदे आहेत त्याचा देखील फायदा होईल.

लिंबुउचकी वर गुणकारी उपाय

लिंबू हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. आपल्याला लिंबू हे सहज उपलब्ध होणारे फळ आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरात लिंबू हे असतेच तर या लिंबाचा तुम्ही उचकी थांबवण्यासाठी देखील उपयोग करू शकता. त्यासाठी तुम्हाला साधारणपणे 1 चमचा लिंबाचा रस त्यामध्ये एक चमचा मध घ्यावा लागेल आणि हे चांगले मिक्स करावे लागेल, आता हे तयार झालेले मिश्रण एकदा चाटण म्हणून घ्यावे, असे केल्याने तुमची उचकी येणे हळूहळू बंद होईल.

 

काळी मिरी आणि खडीसाखरउचकी थांबवण्यासाठी उपयोगी

पाणी पिऊन देखील जर उचकी थांबत नसेल, याउलट सतत उचकी येत असेल तर तुम्ही तीन ते चार काळी मिरी खडीसाखर तोंडामध्ये धरून चावत राहिल्यास देखील उचकी थांबण्यास मदत होते. खडीसाखर चघल्यास तोंडातील लाळ जास्त प्रमाणात निर्माण होऊन उचकी थांबण्यास मदत होते, त्यामुळे उचकी थांबवण्यासाठी घरगुती उपाय, म्हणून हा सर्वोत्तम उपाय म्हणून ओळखला जातो.

त्वरित उचकी थांबवण्यासाठी कान दाबा

उचकी थांबवण्यासाठी आणखी एक घरगुती उपाय म्हणजे उचकी लागल्यावर कानाच्या खालचा भाग दाबल्याने देखील उचकी थांबते. आपल्या घरातील जुनी प्रौढ / लोक असे करण्याचा सल्ला देतात तुम्हाला जर उचकी लागत असेल आणि ती काय थांबायचे नाव घेत नसेल तर हा घरगुती साधा आणि सोपा उपाय करून बघायला काय हरकत आहे, या उपायाचा देखील बराच फायदा होतो.

मीठउचकी लागणे उपाय

तुम्ही जर सततच्या उचकीने हैराण झाला असाल तर मीठाचा उपयोग करावा, कारण मीठ हे उचकी थांबवण्यासाठी गुणकारी ठरते. साधारणपणे एक चमचा मीठ तोंडात ठेवा आणि जर ठेवण्यास अशक्य असेल किंवा ठेवले जात नसेल तर मिठाचे पाणी सुद्धा घेऊ शकता.हा अत्यंत सोपा घरगुती उपाय करून तुम्ही तुमची उचकी येणे घालवू शकता.

साखर / गूळ

अनेकदा काहींची उचकी ही थंड पाणी पिऊन देखील थांबत नाही अशा वेळी आपली आई आपल्याला साखर किंवा गूळ खाण्याचा सल्ला देते,कारण गोड पदार्थ खाल्याने देखील उचकी थांबू शकते. तर मग सततच्या उचकी येण्याने जर तुम्ही हैराण झाले असाल तर एक चमचा साखर किंवा गूळ खावा त्याने अन्ननलिकेवर प्रभाव पडतो उचकी थांबते.

आंबट पदार्थ

आंबट पदार्थ हे उचकीवर उपाय म्हणून गुणकारी ठरतात, सततच्या उचकीने असह्य होत असेल तर तुम्ही लिंबू अथवा इतर आंबट पदार्थ खाल्याने देखील उचकी थांबते उदाहरणार्थ:- कैरी किंवा टोमॅटोच्या फोडी किंवा चिंच चघळत राहणे, काही केल्या उचकी जर थांबत नसेल तर हा घरगुती उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की फरक दिसेल.

दुधाचे पदार्थ

बटर - उचकी लागणे उपाय

उचकी थांबवण्यासाठी उपाय म्हणून तुम्ही पनीर किंवा बटर देखील खाऊ शकता. हे खाल्याने देखील उचकी थांबते कारण हे पदार्थ खाताना तुमच्या दात जीभ यांचा उपयोग होत असतो तेव्हा श्वसन प्रक्रियेत अडथळा येऊन उचकी थांबते.उचकी थांबत नसेल तर हा उपाय करा याचा तुमची उचकी थांबवण्यास नक्की फायदा होईल.

व्यायाम

उचकी ने परेशान आहात आणि जर कोणी तुम्हाला संगितले की एक व्यायाम आहे तो केल्याने तुमची उचकी थांबेल तर तुम्ही म्हणाल काहीतरीच सांगतोय, परंतु एखाद्या वेळी असे करून तर बघा उचकी थांबवण्यासाठी बसल्याबसल्या तुम्ही एक व्यायाम देखील करू शकता तो म्हणजे एका हाताच्या अंगठ्याने दुसऱ्या हाताच्या अंगठ्याला जोरात दाबणे असे केल्याने देखील उचकी थांबते.

योगाप्राणायाम

काही व्यक्तींना सतत उचकी चा त्रास होत असेल तर अशांनी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे श्वसनाचे व्यायाम किंवा प्राणायाम करावे लवकरच फरक पडेल.किमान महिनाभर असा दैनंदिन व्यायाम केल्याने सतत उचकी लागणेचा त्रास कमी होतो.

आले उचकी थांबवण्यासाठी गुणकारी

आले म्हणजेच अद्रक हे अत्यंत गुणकारी आहे. आयुर्वेदा मध्ये आल्याचे महत्व दिलेच आहे,उचकी वर देखील आले गुणकारी ठरते. तुमच्या घरात आले असल्यास त्याचे लहान तुकडे करावेत ते चघळल्यास देखील उचकी थांबण्यास मदत होते. पाणी पिऊन देखील जर उचकी थांबली नाही तर तुम्ही हा घरगुती उपाय करून बघा नक्की फरक दिसेल.

कापुर

तुमच्या घरात देवाजवळ असलेला कापूर हा देखील असह्य करणारी उचकी थांबवण्यास मदत करतो. हा उचकी वरील घरगुती उपाय जरा कठीण आहे परंतु हा केल्याने तुमची उचकी खात्रीशीर थांबेल. प्रथम तुम्ही तुमच्या देवघरातील कापूर घ्या तो कोळशावर जाळा आणि त्याचा धुर तुम्हाला सोसेल एवढ्याच प्रमाणात घ्या त्याने देखील तुमची उचकी थांबण्यास मदत होते.

जिरे मधउचकी लागणे गुणकारी उपाय

आयुर्वेदमध्ये जिरे हे अत्यंत गुणकारी म्हंटले आहेच तर हे जिरे तुमची उचकी थांबवण्यास देखील मदत करते. तुम्ही जिरे बारीक करून त्याची पावडर करा आणि साधारण अर्धा चमचा ही जिरे पावडर घ्या त्यामध्ये एक चमचा मध चांगले एकत्र करा. हे मिश्रण घेतल्याने देखील तुमची उचकी बंद होण्यास मदत होईल.

मोहरीची डाळ

तुमच्या घरात जर मोहरीची डाळ उपलब्ध असेल तर, एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्यावे त्यात दोन चमचे मोहरीची डाळ टाकावी आता हे मिश्रण गॅसवर उकळण्यास ठेवावे. हे 1 ग्लास चे मिश्रण चांगले अर्धा ग्लास होईपर्यंत उकळून द्यावे. त्यानंतर हे मिश्रण चाळणीने चाळून घ्यावे खाली राहिलेले पाणी प्यावे, यामुळे उचकी थांबण्यास मदत होते.

सारांश

उचकी एक श्वसन व्यवस्थेच्या डायाफ्रामच्या अनैच्छिक आकुंचनामुळे येते. डायाफ्राम ही स्नायूंची एक शीट आहे जी तुमची छाती आणि पोट वेगळे करते. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा डायाफ्राम खाली खेचतो, तुमचे फुफ्फुस हवेने भरतो. जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा डायाफ्राम वरच्या दिशेने सरकतो, ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसातून हवा बाहेर पडते. जेव्हा तुम्हाला उचकी येते तेव्हा डायाफ्राम अनैच्छिकपणे आकुंचन पावतो, ज्यामुळे तुमची ग्लोटीस बंद होते. ग्लॉटिस ही तुमच्या व्होकल कॉर्डमधील अरुंद जागा आहे. जेव्हा तुमची ग्लॉटिस बंद होते, तेव्हा ते उच्च-पिच आवाज करते, ज्याला हिचकी म्हणतात.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.



No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know