Translate in Hindi / Marathi / English

Friday, 10 November 2023

मक्यापासून तयार होणारे चविष्ट पदार्थ | मका हे इंडो-चाईनीज पदार्थातील दुवा | मका हे जनावरा च्या चार्यासाठीच नव्हे | कॉर्न बटाटा फिंगर चिप्स | कॉर्न मंच्युरियन | कॉर्न पॅटीस | कॉर्न / स्वीट कॉर्न भेळ | मक्याचे सूप | मका हे तृणधान्य

मका

 

मक्यापासून तयार होणारे चविष्ट पदार्थ

मक्यापासून तयार होणारे पदार्थ हे अतिशय चविष्ट बनतात आणि ते सर्वप्रिय देखील आहे. बरेच नवीन पदार्थ करताना त्यात मक्याचे पीठ टाकले जाते, त्यामुळे मका हे इंडो-चाईनीज पदार्थातील दुवा समजला जातो , कारण काही पदार्थ हे मक्याचे पीठ टाकता बनविता येणे अशक्य असते . मका हे भारतात तिस-या क्रमांकावर पिकवले जाणारे तृणधान्य आहे.

मका हे जनावरा च्या चार्यासाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी देखील फलदायी आणि चव प्रदान करणारे पीक आहे. मक्याच्या कणसात भरपुर प्रमाणात स्टार्च, कर्बोदके, प्रथिने तंतुमय घटक असतात, त्यामुळे ते शरीरासाठी उत्तम अन्न म्हणटले जाते. मक्याचे पदार्थ खाल्यास जर आपले वजन वाढत नसेल तर आपले वजन वाढण्यास बरीच मदत होते .

मक्याचे भाजलेले कणीस

नुकताच पावसाळा संपला असला तरी मंद म्हणजे थोडा पाऊस पडतोच आहे. त्यातच जरी चमचमीत पदार्थ जरी असले तरी कोवळे भाजलेले कणीस खाण्यासाठी तोंडाला पाणी हे सुटतेच सुटते.

कॉर्न बटाटा फिंगर चिप्स

कॉर्न बटाटा फिंगर चिप्स हे मक्क्याचे पीठ आणि बटाटा वापरून बनवले जातात . कॉर्न बटाटा फिंगर चिप्स हे अतिशय चवदार आणि क्रिस्पी, खुसखुशीत होतात. लहान मुलांची तर ही सर्वात आवडीची डिश आहे . त्याचबरोबर कॉर्न बटाटा फिंगर चिप्स , हे करण्यास देखील अतिशय सोपे आहेत आणि कमी साहित्यात बनवता येतात . त्यासाठी मक्क्याचे पीठ पातळसर भिजवायचे आणि त्यात अलगद वाफाळुन घेतलेल्या बटाटयाचे फिंगर चिप्स बुडवून लाल-तपकिरी रंग येईपर्यंत तळायच्या आणि आता मस्त शेजवान सॉस सोबत खाण्यास आपला हलका आणि कुरकूरीत नाश्ता तयार .

कॉर्न मंच्युरियन

मंच्युरीयन हा चायनिज पदार्थ असून तो आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये सर्वांनाच आवडतो . सध्या इंडो-चाइनीज पदार्थ चे बरेच लोक चाहते झाले आहेत . कॉर्न मंच्युरीयन बनविण्यासाठी मक्याचे तीन वाटी पीठ, एक वाटी पत्ता गोबीचे बारीक काप आणि पाववाटी मक्याचे कोवळे दाणे, हिरवी मिरची पुड, बारीक कापलेले गाजर, चवीनुसार मीठ घ्यावे घट्ट मळावे त्यांनतर त्याचे गुलाबजाम ऐवढे गोळे बनवुन लालसर ब्राउन रंग येई पर्यंत तळावे आणि नंतर चिलीसॉस, सोयासॉस, टोमॅटो सॉस आणि चिरलेला लसूण हे सर्व तेलात टाकुन त्याची ग्रेवी बनवावी त्यात तळलेले मक्याचे गोळे टाकावे. कॉर्न मंच्युरीयन बनवुन झाल्यास अर्धा दिवस फ्रिजमध्ये ठेवुन देखील वापरता येतात. अशाप्रकारे मक्क्यापासुन मंच्युरीयन बनवता येते.

कॉर्न पॅटीस

पॅटीस हा चटपटीत पदार्थ देखील जवळपास सर्वांनाच अगदी मनातूनआवडतो . हे कॉर्न पॅटीस बनविण्यासाठी कोवळे मक्क्याचे ताजे दाणे , हिरवी मिरची , कोंथबीर पुदीना, धनेपुड, जिरेपुड थोडे अद्रक या सर्व साहित्याची पेस्ट बनवुन घ्यावी . मक्याचे दाणे देखील ओबड -धोबड मिक्सरमधून काढावे . त्याला छान ही पेस्ट टाकुन मिक्स करावे आणि थोडा चिकटपण येण्यासाठी एक बटाटा स्मॅश करून टाकावा फ्रायपॅनमध्ये थोडे थोडे तेल टाकावे आणि पॅटीसच्या शेपचची चापट वडी त्या तेलावर टाकावी आणि चारही बाजूने खरपुस भाजावी . नंतर पुदिण्याची चटणी बनवावी आणि चिंचेचा कोळ, गुळ थोडे लालतिखट मिठ घालुन चिंचेची चटणी बनवावी.

एका प्लेटमध्ये मक्याचे भाजलेले पॅटीस घ्यावे त्यावर एक चमचा ग्रीन चटणी आणि दोन ते तीन चमचे चिंचेची चटणी टाकावी आणि वरून बारीक चिरलेला कांदा बारीक शेव टाकुन चटपटीत नाश्ता म्हणून खाण्यासाठी द्यावे .हा पदार्थ देखील लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातात.

कॉर्न / स्वीट कॉर्न भेळ

आपल्याला बाजारात 2 प्रकारचे कॉर्न मिळतात , एक म्हणजे साधा कॉर्न आणि दूसरा स्वीट कॉर्न . स्वीट कॉर्न म्हणजेच गोड मका , हा जरा जास्त रसदार आणि चवीस गोड असतो . बाजारातून स्विट कॉर्न आणावे आणि त्याचे दाणे काढुन ते उकडुन घ्यावे . नंतर गाळणीत दाणे गाळुन घ्यावे . त्यावर वर पुदीना चटणी, चिंचेची चटणी प्रत्येकी एक एक चमचा टाकावी . त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकावा, टोमॅटो आणि कोंथबीर टाकावी, असेल तर थोडा चिमुटभर चाट मसाला टाकावा आणि बारीक शेव सजवुन दयावी, झाली आपली अगदी मसालेदार, चटपटीत, आणि नाविन्यपुर्ण अशी मक्याच्या दाण्याची डिश अगदी पंधरा मिनिटात तयार ! मुलांच्या छोट्या भुकेवर ही अगदी उत्तम आणि परिपूर्ण अशी डिश आहे , मक्यातून मुलांना भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात .

मक्याचे सूप

मक्याचे { स्वीट कॉर्न } चे दाणे काढावे आणि ते सर्व मिक्सर मधून बारीक काढावे. मिक्सर मधून काढलेल्या दाण्यांचा ज्यूस हा ज्यूसर च्या गाळनी च्या साह्याने गाळून घ्यावा . गाळणीतील चोथा फेकून द्यावा आणि खाली राहिलेला ज्यूस एक पॅन मध्ये मंद आंचेवर गॅस वर उकळून घ्यावा . उकळत असताना त्यात थोडे मीठ आणि जिरे पावडर टाकावी तसेच काळे मीठ देखील टाकावे . पाच ते सात मिनिटे उकळू द्यावे ,थोडे थंड झाल्यावर एक वाटीमध्ये टाकावे आणि त्यात थोडे काळेमीठ किंवा चाट मसाला टाकावा . असे हे कॉर्न सूप गरम गरम प्याल्याने भूक ही भागते आणि ते शरीरासाठी हे अतिशय पौष्टिक देखील असते .

सारांश

भारतात मक्याचे पीक हे इतर पिकांच्या सोबत -याच प्रमाणात घेतले जाते. -याच भागात मका हे तृणधान्य जनावरांना चारा आणि इतर डाळींच्या पीठासाठी पर्याय म्हणुन वापरले जाते. मक्याचे कणिस आणि पीक हे खवय्यांसाठी पदार्थ बनविण्यासाठी उपयोगी येते तर, मक्याचे तृण म्हणजे पाने हे जनावरांसाठी उत्तम चारा म्हणुन वापरले जाते. जनावरा साठी चारा विकुन देखील त्यातुन -यापैंकी उत्पन्न काढले जाते. अशा प्रकारे मका हे पीक अनेक गोष्टी साठी उपयोगी यत असते.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know