आरोग्यवर्धक औषधी पेरू
पेरू जितका आरोग्यदायी असतो तितकीच त्याची पाने देखील आरोग्यास लाभदायक असतात. इथे जाणून घ्या कोणते आजार दूर करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून पेरूच्या पानांचा उपयोग केला जाऊ शकतो. पेरूचे सदाहरित झाड असते,पाने जाड,गोलसर,कडक,व सुगंधी असतात.कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा व भरपुर बियांनी भरलेला असतो.
हा कच्चा असताना तुरट लागतो व पिकल्यावर गोड. कच्चा पेरू खाऊ नये. खायला व औषधासाठी पिकलेला पेरू बियाकाढून त्याचा गर वापरावा. पिकलेला पेरू गोड,थंड,पित्त व वात दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास "जाम' किंवा "अमरूद' असेही संबोधले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर "क' जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या "व्हायरस'पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यतः मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकड्यात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होत नाही. कारण त्यातील "क' जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.
पेरू हे अत्यंत कमी पैशात पुरेपूर पोषण देणारे असे फळ आहे. पिकलेला पेरू हा आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगला आहे. मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांनी पेरूच्या हंगामात नियमित पिकलेला पेरू खाल्ल्यास पोट छान साफ होते. जुलाबामध्ये थोडा आंबट-गोड (अर्धषिकलेला) पेरू खावा. आय.बी.एस.चा त्रास असणाऱ्यांनादेखील पेरू चांगला आहे. मळमळ, उलट्या, आम्लपित्त, अग्निमांद्य अशा त्रासांमध्ये पेरू पथ्यकारक आहे.
अत्यंत कमी उष्मांक व नगण्य चरबी असलेले हे फळ स्थूलतेवर उपयुक्त आहे. ज्यांना सॅलेड खायला आवडत नाही अशांना फायबरचा फायदा पेरूपासून मिळवता येतो. मधुमेहींनी अगदी पिकलेला पेरू न खाता थोडा आंबटसर पेरू खावा. पेरूतील फेनोलिक्स हे अँटिऑक्सिडंट शरीराच्या पेशींना घातक घटकांपासून वाचवते. आयुर्वेदाने पेरू हा थंड, पचण्यास जड, पित्तशामक, रुचिकारक व बुद्धिवर्धक मानला आहे. वाताचे आजार असणाऱ्यांनी पेरू खाऊ नये, असे आयुर्वेदशास्त्र मानते.
खानपानाच्या चुकीच्या सवयींमुळे किंवा नकळत काहीतरी चुकीचा पदार्थ पोटात गेल्यामुळे मळमळणं, उलटी होणं अशा समस्या एकदम सामान्य आहेत. पण प्रत्येक छोट्या मोठ्या समस्यांवर ताबडतोब मेडिकल मधील औषधं घेणं किंवा डॉक्टरकडे जाणं शक्य नसतं. तसंच सतत औषधं खाणं आरोग्यासाठीही घातक असतं. कारण ही औषधं बनवण्यासाठी वापरण्यात येणा-या सॉल्ट्सचे आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम दिसून येतात. पण आयुर्वेदिक औषधेव घरगुती उपचार हे पूर्णत: नैसर्गिकतेवर अवलंबून असतात.
यामुळे आरोग्यास कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत. पेरुच्या पानांमध्ये तारुण्य प्रदान करण्यास आवश्यक असणारे गुणधर्म असतात. पेरुत मोठ्या प्रमाणात कॅल्शियमही असते. यासोबतच दिर्घकाळ तारुण्यासाठी व आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी पेरुची पाने अतिशय उपयुक्त असतात. त्वचेच्या देखभालीपासून ते पोटाच्या समस्येपर्यंत अनेक गोष्टींवर रामबाण उपाय म्हणून पेरुच्या पानांचा उपयोग होतो.
पेरूची पाने चावण्याची पद्धत
पेरुच्या पानांचे गोळे चावल्याने आपली मळमळ, उलटी, आंबट ढेकर आणि पोटदुखी यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. पेरुची मुलायम व ताजी पाने घेऊन ती स्वच्छ धुवून घ्या. आता या धुतलेल्या पानांवर एक ते दोन चिमटी सैंधव मीठ किंवा काळं मीठ घेऊन हळू हळू चावायला सुरुवात करा. आता त्यातून येणारा रस गिळा. तुम्हाला या पानाचं सेवन पान खातो तसं करायचं आहे.
पेरुच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात. हेच कारण आहे की पेरुच्या पानांचे सेवन केल्यास आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. जर तुम्हाला जेवल्या नंतर किंवा दूरचा प्रवास केल्यानंतर मळमळ किंवा उलटीची समस्या होत असेल तर पेरुची पाने घेऊन त्यावर २ ते ३ चिमटी काळं मीठ घालून चघळा. याचा चांगला परिणाम तुम्हाला लगेचच दिसून येईल. मधुमेहामध्ये रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यासाठी पेरुच्या पानांचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. हा रस नियमित घेतल्यास रक्तातील वाढलेली साखर कमी होण्यासाठी निश्चितच उपयोगी होतो. तसंच वजन कमी करण्यासाठीही पेरुची पाने उपयुक्त असतात. शरीरातील फॅटस वाढविणाऱ्या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेरुची पाने खाल्ल्यास फायदा होतो. शरीरावरील गाठींवर उपाय म्हणूनही पेरुच्या पानांचा वापर केला जातो. दुखणाऱ्या गाठींवर पेरुच्या पानांची पेस्ट करुन ती लावल्यास सूज कमी होण्यासही मदत होते.
दातदुखी दूर करण्यासाठी
पेरुची पाने दातदुखीवरही फायदेशीर ठरतात. दातदुखी थांबवण्यासाठी पेरुची ५ ते ६ पाने घेऊन ती स्वच्छ धुवून घ्या. पुढे ही पाने स्वच्छ पाण्यात उकळवून घ्या. १० मिनिटे पाणी चांगलं उकळवून घेतल्यानंतर गाळणीच्या माध्यमातून ते गाळून घ्या आणि त्या पाण्याने गुळण्या करा. या दरम्यान ते पाणी काही काळासाठी तोंडात धरुनही ठेवा. यामुळे दात शेकले जातील आणि ब-याच प्रमाणात आराम मिळेल.
अँटीऍलर्जीक गुणधर्म
तुम्हाला माहित आहे का अँटीबॅक्टेरिअल गुणधर्मांसोबतच पेरुच्या पानांमध्ये अँटीऍलर्जीक गुणधर्मही आढळून येतात. त्वचेवर खाज, रॅशेज किंवा फोड्या आल्यास पेरुच्या पानांची पेस्ट करुन त्यावर लावा. पण दोन ते तीन वेळा ही पेस्ट लावल्यासच तुम्हाला फरक दिसून येईल. पण हे लक्षात ठेवा की, दोन ते तीन वेळा पेस्ट लावून देखील फरक पडत नसेल तर ताबडतोब डॉक्टरकडे जा. कारण ब-याचदा संसर्ग खूप गंभीर असतो जो औषधांच्या माध्यमातून किंवा ट्रिटमेंटनेच बरा केला जाऊ शकतो. पेरुच्या पानांची पेस्ट बनवण्यासाठी पाने स्वच्छ धुवून मिक्सर किंवा खलबत्त्यात ती वाटून घ्या. तयार पेस्टमध्ये दोन थेंब मोहरीचे व दोन थेंब खोबरेल तेलाचे मिक्स करा. ही पेस्ट संक्रमित जागी लावा.
पेरूचे इतर लाभ
पेरूमध्ये रिच फायबर कंटेंट व लो ग्यायसेमिक इंडेक्स असल्याने हे मधुमेहापासून वाचवते. लो ग्लायसेमिस इंडेक्स अचानक वाढणा-या शुगर लेव्हलला रोखण्याचं काम करतं. तसेच फायबर्सच्या कारणामुळे शुगर चांगल्या प्रकारे रेग्युलेट होत राहते. तसंच पेरू मेटाबॉलिज्म वाढवतो व वजन कमी करण्यास मदत करतो. पेरू खाल्ल्यानंतर पोट देखील भरते आणि कॅलरी इनटेक देखील कमी होते. पेरूंमध्ये जीवनसत्व ‘क' मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे त्वचेवर येणारे चट्टे, डोळ्यांभोवती येणारी काळी वर्तुळं यावर तो लाभदायक ठरतो. पेरूचा गर नुसता शरीरावर लावल्यानेसुद्धा त्वचेतील अशुद्धी दूर होते. त्वचा नितळ होऊन तरुण आणि तेजस्वी दिसायला लागते. पेरू या फळात ८०% पाण्याचा समावेश असतो. हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यात मदत करते.
पेरूच्या पानांचा आरोग्यवर्धक ‘हर्बल चहा’
पेरूच्या पानात अँटिऑक्सिडेंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि क्युरेसेटिकसह अनेक औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. हिवाळ्याच्या काळात बाजारात पेरू हे फळ मोठ्या प्रमाणात विक्रीस येते. हिवाळ्यात याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याच्या चवीबद्दल देखील खूप चर्चा आहे. पेरूमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पण केवळ पेरूच नव्हे, तर त्याची पानेही आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात.
या पानांमध्ये पुष्कळ पोषकद्रव्ये आढळतात, त्यामुळे ही पाने फळापेक्षा
जास्त फायदेशीर असतात. औषधी गुणधर्मांमुळे, अनेक ठिकाणी पेरूच्या पानांचा चहा नियमित
सेवन केला जातो. पेरूच्या पानांपासून बनवलेल्या चहाला ‘हर्बल टी’ म्हणून ओळखले जाते. त्याचे औषधी गुणधर्म देखील अनेक आहेत.
पेरूच्या पानाचा चहा कसा बनवायचा?
हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला प्रथम पेरूची पाने स्वच्छ धुवून घ्यावी लागतील. याशिवाय एक तृतीय चमचा सामान्य चहाची पावडर, दीड कप पाणी आणि मध हे साहित्य लागेल.
कृती- प्रथम पेरूची 10 पाने चांगली धुवा. ही पाने एक भांड्यात घ्या आणि त्यामध्ये दीड कप पाणी घालून मध्यम आचेवर 2 मिनिटे उकळण्यासाठी ठेवा. आता चव आणि रंगासाठी थोडी आपल्या नेहमीच्या चहाची पावडर घाला. आता 10 मिनिटे नीट उकळू द्या. या चहाला गोडी आणण्यासाठी त्यात थोडा मध घाला. झाला तयार आपला पेरू चहा.
पेरूच्या पानाचा चहा मधुमेहापासून ठेवेल दूर
पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने मधुमेहाची समस्या देखील दूर होते. टाईप 2 मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त असणाऱ्यांनी पेरूच्या पानांचा चहा अवश्य प्यावा. रिकाम्या पोटी पेरूच्या पानांचा चहा घेतल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते.
पेरूच्या पानाचा चहा कोलेस्ट्रॉल कमी होते
आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असल्यास घाबरू नका. यावर घरगुती उपाय म्हणून पेरूच्या पानांचा चहा घ्या. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात रक्त परिसंचरण प्रतिबंधित करते ज्यामुळे इतरही अनेक समस्या निर्माण होतात. एका अभ्यासानुसार, पेरूच्या पानांचा चहा सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी बर्याच प्रमाणात कमी होते, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आरोग्यादायी फायदे मिळतात.
सारांश
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.