Translate in Hindi / Marathi / English

Tuesday, 20 February 2024

कॅशफ्लो क्वाड्रन्ट | आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली | कॅश फ्लो क्वाड्रंट हे लोक पैसे कसे कमवतात आणि प्रत्येक दृष्टिकोनाचे संभाव्य बक्षिसे आणि जोखीम समजून घेण्यासाठी एक उपयुक्त फ्रेमवर्क आहे | पैसा महत्त्वाचा नाही असे म्हणणारा माणूस नक्की फार काळ पैशाशिवाय राहिला नसेल | जलद श्रीमंत होता येत का

आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली

 

कॅशफ्लो क्वाड्रन्ट

काय आहे कॅशफ्लो क्वाड्रन्ट?

कॅश फ्लो क्वाड्रंट हे लोक पैसे कसे कमवतात आणि प्रत्येक दृष्टिकोनाचे संभाव्य बक्षिसे आणि जोखीम समजून घेण्यासाठी एक उपयुक्त फ्रेमवर्क आहे. ते सध्या ज्या चतुर्थांशात आहेत आणि ज्या चतुर्थांशात राहण्याची त्यांची इच्छा आहे ते समजून घेऊन, व्यक्ती त्यांच्या करिअरच्या मार्गाबद्दल आणि आर्थिक उद्दिष्टांबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतात.आर्थिक स्वातंत्र्य हवं असेल तर E’ आणि ‘S’ कडून ‘B’ आणि ‘I’ कडे हा प्रवास.

E म्हणजे एम्प्लॉयी अर्थात नोकरी

S म्हणजे स्वयंरोजगार

B म्हणजे बिझनेसमॅन अर्थात उद्योगपती

I म्हणजे इन्व्हेस्टर अर्थात गुंतवणूकदार

आपल्या शिक्षणानंतर आपले जे चरितार्थासाठी मार्ग निवडतो ते हे चार मार्ग आहेत. आपण सर्व साधारणपणे शिक्षणानंतर नोकरीच करणे पत्करतो. १०० तरुण तरुणीमधून ८०% हेच करतात. पारंपरिक व्यवस्थेप्रमाणे वडिलोपार्जित व्यवसाय करणारे या १९% मध्ये आहेत. उरलेल्यामध्ये १ टक्काच फक्त B किंवा I मध्ये आपले कार्य सुरवात करतात. पारंपरिक व्यवस्थेप्रमाणे वडिलोपार्जित व्यवसाय करणारे या १९% मध्ये आहेत. नोकरदार व्यक्तींचे आर्थिक गणित लवकरच मार्गी लागते त्यांच्या सोबत असलेल्या B आणि I यांपेक्षा त्यांची आर्थिक परिस्थिती लवकरच समाधानाची होते. S याचीहि आर्थिक स्थिती काही प्रमाणात समाधानाची असते. पण हे दोघेही तत्कालीन परिस्थितीत B आणि I सापेक्ष सुधृढ असतात. B आणि I त्यावेळी आपल्या भविष्याच्या मोठ्या इमारतीसाठी भक्कम पायाभरणी करत असतात. त्यामुळे त्यांची उंची हि S व E समोर खुजी दिसते.

पैसा महत्त्वाचा

पैसा महत्त्वाचा नाही असे म्हणणारा माणूस नक्की फार काळ पैशाशिवाय राहिला नसेल. नोकरी करून पैसे मिळवावेत का? भीती, असुरक्षितता, भूक यामुळे मनाचा निर्धार डळमळीत होतो. आयुष्याच्या कालक्रमणात ‘E’ आणि ‘S’ हा मार्ग आपणास तत्कालीन गरजांसाठी पैसे उपलब्ध करून देतो. म्हणून ८०% तरुण तरुणी ‘E’ आणि ‘S’ चाच मार्ग स्वीकारतात. एक पिता जो हाच वर्ग स्वीकारून त्याच्या कुवतीप्रमाणे स्थिरस्थावर झालेला असतो, तो आपल्या पुढच्या पिढीला तसेच मार्गदर्शन करतो. फार क्वचित वेळा तो पिता आपल्या अपत्याला B किंवा I हा मार्ग स्वीकारावयास मदत करतो.

जलद श्रीमंत होता येत का?

जलद श्रीमंत होणे हा एक धार धार तलवारीच्या पात्यावर चालण्याचा प्रयत्न असतो. जर यावर सांभाळून चालले तर बराच प्रवास सुरक्षितपणे चालता येतो. मात्र असुरक्षिततेने जलद गतीने केलेला प्रवास नुकसानीचा होतोच पण सापशिडीचा सापाने चावल्यावर ज्याप्रमाणे आपण खूप खाली घरंगळत येतो. किती खाली तर E नि S यांच्या तुलने सापेक्ष खूप अधोगतीने तळास येतो. मग पुन्हा सुरवात करावी लागते यामध्ये आपणास फक्त हाती लागतो तो अनुभव. जलद श्रीमंत म्हणजे इतरांपेक्षा आपणास तेवढ्याच श्रमात आणि तेव्हढ्याच वेळात जास्त उत्पन्न मिळणे. प्रत्येकाचे उत्पन्न त्याच्या शरीराच्या आणि बुद्धीच्या कुवतीप्रमाणे मिळते. पण खरी गोम अशी आहे कि एक व्यक्ती एकवेळेला किती काम अरु शकतो? कारण जेव्हढे काम तेव्हढेच दाम. आपली कार्यशक्ती जो जितक्या पटीने वाढवतो, तितक्याच पटीने तो लवकर श्रीमंत होतो. उदाहरणार्थ एम्प्लॉयी (I) सकाळपासून संध्याकाळ पर्यंत ८ ते १० तास काम करतो जेव्हढे काम तेव्हढेच दाम त्याचे दोन हात व एक मेंदू जेव्हढे काम करू शकतो, तेव्हढाच त्याला मोबदला मिळतो. एक स्वयंरोजगार व्यक्ती आपल्या कलागुणांप्रमाणे एकटा काम करतो व त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याचा मोबदला मिळतो. येथेही शारीरिक मर्यादा त्यास श्रीमंत बनू देत नाहीत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धती प्रमाणे त्यांना मोबदला मिळतो. हा मोबदला त्यांच्या गरजेच्या गोष्टींपेक्षा जास्त असेल तर शिल्लक रकमेतून तो परिस्थितीप्रमाणे आपली राहणीमानाची स्थिती सुधारतो. इतरांपेक्षा अधिक चांगले राहणीमान व्यथित करतो. पण या अर्थाजनावर मर्यादा असतातच.

या जगात जेव्हढी संपत्ती आहे त्यातील ९५% संपत्ती जगातील % लोकांकडे आहे आणि उरलेली % संपत्ती ९५% लोकांकडे आहे. हे ९५% लोक अनुक्रमे एम्प्लॉयी (E) आणि स्वयंरोजगार (S) या गटात येतात. उरलेली ९५% संपत्ती बिझनेसमन (B) आणि इन्व्हेस्टर (I) या ५% लोकांकडे आहे.

संपत्तीची हि तफावत का आहे?

अगोदर सांगितल्या प्रमाणे एम्प्लॉयी (E) आणि स्वयंरोजगारी (S) आपली संपत्ती आपले दोन हात आणि आपला एक मेंदू या द्वारेच कमावतात. अर्थात ती यांची नैसर्गिक मर्यादा आहे.

मात्र बिझनेसमॅन हा असे अनेक एम्प्लॉयी (E) आणि स्वयं रोजगारी (S) आपल्या पदरी कामाला ठेवतो. ज्या मुळे तो तितक्याच पटीने काम एका दिवसात करतो अर्थात त्याच्या दोन हातांशिवाय त्याच्या कडे अनेक हात आणि अनेक मेंदू त्याच्या उत्पन्नाच्या उत्कर्षासाठी झटत असतात. पण बिझनेसमॅनला (B) सुद्धा काही मर्यादा आहेत त्याचीही शारीरिक क्षमता काही वेळा कमी पडते व त्याच्या उत्पन्नावर मर्यादा येतात. पण इन्व्हेस्टरला (I) यामध्ये काहीही फरक पडत नाही. कारण त्याचा गुंतवणूक केलेला पैसाच त्याला अधिक पैसे कमावून देतो. हि गुंतवणूक रात्रंदिवस त्याची गुलामी करत असते. तेथे ना शारीरिक क्षमतेची अडचण, ना वेळेची मर्यादा. इन्व्हेस्टर फक्त चुकीच्या जागी आपली संपत्ती गुंतवून बसला तर त्याची गुंतवणूक त्यास रस्त्यावर आणून सोडते. यासाठी गुंतवणुकीची सर्व काळजी त्याने घेतल्यास त्याची संपत्ती दिवसोदिवस वाढतच जाते.

स्वयं रोजगारी (S) आणि बिझनेसमॅन (B) मधला फरक

जे लोक खरे ‘B’ आहेत, ते त्यांचा व्यवसाय एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी सोडून जाऊ शकतातकदाचित जेव्हा ते परत येतील तेव्हा त्यांचा व्यवसाय पूर्वीपेक्षा अधिक फायदेशीर आणि चांगल्या स्थितीत असेल.

परंतु खर्या ‘S’ प्रकारच्या व्यवसायात, जर ‘S’ एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ दूर गेला, तर तो परत येईपर्यंत त्याचा व्यवसाय असेल की नाही हा प्रश्न आहे.

त्यांच्यात काय फरक आहे? सोप्या शब्दांत सांगायचे तर, ‘S’ हे कामाचे मास्टर आहेत, तर ‘B’ हे प्रणालीचे मास्टर आहेत. ‘B’ त्यांची प्रणाली चालविण्यासाठी पात्र व्यक्ती नियुक्त करतात. बर्याच प्रकरणांमध्ये ‘S’ हा स्वतःच प्रणाली असतो. त्यामुळे तो आपले काम सोडून जाऊ शकत नाही.

समस्या अशी आहे की जेव्हा दंतचिकित्सक (S) सुट्टीसाठी बाहेर पडतो, तेव्हा त्याचे उत्पन्न देखील त्याच्याबरोबर बाहेर पडते. (B) व्यवसाय मालक सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेर जाऊ शकतात. कारण ते कामाचे नव्हे तर संपूर्ण यंत्रणेचे स्वामी असतात. जर ‘B’ सुट्टीसाठी बाहेर गेला तर पैसे येणे थांबणार नाही. म्हणून यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. सिस्टमचे नियंत्रण किंवा मालकी आणि लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता. जर ‘S’ ला ‘B’ बनायचे असेल तर त्याने त्याचे मूलभूत स्वरूप आणि सिस्टमबद्दलची माहिती देखील बदलली पाहिजे. बर्याच लोकांना हे करणे शक्य नाही किंवा ते बहुधा सिस्टममध्ये खोलवर गुंतलेले असतात.

एम्प्लॉयी (E) स्वातंत्र्यापेक्षा सुरक्षेला जास्त महत्त्व का देतात?

लोक नोकरीला घट्ट पकडून राहतात कारण ते सहसा आर्थिक दिवाळखोरी पासून केवळ तीन महिने किंवा त्यापेक्षा कमी काळ दूर असतात. तुम्ही बर्याचदा या लोकांच्या तोंडून असे शब्द ऐकत असता, “मी नोकरी सोडू शकत नाही. मला बिलं भरावे लागतात.” किंवा म्हणतातमाझ्यावर कर्ज आहे, माझ्यावर कर्ज आहे, म्हणून मी कामावर जातो.”

आपण संपत्ती कशी निर्माण करू शकतो?

एक उत्तम उदाहरण: दोन व्यक्ती शेजारी शेजारी राहत असतात. त्यातील एक सुखवस्तू व्यापारी असतो आणि एक रोजदारीने काम करणारा कष्टकरी असतो. नैसर्गिक आपत्तीने दोघेही एकाच पातळीवर येऊन पोहोचतात. चरितार्थासाठी ते मग गावच्या नदीत मासे पकडण्यासाठी जातात. दोघांकडे एकाच प्रकारची काठी आणि इतर सामुग्री असते. दिवसभरात त्यांना प्रत्येकी मासे मिळतात. गरीब आणि सुखवस्तू परमेश्वराचे आभार मानून घरी येतात. गरीब मनुष्य दोन्ही मासे शिजवून खातो आणि सुखवस्तू अर्धवट पोटी राहून एकाच मासा शिजवून खातो. दुसरा मासा तो विकतो आणि मिळालेल्या पैशातून अजून एक मासे पकडायची काठी इतर सामान विकत घेतो. दुसऱ्या दिवशी दोघेही परत नदी किनारी जातात आणि मासे पकडू लागतात. पण सुखवस्तूने एका गरजवंताला आपली खरेदी केलेली काठी आणि सामान देऊन त्याबरोबर करार करतो कि जेव्हढी मासळी पकडशील त्याचा अर्धा भाग माझा. त्याप्रमाणे तिघांनाही त्या दिवशी प्रत्येकी मासे मिळतात आता सुखवस्तू कडे मासे होतात. त्यातील तो मासे गावात विकतो आणि अजून काठ्या आणि सामान विकत घेतो. तिसऱ्या दिवशी सुखवस्तू अजून व्यक्तींना कामावर ठेऊन मासे पकडण्याचे काम करत राहतो. अश्या पद्धतीने काही दिवसांनी त्याच्या कडे अनेक लोकांची फौज तयार होते. जी त्याच्या साठी काम करते. त्यांचे प्रत्येकी दोन दोन हात त्याचसाठी काम करतात. गरीब हा फक्त आपल्या दोन हाताच्या मदतीने चरितार्थ चालवतो. त्यामुळे तो आहे त्याच परिस्थितीत राहतो. मात्र सुखवस्तू तेव्हढ्याच अवधीत गर्भश्रीमंत होतो. या गोष्टीचे सार असे कि आपली सांपत्तिक स्थिती सुधारायची असेल तर आपल्या कुवतीची अनेक पटीने वाढ करा आणि संपत्ती जमवा.

सारांश

कॅश फ्लो क्वाड्रंट विविध पद्धतींचे प्रतिनिधित्व करतो. ज्याद्वारे उत्पन्न किंवा पैसा निर्माण केला जातो. उत्पन्नाच्या विविध पद्धतींसाठी भिन्न तांत्रिक कौशल्ये, भिन्न शैक्षणिक मार्ग आणि भिन्न प्रकारचे लोक आवश्यक असतात. प्रत्येक चार चतुर्थांशांमध्ये उत्पन्न कसे निर्माण होते. अर्थात, एकाच चतुर्थांश किंवा चतुर्थांशांच्या संयोजनातून उत्पन्न मिळू शकते चार चतुर्भुजांना E, S, B आणि I असे नाव दिले आहे. “E” म्हणजे कर्मचारी, “S” म्हणजे स्वयंरोजगारासाठी, “B” व्यवसाय मालकासाठी आणि “I” गुंतवणूकदारासाठी.

Eकर्मचारी: एका कर्मचाऱ्याकडे नोकरी आहे. येथेच बहुतेक लोक त्यांचे उत्पन्न मिळवतात. नोकरी स्वतः व्यवसायाच्या मालकीची असते, जी एकल व्यक्ती किंवा मोठी कॉर्पोरेशन असू शकते. पगाराच्या चेक आणि फायद्यांच्या बदल्यात कर्मचारी आपला वेळ, ऊर्जा आणि कौशल्ये नियोक्त्याला देतो.

S स्वयंरोजगार करणाऱ्या लोकांकडे कर्मचाऱ्यांपेक्षा खूप जास्त नियंत्रण असते, परंतु याचा अर्थ त्यांच्याकडे अधिक जबाबदारी असते. परिणामी, यशाचा अर्थ सामान्यतः कठोर परिश्रम करणे आणि जास्त काळ काम करणे होय. दीर्घकाळापर्यंत, यामुळे बर्नआउट आणि थकवा येऊ शकतो.

Bव्यवसाय मालक. B क्वाड्रंटमधील लोक एक प्रणालीचे मालक आहेत आणि लोकांचे नेतृत्व करतात. व्यवसायासाठी काम करणाऱ्या प्रणाली आणि लोक व्यवसाय मालकाच्या सतत सहभागाशिवाय यशस्वीपणे चालवू शकतात.

I गुंतवणूकदार अनेकदा बी क्वाड्रंटमधील कंपन्यांच्या मालकीचे शेअर्स खरेदी करतात. गुंतवणूकदारांकडून मिळणारे भांडवल व्यवसाय मालकाने तयार केलेल्या प्रणालींना चालना देण्यासाठी मदत करते आणि या इंधनामुळे गुंतलेल्या प्रत्येकासाठी आणखी वाढ (आणि अधिक उत्पन्न) होऊ शकते.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.


No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know