Translate in Hindi / Marathi / English

Saturday, 10 February 2024

पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन | निसर्गाचा समतोल | प्राण वायु चा निर्माता निसर्ग आहे | निसर्गाचा समतोल टिकला तर सृष्टी वरील मानवासह इतर जीव व्यवस्थित पणे आपलं जीवन जगु शकतात | निसर्गाचा समतोल टिकण व टिकवणे हे मानवी कल्याणासाठी खूप महत्वपूर्ण आवश्यक आहे

 पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन

 

निसर्गाचा समतोल

निसर्गातील वेगवेगळ्या ऋतूमुळे आपल्या शेजारील वातावरण बदलत असते. पाऊस पडतो, ऊन पडते, थंडी पडते हे सर्व बदल आपल्यासाठी आवश्यक असतात. पावसाळ्यात पाऊस पडतो त्यामुळे आपल्याला पाण्याची सोय होते. तसेच वातावरणामध्ये हवेचा थर आहे. याबरोबरच आपल्या निसर्गातील झाडामुळे हवेची निर्मिती होते. आणि पृथ्वीवरील सजीवांना याचा फायदा होतो. पृथ्वी असे म्हणता येईल निसर्गशी संलग्न आहे. पृथ्वीवर एक जीवनदायी वातावरण आहे. ज्यामध्ये खूप सारे घटक समाविष्ट आहेत. पाणी आणि हवा हे त्यामधील मुख्य घटक म्हणता येतील. त्याची उपलब्धता निसर्ग नियमानुसार होत असते. माणूस, प्राणी, झाडे जे जे सजीव पृथ्वीवर आहेत ते एकमेकांशी पर्यायाने निसर्गाशी जोडलेले आहेत. जीवन आणि निसर्ग समजणे खूप कठीण आहे. तरी आपण सभोवतालचे वातावरण म्हणजे निसर्ग समजतो की ज्याद्वारे आपले जीवन गतिमान होते. निसर्ग संवर्धनाच्या दिशेने आपण कोणतेही पाऊल उचलले नाही तर आपण आपल्या भावी पिढींचे अस्तित्व धोक्यात ठेवत आहोत हे लक्षात घ्या. त्यामुळे आपणच आपल्या निसर्गाचे सौंदर्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जागतिक पर्यावरण दिन कृतीतून साजरा झाला पाहिजे. वृक्ष लागवड, निसर्ग संवर्धन, आणि निसर्गाचा समतोल राखणे हे फक्त लिहण्यापुरत किंवा सोशल माध्यमातून साजर करण्या पर्यंत नाही तर संकल्प करून ते कृती मध्ये उतरविणे आवश्यक आहे.

प्राण वायु

प्राण वायु चा निर्माता निसर्ग आहे. प्राण वायु सह अनेक अशा अनमोल संपदा आपल्यला निसर्गा कडुन मिळालेली देणगी आहे नव्हे निसर्गाचे आपल्यावर ते अनंत उपकार आहेत. तसेच संबंध जीव सृष्टी हि प्राण वायु वर जीवंत आहे म्हणून प्राण वायु अमुल्य आहे. तर मग निसर्गाचे महत्व किती असल पाहिजे. आणि म्हणूनच निसर्गाचा समतोल टिकला तर सृष्टी वरील मानवासह इतर जीव व्यवस्थित पणे आपलं जीवन जगु शकतात. प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाची लवचिकता प्रेरणास्त्रोत आहे. वणव्याच्या आगीनंतर जंगलांच्या पुनरुत्पादनापासून ते बदलत्या हवामानाशी प्राण्यांचे जुळवून घेण्यापर्यंत निसर्गाने पुनर्प्राप्ती करण्याची आणि विकसित करण्याची त्याची उल्लेखनीय क्षमता प्रदर्शित केली आहे.  या प्रक्रियांचा अभ्यास केल्याने आपण आपल्या स्वतःच्या जीवनातील आव्हाने आणि बदलांना कसे नेव्हिगेट करू शकतो. याबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान केलीली आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर जीव सृष्टीला धोका निर्माण होऊन अनेक परिणामांना समस्यांना सामोरे जावे लागु शकते. एकंदरीत निसर्गाचा समतोल टिकण टिकवणे हे मानवी कल्याणासाठी खूप महत्वपूर्ण आवश्यक आहे. आणि आपण निसर्गाचे संवर्धन केले, रक्षण केले समतोल राखला तरच येणाऱ्या पिढीच भविष्य उज्ज्वल असेल. या मध्ये यत्किंचितही शंका नाही.

निसर्ग आणि विकास

निसर्ग हे जीव सृष्टीच सुरक्षा कवच आहे. आणि विज्ञान युगातील मनुष्य हे कवच विकासाच्या नावाखाली नष्ट करण्याचा दिशेने झपाट्याने मार्गक्रमण करत. आहे हि प्रचंड आणि अंत्यत खेदाची बाब आहे. निसर्गाकडुन प्राप्त होणा-या ज्या दुर्मिळ नानाविध संपदा ज्या आपल्या निसर्गाकडून अगदी मोफत मिळतात आपण निसर्गाचे कायम ऋणी असलं पाहिजे. निसर्ग परस्पर संबंधी जीवनावर आधारित आहे. फुले आणि मधमाश्या यांच्यातील नाजूक परागकण परस्पर संबंध, शिकार आणि शिकारी यांचे परस्परावलंबन आणि बुरशी आणि झाडे यांच्यातील परस्परसंबंध या सर्व गोष्टी निसर्गाच्या परस्परसंबंधित जीवनाचे उदाहरण देतातहे संबंध पर्यावरणातील विविधता टिकवून ठेवण्यासाठी समतोल राखण्याचे काम करतात. हे सगळं आपल्याला निसर्गाकडून देणगी स्वरुपात मिळतं असताना देखिल आपण आपल्या हव्यासापोटी तसेच वाढत्या गरजा वाढती लोकसंख्या, त्या अनुषंगाने आवश्यक असणार्या सेवा सुविधा निर्माण करताना निसर्गाचा असमतोल निर्माण होत आहे. आणि तो असमतोल पण क्रमप्राप्त आहे. महणजे सेवा सुविधा उपलब्ध करत असतानाच निसर्गरम्य सौंदर्य नष्ट होऊन भौतिक विकास होत आहे. म्हणून मग निर्धास्त पणे निसर्गाचे संतुलन बिघडवायचे का आणि मग जीवनासाठी आवश्यक असणारा प्राण वायु कुठुन मिळणार प्राण वायु चे मुल्य काय याचा अनुभव आपण करोना काळात घेतला आहेच. सगळीकडे फक्त ऑक्सिजन ऑक्सिजन हा हाहाकार होता. आणि हा ऑक्सिजन जर निसर्गा कडुन आपल्याला मोफत निःशुल्क मिळत असेल तर त्याच महत्व आपल्यला किती असलं पाहिजे. परंतु जे मोफत मिळत त्याच महत्व ओळखण्या मध्ये सध्या चा मानव कमी पडत आहे. आणि म्हणूनच तो निर्धास्त पणे वृक्षांची कतल करत आहे.

प्रदुषण थांबलं पाहिजे

वायु प्रदुषण प्रचंड वेगाने वाढवत आहे. घानकचर व्यवस्थित व्यवस्थापन करता तो निसर्गाच्या समतोलात भर घालत आहे. महणुन दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. हे कुठं तरी थांबलं पाहिजे. मानवी गरजा पण आवश्यक आहेत. म्हणून निसर्गाचा असमतोल करणं योग्य नाही. म्हणून आवश्यक असणार्या गरजा पूर्ण करताना होणार निसर्गाचे नुकसान टाळण आवश्यक आहे. आणि ज्या प्रमाणात निसर्गाचे नुकसान होत आहे. समतोल बिघडला आहे. त्याच प्रमाणात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून वायु प्रदूषण टाळून, कृतीतून निसर्गाचे संवर्धन करणं आवश्यक आहे.आणि भविष्यातील येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी निसर्गाचं संतुलन टिकवून त्याच संवर्धन आणि रक्षण करण आवश्यक आहे. जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत निसर्गाचा समतोल बिघडणार नाही.वसुंधरेच जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते टिकुन रहिल आणि आपल्या पुढील पिढीच भविष्य सुरक्षित राहिल. जगातील पर्यावरण दिनानिमित्त एवढीच माफक अपेक्षा निसर्ग रक्षण संवर्धन हे कृतीतून झालं पाहिजे.

जगभरात हवामान बदलाचा निषेध होत आहे. निषेधाचा भाग असल्याने आणि त्याबद्दल विचार केल्यामुळे, मला समस्येकडे सर्वांगीण दृष्टिकोन शोधण्यास प्रवृत्त केले.

कारणे अनेक आहेत - जंगलतोड, वाहनांचे प्रदूषण, प्लास्टिकचा वाढता इलेक्ट्रॉनिक आणि मानवी कचरा, मांसाहाराचे परिणाम, कार्बन फूटप्रिंट वाढणे, अनियंत्रित विकास ज्यामुळे शेतजमिनी आणि जंगलांचा नाश होतो . सूक्ष्म घटक आपल्याला मानवांवर उकळतात. मानवी लोभ वाढत आहे आणि तो अनियंत्रित झाला आहे. पण असे का होते? आपल्या सर्वांच्या गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक काम आहे. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्हाला उद्योजकता आणि नोकऱ्यांची गरज आहे.

सहमत आम्हा मानवांना पैशाची गरज आहे जी आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संसाधने विकत घेते. पण गरज म्हणून किती पैसा तयार होतो हा मोठा प्रश्न आहे. पुढे, गरज परिभाषित करणे देखील अवघड आहे कारण आपल्यापैकी प्रत्येकाची गरज भिन्न असू शकते. लोकांना नोकऱ्या देणाऱ्या व्यक्तीला स्वयंरोजगार असलेल्यांना जास्त गरज असू शकते. तसेचकाम हीच पूजाकिंवारिक्त मन म्हणजे शैतानांची कार्यशाळाअशी म्हण आहे तेव्हा कामावर लक्ष केंद्रित करणे कसे थांबवता येईल.

शहरीकरण व औद्योगिकरण

पृथ्वीवर निसर्गाचे सौंदर्य पाहिले जात असताना ब्रह्मांडाचे एक भव्य दिव्य असे कुतुहलाने भरलेले जग आपणास पहावयास मिळते. तारे, आकाशगंगा आणि खगोलीय घटनांनी सुशोभित विश्वाची विशालता ही कुतूहलाची भावना जागृत करते.  नॉर्दर्न लाइट्सकडे टक लावून पाहणे, ताऱ्यांचे लुकलुकणे किंवा उल्कावर्षावाचे सुंदर दृश्य आपल्याला भव्य ब्रह्मांडाच्या अमर्याद भागाची आठवण करून देते. शहरी भागात वृक्षतोड करून निसर्गाचा समतोल बिघडला तो शहरीकरण, औद्योगिकरणामुळे मानवाने २१ व्या शतकात पदार्पण केले आहे, तो संगणक युगात रममाण आहे, याचे सर्व काही फायदे असले तरी तो दैनंदिन जीवनात व्यायाम, कसरती, खेळ, निसर्ग यांना कुठेतरी मागे सोडतोय. निसर्गाचा समतोल बिघडत आहे तो आपल्यामुळे आपण पर्यावरण दिनानिमित्त फक्त झाडे लावा, झाडे जगवा घोषणा करतो. व्हाट्सएप, सोशल मिडिया या सर्व माध्यमातून जनजागृती करतो, पण अंमलबजावणी फार कमी पडते. एखादे झाड लावणे सोपे आहे पण ते जगले पाहिजे, वाढले पाहिजे यासाठी कुणीही धडपडत नाही. मागील महिन्यात आपण वर्तमानपत्रातून महापूराच्या घटना पाहिल्या. अतिशय र्हदयद्रावक घटना होत्या. सर्वत्र महापूराने थैमान घातल्याने सर्व गावेच्या गावे उध्वस्त झाली. दरड कोसळणे, महापूर, धरणाचा बांध फुटणे या सर्व घटनांमागे निसर्गाचा समतोल ढासळलेला दिसून येतो. तसेच एखादा विषाणू यावा आपल्या सर्वांचे जन जीवन थांबावे अशी आपण कल्पनाही केली नसेल. नवनवीन आजारांचा, विषाणूंचा शिरकाव होत आहे. मानवाची जीवनशैलीच बदलून गेली आहे. या सर्व घटनामागे आपण कुठे ना कुठे जबाबदार आहोत असे वाटते. शेतकर्यांच्या समस्यांमागे दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी, सर्पदंश या सर्वांचा निसर्गाच्या समतोलाशी संबंध येतो. आपण सर्वांनी शेतीच्या बांधावर पाणंद रस्त्यावरची सर्व झाडे तोडून नाला, कालवे काढले. प्राण्यांचे, पक्ष्यांचे निवारे संपुष्टात आले. कुठेही निवार्यासाठी एक झाड दृष्टीस पडत नाही. लांबवर गेले तरी कुठे एखादे वारूळ आज ग्रामीण भागात पहायला मिळत नाही. यात प्राण्यांचा काही दोष नाही. प्राण्यांवर आपण भूतदया दाखवली पाहिजे. आज आपण कित्येक सर्पमित्रांच्या मदतीने शेतातील, घरातील जिथे कुठे वन्यजीव सापडतील तिथे त्यांना सुखरुपस्थळी नेऊन सोडविलेले पाहतो. शेवटी त्यांनाही निवारा हवा असतोच. आपण त्यांची निवारे संपुष्टात आणली मग स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तेही निवारा शोधतात, मग यातूनच काही सर्पदंशाच्या घटना घडतात. उष्णतेच्या दाहकतेने अन्न, पाण्याच्या शोधात पक्षी, प्राणी बाहेर पडू लागतात यांची घरटे, निवारे उध्वस्त झाल्याने ते पावसाळ्यात निवारा शोधू लागतात. मग निवारा शोधताना बळी जातो तो शेतकर्याचा.

सारांश

निसर्गाचा समतोल राखण्यास आपण काही अंशी का होईना प्रयत्न केल्यास कुठे ना कुठे या घटना कमी प्रमाणात पहायला मिळतील. निसर्गाचा समतोल राखूया शेतकर्यांच्या तसेच मानवी जीवनातील समस्या थांबवूया तेव्हाच सर्वजण सुखी, निरामय, निरोगी, आनंदी जीवन जगण्यास सार्थक होऊ असे वाटते. निसर्गाने त्याच्या विस्मयकारक सौंदर्याने आणि चमत्काराने शतकानुशतके मानवी मनावर कब्जा केला आहे. महाद्वीपांमध्ये पसरलेल्या भव्य लँडस्केपपासून ते एका फुलाच्या छोट्या पाकळी मध्ये निसर्गामध्ये आश्चर्य निर्माण करण्याची शक्ती आहेपृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीच्या परस्परसंबंधाची आठवण करून देतात.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know