Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 14 February 2024

निरोगी जगण्याचा मंत्र | नैसर्गिक आहार हेच जीवनदायी अन्न आहे | कच्च्या अन्नात अधिक पोषक घटक असतात | वात पित्त कफ दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात | सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर | ठरलेल्या वेळी जेवणे आवश्यक आहे | आपण रोज पितो तीच कॉफी जर वेदनाशामक म्हणून वेदना होत असताना जाणीवपूर्वक प्राशन केली तर तिचाही उपयोग वेदनाशामक म्हणून होतो

 निरोगी जगण्याचा मंत्र

 

नैसर्गिक आहार हेच जीवनदायी अन्न आहे. हजारो वर्षांपूर्वी माणूस निसर्गात राहत होता. निसर्गातील कंदमुळे,कच्चे अन्न खात होता. कालांतराने अग्नीचा शोध लागला. तो अन्न भाजून अथवा शिजवून खाऊ लागला. ही प्राचीन परंपरा आहे. कच्च्या अन्नात अधिक पोषक घटक असतात. अन्न शिजवल्याने अन्नातील पोषक तत्वांचा नाश होतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी शिजवलेल्या अन्नाबरोबरच कच्च्या अन्नाचा समतोल आहार घेतलात तर नक्कीच आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल

) वात ) पित्त ) कफ

वरील दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात .यामध्ये बिघाड झाला की आपल्याला त्या दोषाचा आजार होतो. यावर उपाय म्हणजे आपली जीवनशैली थोड़ी बदलली की आपल्याला त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतात.

आपण नुसते बोलतो की जुने लोक जास्त वर्ष जग़ायचे पण आपण हे कधी पाहिले नाही की ते लोक एवढे वर्ष तंदुरुस्त कसे जगायचे?

त्यासाठी हे कृतीत आणा

) सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर .३० ते .०० या वेळेत उठावे.

) दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे - ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात.)

) पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातिर्विधी करुन घ्यावा.

) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी, करंजेची काड़ी, बाभळीची काड़ी . किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन) दंत रोग दूर राहतात.

) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरु नये.

) सूर्योदयानंतर सकाळी .३० ते .३० च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे. जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने भरभक्कम नाश्ता आदर्श. (अन्न पचन उत्तम होते)

अन्न प्राशन नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

) जेवणाच्या अगोदर ४५ मिनीट आणि जेवणानंतर तासाने पाणी प्यावे. जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.

) सकाळी फळांचा ज्युस प्या दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या आणि  झोपताना देशी गाईचे दूध, देशी गाईचे तूप हळद टाकुन प्या.

) नेहमी पाणी पिताना हळुवार खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून, गड़बडीने पाणी पिऊ नये.

(शरीराला दररोज लाळेची गरज असते. जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

१०) नेहमी जेवण केल्यावर १० ते १५ मिनीटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीटे झोपावे) घ्यावी. आणि संध्याकाळी जेवण केल्यावर तास झोपू नये शतपावली करावी.

११) ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये काहीही खाऊ नये. ॲल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

१२) भोजन करतांना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या, पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा.

१३) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत, आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले, पोटावर झोपु नये.

१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल, बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.

लाकडी घाण्याचे तेलच वापरा.  (रिफाईन्ड तेल/ डबल रिफाईन्ड विष आहे)

१५) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा. (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)

१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.

१७) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

१८) कमीत कमी ते तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.

१९) दररोज एक तास प्राणायाम, १५ मिनीट योगासने, जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे. (किमान बारा)

२०) प्राणायाम मात्र नियमित करणेच चांगले.

२१) रोज चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा. तसेच दुधी भोपळा, गाजर, बिट, मुळा, काकड़ी, कोबी यांचा वापर करावा.

२२) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे, जास्त वेळ उभे राहणे, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे. त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे, उकड़ु बसावे, ज्यामुळे आपले मणके सांधे चांगले राहतील.

२३) भारतीय रस म्हणजे उसाचा रस, कोकम सरबत,आवळा रस, लिंबू सरबत, फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत.

२४) भारतीय पोशाख घाला तो सैल असावा, जास्त फिट टाईट नसावा. शक्यतो पांढराच असावा.

२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये. जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात. लघवीला आली की थांबवू नये, बसूनच लघवी करावी, अश्रू बाहेर येवू द्यावेत, रडायला आले तर ऱडावेच, हसायला आले की भरपुर हसावे, जांभई आली की द्यावीच, शिंक आली की बिनधास्त द्यावी , अपानवायू आला की तसाच बाहेर येऊ द्यावा.

२६) कफ कधीच गिळू नये.

 

वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो.

अन्न हेच औषध

आपण सध्या विविध प्रकारच्या विकारांनी ग्रस्त होऊन रोज एवढ्या गोळ्या घ्यायला लागलो आहोत की आपला सकाळचा ब्रेकफास्ट गोळ्यांचाच होत आहे. आपण अन्नासारखे औषधे खात आहोत परंतु ही औषधे टाळून नियोजनपूर्वक काही अन्न नीट खाल्ले तर ते अन्नच आपल्याल औषधासारखे उपयोगी पडू शकते. तेव्हा काही अन्नांचे किंवा पदार्थांचे औषधी गुणधर्म जाणून घेतले पाहिजेत. आपण दररोज खातो ती हळद अनेक औषधी गुणांनी युक्त असते. हळदीमध्ये सर्क्युमीन नावाचे औषधी द्रव्य आहे. ज्याच्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म आहेत. विशेष म्हणजे हळदीचे कसलेही साईडइफेक्ट नाहीत. आपण दुधात घालून हळद प्राशन केली तर ती वेदनाशामक ठरते. शिवाय खवखवणारा घसा मोकळा होतो आणि त्वचा नितळ होते. विशेषतः सांध्यांच्या दुखण्यावर हळद उपयोगी पडते.

अद्रक किंवा आले याचे तर औषधी गुणधर्म अनेक प्रकारचे आहेत. सांध्यांचे दुखणे, पोट दुखणे, छाती दुखणे, शरीरातल्या कोणत्याही स्नायूंचे सुजणे आणि महिलांच्या मासिक पाळीतील वेदना यांच्यावर आल्याचा उतारा चांगला असतो. शरीराचा जो भाग दुखत असेल त्या भागावर आले ठेचून बांधावेत. चेरीची फळे हीसुध्दा औषधी असतात. रेज व्हॅरॅट्रोल या नावाच्या लाल द्रव्यामुळे चेरीला लाल रंग आलेला असतो. चेरीचा फळांमुळे सांध्यांचे आणि पाठीचे दुखणे थांबते. जेव्हा पाठ दुखत असेल तेव्हा मूठभर चेरी खावी. मीठ हे कितीतरी सामान्य अन्नद्रव्य आहे. परंतु ते अनेक प्रकारे औषधी गुणधर्म दाखवते. त्याचे कसकसे उपयोग करावेत यावर अनेक ठिकाणी माहिती दिली जाते परंतु आंघोळीच्या पाण्यामध्ये १० ते १५ चमचे मीठ घालून त्याने स्नान केल्यास शरीराच्या वेदना कमी होतात.

सोयाबीन सर्वाधिक औषधी गुणधर्म असलेले धान्य होय. सांध्यांच्या वेदना आणि हाडांचे दुखणे यावर सोयाबीनमधील आयसोफ्लेवन्स हे द्रव्य गुणकारी ठरते. त्याचबरोबर आपण रोज पितो तीच कॉफी जर वेदनाशामक म्हणून वेदना होत असताना जाणीवपूर्वक प्राशन केली तर तिचाही उपयोग वेदनाशामक म्हणून होतो. तेव्हा डोके दुखायला लागले किंवा अंग दुखायला लागले की डॉक्टरला विचारता उगाच क्रोसीन, सारिडॉनसारख्या गोळ्या घेत बसण्यापेक्षा ही घरात उपलब्ध असलेली अन्नद्रव्येच व्यवस्थित वापरावीत. त्यांचा चांगला उपयोग होतो. क्रोसीन सारख्या गोळ्यांचे दुष्परिणाम होत असतात. ते या घरगुती उपायांनी टळतात.

सारांश

जेवण्याची एक वेळ असते. ती वेळ जवळ आली की भूक लागते. आपल्या घरात दररोज स्वयंपाक होतो. दुपारी बारा वाजता जेवायचे असले की, दोनेक तास अगोदर तयारी करावी लागते तीच प्रक्रिया आपल्या शरीरात होत असते. समजा बारा वाजता जेवायला बसतो हे शरीरास माहीत असते. मेंदूकडून दोन तास अगोदर सूचना सुटते. जठरात वेगवेगळे पाचक रस आणि एन्झाइम्स तयार होऊन लागतात. जेवल्या नंतर ते अन्न जठरात येते. तिथे हे पाचक रस आणी एन्झाइम्स अन्नात मिसळतात. जठराच्या आकुंचन प्रसरणाने ते अन्नात मिसळून पचनास मदत होतेजेवणानंतर सर्वसाधारणपणे तीन तासांपर्यंत ही पचन क्रिया चालू असते. त्यानंतर ते खालील आतड्यांत उतरते. ठरलेल्या वेळी आपण जेवलो नाही तरी जठरात सवयीने पाचक रस तयार होते.अर्ध्या तासाने तो खालील आतड्यांत उतरतो. अवेळी जेवल्याने जठरात जेव्हा अन्न येते, त्या वेळी तिथे पाचक रस नसतो. या वेळी मेंदूकडून सूचना मिळते. पाचक रस तयार करा. ही प्रक्रिया होई पर्यंत दोन तास लागतात. पाचक रस तयार होतो. त्या वेळी अन्न् जठरातून खाली सरकते. अन्न पुढे पाचक रस मागे असा स्थितीत अपचन होते. पित्त होते म्हणून ठरलेल्या वेळी जेवणे आवश्यक आहे.

कृपया लक्षात असू द्या

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.




No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know