आजीचा बटवा
आजीबाईंच्या बटव्यातील काही घरगुती उपाय
आजीचे घरगुती सल्ले
घरामध्ये आजी असली, की आरोग्याच्या बाबतीतले सल्ले सतत ऐकायला मिळत असतात. या मधील कितीतरी सल्ले आपण, ‘जुन्या गोष्टी झाल्या या’, असे म्हणून दुर्लक्षित करतो, पण आजच्या काळामध्ये देखील या सल्ल्यांमध्ये तथ्य असल्याचे, किंवा घरगुती उपचारांमध्ये आजार बरे करण्याचे सामर्थ्य असल्याचे आता वैज्ञानिक देखील मान्य करतात.
आंब्याचे सेवन
उन्हाळ्याच्या ऋतूचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे आंबे. पण आंबे खाण्याआधी पाण्यामध्ये काही काळ बुडवून ठेऊन मग खावेत असे म्हटले जाते. याचे कारण असे, की आंबा प्रकृतीने उष्ण असून, त्याच्या अति सेवनाने अंगावर उष्णतेचे फोड येऊ शकतात. त्यामुळे आंबे खाण्यापूर्वी काही काळ पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यास, त्यावरील चिक निघून जातो, व त्याची उष्णता देखील कमी होते. आंब्यामध्ये अ आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर आहे. रक्तशुद्धी आणि आतड्यांच्या आरोग्याकरिताही आंबे अतिशय फायदेशीर आहेत.
सकाळी
पाणी पिण्याचा सल्ला
सकाळी उठल्यानंतर लगेच दोन लास पाणी पिण्याचा सल्ला आपल्याकडे सर्वच वडीलधारी मंडळी देत आली आहेत. पाणी प्यायल्याने शरीरातील घातक द्रव्ये लघवीवाटे बाहेर टाकली जातात, व शौचास साफ होते. त्यामुळे शरीरामध्ये स्फूर्ती येऊन मन प्रसन्न राहते. पाणी प्यायल्याने आतड्यांची स्वच्छता होते, व किडनीचे आरोग्य चांगले राहते. तसेच बद्धकोष्ठाची तक्रार उद्भवत नाही.
हळदीचा वापर
जेवणामध्ये हळदीचा वापर करण्याची प्रथा आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. हळद प्राकृतिक अँटी सेप्टिक आणि अँटी बॅक्टेरियल आहे. शरीरातील घाव हळदीच्या सेवनाने ठीक होऊ शकतात. मधुमेहींकरिता हळद विशेष गुणकारी आहे. रक्तशुद्धीसाठी देखील हळद उपयोगी आहे. हळदीमध्ये सूज कमी करणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे गुण आहेत. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधामध्ये एक चिमुट हळद घालून पिणे आरोग्यास लाभकारक समजले जाते.
केसांना तेल मालिश
केसांना तेल लावून मालिश करण्याची पद्धत आता जुनी होत चालली आहे. त्याऐवजी महागडे हेअर प्रोडक्ट्स आणि कंडीशनर्स यांच्यावर खर्च करणे आता जास्त आढळू लागले आहे. पण खोबरेल तेल हे नैसर्गिक कंडीशनर असून, त्याच्या वापराने केसांना नैसर्गिक रूपाने आर्द्रता मिळते. त्यामुळे केस मुलायम, चमकदार तर होतातच, शिवाय केसांच्या मुळांना पोषण मिळून केसगळती कमी होते. खोबरेल तेलामध्ये थोडेसे नारळाचे दूध मिसळून ते केसांना लावल्यास फायदा होतो.
त्वचेची निगा
त्वचेच्या आरोग्यासाठी कडूनिम्बाचा वापर फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. यामध्ये असलेले निम्बडीन सल्फर युक्त असून, त्यामुळे त्वचेचे अनेक विकार बरे होतात. मुरुमे, पुटकुळ्या, त्वचेला सतत सुटणारी खाज, खरुज, आणि सोरायसिस सारखे विकार देखील कडूनिंबाच्या वापराने बरे होण्यास मदत होते. पण जर त्वचा जास्त संवेदनशील असेल, तर मात्र कडूनिम्बाचा वापर करताना काळजी घ्यावी.
भूक नाही लागणे घरगुती उपचार
भूक नाही लागत असणार तर आपण अर्धा चम्मच आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध दिवसातून दोन वेळा जेवणानंतर घेतल्यास भूक लवकर लागते. जास्त करून मेथी ची भाजी खाल्ल्यामुळे आपली भूक नाही लागणे ची समस्या कमी होते आणि आपल्याला जेवण चांगले जाते. भूक लागण्यासाठी काय करावे असा प्रश्न तुमचा मनात येत असेल तर आपल्याला काळे मीठ पाव चमचा,एक चिमुट भर ओवा,१ चमचा जीरा आणि चिमुटभर हिंग घेऊन दिवसातून दोन वेळा आर्धा ग्लास पाण्यात मिसळून पिल्याने आपल्या भूक न लागणे चा घरगुती उपचार होतो.
आजीच्या बटव्यातली काही गुपितं
उन्हाळा वाढला, हवा बदल झाला तब्येत बिघडू शकते. जर घरात कोणी आजारी पडल तर मदतीला धावून येते ती आज्जी आणि तिच्या बटव्यातील तिचे उपाय!! आज्जी नी वैद्यकीय अभ्यास केला नसला तरी तिच्या अनुभवातून तिला बरीच माहिती झालेली असते. असे किती साधे साधे बिनखर्चाचे आणि प्रभावी उपाय आणि उपचार. शिवाय हे सगळे उपाय सहजसुलभ मिळतात आणि अगदी हाताशीच असतात. आई, आजी, काकू, आत्या, मावशी, मामी सगळ्यांनाच असे कितीतरी उपाय माहीतच असायचे. परंपरेनं चालत आलेलं घरगुती शहाणपण म्हणजे खात्रीशीर गुणकारी. काही त्रास व्हायला लागला कि लगेच डॉक्टर कडे पळायची गरज नसते. सोप्पे उपाय करून सुद्धा होणारा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. पण अर्थात घरगुती उपचारांनी प्रकृती मध्ये काही फरक पडला नाही तर मात्र अंगावर न काढता डॉक्टर कडे जाण महत्वाच असत. त्याचबरोबर, घरात काही आवश्यक वस्तू म्हणजेच थेर्मोमीटर, शेकायची पिशवी इत्यादी ठेऊन द्यायची गरज असतेच.
१. ताप-
बऱ्याच वेळा हवा बदलली कि घरात तापाचे पेशंट्स वाढायची शक्यता वाढते. त्यावर घरातल्या घरात करता येण्यासारखा उपाय- १. कडुलिंब, तुळस, बेल यांचा विडा करून खावा.
२. गवती चहा, दालचिनी, बेहेडा, खडीसाखर मिरे हे घालून काढा करून तो काढा पिल्यानी नक्कीच ताप कमी होण्यास मदत होते. ३.घरी बनवलेलं चिकन सूप घेतल्यानी आराम मिळतो.
२. कफ-
कफावर उत्तम घरगुती उपचार-
१. खडी साखर, हळद, कोरफडीचा रस हे मिश्रण मधा मधून चाटणे.
२. जेष्टमदाची कांडी तोंडात बराच वेळ चघळावी.
३. पांढरा कांदा किसून त्याचा काढा दिवसातून २ वेळा घ्यावा.
३. सर्दी, खोकला-
पावसाळ्यात उद्भवणारा त्रास म्हणजे सर्दी आणि खोकला. त्यावर लगेच अॅलोपथी औषध घेण्यापेक्षा घरगुती उपचारांमुळे सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होण्यास मदत होते आणि गोळ्यांचा काही दुष्परिणाम सुद्धा होत नाहीत.
१. उकळलेल्या पाण्यात गवती चहा किंवा निलगिरी घालून त्या पाण्याचा वाफारा घ्या.
२. ओव्याची पाव चमचा पूड कोमट पाण्यातून वरचेवर घ्यावी.
३. सुंठ व लवंगाचा काढा करून त्यात मध घालून ठेवून द्या आणि ते दिवसात २ वेळा घ्यावे.
४. डोळ्याचे विकार -
कॉम्पुटर वर तासंतास बसायला लागल्यामुळे, जास्ती टी. व्ही पाहिल्यामुळे डोळ्यांना त्रास व्हायची शक्यता वाढते. कधी कधी हवामानातल्या वाढलेल्या उष्णतेमुळे सुद्धा डोळ्यांना त्रास होतो. अश्यावेळी आजीच्या बटव्यातले काही उपाय-
१.गुलाब पाण्याच्या घड्या डोळ्यावर ठेवल्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
२. डोळ्यातली उष्णता कमी होण्यासाठी पापाण्यांवरून बर्फ फिरवावा. कधी कधी डोळ्यात धुळीचा कान गेल्यामुळे डोळ्यांमध्ये अस्वस्थ वाटू शकते.
१. एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात डोळ्याची उघडझाप करा. त्यामुळे धुळीचा कण बाहेर पडण्यास मदत होईल.
२. एक स्वच्छ रुमाल घेऊन तो रुमाल गरम पाण्यात भिजवून घ्या. तो व्यवस्थित पिळून डोळा शेकावा.
५. घसा बसला असल्यास-
हवेमुळे किंवा सर्दी झाल्यावर घसा बसू शकतो. त्यासाठी अॅलोपथी च औषध घेण्यापेक्षा आजीच्या बटव्या मधल्या काही युक्त्या-
१. घश्याला सहन होईल इतक गरम पाणी करून त्यात मीठ आणि हळद घालून त्याच्या गुळण्या करा. मीठ आणि हळदी मुळे घश्याला आराम मिळण्यास मदत होते आणि आवाज सुधारण्यास देखील मदत होईल.
२. हळदीचे दूध न विसरता सकाळ संध्याकाळ प्या.
३. दालचिनीचा तुकडा किंवा लवंग तोंडात ठेऊन चघळा.
४. जेष्ठमध, तूप आणि मध याच चाटण बनवून ते वारंवार चाटा.
५.६ काळ्या मनुका गरम पाण्याबरोबर खाल्ल्ल्यानी आवाज सुटण्यास मदत होते.
६. सन बर्न-
कडक उन्हात बाहेर फिरल्यावर सन बर्न चा त्रास जाणवू शकतो. अश्यावेळी आजीचा बटवा कामी येतो.
१. बेकिंग सोडा सन बर्न झालेल्या भागावर लावण्यामुळे त्वचेला आराम मिळण्यास मदत होते.
२. घरात असलेली कोरफडीचा गर सन बर्न झालेल्या भागावर लावावा. त्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.
३. थंड मिल्क कॉम्प्रेस चा वापर केल्यानी सन बर्न चा त्रास कमी होण्यास मदत होते.
७. जीभेला चव नसल्यास-
कधी कधी जिभेची चव एक्मच जाते. कोणत्याही पदार्थाची चव लागली नाही कि विचीत्रच होत. अश्यावेळी आजीच्या बटव्या मधले
उपाय जरूर करून बघा.
१. लिंबाच्या फोडीला थोड मीठ लाऊन टी फोड जिभेला चोळावी.
२. तूप आणि बडीशेप गरम करून थोड्या हळदी मध्ये मिसळून दिवसातून ३ वेळा खावी.
३. तोंडाला चव नसल्यास तोंडल्याची उकडून भाजी खावी. सोबत सुंठ पाणी घ्यावे.
४. आल्याच्या तुकड्याला मीठ लाऊन खाल्ल्यानी तोंडाची चव येण्यास मदत होते.
८. उलटी होत असल्यास-
उलटीचा त्रास व्हायला लागला कि सगळ अवसानच गळून जात. अश्यावेळी आजीच्या बटव्यातून काही सोप्पे उपाय-
१. आल्याचा रस आणि कांद्याचा रस याच मिश्रण प्यावे.
२. आल्याचा काढा बनवून त्याचा एक एक घोट घेतल्यानी फायदा होतो.
३. मिरी बरोबर मीठ घालून ते वाटून घेऊन खावे.
९. मूत्र विकाराचा त्रास होत असल्यास-
जवळजवळ निम्म्याहून अधिक बायकांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच लघवीत जंतूजन्य दाह याचा अनुभव येतो. अस्वच्छता असलेल्या ठिकाणी लघवी ला गेल्यामुळे हा त्रास व्हायची शक्यता जास्ती असते. लाघवी च्या विकारांवर घरातल्या घरात करता येणारे उपाय-
१. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झाल्यावर दह्याच नियमित सेवन केल्यामुळे त्रास कमी झाल्याच दिसून येत.
२. धने आणि जिरे रात्रभर भिजत घालून ते पाणी गळून प्यावे.
३. कोकम सरबत प्यावे.
४. रात्री २ चमचे बडीशेप भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे.
५. गुळामध्ये हळद मिसून खावी.
१०. केसांसाठी-
सुंदर काळे भोर केस प्रतेक बाईला हवे हवेसे वाटत असतात. त्यासाठी जास्ती खर्च न करता घरातले उपाय-
१. केसांना कोरफडीचा गर लावा त्यामुळे केस वाढण्यास फायदा होतो.
२. केसात कोंडा झाला असल्यास तेलात लिंबाचा रस मिसळून ते केसांना लावा.
३. रोज अर्धा चमचा काळे तीळ चावून खाल्ले तर केस गाळण्याचा त्रास कमी होईल.
११. अशक्तपणा आला असल्यास-
मासिक पाळी च्या वेळी अशक्तता जाणवू शकतो. किंवा अगदी फार ताण, श्रम झाले तर अशक्तपणा येतो आणि शरीरातली सगळी शक्ती जाते. त्यावर घराच्या घरी करण्यासारखे उपाय-
१. चना डाळ रात्री भिजत घालून खावी.
२. बीट कापून त्यावर मिरीपूड, मीठ, धने जिरे पूड घालून कच्चा खाव किंवा ते उकडून खाल्लं तर जास्ती उपयुक्त ठरेल.
३. नेमानी ४-५ खजूर किंवा खारीक खावी.
४. जेवल्यावर पिकलेली केळी खावी.
५. जेवणात हिरव्या भाज्या, मोड आलेली धान्य इत्यादीचा समवेश न चुकता करा.
१२. डोक दुखत असल्यास-
डोके दुखी चा त्रास हा कधीही चालू होऊ शकतो. डोक दुखायला लागल ली काही विचार न करता आपण गोळ्या घ्यायचा विचार करतो पण तस करण्याआधी घरगुती उपाय करून बघा. आणि हो. गरज पडली तर डॉक्टर चा सल्ला महत्वाचा आहेच.
१. लवंगाच तेल कपाळाला चोळावे.
२. उन्हातून आल्यावर डोक दुखत असेल तर कांदा फोडून त्याचा वास घ्यावा आणि तळपायाला चोळावा.
३. रात्री काळ्या मनुका खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावे.
४, गाई च्या दुधार सुंठ उघळून त्याचा लेप कपाळावर लावावा. आणि त्यावर कापूस लाऊन ठेवावा.
सारांश
बरेच उपाय आजीच्या बटव्यात असतात. थोडा त्रास होत असल्यास लगेच डॉक्टर कडे जाण्यापेक्षा आधी हे उपाय करून बघा. त्यानी तुमचे पैसे तर वाचतीलच आणि महत्वाच म्हणजे तुम्हाला त्रासातून मुक्ती देखील मिळेल. पण जर कोणताही त्रास वाढला तर मात्र घरगुती औषध घेण्यापेक्षा डॉक्टर चा सल्ला घेण कधीही हितावह ठरत आणि आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते त्यामुळे गरज असेल तर डॉक्टरचा सल्ला नेहमीच महत्वाचा.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know