आयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी
आयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी कोणत्या धातूची आहेत यावर त्यामध्ये केलेल्या पदार्थाचा गुणधर्म व त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. म्हणूनच वैदिक, आयुर्वेदशास्त्रावरील विविध ग्रंथ तसेच पाकशास्त्रावरील ग्रंथांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्यार भांड्यांकडे विशेष लक्ष दिलेले दिसते.
आयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी कोणत्या धातूची आहेत यावर त्यामध्ये केलेल्या पदार्थाचा गुणधर्म व त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अवलंबून असतो. म्हणूनच वैदिक, आयुर्वेदशास्त्रावरील विविध ग्रंथ तसेच पाकशास्त्रावरील ग्रंथांमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणार्यार भांड्यांकडे विशेष लक्ष दिलेले दिसते.
सोन्याची, चांदीची, कांस्याची भांडी
आयुर्वेदानुसार, सोन्याच्या भांड्यात अन्न ठेवल्याने ते निर्वषी, बलवर्धक होते, सर्व धातूंची पुष्टी करते. चांदीच्या भांड्यातील जेवण त्रिदोषशामक असून ते मेंदू व डोळ्यांचे आरोग्य सुधारते. तसेच कांस्याच्या भांड्यातील जेवण त्रिदोषनाशक, बुद्धिवर्धक असून ते रक्तशुद्धी करते. शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी लोखंडी पात्रात जेवण शिजवावे, असे आयुर्वेद शास्त्रात म्हटले आहे. आयुर्वेदात तांबे व पितळ हे औषधी धातू म्हणून ओळखले जातात. तांब्याच्या भांड्यात शिजवलेला भात वातशामक, स्मृतिवर्धक असतो. तांबे आणि जस्त मिश्रित धातू म्हणजे पितळ. धन्वंतरीला पितळ जास्त प्रिय होते म्हणून त्याला नैवे दाखवताना पितळेची थाळी वापरली जाते, असे म्हटले जाते. पितळेच्या भांड्यात जेवल्याने वायू-कफ दोष नाहीसा होतो. आयुर्वेदात आणि पाकशास्त्रावरील विविध ग्रंथांमध्ये मातीची भांडी ही स्वयंपाकासाठी सर्वश्रेष्ठ सांगितली आहेत. त्यातून शरीरास कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, मॅग्रेशिअम, गंधक मिळते.
मातीपासून तयार भांडी
अतिशय कोरड्या जागेवरील मातीपासून तयार केलेल्या भांड्यात स्वयंपाक केल्यास रक्तदोष नाहीसे होऊन त्वचाविकार दूर होतात. पाणथळ जागेवरील मातीपासून तयार केलेली भांडी वापरल्यास कफविकार दूर होतात आणि दलदलीच्या जागेवरील माती वापरल्यास पचनसंस्था मजबूत होते. सामान्यतः राजघराण्यांमधून सोने व चांदीची भांडी आवर्जून वापरत, तरसर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात दगड, माती, तांबे व पितळेची भांडी वापरली जात असत. कधी काळी घरची श्रीमंती ही स्वयंपाकघरातील भांड्यांवरून ठरत असे. एखादे धातूचे भांडे चेमले तर ठोकून पूर्ववत केले जाई आणि फुटलेच तर त्याला डाग लावून पुन्हा वापरले जाई. मात्र काळाच्या ओघात तांबे- पितळ महाग झाल्याने तसेच लोखंडी भांड्यांना गंज येत असल्याने या सर्व भांड्यांची जागा स्टेनलेस स्टीलच्या आणि अॅयल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली.
नॉनस्टिक, काचेच्या भांड्यात स्वयंपाक
सध्याच्या वेगवान जीवनपद्धतीत (फास्ट लाईफस्टाईल) नॉनस्टिक, उष्णतेमुळे न फुटणार्याच पायरेक्ससारख्या काचेच्या आणि ‘ओव्हन फ्रेंडली' सिरॅमिक्सच्या भांड्यामुळे स्वयंपाक करणे सोपे झाल्याने, घरातील जुनी भांडी एक तर ती अडगळीच्या खोलीत जाऊन पडत आहेत किंवा मोडीत निघत आहेत. मात्र ही भांडी म्हणजे केवळ स्वयंपाक रांधण्याचे साधन नसून तत्कालीन सामाजिक, आर्थिक इतिहास समजावून घेण्याचे एक माध्यमही आहे. अनेकदा या भांड्यांवरून कुटुंबाचा इतिहास समजतो. नवीन भांडे घेत असताना त्यावर आवर्जून नावव तारीखही नोंदवली जात असल्याने त्यावरून आपल्या कुळाचा इतिहास, तत्कालीन भाषेचा-लिपीचा विकास ज्ञात होतो.
शरीरासाठी घातक भांडी
या ५ प्रकारच्या भांड्यामध्ये जेवण म्हणजे शरीरासाठी अतिशय घातक
अन्न पदार्थ शिजवण्यासाठी वेगवेगळ्या भांड्याची गरज असते. ही भांडी आपलं सर्वस्व त्या पदार्थांला देत असतात. एखाद्या पदार्थाची पौष्टिकता ही त्या भाड्यांमुळे वाढत असते. जसं योग्य आणि पौष्टिक अन्न खायला हवं तसंच पदार्थासाठी योग्य असलेली भांडी जेवण बनवण्यासाठी वापरायला हवीत. एखादा पदार्थ विशेष भांड्यात बनवला तर त्या पदार्थाचे विघटन होऊन ते शरीरासाठी घातक असते.
पदार्थ बनवताना जिन्नस ज्याप्रमाणे स्वच्छ करून घेतात त्याप्रमाणे भांड देखील स्वच्छ असणं गरजेचं असतं. ज्याप्रमाणे पितळेच्या भांड्यात जेवण करण्यापूर्वी त्या भांड्याला कलही लावून घेणं गरजेच असतं. तसेच भिडाच्या कढईतही केलेले काही पदार्थ शरीरासाठी उत्तम असतात. अगदी तसेच लोखंडाच्या कढईतही तयार केलेल्या अन्नपदार्थात लोह निर्माण होतं. जे शरीरासाठी उपयुक्त असते. मात्र तयार झाल्यानंतर हा पदार्थ फार काळ त्या कढईत ठेवू नये.
चमकदार कोटिंग असलेली भांडी खरेदी करू नका
कॉपर कूकवेअर हे सहसा शिजवण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी निरोगी पर्याय मानले जाते. तांब्यामध्ये अन्नाची उष्णता दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची गुणवत्ता असते. तांब्याच्या भांड्यात खारट अन्न शिजवण्याचा सल्ला दिला जात नाही कारण मिठात असलेले आयोडिन तांब्यावर त्वरीत प्रतिक्रिया देते, ज्यामुळे तांब्याचे कण अधिक बाहेर पडतात. त्यामुळे अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे.
ऍल्युमिनियम कूकवेअर खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्या
आणखी एक सामान्यतः वापरले जाणारे भांडे म्हणजे अॅल्युमिनियम, जे तुम्ही शिजवता किंवा सर्व्ह करता तेव्हा ते खूप आकर्षक वाटू शकते, परंतु जसे ते म्हणतात- 'जे काही चकाकते ते सोन्याचे नसते', अॅल्युमिनियमने बनवलेले कूकवेअर वापरणे योग्य नसते! अॅल्युमिनियम खूप लवकर गरम होते आणि आम्लयुक्त भाज्या आणि खाद्यपदार्थांवर सहज प्रतिक्रिया देते, म्हणून अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. या रासायनिक अभिक्रियांचा तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.
पारंपरिक पितळेच्या भांड्याचा विचार करताय?
तुम्ही तुमच्या आजीला पितळेच्या स्वयंपाकाच्या भांड्यात स्वयंपाक करताना पाहिले असेल, जे अक्षरशः इतके जड होते की ते उचलणे खूप कठीण होते! खरे तर पितळेच्या ताटात शिजवून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असा सर्वसामान्यांचा समज होता. पितळेच्या भांड्यात खाणे हे स्वयंपाकाच्या तुलनेत हानिकारक नव्हते. गरम झाल्यावर पितळ मीठ आणि आम्लयुक्त पदार्थांवर सहज प्रतिक्रिया देते. त्यामुळे अशा भांड्यांमध्ये स्वयंपाक करणे टाळावे.
स्टेनलेस स्टील किती महत्वाचे
स्टेनलेस स्टीलची भांडी ही सर्वात जास्त वापरल्या जाणार्या कूकवेअरपैकी एक आहे, परंतु बहुतेक लोकांना हे माहित नाही की तुमचे आवडते जेवण शिजविणे हे आरोग्यदायी पर्याय नाही. स्टेनलेस स्टील हे धातूचे मिश्रण आहे, जे क्रोमियम, निकेल, सिलिकॉन आणि कार्बन यांचे मिश्रण आहे. स्टेनलेस स्टील आम्लयुक्त पदार्थांवर प्रतिक्रिया देत नाही. पण तुम्ही स्टेनलेस स्टीलची भांडी विकत घेण्यापूर्वी, गुणवत्ता तपासा कारण ती धातूंच्या मिश्रणाने तयार केली जाते, जी योग्य प्रकारे तयार न केल्यास मानवी शरीरासाठी हानिकारक असू शकते. त्यामुळे, नेहमी उच्च दर्जाची आणि टिकाऊ स्टेनलेस स्टीलची भांडी घ्या.
लोखंडाची कढईत करावा स्वयंपाक?
इतर भांडींच्या विपरीत, लोहाच्या कूकवेअरमध्ये स्वयंपाक करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे कारण ते नैसर्गिकरित्या लोह सोडते, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक आहे. किंबहुना, काही अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की लोखंडी भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याची पारंपारिक पद्धत, गर्भवती मातांसाठी चांगली आहे कारण ती गर्भाशयात बाळाला विकसित होण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांचा उत्तम पुरवठा करते.
किराणासामान साठवण्यासाठी भांडी
थोडक्यात, चार जणांच्या कुटुंबासाठी भांडी
तांदूळ, गहू/आटा: (५ किलोचे स्टीलचे २ डबे)
तूरडाळ, गूळ, साखर: (१ किलोचे स्टीलचे ३ डबे)
इतर डाळी म्हणजे मूगडाळ, उडीद डाळ, हरभऱ्याची डाळ, हिरव्या मुगाची डाळ, मसुराची डाळ: अर्धा किलोच्या ५ काचेच्या बरण्या
कडधान्यं म्हणजे मूग, मटकी, चवळी, राजमा, वाटाणा: अर्धा किलोच्या ५ काचेच्या बरण्या
पोहे, रवा, बेसन, इडली रवा, साबुदाणा, भाजणी इ. १ किलोचे ८ स्टीलचे डबे
सुक्या लाल मिरच्या-सुकं खोबरं-शेंगदाणे: १ किलोच्या ४ काचेच्या बरण्या
धणे, जिरे, मोहरी, हळद, तिखट, मसाला: पाव किलोच्या ६ काचेच्या बरण्या
इतर बारीकसारीक पदार्थांसाठी: १०० ग्रॅमच्या ६ छोट्या बरण्या
५ किलोचे २ स्टीलचे डबे,
१ किलोचे १२ स्टीलचे डबे (मुद्दाम जास्त असू द्या. एरवी जास्तीचे पदार्थ साठवायला कामाला येतात.)
अर्धा किलोच्या १० काचेच्या बरण्या,
पाव किलोच्या ६ काचेच्या बरण्या, आणि
१०० ग्रॅमच्या १२ बरण्या
एवढी भांडी साठवण्यासाठी वापरली जायला हवीत.
रोजच्या वापरासाठी किती भांडी
दुधाची पातेली – साधारण दीड ते दोन लिटरची ३ स्टीलची पातेली किंवा दुधाचे कुकर.
एक आज वापरायला, एक उद्या वापरायला आणि एक जास्तीचं दूध काढून ठेवायला.
स्टीलची ठोक्याची पातेली – अर्ध्या लिटरपासून २ लिटरपर्यंतची साधारण ४ पातेली
आमटी, पातळ भाजी, रस्सा, कढी, सूप, सार, वरण, आमटी इ. उकळण्यासाठी आणि काढून ठेवायला. ठोक्याची मोठी पातेली – ५ लिटरची मोठी २ पातेली. इडली-डोशाचं पीठ आंबवणं, श्रीखंड, दहीवडे यासाठी दही लावणं, दूध आटवणं, पाहुणे आल्यास जास्त प्रमाणात मसालेभात - पुलाव यासाठी वापरता येतात. कढया – २ लिटरच्या सर्जिकल स्टीलच्या २ कढया, २ लिटरची एक लोखंडी कढई, नॉनस्टिकची १ लिटरची १ कढई, वरून फोडणी घालण्यासाठी १ छोटी लोखंडी कढली.
तवे – ४
एक पोळ्यांसाठी (हार्ड अनोडाइज्ड किंवा लोखंडी), एक डोसे, उत्ताप्पे यांसाठी (बिडाचा), एक नॉनव्हेज फ्राय पदार्थांसाठी (नॉनस्टिक किंवा सिरॅमिक कोटिंगचा), एक भाकरी, थालिपीठं यासाठी (लोखंडी). फ्रायिंग पॅन्स – २. तसराळी आणि परात - ५
एक मोठी परात (स्टील किंवा पितळेची)
चार एकात एक बसतील अशी तसराळी, एखादं पीठ भिजवण्यासाठी, कोशिंबीर, रायता इ. कालवण्यासाठी (स्टीलची)
एक ऑम्लेटसाठी, एक शॅलो फ्रायसाठी.
कुकर – ३ (स्टीलचे)
किमान दोन कुकर असलेले म्हणजे एक लहान आणि एक मध्यम, हे केव्हाही सोयिस्कर. लोकाचं जेवणखाण आणि तसा गोतावळा असेल तर तिसरा म्हणजेच मोठा कुकरही असायला हवा. ताटं-वाट्या-चमचे
१२ ताटांचा सेट, १२ वाट्या, १२ ग्लास किंवा पाणी प्यायची भांडी, २ तुपाची भांडी, १२ बोल्स, २ डझन चमचे.
हानिकारक, सुरक्षित, आणि हितकारक मटेरियल
हानिकारक मटेरियल्समध्ये मुख्यतः
प्लॅस्टिक आणि ऍल्युमिनियम हानिकारक मटेरियल्समध्ये येतात. अगदी प्रत्येक स्वयंपाकघरात प्लॅस्टिकचे डबे, ऍल्युमिनियमचे तवे असतातच. गंमत म्हणजे घरात मुबलक आढळणारं प्लॅस्टिक आरोग्यासाठी तितकंच घातक आहे. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचं किती नुकसान होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण वैयक्तिक पातळीवर आपल्या आरोग्याचंही ते तितकंच नुकसान करत आहे. आजकाल सर्वत्र हॉर्मोनल इम्बॅलन्स वाढल्याच्या तक्रारी ऐकू येतात, त्यात इतर कारणांबरोबर प्लॅस्टिकचा स्वयंपाकघरात वाढलेला वापर हेही एक कारण आहे. याचं कारण म्हणजे प्लॅस्टिक कंटेनरमध्ये साठवलेल्या/ शिजवलेल्या पदार्थांमुळे शरीरातल्या अंतःस्रावी ग्रंथींच्या कामात बाधा येते. प्लॅस्टिक वापरल्याने कॅन्सर होतो या विधानाला थेट शास्त्रीय पुरावा नसला तरी अंतःस्रावी ग्रंथींचा आणि हॉर्मोन्सचा समतोल बिघडणं अनेक समस्यांना जन्म देतं. तीच गोष्ट ऍल्युमिनियमची. ऍल्युमिनियमचा संबंध अल्झायमर(स्मृतीभ्रंश) या रोगाशी लावला जातो. उच्च तापमानाला ऍल्युमिनियम विघटित होऊन त्याचे सूक्ष्म कण अन्नात मिसळू शकतात. अन्नातल्या आम्लधर्मी घटकाशी त्याची लवकर रासायनिक विक्रिया होऊन शरीराला अपायकारक संयुगं तयार होतात. त्यामुळे ऍल्युमिनियम भांड्यांत अन्न शिजवणं टाळा, शिजवलंच तर ते ताबडतोब दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा.
सुरक्षित मटेरियलपासून बनलेली भांडी
स्टेनलेस स्टील, काच, माती, दगड यांपासून बनलेली भांडी शरीराला खास पोषण वगैरे पुरवत नसली तरी वापरायला पूर्णपणे सुरक्षित असतात. यात पदार्थ साठवणं, शिजवणं तुम्ही डोळे झाकून करू शकता.
तिसऱ्या प्रकारातली भांडी म्हणजे लोखंड, तांबं यांपासून बनवलेली भांडी. ही सुरक्षितच नाहीत तर आरोग्यासाठी हितकारकही आहेत. तांब्यामध्ये सूक्ष्म जीवविरोधी गुणधर्म असल्याने आजही अनेक घरांत पिण्याचं पाणी साठवण्यासाठी तांब्याची भांडी वापरली जातात. शिवाय तांब्यातून उष्णतेचं वहन जलद होत असल्याने ही भांडी लवकर तापतात. कॉपर बॉटमच्या भांड्यांमध्ये हेच तत्त्व वापरलेलं असतं. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात तळाला तांब्याचा थर दिल्याने भांडं लवकर तापतं आणि इंधनाची बचत होते. मात्र तांब्याच्या भांड्यात ताक वगैरेंसारखे आम्लधर्मी पदार्थ ठेवू नका. यातल्या आम्लाची तांब्याबरोबर रासायनिक विक्रिया होऊन पदार्थाला कळकल्यासारखी चव येते. शिवाय तांब्यापितळ्याची भांडी दमट हवेच्या संपर्कात आल्याने क्युप्रस क्लोराईड नावाचं संयुग तयार होऊन भांड्यावर हिरवट राप तयार होतो. त्यामुळे ती वरचेवर स्वच्छ करावी लागतात. लोखंडी भांडी - तवे, कढया, उलथणी, खलबत्ता - वापरणं आरोग्यदृष्ट्या अत्यंत हितकारक आहे. यामुळे नियमितपणे लोह पोटात जातं.
आरोग्यासाठी कोणती भांडी फायदेशीर
तांब्याचा वापर - तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तांब्याच्या ग्लासात किंवा भांड्यात साठवलेले पाणी प्यायल्यास पचनक्रिया चांगली होते आणि जखमा लवकर भरून येण्यासही मदत होते. एवढेच नाही तर तांब्याची भांडी हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहेत. पण, आंबट वस्तू तांब्याच्या भांड्यात बनवू नये किंवा ठेवू नयेत. मेडलाइनप्लसच्या मते, आपण स्वयंपाक करताना तांबे देखील वापरू शकता. पण त्याचा अतिवापर केल्यास जुलाब, मळमळ किंवा चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकतात. त्यावर दुसर्या धातूचा लेप लावून स्वयंपाकासाठी वापरल्यास ते चांगले होईल.
नॉनस्टिक भांडी
यात भांड्याच्या पृष्ठभागावर पॉलिटेट्राफ्ल्यूरोइथिलिन या मटेरियलचा थर दिलेला असतो. या थरामुळे अन्नातल्या रेणूंचा भांड्याच्या रेणूंशी थेट संपर्क न आल्याने त्यांच्यात बंध निर्माण होत नाहीत आणि पदार्थ भांड्याला चिकटत नाही. परंतु कालांतराने हे कोटिंग निघू लागतं. अशा वेळी ही भांडी वापरू नका.
पितळेचा
वापर
आपण पितळेच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवू शकता, परंतु त्यावर स्टीलचा
लेप लावल्यावरच स्वयंपाक करताना वापरणे चांगले. वास्तविक, हा धातू गरम झाल्यावर मीठ
आणि आम्लयुक्त पदार्थांवर रिअॅक्शन देऊ शकतो, म्हणून त्यात स्वयंपाक करणे टाळले पाहिजे.
पण तुम्ही त्याचा ग्लास आणि प्लेट नक्कीच वापरू शकता. पितळेच्या भांड्यातून खाल्ल्याने
रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि यकृत चांगले राहते.
लोहाचा
वापर
स्वयंपाक करताना आपण लोखंडी कढई, तवा इत्यादींचा वापर केला तर त्यामुळे
शरीरातील हिमोग्लोबिन सुधारते आणि लाल रक्तपेशींच्या विकासास मदत होते. मात्र, त्यात
रसम, सांबार इत्यादी आंबट पदार्थ कधीही बनवू नका. रिअक्शन होऊन अन्नाची चव देखील खराब
होऊ शकते. इतकेच नाही तर त्यामुळे भाज्यांचा रंगही गडद होऊ शकतो.
स्टील
वापरणे
स्टील हे स्वयंपाकासाठी तसेच खाण्यासाठी सर्वात योग्य धातू मानले जाते.
उच्च उष्णतेवरही त्यातून अन्नावर कोणतीही रिअॅक्शन होत नाही. नॉन-रिएक्टिव गुणधर्मांमुळे
आपण त्यात काहीही खाऊ आणि पिऊ शकता. त्याशिवाय बिनधास्त कोणत्याही उष्णतेवर काहीही
शिजवू शकतो. आरोग्यासाठीही त्याचा वापर फायदेशीर आहे.
सारांश
फॅशनच्या या युगात मॉड्युलर किचनचा ट्रेंड आहे, लोक स्वयंपाकासाठी विविध प्रकारची भांडी देखील वापरत आहेत. एकीकडे नॉन-स्टिक पॅनचा वापर वाढला आहे, तर खाण्यापिण्यासाठी लोक फायबर, ग्लास, स्टील किंवा बोन चायना भांड्यांमध्ये खाण्याला प्राधान्य देतात. तरी अजूनही बरीच कुटुंबे आहेत जी तांबे, पितळ यांसारख्या भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आणि सर्व्ह करणे पसंत करतात. मेडलाइन प्लस च्या मते, पूर्वीच्या काळात वापरण्यात येणारी भांडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर होती. उदाहरणार्थ, जर आपण लोखंडाच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवले तर शरीरात लोहाची कमतरता भासणार नाही आणि शरीरातील हिमोग्लोबिनची पातळीही चांगली राहील.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know