चटकदार चिवड्यांचे प्रकार
चिवडा हा अनेकांचा आवडीचा. दिवाळीतील चटकदार आणि 'करावा तसा आवडणारा' अशा प्रकारातील हा पदार्थ आहे. चिवडा नुसताही खाता येतो किंवा भेळ, मिसळ, दहीभात यांचा लज्जतही वाढवते. त्यात चिवड्याचे अनेक प्रकार आहेत, त्यातील तुम्हाला कोणत्या प्रकारचा चिवडा खायला जास्त आवडतो, तो चिवडा बनवा.
खमंग चुरमुरे किंवा मुरमुरा चिवडा
हा चिवडा तयार करण्यासाठी जास्त वेळ किंवा मेहनत लागत नाही आणि ही साधी आणि सोपी रेसिपी वापरून घरी सहज तयार करता येते.
साहित्य:
३ कप पुफ केलेला तांदूळ (चुरमुरे - मुरमुरे)
चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर
तडका साठी:
1 ½ टेबलस्पून तेल
१ टीस्पून मोहरी
7-8 कढीपत्ता
२ टेबलस्पून शेंगदाणे
¼ टीस्पून हिंग
¼ टीस्पून हळद पावडर
½ टीस्पून लाल तिखट
गार्निशिंग साठी
¼ कप सेव्ह
¼ कप कोथिंबीर पाने (चिरलेली)
एक लहान आकाराचा कांदा (चिरलेला)
एक लहान आकाराचा टोमॅटो (चिरलेला)
कृती-
ताजे पुफ केलेले तांदूळ (मुरमुरे) घ्या. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि शेंगदाणे घालून एक मिनिट परतून घ्या.
नंतर मीठ, लाल तिखट, हळद आणि पुफ केलेला तांदूळ घालून चांगले मिक्स करा आणि मंद आचेवर २ मिनिटे तळून घ्या.
पावडर साखर घालून चांगले मिक्स करा आणि मंद आचेवर एक मिनिट तळून घ्या.
सर्व्ह करताना कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि शेव घालून सजवा.
कोथिंबीर चिवडा:
साहित्य- अर्धा किलो जाड पोहे, अर्धा चमचा आमचूर, एक चमचा पिठीसाखर, आठ-दहा मिरच्या, पुदिना, दोन चमचे धणे पावडर, एक वाटी चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या सात-आठ हिरव्या मिरच्या, दीड चमचा मीठ, फोडणीसाठी अर्धा चमचा जिरे-मोहरी-हळद, एक चमचा पिठीसाखर, आठ-दहा मिरच्या, मूठभर पुदिना.
कृती- सुरवातीला पोहे तळून घ्या. पुदिना व मिरच्या एकत्र वाटून प्लेटमध्ये पसरुन ठेवा. दोन-तीन तास सुकवा. फोडणीसाठी पाव वाटी तेल घेऊन त्यात जिरे-मोहरी घालून त्यावर वाटण परतून मंद आचेवर कुरकुरीत किंवा सुके करा. नंतर मीठ, साखर, जिरेपूड, आमचूर व तीळ घालून जरा परतून उतरवून घ्या. त्यात पोहे घालून सर्व नीट हलवा. तयार चिवडा गार झाल्यावर डब्यात भरा.
स्वादिष्ट ओट्स चिवडा:
साहित्य - १ कप ओट्स, १ कप पोहे, १/४ कप शेंगदाणे, २ टेबल स्पून चना डाळ, १/२ टी स्पून लाल मिरची पाडवर, १/२ टी स्पून हळदी, १/२ टी स्पून काळी मिरची, १/२ टेबल स्पून साखर.
कृती- सुके ओट्स आणि पोहे घ्या आणि ती हलकेसे भाजून घ्या. आता एक पॅन घ्या आणि त्यात थोडेसे तेल, राई, शेंगदाणे, कढीपत्ता, हिंग आणि मसाले चवीसाठी टाका. ती चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या. आता चना डाळ आणि सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करुन टाकून ती एकत्र करा. आता भाजलेले ओट्स आणि पोह्यांचे मिश्रण टाका आणि मसाले खाली-वर करुन घ्या. मग घ्या ओट्स चिवड्याचा आनंद.
पातळ पोह्यांचा चिवडा:
साहित्य- पातळ पोहे 1 किलो, शेंगदाणे पाव किलो, पंढरपुरी डाळे 100 ग्रॅम, तेल अर्धा किलो, मीठ चवीनुसार, पिठीसाखर अर्धी वाटी, हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे, लाल तिखट 1 ते दीड चमचा, तीळ दोन चमचे, सायट्रिक अॅसिड (लिंबू सत्व)अर्धा चमचा, जिरेपूड एक चमचा, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता.
कृती- कढईत दोन चमचे तेल घालून त्यावर चार वाट्या पातळ पोहे, पाव चमचा मीठ घालून खमंग भाजून घ्या. भाजलेले पोहे कागदावर पसरून ठेवा. अशाप्रकारे सर्व पोहे भाजून घ्या. नंतर तेल तापल्यावर शेंगदाणे तळून घ्या. कढईत एक ते दीड वाटी तेल ठेवून उरलेले तेल बाजूला ठेवा. कढईतील तेलात मोहरी, कढीपत्ता, मिरची ठेचा, सायट्रिक अॅसिड घाला. सर्व तडतडायचे थांबल्यावर हिंग, हळद घालून फोडणी करा. कागदावरचे पोहे परातीत किंवा मोठ्या पातेल्यात घेऊन त्यावर डाळे ( न भाजता, तळता), तळलेले शेंगदाणे घाला. त्यावर लाल तिखट, चवीनुसार मीठ, पिठीसाखर घालून जिरेपूड घाला. सर्व मिश्रण कालवून वरून अंदाज घेत फोडणी ओता. सर्व मिश्रण नीट एकत्र करा. चव घेऊन आवश्यकतेनुसार साखर, मीठ, तिखट वाढवा. आवडत असल्यास चिवड्यात पाव किलो तिखट बुंदी व पाव किलो मध्यम जाडीची शेव मिसळा. चिवडा दिसतोही छान व लागताहो फारच चविष्ट. गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
उपवासाचा बटाट्याचा चिवडा:
उपवासाचा बटाट्याच्या चिवडा हा घरी बनवता येतो. हा चिवडा चवीला स्वादीस्ट लागतो. बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी बटाटे सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घेतले आहेत. बटाटे किसून पाण्यात घालून त्यामध्ये १/४ टी स्पून सोडा घालावा त्यामुळे बटाट्याचा कीस हलका होतो.
साहित्य:
८ मोठ्या आकाराचे बटाटे
१ कप शेगदाणे
१/४ कप काजू तुकडा
१/२ कप बेदाणे
१/२ कप पिठीसाखर
मीठ चवीने
तूप चिवडा तळण्यासाठी
फोडणी करीता:
२ टे स्पून तूप
१ टी स्पून जिरे
६-७ हिरव्या मिरच्या
कृती:
बटाटे धुऊन, सोलून मोठ्या भोकाच्या किसणीने किसून घ्या. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सोडा घालून किसलेला बटाट्याचा कीस घालून हलवून पाणी काढून टाका. मग बटाट्याचा कीस स्वच्छ कापडावर ५-१० मिनिट पसरवून ठेवा. शेगदाणे भाजून व सोलून घ्या. हिरव्या मिरच्याचे तुकडे कापून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये बटाट्याच्या कीस गुलाबी रंगावर कुरकुरीत तळून घेऊन पेपरवर ठेवा. मग भाजलेले शेगदाणे, बेदाणे व काजू तळून घ्या. मग सर्व मिक्स करून घ्या.
फोडणी साठी तूप गरम करून घेऊन त्यामध्ये जिरे व हिरव्या मिरच्या घालून मिक्स करून फोडणी तळलेल्या कीसावर घालून मिक्स करून घ्या. मग वरतून मीठ व पिठीसाखर घालून हातानी मिक्स करून घ्या. चिवडा थंड झालाकी डब्यात भरून ठेवा.
मक्याच्या पोह्यांचा चिवडा:
साहित्य- मक्याचे पोहे पाव किलो, शेंगदाणे 100 ग्रॅम, पंढरपुरी डाळे 100 ग्रॅम, तेल, मीठ चवीनुसार, पिठीसाखर पाव वाटी वाटी, हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे, लाल तिखट 1 ते दीड चमचा, तीळ दोन चमचे, सायट्रिक अॅसिड (लिंबू सत्व) अर्धा चमचा, जिरेपूड एक चमचा, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता.
कृती- कढईत दोन चमचे तेल घालून त्यावर मक्याचे पोहे, पाव चमचा मीठ घालून खमंग भाजून घ्या. भाजलेले पोहे कागदावर पसरून ठेवा. अशाप्रकारे सर्व पोहे भाजून घ्या. नंतर तेल तापल्यावर शेंगदाणे तळून घ्या. कढईत एक ते दीड वाटी तेल ठेवून उरलेले तेल बाजूला ठेवा. कढईतील तेलात मोहरी, कढीपत्ता, मिरची ठेचा, सायट्रिक अॅसिड घाला. सर्व तडतडायचे थांबल्यावर हिंग, हळद घालून फोडणी करा. कागदावरचे मक्याचे पोहे परातीत किंवा मोठ्या पातेल्यात घेऊन त्यावर डाळे (न भाजता, तळता), तळलेले शेंगदाणे घाला. त्यावर लाल तिखट, चवीनुसार मीठ, पिठीसाखर घालून जिरेपूड घाला. सर्व मिश्रण कालवून वरून अंदाज घेत फोडणी ओता. सर्व मिश्रण नीट एकत्र करा. चव घेऊन आवश्यकतेनुसार साखर, मीठ, तिखट वाढवा.
तळलेल्या पोह्यांचा चिवडा:
साहित्य- दगडी पोहे (जाड) अर्धा किलो, बाकी सर्व साहित्य पातळ पोह्याच्या चिवड्याचे, एक वाटी काजू तुकडा, अर्धा वाटी बेदाणे.
कृती - कढईत तेल तापवून तळणीने थोडे-थोडे पोहे घालून तळून घ्या. काजू पाकळी, बेदाणे, शेंगदाणे तळून घ्या. डाळे न तळता न भाजताच घाला. हे सर्व एकत्र करून त्यावर लाल तिखट, पिठीसाखर, मीठ घाला. वरून फोडणी (तीळ, कढीपत्ता फोडणीत घालून) घाला. चिवडा ठेवा.एकसारखा करून डब्यात भरू ठेवा.
कॉर्नफ्लेक्स चिवडा:
साहित्य: 2 कप कॉर्नफ्लेक्स, 1 चमचा तेल, 1 टीस्पून मोहरी, 7-8 कढीपत्ता, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 टीस्पून बडीशेप, 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे बदाम, 1 चमचा भाजलेली चणा डाळ, 1/4 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून चाट मसाला, 2 चमचे साखर, 2 चमचे किशमिश.
कृती: सुरवातीला, एका पातेल्यात तेल घालूनम गॅस मंद आचेवर ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि कढीपत्ता घाला. नंतर हिरवी मिरची, बडीशेप, शेंगदाणे, बदाम आणि चणा डाळ त्यात तळून घ्या. यानंतर, तेलात हळद, लाल तिखट घाला आणि चांगले मिक्स करा. आता त्यात कॉर्नफ्लेक्स घालून मिक्स करा. यानंतर साखर, चवीनुसार मीठ, चाट मसाला आणि मनुका घालून चांगले मिक्स करा. तयार कॉर्नफ्लेक्स चिवडा नमकीन चहा बरोबर खा. तुम्ही हा नमकीन चिवडा एका बॉक्समध्ये भरून ठेवू शकता.
बटाटा तिखट चिवडा
साहित्य:
500 ग्रॅम बटाटे मोठे (किसून)
1 टेबलस्पून लाल तिखट
मीठ चवीनुसार
1 टीस्पून पिठीसाखर
1-1/2 टीस्पून लिंबू रस
1/8 कप शेंगदाणे
शेंगदाणा तेल (तळणीसाठी)
कृती:-
प्रथम बटाटे सोलून घ्या. नंतर जाड किसणी वर किसून घ्यावे. गॅस वर पाणी उकळत ठेवा. त्यात बटाटा किस घालून 4 ते 5 मिनिटे ठेवून नंतर चाळणीवर उपसून घ्यावे.
एका कपड्यावर घालून पाणी त्यातले टिपून घ्या. नंतर फॅन खाली पसरवून ठेवा. थोडा कोरडा झाल्यानंतर कढईत तेल तापत ठेवा. त्यात थोडा थोडा किस घालून कुरकुरीत तळून घ्या. शेंगदाणे तळून घ्या.
तळलेल्या किसावर, शेंगदाणे, लाल तिखट, मीठ चवीनुसार, पिठीसाखर, लिंबू रस घालून एकजीव करून घ्या.
साबुदाणा चिवडा
साबुदाणा चिवडा वापरून पहा जो तुमच्यासाठी उपवासाच्या वेळी उपलब्ध असलेला सर्वोत्तम नाश्ता आहे. कारण ते तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही, ही ओठ-स्मॅकिंग रेसिपी बनवता येते ज्यामुळे अचानक भुकेच्या वेदनांपासून सुटका मिळवता येते ज्यामुळे तुम्हाला खरोखर वाईट वाटते. हा क्रिस्पी स्नॅक सर्व वयोगटातील लोकांना आवडतो आणि आम्ही पैज लावतो की जो कोणी एकदा वापरून पाहतो त्याला पुन्हा पुन्हा ते आवडेल. तर, पुढे जा आणि खाली दिलेल्या सोप्या पायऱ्या पहा आणि आपल्या मित्र आणि कुटुंबासह मोहक चव चा आस्वाद घ्या.
साहित्य: ३ हिरव्या मिरच्या चिरलेल्या
आवश्यकतेनुसार मीठ
२ चमचे साखर
१/२ कप काजू
आवश्यकतेनुसार शुद्ध तेल
आवश्यकतेनुसार काळी मिरी
२ कप साबुदाणा
१/२ कप कच्चे शेंगदाणे
कृती:- सुरुवातीला, मध्यम आचेवर पॅन ठेवा आणि त्यात रिफाइंड तेल घाला. गरम झाल्यावर त्यात काजू, शेंगदाणे टाकून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. नंतर, त्यांना बाहेर काढा आणि बाजूला ठेवा. तुमची पुढची पायरी असेल साबुदाणा तळणे. ते पफी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. चांगले शिजल्यावर तळलेले शेंगदाणे आणि काजू सोबत सर्व्हिंग डिशमध्ये ठेवा. तुमच्या चवीनुसार मीठ आणि काळी मिरी शिंपडा. नंतर, मध्यम आचेवर पॅन ठेवा, चिरलेल्या हिरव्या मिरच्यांसह एक चमचा तेल घाला. कुरकुरीत होईपर्यंत परतावे. पूर्ण झाल्यावर तळलेल्या साबुदाण्यावर टेम्परिंग घाला. चांगले मिसळा आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
चिवडा मसाला
साहित्य: बडीशोप १ चमचा, जिरे १ चमचा, आमसूल १ चमचा, तिखट १ चमचा, धने २ चमचा, मिरे १ चमचा, हळद १ चमचा.
कृती:- चिवडा मसाला तयार करण्यासाठी सर्व साहित्याची बारीक पूड करून एकत्र मिसळून घ्यावी. मसाला हवाबंद डब्यात भरून कोरड्या जागी संग्रहित करावा. हा मसाला चुरमुरे व पातळ पोहे यांचा चिवडा तयार करताना वापरावा.
चिवडा उत्तम होण्यासाठी टिप्स
चिवड्यासाठी लागणारे पोहे, चुरमुरे, भडंग इत्यादी नीट निवडून घेऊन उन्हात तापवून वापरावेत. चिवडा कुरकुरीत होतो. सर्व तयारी अगोदर करून ठेवावी. उदा. शेंगदाणे सोलणे, खोबऱ्याचे काप, कांद्याचे वाळवलेले पातळ काप. चिवडा करताना सर्वांत शेवटी पिठीसाखर घाला. आधी घातली तर कडक खडे होतील. पोहे चिवड्यात लाल तिखट घालायचे असल्यास पोहे, भडंग, चुरमुरे इत्यादींवर घाला. फोडणीत घातले तर फोडणी करपते. खोबऱ्याचे पातळ काप करण्यासाठी खोबरे फ्रिजमध्ये ठेवून मग पातळ काप करा. चिवड्यात छोटीशी मिठाची पुरचुडी ठेवा, म्हणजे चिवडा मऊ पडत नाही. पोहे तळताना गॅस मोठा व तेल एकदम गरम असावे म्हणजे पोहे छान फुलतात व कुरकुरीत लागतात. पोहे भाजून चिवडा का पोह्याबरोबर प्रत्येक वेळी चिमूटभर मीठ घालून भाजा. कुरकुरीत भाजले जातात. पोहे आकसणार नाही. पोह्यात पुदिना, कोथिंबीर पूड वापरायची असेल तर अगोदरच करून घ्या. चिवडा नेहमी रिफाइंड तेलात करावा. चिवड्याच्या फोडणीत थोडे वनस्पती तूप घातल्यास वेगळीच खमंग चव येते. तळलेल्या पोह्यांचा चिवडा करताना पोहे तळण्यासाठी गाळणे वापरावे, म्हणजे पोहे करपत नाहीत, छान तळले जातात. भाजक्या पोह्यांचा चिवडा करताना त्यात उभा चिरलेला कांदा वाळवून तेलात तळून घालावा चव वेगळीच लागते.
* चिवडा बनवतांना प्रथम पोहे निवडून, चाळून एक दिवस आगोदर कडकडीत उन्हात ठेवा म्हणजे चिवडा बनवताना परत पोहे भाजून घ्यावे लागत नाहीत किंवा उन नसेलतर चिवडा बनवण्या अगोदर पोहे मंद विस्तवावर भाजून घ्या म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होईल.
* पोह्याचा चिवडा बनवायचा असलेतर त्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे पोहे आहेत पातळ पोहे, नायलॉन पोहे किंवा भाजके पोहे तळावे लागत नाहीत पण दगडी पोहे, मक्याचे पोहे व जाड पोहे तळून घ्यावे लागतात.
* चिवडा बनवतांना तेल चांगले वापरावे तसेच चिवडा बनवतांना थोडे थोडे वनस्पती तूप वापरले तर त्याची टेस्ट अजून छान लागते.
* चिवडा बनवतांना खोबऱ्याचे काप, पंढरपुरी डाळ, शेगदाणे,काजू, बेदाणे, हिरवी मिरची चिवडा मसाला, कडीपत्ता सर्व तयार ठेवा म्हणजे चिवडा बनवतांना गडबड होत नाही व आपल्याला पटकन बनवता येतो.
* खोबरे काप बनवतांना छान एकसारखे पाहिजे असेल तर पाण्यात अर्धा ते एक तास भिजत ठेवून मग पाणी काढून त्याचे काप करावे लवकर होतात.
* आंबट गोड चिवडा बनवतांना आपण आमसूल किंवा सायट्रिक अँसिड वापरतो. तर आमसूल आगोदर तळून घ्या व थंड झाल्यावर चिरून घ्या. सायट्रिक अँसिड वापरायचे असेल तर पिठीसाखर व सायट्रिक अँसिड एकदम मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
* दगडी पोहे, मक्याचे पोहे व जाड पोहे चिवडा बनवणार असालतर प्रथम तेल चांगले तापून घ्या. व पोहे तळताना विस्तव मोठा ठेवा मग तळून झाल्यावर टिशू पेपरवर ठेवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईन.
* पिठीसाखर वापरतांना सर्वात शेवटी पिठीसाखर वापरायची म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होतो.
* खमंग चिवडा बनवतांना आपण कांदा चिरून उन्हात वाळवून मग तळून घेतो. काही वेळेस उन्हात वाळवून घेणे शक्य नसते तेव्हा कांदा उभा पातळ चिरून पेपरवर वाळत घालून वाळला की मग तळावा. कांदा वाळायला साधारपणे २-३ तास लागतात किंवा सोपा उपाय म्हणजे आपण कांदा किसून त्यातील रस थोडेसे दाबून काढा पूर्ण रस काढायचा नाही थोडासा काढायचा मग तेलाच्या फोडणीत घालून गुलाबी रंगावर परतून घ्यायचा.
* चिवडा बनवून झाल्यावर पूर्ण थंड झाल्यावर मग २ प्लास्टिकच्या पिशव्यात भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा व पाहिजे तेव्हडा काढून घ्या. म्हणजे तो जास्त दिवस ताजा राहील. आता प्लास्टिकच्या पिशव्या नसतील तर आपली कॉर्न फ्लेक्सच्या पिशव्या जपून ठेवा मग त्या वापरा.
* दिवाळी फराळातील चिवडा जास्त उरला तर प्लास्टिक पिशवीत घट्ट बंद करून ठेवा व आपण आठवड्यातून एक दोन वेळा पोहे किंवा उपीट बनवतो तेव्हा हा चिवडा सजावटीसाठी वापरा पोहे व उपीट चवीला टेस्टी लागते.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know