मिरची अर्थात चिली
मिरचीचा भूगोल आणि इतिहास
मिरचीला इंग्रजीत 'चिली' म्हणतात. चिली हा मेक्सिकन शब्द आहे. त्याचा अर्थ होतो, कॅप्सिकम. मिरचीचं शास्त्रीय नाव 'कॅप्सिकम अॅनम' आहे. हिरव्या मिरचीत व्हिटॅमन ए, बी आणि सी पुरेशा प्रमाणात असतात. त्याशिवाय कॅल्शअम आणि फॉस्फरसची मात्राही असते. मिरचीतला तिखटपणा त्यातील 'कॅप्सेसिन' (ओलियोरेजिन) या रसायनामुळे असतो, तर मिरची पिकल्यानंतर तिच्यावरील लाल रंग 'कॅप्सेन्थिन'मुळे तयार होतो. भारत हा जगातील सर्वात मोठा मिरची उत्पादक देशच नाही, तर सर्वात मोठा मिरची खाणाऱ्यांचाही देश आहे.
भारतात मिरचीचं देशभर विविध ठिकाणी वर्षभर पीक घेतले जाते. मिरचीच्या पिकासाठी 20 ते 30 डिग्री तापमानाची आवश्यकता असते. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमधील मिरचीचे प्रकार विशेष प्रसिद्ध आहेत. आता या यादीत आसाम आणि नागालँडचं नावही जोडलं गेलंय.
किती तिखट असते ही मिरची?
मिरचीचा तिखटपणा स्कोविल हीट यूनिट द्वारे मोजला जातो. अमेरिकन फार्मासिस्ट विल्बर स्कोविल यांच्या नावानं ही मोजणी पद्धत बनलीय. मिरचीत असलेल्या 'कॅप्सोसिन'च्या आधारावर हे ठरवलं जातं की, मिरचीत किती तिखटपणा आहे. जाणकारांच्या मते, ही मोजणी पद्धत अवलंबल्यास राजा मिर्चाचा स्कोअर एक मिलियन एसएचयू होतो. जगातील सर्वात तिखट मिरचीचा स्कोअर दोन मिलियनच्या वर आहे. जगातल्या पाच सर्वात तिखट मिरच्यांमध्ये राजा मिर्चाचं स्थान पाचवं आहे.
देशभरात मसाला शेतीवर भर दिला जात आहे. मिरची शेती देखील त्यापैकीच एक आहे. हिरवी मिरची खाण्याचेही फायदे आहेत. यामध्ये जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. मिरचीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते. वेदना कमी करण्यासाठी मिरचीचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. मिरचीचा अर्क संधिवात, डोकेदुखी, जळजळ आणि मज्जातंतुवेदना कमी करण्यासाठी वापरला जातो.
मिरचीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद असल्याचा दावाही केला जातो. नॅशनल चिली टास्कफोर्सच्या मते, देशातील एकूण मसाल्यांच्या निर्यातीमध्ये मिरचीचा मोठा हिस्सा आहे (सुमारे 6,500 कोटी रुपये प्रतिवर्ष). तर मसाल्यांची एकूण निर्यात सुमारे 21,500 कोटी रुपयांची आहे. मिरची उत्पादन आणि निर्यातीत भारत जागतिक आघाडीवर आहे आणि आंध्र प्रदेश हे व्यापारी पीक उत्पादक राज्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. भारतात उगवलेल्या मिरचीच्या गुणवत्तेची जगभरात प्रशंसा झाली आणि गेल्या 10 वर्षांत निर्यातीमध्ये प्रमाण आणि मूल्य या दोन्ही बाबतीत चांगली वाढ दिसून आली. कीटकनाशकांचे अवशेष आणि अफलाटॉक्सिन नगण्य प्रमाणात आढळून आले. आजच्या घडीला, जागतिक मिरचीच्या व्यापारात भारतीय मिरचीच्या निर्यातीचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे, चीन हा त्याचा सर्वात जवळचा स्पर्धक आहे, परंतु दुसऱ्या स्थानावर तो खूप मागे आहे.
रक्तदाब ते कॅन्सरपर्यंच्या आजारावर प्रभावी आहे हिरवी मिरची. पण, खाताना घ्या काळजी
हिरवी मिरची खाण्याचे फायदे
हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं - हृदय निरोगी ठेवण्यासाठी हिरवी मिरची उपयुक्त आहे. त्यात कॅप्सिसिन नावाचं संयुग असतं. ते मिरचीला मसालेदार आणि आरोग्यदायी बनवतं. कॅन्सरवर प्रभावी मिरचीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ते शरीराला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देऊन कॅन्सरचा धोका कमी करतात. डोळ्यांचं आरोग्य सुधारतं हिरव्या मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारख्या पोषक तत्त्वांसह अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे डोळे निरोगी ठेवण्यासाठी हिरवी मिरची फायदेशीर ठरते. मिरचीमध्ये बीटा कॅरोटीन असतं. ते डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं. त्वचेसाठी फायदेशीर हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन-ई असल्याने त्याचा त्वचेसाठीही फायदा होतो. यामुळे चेहरा तजेलदार आणि त्वचा नेहमी सुंदर राहते. रक्तदाब नियंत्रण हिरव्या मिरचीमध्ये आढळणारं कॅप्सिसिन उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. पचनास मदत पचनसंस्था सुरळीत चालण्यासाठी हिरवी मिरचीही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. संशोधनानुसार, हिरव्या मिरचीचा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल विकारांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो सर्दी, खोकल्यापासून आराम मिरचीमध्ये असलेलं कॅप्सिसीन नाकातली सर्दीमुळे चोंदलेली श्वसनप्रणाली मोकळी करते आणि सर्दी-खोकल्यापासून थोडा दिलासा मिळतो. वजन कमी करण्यात उपयुक्त मिरच्या आहारात असतील, तर वजन वाढण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यास उपयुक्त ठरू शकते.
मिरचीचे तोटे
हिरवी मिरची हे ऍसिडीटीचे कारण असू शकतं. त्यामुळे सेवन मर्यादित करणंच हिताचं. - हिरवी मिरची जास्त खाल्ल्याने पोटात जळजळ होणं, पोट फुगणं आदी प्रकार संभवतात. - हिरवी मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातली विषद्रव्यं वाढू शकतात. - दररोज 50 ग्रॅमपेक्षा जास्त हिरव्या मिरच्यांचं सेवन केल्याने डिमेन्शियासारखी स्थिती उद्भवू शकते. -हिरवी मिरची ही फायदेशीर असली, तरी ती रोगावर इलाज नव्हे. मर्यादित प्रमाणात आहारात असावी, इतकाच याचा अर्थ आहे.
भारतात मिळणाऱ्या पाच सर्वात तिखट मिरच्या
भारतामध्ये चटपटीत आणि तिखट खाण्याची पद्धत आहे आणि यासाठी वेगवेगळ्या पदार्थाच्या मसाल्यांचा वापर करतात. मसाल्याच्या बरोबरच जगातील सर्वात तिखट मिरची या ठिकाणी उत्पादित केली जाते. नेहमी आपण बाजारामध्ये जातो त्यावेळी आपण लाल मिरची खरेदी करतो परंतु कमी लोकांना हे माहित आहे की जी आपण मिरची घरी आणतो ती कोणती आहे. भारतामध्ये तसे पाहिले तर दहा पेक्षा जास्त प्रकारच्या मिरच्या आहेत. परंतु त्यातील पाच मिरच्या असे आहेत जे त्याच्या तिखटपणा मुळे जास्त ओळखल्या जातात. जर तुम्हाला या पाच मिरची बाबत काहीच माहिती नाही तर चला या ठिकाणी आपण त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया .खासकरून भारतातील या पाच मिरच्या बाहेर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जातात.
भुत जोलोकिया
मिळण्याचे ठिकाण: आसाम आणि नागालँड. जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून या मिरचीला ओळखले जाते. याला घोष्ट चिली उमररॉक घोष्ट पेपर नागा चिली या नावाने सुद्धा ओळखले जाते. जर तुम्हाला सांगितले की ही मिरची खाणारे अक्षरशः हैवान होतात असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. खास करून या मिरचीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा करण्यात आली आहे, जेव्हा ही मिरची दुनियातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली जात होती. ही मिरची आपणास असा अनुभव देते की एकाच वेळी आपल्या शरीरामध्ये अनेक सुया टोचत आहेत. ही मिरची एका अनोख्या स्वादासाठी सुद्धा ओळखले जाते. 1000000 स्कोविल युनिट पेक्षा जादा तिखटपणा देऊन या मिरची चा मुकाबला कोणी करू शकत नाही.
गुंटूर मिरची
मिळण्याचे ठिकाण आंध्र प्रदेश हे राज्य तिखट पदार्थ खाणारा राज्य म्हणून ओळखला जातो. याचे श्रेय जाते ते गुंटूर या मिरचीला. गुंटूर आंध्र प्रदेश मधील एक जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये ही मिरची अधिक मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. ही मिरची श्रीलंका, बांगलादेश, साऊथ कोरिया, अमेरिका, लॅटिन अशा देशांमध्ये निर्यात केली जाते. गुंटूर मिरची अत्यंत तिखट असते आणि आपल्या नेहमीच्या मिरची पेक्षा ती जास्त प्रभावित ठरते .
कंठारी मिरची
मिळण्याचे ठिकाण: केरळमधील ही मिरची अत्यंत प्रसिद्ध आहे जे शिजवल्यानंतर ती पांढरी होते. स्वादासाठी सुद्धा ही मिरची अत्यंत उत्कृष्ट समजली जाते. या मिरचीचे स्वरूपच वेगळे असते आणि त्याचा वास ही अत्यंत चांगला असतो. तुम्हाला वाटेल की ही मिरची भुत जोलोकिया सारखी तिखट असेल परंतु असे नाही. तिखट असणारी ही मिरची केरळमधल्या अनेक डिश मध्ये वापरली जाते.
ज्वाला मिरची
मिळण्याचे ठिकाण: गुजरात खरेतर गोड खाण्यासाठी प्रसिद्ध आहे परंतु याठिकाणी उत्पादित होणारी ही मिरची अत्यंत तिखट आहे. गुजरात मधून येणारी ज्वाला लहान हिरवी मिरची ही खूप तिखट असते आणि अनेक राज्यांमध्ये त्याला मागणी असते. ज्वाला मिरची ही समोसा वडापाव मध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि याचे स्वादही अत्यंत चांगले असते .जास्त शिजवल्यानंतर ही मिरची लाल होते . या मिरचीचे लोणचे तयार करण्यासाठी सुद्धा वापर केला जातो.
ब्याडगी मिरची
मिळण्याचे ठिकाण: ही मिरची खासकरून कर्नाटका मध्येच मोठ्या प्रमाणात पिकते. कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील ही मिरची स्वादासाठी अत्यंत चांगली आहे. ही मिरची परदेशात सुद्धा अत्यंत प्रसिद्ध आहे. वर दिलेल्या अन्य चार मिरचीच्या तुलनेत ही मिरची कमी तिखट आहे परंतु अत्यंत चटपटीत असे त्याचे स्वरूप आहे. ही मिरची रंग आणि त्याच्या वासासाठी प्रसिद्ध आहे.
जगभरातील लोकांचं 'मिरचीप्रेम'
जगभरातल्या लोकांचं मिरचीवर अतोनात प्रेम आहे. भारतीय जेवणात हळद आणि मिरची हे दोन पदार्थ सर्वाधिक होतो. विशेषत: भाजी करताना वापर केलाच जातो.
एक व्यक्ती वर्षभरात सरासरी किती मिरची खातो?
एका अंदाजानुसार, 2018 या वर्षात प्रत्येक व्यक्तीनं जवळपास पाच किलो मिरची खाल्ली. हे आकडे इंडेक्स बॉक्स या मार्केट अनॅलिसिस फर्मने जाहीर केले आहेत. काही देशांमध्ये तर ही संख्या आणखी वाढते.
तुर्कस्थानात एका दिवसात एक व्यक्ती सरासरी 86.5 ग्रॅम मिरची खातो. म्हणजेच, जगभराच्या तुलनेत हे सर्वाधिक प्रमाण आहे.
मेक्सिको तर तेथील मासलेदार पदार्थांमुळेच जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र, तुर्कस्थानात मेक्सिकोहून जास्त मिरची खाल्ली जाते. त्याशिवाय, भारत, थायलंड, फिलीपिन्स आणि मलेशियामध्येही मिरचीचा वापर अधिक केला जातो. स्वीडन, फिनलँड आणि नॉर्वे यांसारख्या देशात मिरचीचा वापर सर्वात कमी केला जातो.
सारांश
दैनंदिन आहारात हिरवी मिरची जेवणाची चव वाढवते. मग कोणतीही भाजी असो, आमटी असो की अन्य कोणताही पदार्थ, हिरव्या मिरचीशिवाय जेवण अपूर्णच. भारतातल्या प्रत्येक स्वयंपाकघरात हिरव्या मिरचीचा वापर ठरलेला असतोच; फक्त त्याचं प्रमाण कमी-जास्त असतं. अनेक जण हिरवी मिरची झणझणीत असल्याने खात नाहीत. मात्र आयुर्वेदामध्ये हिरव्या मिरचीचे औषधी गुणधर्मही सांगितलेले आहेत. असं असलं, तरी तिचा वापर मात्र प्रमाणात करणं गरजेचं आहे.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.
No comments:
Post a Comment
If you have any doubts, please let me know