Translate in Hindi / Marathi / English

Monday, 5 August 2024

गुळाचा चहा आरोग्यवर्धक | साखरेच्या तुलनेत गुळाच्या चहामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात | गुळात भरपूर प्रमाणात अँटी ऑस्किडंट आहेत जे गुळाच्या चहातून तुमच्या शरीरात जातात | अँटी ऑस्किडंट तुमच्या आरोग्याप्रमाणेच त्वचा आणि केसांसाठी उत्तम असतात | गुळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात

गुळाचा चहा आरोग्यवर्धक


 

गुळाचा चहा पिण्याचे हे फायदे आणि तोटे

 

साखरेच्या तुलनेत गुळाच्या चहामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तुमच्या नेहमीच्या चहामध्ये जेव्हा तुम्ही गूळ मिसळता तेव्हा त्या चहाचे पोषणमुल्य दसपटीने वाढते. कारण गुळात भरपूर प्रमाणात अँटी ऑस्किडंट आहेत जे गुळाच्या चहातून तुमच्या शरीरात जातात. शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. अँटी ऑस्किडंट तुमच्या आरोग्याप्रमाणेच त्वचा आणि केसांसाठी उत्तम असतात. यामुळे तुमच्या शरीराचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते.यासाठीच नेहमी गुळाचा चहा प्यायला हवा.  थंडीच्या दिवसात गूळ खाणे चांगले असते असेही म्हटले जाते. तसेच गूळ खाण्याचे आणि गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत.

गुळाचा चहा पिण्याचे फायदे

सर्दी, पडसे, खोकल्यावर प्रभावी सर्दी आणि खोकला झाल्यास आजही घरातील जुनी लोकं गुळ आणि हळद खाण्याचा सल्ला देतात. किंवा दुधामध्ये गुळ आणि हळद मिसळून पिण्याचा सल्ला देतात. थंडीमुळे शरीरातील तापमान थंड पडू लागते. ज्यामुळे थंडी वाजते आणि सर्दी, खोकला, ताप असे आजार होतात. निरोगी राहण्यासाठी या काळात शरीराला पुरेशी ऊर्जा आणि तापमान मिळायला हवे. गुळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. शिवाय गूळ उष्ण गुणधर्माचा आहे. त्यामुळे गूळ खाणे हिवाळ्यात शरीराराठी नक्कीच चांगले ठरते. यासाठीच हिवाळ्यात गुळापासून बनवलेले विविध पदार्थ तसेच गुळाचा चहा आवर्जून सेवन केला जातो. ज्यामुळे शरीर उष्ण राहते आणि थंडीपासून तुमचा बचाव होतो.

मुरुमाची समस्या जास्त तेलकट खाल्ल्याने, धुळीमुळे किंवा पित्ताचा त्रास असल्यास चेहऱ्यावर मुरूम येतात. मात्र रोज थोडा गूळ खाल्ल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते.

ऍनिमिया गुळात लोह खनिज जास्त असल्याने रोज सकाळी पाण्यासोबत याचे सेवन केल्यास ऍनिमियाचा त्रास कमी होतो. अशक्तपणा असलेल्या लोकांना शरीरात लोह वाढण्याची गरज असते. कारण हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे अशक्तपणा वाढतो. लोह  हा हिमोग्लोबिनचा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्यामुळे रक्तपेशींना शरीरातील विविध भागांमध्ये ऑक्सिजनचा पूरवठा करता येतो. गुळामुळे शरीराला पुरेसे लोह मिळते. यासाठी जर तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल अथवा सतत थकल्यासारखे वाटत असेल तर नियमित गुळाचा चहा प्या.

एनर्जी देण्याचे काम थकवा जाणवत असल्यास किंवा ऊन लागल्यास गुळाच्या चहाचे सेवन केल्याने आराम मिळतो आणि शरीराला एनर्जी देण्याचे काम गूळ करतो.

पचनक्रिया सुधारते दम्याचा त्रास असल्यास गूळ खाल्ल्याने आराम मिळतो. यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुधारते. आहारात झालेले बदल तुमच्या शरीरावर कळत नकळत परिणाम करत असतात. जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर त्यामुळे तुमच्या सतत पोटात दुखते अथवा पोट साफ होत नाही. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे इतर आजार वाढू लागतात. मात्र जर तुम्ही नियमित गुळाचा वापर आहारात केला तर तुमची पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते. यासाठी गुळाचा चहा घेणं फायद्याचं ठरेल.

घशाला आराम घसा खवखवत असल्यास किंवा घसा बसल्यास गूळ खाल्ल्याने आराम मिळतो.

थंडी आणि तापापासून संरक्षण– हिवाळा सुरू झाला की जीवजंतूच्या पोषणासाठी चांगले वातावरण निर्माण होते. ज्याचा परिणाम तुम्हाला सर्दी, खोकला अथवा तापाचे इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. मात्र गूळ हा यावर एक उत्तम घरगुती उपाय आहे. कारण गुळात उष्णता आणि इतर पोषक घटक सर्दी, खोकला दूर करण्यास मदत करतात. यासाठीच या काळात गुळाचा चहा घेतला जातो. तसंच अनेक घरगुती उपायांमध्ये गुळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. गुळामुळे तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने या आजारपणांना तोंड देणे सोपे जाते.

हिमोग्लोबिन वाढते रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

रक्त वाढतेगुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर मग गुळाचा चहा तुमची ही समस्या दूर करेल. गुळामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्त अशुद्ध असेल तर अनेक आजारपणे मागे लागू शकतात. यासाठी नैसर्गिक पद्धतीने रक्त शुद्ध ठेवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. याचा तुमच्या आरोग्याप्रमाणेच त्वचा आणि केसांवरही चांगला परिणाम होतो. यासाठीच नियमित गूळ खाण्याचा अथवा गुळाचा चहा पिण्याचा सल्ला दिला जातो.

वजन नियंत्रित ठेवते– आजकाल वाढते वजन ही खूप मोठी समस्या झालेली आहे. चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि तुमचे वजन अनियंत्रित होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्हाला गोड पदार्थ आणि साखरेचे पदार्थ आहारातून कमी करावे लागतात. मात्र गुळ साखरेच्या मानाने शरीरासाठी उत्तम असल्यामुळे तुम्ही चहा अथवा इतर गोड पदार्थांमध्ये त्याचा वापर करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात गुळाचा चहा नक्कीच समाविष्ट करू शकता. ज्यामुळे तुम्हाला गोडही खाता येईल आणि वजनही कमी होईल.

रोगप्रतिकार शक्ती वाढते- गुळामध्ये इतर पोषकमुल्यांसोबत झिंक आणि सेलेनियमही भरपूर असते. ज्यामुळे तुमचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. आजकाल प्रतिकार शक्ती मजबूत करण्याची खूप गरज आहे. कारण बाहेरील वातावरण चिंताजनक आणि निराशाजनक झालेले आहे. अशा काळात स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उत्तम उपाय म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवणारे पदार्थ आहारात वाढवणे. गुळामुळे प्रतिकार शक्ती वाढत असल्यामुळे तुम्ही नियमित गुळाचा चहा यासाठी नक्कीच पिऊ शकता.

गुळाचा चहा कोणी पिऊ नये

डायबेटीसच्या रुग्णांनी गुळाचा चहा पिऊ नये. कारण गुळाचा चहा पिण्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी गुळाचा साखरेचा चहा पिणे टाळावे.

आमवातचा त्रास असल्यास गुळाचा चहा पिणे टाळावे. कारण गुळात सुक्रोजचे प्रमाण अधिक असल्याने आमवातात सांध्यातील सूज अधिक वाढू शकते.

गुळाच्या चहामुळे होणारे नुकसान

दिवसभरात एक ते दोनवेळा चहा पिणे पुरेसे असते. मात्र दिवसभरात वरचेवर चहा पित राहिल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. याला गुळाचा चहाही अपवाद नाही.

गुळाचा चहा अधिक पिण्यामुळे यातील कॅलरीजमुळे अधिक वजन वाढू शकते. वजन अधिक वाढण्यामुळे डायबेटीस, हृदयविकार होण्याचा धोकाही वाढू शकतो.

गुळाच्या अती सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं. 10 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 9.7 ग्रॅम इतकी साखर असते.

100 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 385 कॅलरी असतात. त्यामुळं डाएट करणाऱ्यांनी याचं सेवन प्रमाणात करावं. पण, वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हे सेवन फायद्याचं ठरतं.

गरम वातावरणात गुळाचे सेवन केल्यास अनेकदा नाकातून रक्त वाहण्यासही सुरुवात होते. पोटातील गरमी वाढल्यामुळं याचे विपरीत परिणाम त्वचेवरही दिसून येतात.

गुळाचा चहा बनवण्याची पद्धत

गूळाचा चहा बनवण्याची पद्धत वेगळी आहे. गुळाचा चहा बनवण्याची रेसिपी फॉलो करणं यासाठी गरजेची आहे कारण साखरेप्रमाणे गुळाचा चहा बनवला जात नाही.

साहित्य

एक चमचा चहापावडर

तीन ते चार चमचे गूळ पावडर

दोन वेलची वाटून

एक कप दूध

एक कप पाणी

स्वादाप्रमाणे आल्याचा किस

गूळाचा चहा करण्याची पद्धत एका चहाच्या भांड्यात पाणी उकळत ठेवा. त्यात कुटलेली वेलची आणि किसलेले आले टाका. पाण्याला उकळ आली की चहा पावडर टाका. चहा उकळल्यावर त्यात दूध मिसळा. चहाचे भांडे गॅसवरून उतरण्याआधी आवडीनुसार गूळ पावडर मिसळा. लक्षात ठेवा चहा उकळताना अथवा दूध उकळताना गूळ पावडर टाकू नका. नाहीतर त्यामुळे दूध फाटून चहा खराब होऊ शकतो. चहा कपमध्ये ओतल्यावरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ पावडर त्यामध्ये मिसळू शकता.

सारांश

गारवा सुरू होताच घरोघरी गूळ घातलेला मस्त गरम गरम चहा बनवला जातो. चहाचं आणि हिवाळ्याचं एक निराळं नातं आहे. कारण गारव्यात थंडाव्यापासून बचाव करण्यासाठी चहाचा चांगला आधार मिळतो. पण एवढंच नाही. हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे हे एखाद्या एनर्जी बुस्टरपेक्षा नक्कीच कमी नाही. कारण साखरेपेक्षा गूळ आरोग्यासाठी लाभदायक आहे. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गुळाचा चहा पिण्याचे फायदे नक्कीच आहेत. गूळ खाणे गारव्यात हिताचे असते कारण गुळ उष्ण असतो. शिवाय गुळात व्हिटॅमिन्स, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम असे अनेक पोषक गुणधर्म असतात. यासाठी गूळाचे अनेक फायदे आहेत.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावावाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know