Translate in Hindi / Marathi / English

Tuesday, 13 August 2024

पोटाची अवाजवी चरबी # पोटाच्या चरबीमुळे स्थूलता समस्या # पोटाच्या अवाजवी चरबीपासून मुक्ती उपाय # कॅलरीचा इनटेक कमी करा # उच्च प्रोटीनयुक्त नाश्ता # उच्च प्रोटीनयुक्त नाश्ता # मिनी मील्स # फायबरचे सेवन वाढवा # पूर्ण झोप घ्या # खूप सारे पाणी प्या # कंबर व नितंबाचे प्रमाण डब्ल्यूएचआर # धूम्रपान व मद्यपान टाळा # कंबर कमी करणारे खाद्यपदार्थ # व्यायाम व योगाने घटवा पोटाची चरबी

पोटाच्या चरबीमुळे स्थूलता समस्या

 

पोटाची चरबी वाढल्यामुळे स्थूलतेची समस्या तर उद्भवतेच; शिवाय गुडघ्यांच्यामुळे इतर आणखीही समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या टाळण्यासाठी पोटाच्या चरबीवर नियंत्रण ठेवायला हवे. त्यासाठी देत आहोत काही उपाय.

संतुलित आणि पोषक आहार:
सुदृढ फिट राहण्यासाठी ज्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त आणि कार्बोहायड्रेट स्निग्धता कमी असेल असा आहार घ्यावा. शुगर प्रोसेस्ड फूड कमी घ्यावेत. आपल्या ३५ टक्के कॅलरीज प्रोटीनमधून यायला हव्यात.

कॅलरीचा इनटेक कमी करा

जर आपण रोज १०० कॅलरी कमी घेतल्या, तर दुसरा कोणताही उपाय करता आपले वजन किलो कमी होईल. आपण तळकट पदार्थांसारखे उच्च स्निग्धतेचे पदार्थ, शुगरयुक्त खाद्य पेय पदार्थ घेणे बंद वा कमी करून सहजतेने कॅलरीचा इनटेक कमी करू शकता. ज्यात स्टार्च कमी असेल अशा भाज्या खा. सिमला मिरची, काकडी आणि बीट . कमी कॅलरीज असून, पाणी फायबर जास्त असते.

उच्च प्रोटीनयुक्त नाश्ता

जर आपण दिवसाची सुरुवात उच्च प्रोटीनयुक्त नाश्त्याने कराल, तर आपले मेटाबॉलिझम तीव्र होऊन आपण दिवसभर जास्त कॅलरी जाळू शकाल. प्रोटीनयुक्त जेवण उशिरापर्यंत पोट भरलेले असल्याची जाणीव देत राहील.

मिनी मील्स

एका दिवसात तीन वेळा मेगा मील्स खाण्याऐवजी सहा वेळा मिनी मॉल्स खा. दर तीन-चार तासांनंतर काही खात राहा. मील स्किप करणे मेटाबॉलिझम संथ करते कॅलरीज प्रभावीपणे जाळणे रोखते.

फायबरचे सेवन वाढवा

२०१० मध्ये पेन्सिल्वेनिया विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासात ही गोष्ट दिसून आली की, जे रोज १० ग्रॅम फायबर खातात त्यांच्या कंबरेचे माप फायबर कमी खाणाऱ्या वा खाणाऱ्या लोकांपेक्षा सुमारे तीन इंच कमी असते.

पूर्ण झोप घ्या

पोटाच्या आजूबाजूला चरबी साचू नये यासाठी नियमितपणे ७-८ तास झोप घ्या. कमी वा जास्त झोपण्याचा कंबरेभोवतालच्या चरबीशी सरळ संबंध असल्याचे एका अध्ययनात दिसून आले आहे. कमी झोपेमुळे तणाव वाढवणारे हार्मोन कॉर्टिसोलची पातळी वाढू शकते. ज्याचा सरळ संबंध चरबी साठण्याशी असतो.

खूप सारे पाणी प्या

भरपूर पाणी प्या. विशेषत: जेवणापूर्वी जेव्हा कार्बोहायड्रेट खाण्याची इच्छा होईल तेव्हा. जर जेवणाच्या आधी अर्धा तास ३००-४०० मिली पाणी प्याल, तर १३ टक्के कमी कॅलरी मिळवाल. काहींना जेव्हा भूक लागली आहे असे वाटते तेव्हा खरे तर त्यांना तहान लागलेली असते. यासाठी काही खावेसे वाटले, तर प्रथम पाणी प्यावे. कदाचित आपण तहानेलाच भूक समजण्याची चूक करीत असाल.

धूम्रपान मद्यपान टाळा

अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की, सिगारेट भूक कमी करते, पण पोटाभोवती चरबी बेगाने वाढवते. त्यामुळे जर फिट राहायचे असेल, तर धूम्रपान मद्यपान पूर्णपणे बंद करावे.

कंबर कमी करणारे खाद्यपदार्थ

धान्ये, सुकामेवा, सिट्रस फ्रूट्स, सोयाबीन, फॅटी फिश, ग्रीन टी, स्निग्धांशरहित दूध दूध उत्पादने.

कंबर- नितंबाचे प्रमाण (डब्ल्यूएचआर)

पोटाभोवती चरबी जमा झाल्यामुळे कंबरेचा आकार वाढतो. वेस्ट-हिप रेशो म्हणजेच डब्ल्यूएचआर आपल्याला आपल्या पोटाभोवती चरबी साठल्यामुळे आपला डब्ल्यूएचआर किती बिघडला आहे हे सांगेल.

डब्ल्यूएचआर असा मोजा

जर एखाद्या महिलेच्या कंबरेचे माप २८ इंच असेल नितंबाचे माप ३६ इंच असेल, तर डब्ल्यूएचआर २८ ला ३६ ने भागल्यानंतर येतो, जो .७७ असेल. जर डब्ल्यूएचआर वा त्यापेक्षा जास्त असेल तर कार्डियोव्हॅस्क्युलर आजारांचा धोका खूप वाढेल. डब्ल्यूएचआर आदर्श शारीरिक मापाचा इंडिकेटर मानला जातो.

एक पुरुष ज्याची उंची फूट (७२ इंच, १८३ सेंमी) असेल त्याने आपल्या कंबरेचे माप ३६ इंचांपेक्षा कमी ठेवायला हवे.

एक महिला जिची उंची फूट इंच (६४ इंच, १६३ सेंमी) असेल तिने आपल्या कंबरेचे माप ३२ इंचांपेक्षा कमी ठेवायला हवे. अर्थात कंबरेचा घेर आपल्या उंचीच्या निम्मा ठेवायला हवा.

व्यायाम योगाने घटवा पोटाची चरबी

जर आपल्याला सडपातळ कंबर हवी असेल, तर आहारासोबत नियमित व्यायामही करायला हवा. दैनंदिन जीवनात हे व्यायाम सामील करा. दोरीच्या उड्या, बर्फीज, बायसिकल क्रंचेज, प्लॅक, बॉलसोबत व्यायाम, धावणे, पुशअप्स, सायकलिंग, स्वीमिंग योगासने नियमित केल्यामुळे फिट राहण्यास मदत होतेच; पण काही योगासने कंबरेचा घेर वाढू देत नाहीत वाढलाच तर कमी करण्यास मदत करतात. अशी आसने आहेत धनुरासन, भुजंगासन, पश्चिमोत्तानासन.

सारांश

पोटाची चरबी वाढण्याची समस्या आजकाल अनेकांना जाणवते. ही अनावश्यक चरबी कमी करण्याकरीता लोक वेगवेगळ्या प्रकारचे डाएट फाॅलो करतात. अनेक जण तासनतास जिममध्ये व्यायाम करण्यात घालवतात. लठ्ठपणा वाढल्याने अनेक गंभीर आजार बळावतात. पोटाची चरबी केवळ दिसायलाच वाईट नाही तर तुमच्या शरिराकरताही चांगली नाही. वजनात थोडीही वाढ झाली किंवा लाईफस्टाईल बिघडली तर त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होतो आणि पोटाची चरबी वाढते. ही वाढलेली पोटाची चरबी कमी करण्याकरता लोक खूप मेहनत घेतात. मात्र याचे कारण जाणून घेतल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यास अधिक मदत होऊ शकते. व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार, ताणतणाव अशी अनेक कारणे याला कारणीभूत आहेत.


कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावावाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know