Translate in Hindi / Marathi / English

Thursday, 22 August 2024

सुरणाची उपयुक्तता # सर्वेशा कन्दशाकाना सुरण # सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरणाची भाजी ही सर्वश्रेष्ठ आहे # सुरणा मध्ये a, b आणि c जीवनसत्त्व आढळतात # सुरणाची चव सामान्यत: तुरट, तिखट असते # सुरणाच्या भाजीचे फायदे # सुरणापूसन विविध खाद्यपदार्थ बनविले जातात कारण त्यापासून पौष्टिक आहार व औषधी गुणधर्म मिळतात

सुरणाची उपयुक्तता

सर्वेशा कन्दशाकाना सुरण

सुरण या भाजीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे वरील वाक्यात असे म्हटले आहे की, सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरणाची भाजी ही सर्वश्रेष्ठ आहे. कोकणात सहज आढळणाऱ्या सुरण या वनस्पतीच्या सर्व भागांचा उपयोग भाजी म्हणून केला जातो. भाजी करताना थोडी काळजी घ्यावी लागते, या भाजीच्या मुळाशी असणाऱ्या कंदामध्ये कॅल्शियम ऑक्सीलेट असल्यामुळे भाजीचा डायरेक्ट उपयोग केल्यास घशाजवळ खाज सुटते. याच्यावर पर्याय म्हणून कोकणातील बांधव चिंच किंवा कोकम, आमसूल इत्यादींच्या पाण्यामध्ये भिजत ठेवतात किंवा भाजी करण्या अगोदर कंद उकडून घेताना त्या पाण्यामध्ये कोकम किंवा चिंच टाकतात. सुरणाची भाजी अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक असते सुरणा मध्ये a, b आणि c जीवनसत्त्व आढळतात. सुरणाची चव सामान्यत: तुरट, तिखट असते. या भाजीचे फायदे देखील खूप आहेत. सुरणाचा कंद हा जमिनीमध्ये वाढतो तसेच तो ओबडधोबड म्हणजे असा कोणताही त्याला फिक्स आकार नसतो, अर्धगोलासारखा चपटा गर्द तपकिरी, मातेरी रंगाचा असतो, तिला पावसाळ्यामध्ये कोंब येतात वरती एक खोड वाढते, व इतर आठ महिने कंद जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत असतो. तसेच याला एका कंदाला अनेक छोटे छोटे कंद शाखा स्वरूपात तयार होतात व पावसाळ्यात त्या छोट्या छोट्या कंदांना कोंब येतात. थोडक्यात केळीच्या झाडाचे उदाहरण आपण घेऊ केळीच्या एका झाडापासून अनेक झाडे तयार होत जातात त्याच पद्धतीने सुरणाच्या शाखा जमिनीत विस्तारात जातात.

सुरणाची सर्वसाधारण माहिती

सुरण या कंदमुळाचे सर्वाधिक म्हणजे ७० ते ७५ टक्के उत्पादन नायजेरियात होते. सुरणाचा जास्तीत जास्त वापर मानवी खाद्य, अन्न औषधनिर्मितीसाठी केला जातो. हे पीक फिलीपाईन्स, मलेशिया, इंडोनेशिया या देशांत पसरले आहे. हे पीक व्यापारी दृष्टीकोनातून भारत, श्रीलंका, चीन, जावा आदी प्रमुख देशांमध्ये घेतले जाते. भारतात नगदी पीक म्हणून प्रामुख्याने बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकाचा प्रसार आता बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात वाढत चालला आहे. सुरणापूसन विविध खाद्यपदार्थ बनविले जातात कारण त्यापासून पौष्टिक आहार औषधी गुणधर्म मिळतात. सुरणाचे संत्रागच्छी, कोऊ, श्री पद्या, श्री अधिरा, बिदानकुसूम, पालमझिमिखंड- आणि गजेंद्र हे वाण विविध विभागात लावले जातात त्यांचे उत्पादन हेक्टरी सर्वसाधारण १२ ते २२ टन मिळते.

सुरणाचे पांढरे, पाणीदार, पिवळे आणि कडवट बिटर सुरण असे प्रकार पडले जातात. या पैकी फक्त कडवट/बिटर सुरण, वरानटी सुरण (डायस्कोरिया हिसपीडा आणि डायस्कोरिया हूमेटोरियम) हे प्रकार खाद्यात्र म्हणून वापरले जात नाहीत कारण त्यामध्ये कॅल्शियम ऑक्झिलेद्स आणि अल्कलॉईडस डायोसरजेनिन (. ते . टक्के) हे विषारी घटक असतात.

महाराष्ट्रातही सुरणाचे उत्पादन वाढत चालले आहे. चांगली प्रक्रिया करुन उत्तम प्रतिचा कच्चा माल आणि मुल्यवर्धीत पदार्थ निर्माण करता यावेत यासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे.

सुरणाच्या भाजीचे फायदे

कंद भाजी प्रकारातील सगळ्यात गुणकारी तसेच पौष्टिक भाजी म्हणून सुरण कडे पाहिले जाते. संपूर्ण वर्षभर कोणत्याही ऋतूत सुरण सहज उपलब्ध असतो. सुरणाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत, अनेक आजार, शारीरिक तक्रारी यांच्यावर सुरण फार उपयुक्त ठरतो. सुरणाची भाजी खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते पाहूया.

सुरणाच्या भाजी मुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, आहारात फायबर युक्त भाज्यांमुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत राहते, सुरणाची भाजी ही आरोग्यवर्धक असून या भाजीचा समावेश आहारात केल्याने आपणास वारंवार भूक लागत नाही, तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. रक्तदाब नयंत्रित ठेवता येतो, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येतो, तसेच श्वासनलिका दाह, पोटदुखी, रक्त विकार इत्यादी आजार बरे होण्यास मदत होते.

बद्धकोष्ठता कमी करण्यास या भाजीचा फायदा होतो.

रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत.

सुरणामुळे शरीरातील एल.डी.एल. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

दमा आणि फुप्फुसनलिका दाह कमी करण्यासाठी सुरणाचा उपयोग होतो.

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास तसेच उदराचा दाह कमी करण्यास मदत होते.

स्नायुंमध्ये अचानक होणाऱ्या वेदना कमी करणे, वजन कमी करणे, कॅन्सर प्रतिबंध करण्यात मदत होते.

स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन आणि हार्मोन्सचा समतोल साधला जातो. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

मानवी यकृतामधील स्त्राव नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ख्रियांमधील प्रसुतीनंतरचा स्त्राव नियंत्रणात ठेवणस मदत होते.

सुरणाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहाच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

सुरणापासून आपणास उत्कृष्ट प्रथिने, पिष्टमय पदार्थ आणि ओमेगा- स्निग्ध आम्ल मिळतात.

सुरण हे एक उत्कृष्ट अन्टीऑक्सिडंट म्हणून कार्य करते त्यामुळे मानवी शरीर निरोगी राहण्यास मदत हेते.

दमा, खोकला, जंत, तसेच यकृताचे विकार यावर देखील सुरण गुणकारी आहे.

सुरणाच्या कंदाची भाजी ही मुळव्याधीवर गुणकारी आहे.

सुरणापासून विविध खाद्यपदार्थ

सुरणाची बटाट्याप्रमाणे भाजी होते. तसेच विविध प्रकारच्या करीज आणि लोणचे तयार करण्यासाठी केला जातो. सुरणापासून पीठ , फ्लेक्स, वेफर्स, भाजलेले काप.

वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, सूप, चटणी, केक, गुलाबजाम, खीर, कटलेट, पकोडा, वडा, सुरण चोप, मिक् व्हिजीटेबल चोप आदी पदार्थ तयार केले जातात.

 सुरणापासून पीठ आणि वेफर्स: सुरण स्वच्छ करणे,धुवून घेणे साल काढणे, मध्यम आकाराचे काप पाडणे/फोडी करणे/चीप्स करणे, गरम पाण्याची प्रक्रिया करणे, गंधकाची धुरी देणे, शिजविणे/उकडणे, ६० ते ८० सें. तापमानात वाळवणे.त्यानंतर त्याचे पीठ करणे.

सुरणाचे लोणचे

सुरण स्वच्छ करुन धुवून त्याची साल काढावी त्याचे बारीक चौकोनी तुकडे करावेत. या फोडीमध्ये चिंचेची पेस्ट, मिरची पावडर, थोडा गुळ, हिंग, आले पेस्ट, लसणाची पेस्ट आणि गरम मसाला टाकून त्यास गरम तेलामध्ये तळून घ्यावेया 2. आणि

नंतर गरम तेल आवश्यकतेनुसार टाकून लोणचे तयार करावे. हे लोणचे चांगल्या निर्जतूक बाटलीमध्ये भरुन त्याची साठवण करावी.

सुरणाचे गुलाबजाम

चांगली पेस्ट तयार करणे.या पेस्टमध्ये गव्हाचा स्टार्च, दुध पावडर, बेकींग पावडर आणि थोडे तेल टाकून त्याचे लहान-लहान गोल गोळे तयार करुन घ्यावेत. हे सुरणाचे गोल गोळे गरम तेलात चांगले तांबडे होई पर्यंत तळून घ्यावेत नंतर साखरेच्या पाकात साधारणता एक तास मुरविण्यासाठी ठेवावेत.

सुरणाचे इतर उपयोग

 सुरणाचा व्यापारी तत्वावर प्रामुख्याने स्टार्च तयार करण्यासाठी उपयोग केला जातो. बटाटा आणि रताळ्यापेक्षा सुरणामध्ये स्टार्चचे प्रमाण आधिक असते. सुरणाच्या स्टार्चमध्ये अधिक फायदेशीर गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर औषधनिर्मिती, कापड निर्मिती (टेक्सटाईल), खाद्य पदार्थ, कागद कारखान्यामध्ये आणि पेट्रोल केमिकल्स प्रोसेसिंग प्रक्रियेमध्ये होतो. स्टार्च तयार करण्यासाठी लहान, मध्यम, मोठा किंवा खराब असा कोणत्याही प्रकारचा सुरण वापरता येतो. सुरणाचे विविध पदार्थ तयार करताना जो भाग वापरला जात नाही (शिल्लक किंवा वाया जाणारा भाग) त्याचाही वापर स्टार्च करण्यासाठी वापरला जातो.

सारांश

सुरण या कंदमुळाचे सर्वाधिक म्हणजे ७० ते ७५ टक्के उत्पादन नायजेरियात होते. सुरणाचा जास्तीत जास्त वापर मानवी खाद्य, अन्न औषधनिर्मितीसाठी केला जातो. हे पीक फिलीपाईन्स, मलेशिया, इंडोनेशिया या देशांत पसरले आहे. हे पीक व्यापारी दृष्टीकोनातून भारत, श्रीलंका, चीन, जावा आदी प्रमुख देशांमध्ये घेतले जाते. भारतात नगदी पीक म्हणून प्रामुख्याने बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकाचा प्रसार आता बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात वाढत चालला आहे. सुरणापासून विविध खाद्यपदार्थ बनविले जातात कारण त्यापासून पौष्टिक आहार औषधी गुणधर्म मिळतात.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावावाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know