Translate in Hindi / Marathi / English

Sunday, 18 August 2024

सूर्यप्रकाश आणि व्हिटॅमिन डी # व्हिटॅमीन डी हे एक महत्वाचे जीवनसत्व आहे # नैसर्गिक रुपात व्हिटॅमिन डीचा लाभ # नैसर्गिक रुपात व्हिटॅमिन डीचा लाभ # आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार करणे खूप महत्वाचे आहे # गडद त्वचेच्या लोकांनी 30 मिनिटांपेक्षा जास्त सूर्यप्रकाश घेऊ नये आणि गोरी त्वचा असलेल्या लोकांनी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊ नये

सूर्यप्रकाश आणि

  व्हिटॅमिन डी

 

नैसर्गिक रुपात व्हिटॅमिन डीचा लाभ

उन्हात शेकण्याची योग्य वेळ सकाळी ८ वा त्यापूर्वी. व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम आणि नैसर्गिक स्रोत सूर्यप्रकाश मानला जातो. आपल्या सर्वांना माहित आहे की, आपल्या शरीराला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी तयार करणे खूप महत्वाचे आहे. हाडे आणि सांधे यांना भरपूर व्हिटॅमिन डी आवश्यक आहे.

व्हिटॅमिन डी अनेक प्रथिने आणि एन्झाईम्सच्या निर्मितीमध्ये सामील आहे, जे मानवी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि ते अनेक रोगांना प्रतिबंधित करते. सूर्यप्रकाश घेण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा सूर्याची किरणे खूप कठोर नसतात, कारण जर तुम्ही खूप तेजस्वी प्रकाशात बसलात तर सूर्याच्या किरणांच्या थेट संपर्कामुळे त्वचेचा मिलोनेमा होऊ शकतो, जो एक प्रकारचा आहे. घातक कर्करोग आहे.

पोषण तज्ज्ञांच्या मते, गडद त्वचेच्या लोकांनी 30 मिनिटांपेक्षा जास्त सूर्यप्रकाश घेऊ नये आणि गोरी त्वचा असलेल्या लोकांनी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. याशिवाय काही तज्ज्ञ असेही म्हणतात की, हलक्या रंगाचे कपडे घालून सूर्यप्रकाश घेणे चांगले. कारण ते सूर्यप्रकाश चांगल्या प्रमाणात शोषून घेतात.

उन्हात खेळणारी मुले ही एक चांगली थेरपी असू शकते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. नवजात बाळाला सूर्यप्रकाशात आणल्याने मेलाटोनिनच्या उत्पादनात खूप मदत होते. मेलाटोनिनची पातळी बाळाच्या झोपेची पद्धत नियंत्रित करते. जी निरोगी राहण्यासाठी चांगली असते.

नैराश्याने ग्रस्त असलेल्या रुग्णासाठी सूर्यस्नान ही एक चांगली थेरपी देखील होऊ शकते. उन्हात राहिल्याने सेरोटोनिन नावाच्या हार्मोनचे उत्पादन वाढते. ज्यामुळे तुम्ही आनंदी आणि शांत राहू शकता.

हिवाळ्यात हाडे निरोगी ठेवण्यासाठी उन्हात योग्य प्रमाणात व्यायाम करणे फायदेशीर ठरते. आपण जेव्हा उन्हात बसतो तेव्हा डोक्यावर टॉवेल ठेवतो आणि हाता-पायांवर ऊन घेतो वा खूप तास उन्हात बसूनच राहतो. पण ही उन्हात अंग शेकण्याची योग्य पद्धत आहे का? जर पद्धत योग्य असेल तर शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डी मिळते आणि नसेल तर आरोग्य व त्वचेची हानी होऊ शकते. यासाठी उन्हात कसे बसल्यामुळे नैसर्गिक रुपात व्हिटॅमिन डीचा लाभ मिळू शकेल हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

१. सकाळचे ऊन योग्य: उन्हात शेकण्याची सर्वांत योग्य वेळ सकाळी ८ वा त्यापूर्वीचे ऊन. यावेळी ऊन कोवळे आणि परिणामकारक असते. यानंतर ते प्रखर होऊ लागते. दुपारी १२ नंतर सूर्याच्या किरणांमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणे जास्त असतात. जी त्वचा व डोळ्यांचे नुकसान करू शकतात. यामुळे त्वचा करपू शकते वा इतर आरोग्य समस्या होऊ शकतात. तसे हिवाळ्यात दुपारी ऊन घेऊ शकता. पण सकाळच्या उन्हात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन- डी तयार होते. त्यावेळी आपण किमान ३० मिनिटे अवश्य उन्हात बसायला हवे.

२. उन्हात बसण्याची योग्य पद्धत: प्रयत्न करा की उन्हात शेकताना शरीराचा काही भाग उघडा राहील. विशेषत: हात आणि पाय. जेणेकरून किरणांचा त्वचेशी जास्तीत जास्त संपर्क होईल. हे लक्षात ठेवा की ऊन आपल्या शरीराच्या जास्तीत जास्त अवयवांपर्यंत पोहाचावे, ज्यामुळे शरीरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी तयार होऊ शकेल. ऊन घेताना नेहमी आपली पाठ उन्हाकडे करून बसावे आणि हाता-पायांवरही ऊन पडू द्यावे.

३. अशाप्रकारे वाढवा वेळ: आपल्या शरीराला ८० टक्के व्हिटॅमिन डी सूर्यकिरणांच्या माध्यमातून मिळतात ३० टक्के इतर माध्यमांतून. यासाठी ऊन घेण्यात अजिबात बेपर्वाई करू नये. सुरुवातीला रोज १०-१५ मिनिटे उन्हात राहावे. दर तिसऱ्या दिवशी ४ मिनिटे वाढवीत जावे. दर ५-७ दिवसांनंतर एक वा दोन दिवस आराम घ्यावा.

४. डोळ्यांना जपावे: सूर्याचा प्रकाश डोळे व मेंदूचेही नुकसान करू शकतो. याच्या संपर्कात आल्यामुळे डोळ्यांच्या रेटिनांत जळजळ

होऊ शकते. डोळे लाल होऊ शकतात वा खुपूही शकतात. यासाठी यापासून संरक्षणासाठी गॉगल वापरू शकता वा सूर्याकडे पाठ करून बसणे चांगले.

५. जास्त खुराक घेऊ नये: कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जास्त हानिकारक असू शकतो. उन्हाबाबतही काहीसे असेच आहे. काहीजण सतत एक-दोन तास उन्हात बसून राहतात. यामुळे डोकेदुखी, मळमळ, चक्कर अशा समस्या होऊ शकतात. विशेषत: प्रखर ऊन नुकसान करू शकते.

हेही लक्षात ठेवा

उन्हात बसण्याच्या १५ मिनिटे आधी शरीरावर सनस्क्रीन अवश्य लावा. वेगवेगळ्या त्वचेसाठी सनस्क्रीनही वेगवेगळे असते. यासाठी आपल्या त्वचेनुसार वा विशेषज्ञांचा सल्ला घेऊन ते निवडू शकता. सनस्क्रीन हाता-पायांना अवश्य लावावे. यामुळे त्वचा सुरक्षित राहील.

ऊन घेताना पाणी पित राहा. शरीर हायड्रेटेड ठेवा.

शरीराच्या ज्या अवयवांची त्वचा नाजुक असेल ती झाकून ठेवा. उदा. चेहरा, डोके.

काही मिनिटे उन्हात बसल्यानंतर शरीर गरम झाले तर सावलीत बसून ऊब घेणे उतम असते. सतत उन्हात बसण्याऐवजी तुकड्यांत ऊन घ्या.

शरीराला किती व्हिटॅमिन डी आवश्यक आहे

आपल्या शरीरातील दात, हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळायला हवे. शरीरातील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचविण्याचे काम हे जीवनसत्त्व करते. एका निरोगी व्यक्तीला एका दिवसात 37.5 ते 50 mcg व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. तर, वाढत्या मुलांना दररोज किमान 25 mcg ची गरज असते. व्हिटॅमिन डीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत राहते.

शरीराला अनेक विटामिन्सची गरज भासते. मात्र त्यापैकी अत्यंत महत्त्वाचे एक विटामिन म्हणजे विटामिन डी. शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या विटामिन डी मध्ये एक फॅट सॉल्युबल विटामिन असते. या विटामिनचे अनेक फायदे आहेत. मात्र शरीरातील कॅल्शियम योग्य राखण्यासाठी विटामिन डी चा मुख्य फायदा होतो. हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील विटामिन डी योग्य राखणे गरजेचे आहे. विटामिन डी ची शरीरामध्ये कमतरता जाणवायला लागली की नक्की काय होतं हे अनेकांना माहीत नसतं. तर काही वेळा शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता आहे.

विटामिन डी कमतरतेमुळे हाडांवर परिणाम

शरीरात जेव्हा विटामिन डी कमतरतेमुळे हाडांवर परिणाम होतो तेव्हा हाडांच्या सर्व समस्या सुरू होतात आणि शरीरातील प्रतिकारशक्ती यामुळे प्रभावित होते. तसंच हृदयाशी संबंधित आजार सुरू होतात आणि ऑटोइम्युनशी संबंधित सर्व समस्या सुरू होतात.

तसंच यामुळे न्युरोलॉजिकल आजार अधिक होतात आणि इन्फेक्शन वाढण्याचा धोकाही असतो. विटामिन डी च्या कमतरतेमुळे गरोदर महिलांमध्येही गुंतागुंत होऊ शकते. तसंच ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सरलादेखील कारणीभूत ठरते.

सारांश

आपल्या शरीराला योग्य संतुलित आहार आणि व्यायामाची जोड असेल तर आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. शरीराला अनेक पोषकघटकांची आवश्यकता असते. या पोषकघटकांमध्ये व्हिटॅमीन डी चा देखील समावेश आढळून येतो. व्हिटॅमीन डी हे एक महत्वाचे जीवनसत्व आहे. या व्हिटॅमीनची कमतरता अनेक लोकांमध्ये आढळते. हे व्हिटॅमीन डी आपल्या शरीरात तयार होत नाही. आपल्या त्वचेमध्ये असलेले कोलेस्ट्रॉल जेव्हा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते, तेव्हा ते तयार होते. व्हिटॅमीन डी च्या शरीरातील कमतरतेमुळे कॅल्शिअम शरीरात शोषले जात नाही. त्यामुळे, हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे, व्हिटॅमीन डी साठी शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही किती ही वेळ सूर्यप्रकाशात बसावे. यामुळे, तुम्हाला नुकसान पोहचू शकते.

कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावावाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know