Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 28 August 2024

सेंद्रिय शेती # सेंद्रिय शेतीमध्ये अशा रासायनिक खतांचा किंवा रासायनिक औषधांचा वापर केला जात नाही # रसायनांशिवाय सेंद्रिय शेती # सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्रास समजून घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धत होय # सेंद्रिय म्हणजे सजीवपणाचे मूळ व सेंद्रिय शेती म्हणजे प्रदीर्घ चालणारी उत्पादन पध्दती स्वीकारून जमिनीची सुपीकता वाढवून सजीव पध्दतीतील चैतन्य # सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून व अनुरूप हवी

 सेंद्रिय शेती

रसायनांशिवाय सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्रास समजून घेऊन रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धत होय. सिक्कीम सरकारने संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणले आहे. सेंद्रिय शेती सध्या सुमारे ११० देशांमध्ये केली जात असून तिचा हिस्सा वाढतो आहे. सेंद्रिय म्हणजे सजीवपणाचे मूळ सेंद्रिय शेती म्हणजे प्रदीर्घ चालणारी उत्पादन पध्दती स्वीकारून जमिनीची सुपीकता वाढवून सजीव पध्दतीतील चैतन्य आणणे होय. एकंदरीत सेंद्रिय शेती पध्दती म्हणजे निसर्गाशी जवळीक होय, सेंद्रीय शेती ही केवळ एक शेतीपध्दती नसून ते एक विकसित तंत्र आहे. त्यात रसायन वापरावर बंदी असते. स्थानिक परिस्थितीचा विचार स्थानिक साधनांचा पुरेसा वापर करून जमिनीची दीर्घकालीन सुपीकता टिकविणे, कृषी तंत्रज्ञानाच्या वापराने निर्माण होणारे प्रदूषण टाळणे, सकस आहाराचे उत्पादन घेणे, जमिनीतील जीवजंतू वनस्पती अवशेषांचा पुरेपूर वापर करणे, जनावरांचे नैसर्गिकरित्या संगोपन करणे आदींचा अंतर्भाव होतो.

सेंद्रिय अन्नाच्या बाजारपेठा - युनायटेड स्टेट्स, . युरोपियन युनियन (जर्मनी, फ्रान्स, इटली, बेल्जियम, युनायटेड किंगडम) आणि जपान या सेंद्रिय पद्धतीची शेती करून पिकविलेल्या अन्नधान्याच्या मुख्य बाजारपेठा आहेत. आता भारतातही सेंद्रिय अन्नधान्याला मागणी वाढत आहे. चीन, युक्रेन, भारत, इंडोनेशिया आणि इस्त्राईल हे सेंद्रिय शेती करून उत्पादनांची निर्मिती करणारे आशियातील प्रमुख देश आहेत. सेंद्रिय बाजारपेठ वाढत असताना त्यासंबधी सेंद्रिय प्रमाणिकरण (सर्टिफिकेशन) आणि नियमावली अधिकाधिक कठोर आणि अनिवार्य होत आहे. प्रत्येक देशानुसार त्यासाठी असलेल्या गरजेनुसार बदल होतो आणि सर्वसाधारणतः त्यामध्ये पिकविणे, साठविणे, प्रक्रिया करणे, पॅकेजिंग करणे आणि वाहतूक करणे इत्यादी उत्पादन मानकांचा समावेश असतो. त्याचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.

हवा, माती, धान्याची रोपे, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा उद्देश आहे. कोणत्याही रासायनिक गोष्टी वापरल्यामुळे हे आरोग्यास पोषक आहे.

निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून सेंद्रिय शेती

सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून अनुरूप हवी. ती जीवसृष्टीला धरून चालणारी हवी. यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही.

सेंद्रिय शेती ही निसर्गचक्रातील परस्परांच्या संबंधात कोणत्याही एका बाजूस कलणारी नसावी. निः ष्पक्षतेची खात्री देणारी असावी. यात अंतर्भूत असलेल्या सर्व घटकांचे संगोपन सुयोग्यरित्या व्हावयास हवे. परिणामी, या पुढच्या पिढीतील सर्वांचे आरोग्य कल्याण योग्य रितीने राखले जाईल शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयक ज्ञानाचा अभाव आणि असंघटितपणामुळे दिवसेंदिवस शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरी गरज आहे सेंद्रिय शेती पद्धतीची. सेंद्रिय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमूत्राचा वापर करणे यामुळे पाणी वाफ्यात टिकून राहते. बैल मशागतीने जमिनीची नांगरणी उत्तम होते. नांगरणी उत्तम झाल्यामुळे पिकांची वाढ चांगल्याप्रकारे होते. अशी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केल्यास शेती उत्पादन वाढेल आणि खासगी सावकारांच्या दुप्पट व्याजाच्या चक्रातून शेतकरी मुक्त होईल. त्यामुळे अनुदान देण्याची वेळ शासनावर येणार नाही.

भारतीय सेंद्रिय शेती

भारत देश कृषीप्रधान देश आहे. भारतीय शेती ही भारतातील 80 टक्के लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. शेती व्यवसाय हा भारताचा आत्मा आहे, असे महात्मा गांधी यांनी सांगितले होते. सध्या शेती क्षेत्रातील वाढता भार, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, त्यातून मिळणारे उत्पादन कमी यामुळे शेतजमिनीचा कस कमी होत चालला आहे. त्यासाठी एकमेव पर्याय 'सेंद्रिय शेती' पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. भारत देशात ज्यावेळी अन्नधान्याची कमतरता भासू लागली त्यावेळी 1966 नंतर देशात 'हरितक्रांती' उदयास आली. त्यामुळे नवनवीन वाण, रासायनि खतांचा वापर करून शेती उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ घडवून आणली. हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानातून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचा आणि आधुनिक शेती पद्धतीचा शिरकाव झाला. 1990-91 पासून शेतीतील अन्नधान्य उत्पादनातील स्थिरता आली.

सेंद्रिय शेतीची उद्दिष्ट्ये

1) मातीची शाश्वत उत्पादकता उत्पादनातील सातत्य टिकवणे.

2) नैसर्गिक स्थानिक संसाधनांची जोपासना करणे वापर करणे. उत्पादनावरील खर्च कमी करणे. 3) खर्चाची बचत आणि मूल्यवृद्धी.

4) शेताबाहेरील निविष्ठांचा (खतांचा + औषधांचा) कमीत कमी वापर.

5) मिश्र शेती पद्धतीतून जैविक विविधता टिकवून ठेवणे.

6) विषमुक्त अन्नाची शाश्वती, आर्थिक सुरक्षितता.

7 ) स्थानिक गरजांचे निवारण.

8) नैसर्गिक संतुलन आणि शुद्ध पाणी.

9) सामाजिक मूल्यांची जोपासना.

सेंद्रिय शेतीचे फायदे

1) जमिनीची नैसर्गिक जैविक सुपिकता टिकून राहाते. पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

2) शेती उत्पादनाची प्रत उंचावून साठवणूक क्षमतेत वाढ होते.

3) मित्र किडी, उपयुक्त जीवजंतू यांची वाढ भरपूर प्रमाणात होऊन हानिकारक किडींचा प्रादुर्भाव टाळला जाऊ शकतो.

4) जमिनीच्या धुपाचे प्रमाण कमी होते.

5) पशुधनाचा शेती मशागतीमध्ये भरपूर प्रमाणात उपयोग करता येतो.

6) सेंद्रीय शेती पद्धतीपासून मिळणाऱ्या कृषी मालात किटक बुरशीनाशकांच्या अवशेषांच्या विषाचे प्रमाण नसते.

7) जमिनीची पाणीधारण क्षमता वाढून जमीन सच्छिद्र होते.

8) प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

भविष्याची गरज सेंद्रिय शेती

भविष्यात जर आपली शेती टिकवायची असेल, तर सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. सेंद्रिय शेती पद्धतीच्या माध्यमातून खत मात्रेत शेणखत, गांडूळ खत, हिवळीचे खत वापरणे गरजेचे आहे. या सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत टिकून राहतोच याशिवाय दिवसेंदिवस वाढणाऱ्या खतांच्या किमतीवर मात करून शेतीवरील खर्च कमी करता येतो. कृषी विभागांच्या माध्यमातून 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गांडूळ प्रकल्प उभा करता येतो. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या अर्धवट कुजलेल्या खतांपासून चांगल्या पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.

गांडूळ खताच्या वापरामुळे फायदे

1) जमिनीची सुपिकता वाढते. 2) जमीन भुसभुशीत होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 3) जमिनीतील काडीकचऱ्याचे रुपांतर खतात होते. 4) जमीन सतत वाफसा स्थितीत राहू शकते. गांडुळ हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. शेतकऱ्यांनी गांडूळ खताचा वापर करणे गरजेचे आहे.

सेंद्रिय शेतीवर विश्वास नसेल तर हा प्रयोग करून पहा

प्रयोग करण्यासाठी आपल्याला शेळ्यांच्या लेंड्या घ्यायच्या आहेत. आणि त्या शेळ्यांच्या लेंड्यांची पावडर आपल्याला तयार करायची आहे आणि तयार केलेली पावडर आपल्याला कृषी लॅब मध्ये घेऊन जायची आहे. आणि जेव्हा आपण ती पावडर लॅब मध्ये टेस्ट करू तर त्यामध्ये आपल्याला नत्र,पालश,स्फुरद आणि फॉस्फेटिक ऍसिड यांचं 100% प्रमाण तुम्हाला आढळून येईल. म्हणजेच सांगायचं झालं तर शेळ्यांच लेंडी खत हे शेतीसाठी एक उत्तम उपयुक्त खत आहे, त्याचबरोबर गाई म्हशींच शेणखत हे देखील शेतीसाठी उत्तम खत आहे आणि यानंतर कोंबड खत हे देखील शेतीसाठी एक उत्तम खत आहे आणि या तिन्ही खतांचा संगम करून जर आपण आपल्या पिकासाठी खत व्यवस्थापन केलं किंवा शेतीसाठी केल तर ते नेहमीच आपल्यासाठी फायदेशीर आहे. कारण की प्रत्येकाच्या जमिनीमध्ये काही सूक्ष्मजीवाणू असतात ते त्या जमिनीची सुपीकता वाढवत असतात परंतु आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानामुळे किंवा रासायनिक खतामुळे जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव नष्ट होत चालले आहे त्यामुळे जमीन हे पुढील काळात खूप धोक्यात येणार आहे यामुळे आपण सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे आत्ताच वळले पाहिजे आपले भविष्य एक चांगले बनवले पाहिजे.

सारांश

सेंद्रिय शेतीमध्ये अशा सर्व खतांचा किंवा रासायनिक औषधांचा वापर केला जात नाही त्यामुळे आपल्या पिकासाठी आपल्याला नैसर्गिक रित्या प्राप्त खते किंवा औषधे किंवा घरगुती निर्माण खते किंवा औषधे ही आपल्या लागवडीसाठी किंवा पिकासाठी वापरावी लागतात किंवा याचा वापर काही लोक करतात त्याला सेंद्रिय शेती असे म्हणतात. सन 2000 नंतर शेतीतील उत्पादन खर्च जास्त, उत्पन्न कमी ही प्रचिती येऊ लागली. कितीही रासायनिक खतांचा औषधांचा वापर करूनही उत्पन्नात वाढ होण्याऐवजी घट होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा वापर करुन उत्पादन घेण्यास सुरुवात केली. या रसायनांचा कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवावर अनेक दुष्परिणाम होऊ लागले. मोठ्या प्रमाणात कॅन्सर, आतड्यांचे रोग, विविध अशा रोगांनी मनुष्यहानी होऊ लागली आहे. मनुष्यहानीबरोबर जमिनीची सुपिकता, जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. स्थानिक संसाधनाचा वापर करणारी, कमी भांडवली खर्चाची मूलतत्त्वावर आधारलेली, सेंद्रिय पदार्थांच्या सुयोग्य वापराने जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून ती टिकवून धरण्यावर भर देणारी, जैविक विविधता जोपासणारी, शेतकरी कुटुंबाच्या पोषणविषयक इतर मूलभूत गरजा पूर्ण करणारी निसर्गपूरक स्वयंपूर्ण शेती पद्धती म्हणजेच 'सेंद्रिय शेती' होय.


कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावावाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know