Translate in Hindi / Marathi / English

Wednesday, 28 August 2024

व्यक्तिमत्व विकास # योग्य त्या ठिकाणीय योग्य ती कृती करण्याची समज व्हावी यासाठी त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे आवश्यक असते # व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय # प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय आहे # व्यक्तिमत्व विकासामुळे आळस आणि, अनुत्साह आणि निरसतेमध्ये अडकलेली व्यक्ती कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि आपल्या ध्येयाने प्रेरित व्यक्ती बनते # व्यक्तिमत्व विकासाचे चे ९ उपाय # व्यक्तिमत्व उत्तम असणे खूप गरजेचे आहे

व्यक्तिमत्व विकास

 

व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय ?

प्रत्येक व्यक्ती जन्मतः वेगळी आणि विशेष आहे. प्रत्येकाच्यात एक वेगळी खासियत आहे जिच्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे असतो. हा वेगळेपणाच ठरवतो कि आपण कोण आहोत, कसे आहोत आणि एखाद्या परिस्थितीत आपण कसे वागतो. बहुतेकवेळा ज्या विशेषतांमुळे आपले नुकसान होते त्यांच्या प्रती आपण जागृत असतो, संवेदनशील असतो. मग त्यांच्यामुळे आपल्यात न्यूनगंड येतो. पण आपण हे जाणतो कि येथे प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय आहे, बस गरज आहे ती आपली अंतर्गत क्षमता जागवण्याची आणि व्यक्तिमत्व सुधारण्याची. इथेच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रिया मदत करणे सुरु करतात.

व्यक्तिमत्व विकासामुळे आळस आणि, अनुत्साह आणि निरसतेमध्ये अडकलेली व्यक्ती कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि आपल्या ध्येयाने प्रेरित व्यक्ती बनते. व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आपल्या वैशिष्ट्यांना कोणत्याही प्रतिकाराशिवाय आणि आपल्या सीमांच्या बंधनांना त्यागने शिकतो, आनंदी राहणे शिकतो आणि हे सर्व अधिक उत्साहाने आणि चैतन्याने करतो.

व्यक्तिमत्व विकासाचे चे ९ उपाय

1.                      प्रोटॉन सारखे सकारात्मक रहा

प्रोटॉन कधीही आपली सकारात्मकता गमावत नाही. तसेच आपण ही बना. कदाचित ती तणावामुळे झाकोळली जाऊ शकते आणि तणाव आपली ऊर्जा कमी करतो. सकारात्माकतेत राहून आपण कठीण ते कठीण समस्या देखील सोडवू शकतो. जेणेकरून आपण आणखी सकारात्मकता आणि शक्यतांना आपल्याकडे आकर्षित करतो.

2. अधिक उत्साही बना

अधिक उत्साहाने काम करणे हि कोणतेही काम करण्याची उत्तम रीत आहे. जेंव्हा पूर्ण उत्साहाने आपण प्रयत्न करतो तेंव्हा आपल्या जीवनातील श्रेष्ठतांना आपण स्वतः अनुभव करतो.

3. भावनांना काळजीपूर्वक हाताळा

जेंव्हा जीवन तुम्हाला भावनांच्या रोलर कोस्टरमध्ये बसऊन फिरवत असते तेंव्हा त्याचा देखील आनंद घ्या. आपल्या भावनांना आपल्यावर नियंत्रण घेऊ देऊ नका तर त्यांच्यावर आपले नियंत्रण राहू द्या. यामुळे आपण समस्यांमध्ये शांत आणि एकाग्र बनतो.

4. स्वतःप्रती तसेच इतरांप्रती करुणा ठेवा

करुणामय रहा. जेंव्हा आपल्या हातून तसेच इतरांच्या हातून चूक घडेल तेंव्हा मनात अढी बनू देऊ नका. सोडून द्या. हे माहित असू द्या कि कोणीही परिपूर्ण नाही आणि प्रत्येकजण प्रगती करत आहे. या दृष्टिकोनामुळे स्वतःला तसेच इतरांना स्वीकारण्यास मदत होईल.

5. प्रशंसा करा

ज्या ज्या वेळी आपण कोणाची तरी खुल्या मनाने प्रशंसा करतो तेंव्हा आपली चेतना विस्तृत होऊ लागते. त्यामुळे आपल्यामध्ये उत्साह आणि ऊर्जेचा संचार वाढतो. ते गुण आपल्यामध्ये देखील वाढू लागतात आणि आपण आणखी प्रगत मानव बनू लागतो.

6. प्रभावी संवाद करा

आपण इतरांशी आपल्या हजेरीने, उपस्थितीने किंवा आपल्या भावनांना अभिव्यक्त करत संवाद करत असतो. आपल्या संवादांमध्ये स्पष्टता आणा आणि लक्षात येईल कि लोक आपल्याशी चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया देतील, जे आपल्यासाठी खूप लाभदाई असेल.

7. संकटांचा सामना धैर्याने करा

जेंव्हा तुम्ही संकटांचा मुकाबला करण्यासाठी धैर्याने उभे राहता तेंव्हा त्या संकटांना पार करण्याची शक्यता जास्त असते. संकटांचा दबाव घेऊन गळून जाऊ नका. आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जा. यामुळे दोन गोष्टी होतील, तुम्ही विजयी तरी व्हाल किंवा जीवनासाठी एक अमुल्य शिकवण, अनुभव मिळेल.

8. धीर बाळगा

जीवनात यशस्वी होण्यासाठी धीर बाळगणे हे एक रहस्य आहे. गडबड, गोंधळ आणि चंचलतेमधील प्रतिक्रियांमुळे फायद्यापेक्षा जास्त नुकसानच होते. ध्यान करा. शांती आणि धीर ठेवा. यामुळे आपण तणावमुक्त राहून जलद निर्णय घेऊ शकतो.

9. सुदर्शन क्रिया शिका

शेवटचे आणि अत्यंत महत्वाचे, सुदर्शन क्रिया शिका. योग्य प्राणायामांमुळे आपण तणावरहित आणि सकारात्मक जीवन प्राप्त करू शकतो याकडे आपण कधी लक्ष दिलेले नसते. सुदर्शन क्रिया शिका आणि श्वासामध्ये दडलेल्या शक्तीचा वापर करा. योग्य प्रकारे श्वास घेण्याने आपण शारीरिक, मानसिक आणि भावनिक तणावांपासून मुक्त होतो.

जेंव्हा आपण सुदर्शन क्रिया शिकून ती करत राहतो तेंव्हा आपापसातील संबंध सुधारण्याची आणि आपले व्यक्तिमत्व आणखी आकर्षित होण्याची प्रक्रिया जाणून घेतो.

आपल्या व्यक्तीमत्वात विकास कसा करावा?

प्रत्येक आर्ट ऑफ लिविंग शिबिरामध्ये सुदर्शन क्रिया नामक एक प्रक्रिया शिकवली जाते जी आपल्या व्यक्तिमत्वाचा विस्ताराने विकास करते. पहिली सुदर्शन क्रिया केली म्हणजे आपण आपल्या व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे.

तुम्ही पाहिले असेल की एका खोलीत एक छोटे बाळ आले की त्याच्या केवळ अस्तित्वाने तेथील सर्वजण त्याच्याकडे आकर्षिले जातात. त्या बाळाला सगळ्यांना आकर्षित करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत. ते नैसर्गिकरित्या होऊन जाते. आपण शब्दांपेक्षा आपल्या अस्तित्वाने, उपस्थितीने अधिक प्रभावी संवाद साधू शकतो. पण आपण जसे मोठे होतो तसे आपल्या आयुष्याच्या ह्या उदात्त पैलूकडे दुर्लक्ष करतो. आपले अस्तित्व दुबळे होत जाते. कारण आपल्या मनात भूतकाळातील अनुभवांचे अगणित ठसे उमटलेले असतात.

आपल्या जीवनात तीच निरागसता, मैत्रीभाव आणि स्वाभाविकता कशी काय परत मिळवता येईल?

हे शक्य आहे केवळ एका साध्या सरळ, पण प्रभावशाली श्वसन-क्रियेमुळे, जिचे नाव ' सुदर्शन क्रिया '. या प्रक्रियेमुळे आपल्या अस्तित्वाच्या विविध स्तरावर म्हणजेच स्थूल शरीरापासून ते सूक्ष्मतम स्तरांपर्यंतचे तणाव आणि भूतकाळातील अनुभवांचे ठसे बुजवले जातात आणि आपले अस्तित्व सुंदर होऊ लागते.

तुम्हाला तुमच्या जीवनात जे काही हवे आहे ते मिळविण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास आणि कार्यक्षमता मिळते आणि चेहऱ्यावर कधीही लोपणारे स्मित येते. याच्यामुळे तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांना तुमच्यासारखे होण्याची प्रेरणा मिळते.

Ø आत्मविश्वास आणि उत्साहात वाढ

Ø जीवनाप्रती उत्साहपूर्वक दृष्टीकोन

Ø सकारात्मक विचारांचा स्वीकार

Ø व्यक्तिमत्व विकास प्रोग्रॅमचे लाभ

Ø तणावमुक्त स्वस्थ जीवन

Ø उत्तम निर्णय क्षमता

Ø वाढलेला आत्मविश्वास

Ø एक मधुर व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व उत्तम असणे खूप गरजेचे आहे. व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास, सकारात्मकता आणि दयाळूपणा यासारख्या सर्व गुणांचा समावेश होतो. हे गुण वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात उपयोगी ठरतात. या व्यक्तिमत्त्वासह तुम्ही इतरांना सकारात्मक पद्धतीने प्रभावित करू शकता. व्यक्तिमत्व विकसित करणे इतके सोपे नाही. यासाठी खूप मेहनत करावी लागते. व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी काही टिप्स फॉलो करू शकता.

सकारात्मकता: व्यक्तिमत्व जिंकण्यासाठी, स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टीकोन आणणे सर्वात महत्वाचे आहे. सकारात्मक दृष्टीकोन लोकांना आकर्षित करते आणि त्यामुळे तुमचे नाते वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्ही सुधारते. सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी, जीवनातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा आणि नकारात्मक विचार टाळा. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.

आत्मविश्वास: आत्मविश्वास हा कोणत्याही व्यक्तिमत्वाचा पाया असतो. आत्मविश्वास म्हणजे आपल्या क्षमता आणि क्षमतांवर विश्वास ठेवणे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी, तुमची ताकद जाणून घ्या आणि तुमच्या कमकुवतपणा सुधारण्यासाठी काम करा. सकारात्मक आत्म-संवादामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो.

संवादावर काम करा: संवाद हा व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतो. प्रभावी संवादामध्ये केवळ बोलणेच नाही तर ऐकणे देखील समाविष्ट आहे. संवाद सुधारण्यासाठी सक्रिय ऐकण्याचा सराव करा. यासोबतच इतरांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा. बोलता बोलता आत्मविश्वासपूर्ण देहबोली वापरा आणि डोळ्यांचा संपर्क ठेवा.

सारांश

आपण पैशाने किती मोठे झालो यापेक्षा माणूस म्हणून किती मोठे झालो याला समाजात आजही खूप महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे मुलांच्या कळत्या वयातच त्यांच्यावर संस्कार होणे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास होणे हे फार गरजेचे आहे. त्यांना भविष्यात बऱ्या- वाईटाची जाणीव हवी, योग्य त्या ठिकाणीय योग्य ती कृती करण्याची समज व्हावी यासाठी त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होणे आवश्यक असते. बऱ्याचदा शालेय जीवनात आणि नंतर अनुभवातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास होत असतो.


कृपया महत्वाची सूचना आपल्यासाठी

वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावावाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती.





No comments:

Post a Comment

If you have any doubts, please let me know