सुयोग्य व सोप्या किचन टिप्स
स्वयंपाक करणं ही एक कला आहे. कोणतीही कला आत्मसात करायची असेल तर सर्वात आधी त्या कलेतील बेसिक ज्ञान मिळवणं गरजेचं असतं. स्वयंपाक कला तर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर उपयुक्त ठरते. स्वयंपाक करणं ही फक्त महिलांची जबाबदारी नसल्याने आजकाल पुरूषदेखील स्वयंपाकात रस घेतात. खरंतर घरातील प्रत्येकाला किचन मॅनेजमेंट यायलाच हवं. नोकरी करणाऱ्या अथवा दिवसभर बिझी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वेळेवर भुक लागतेच. दररोज आपण काही मेस अथवा हॉटेलमधील जेवण जेवू शकत नाही. शिवाय घरात स्वयंपाकासाठी कूक असेल तरी कधी ना कधी तरी त्याला सुट्टी द्यावीच लागते. मग स्वावलंबी होत आपण स्वयंपाक कला शिकण्याशिवाय कोणताच पर्याय आपल्याजवळ उरत नाही. योग्य मार्गदर्शन असेल तर स्वयंपाक कला तुम्ही सहज आत्मसात करू शकता.
कापणे – सोलणे यासाठी उपयुक्त किचन टिप्स
vकांदा कापताना डोळे चुरचुरत असतील तर पंधरा मिनीटे आधी कांदा सोलून त्याचे दोन तुकडे करा आणि पाण्यात भिजत ठेवा.
vकांद्याची साल डोक्यावर अथवा कानाजवळ ठेवल्यास कांदा डोळ्यांना झोंबत नाही.
vसोलण्याआधी भाज्या आणि फळं स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या.
vभाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका. कारण दिसायला कितीही छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात.
vबटाटे आणि वांग्याचा रंग बदलू नये यासाठी चिरल्यावर फोडी लगेच पाण्यात टाका.
vसफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा. ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहिल.
vकोथिंबीर जास्त काळ टिकण्यासाठी ती निवडून मऊ कापडात अथवा कागदात गुंडाळून ठेवा.
vगोड पदार्थांसाठी बदाम चिरून टाकायचे असतील तर आधी ते पाण्यात भिजत ठेवा. ज्यामुळे ते सोलणे आणि चिरणे सोपे जाईल.
vलाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होत नाही.
vसुकमेवा चॉप करताना तो काही तास फ्रिजमध्ये ठेवा आणि चाकू गरम पाण्याने धुवून घ्या.
vटोमॅटो चिरल्यावर त्याचा देठ आणि आतील बिया बाजूला करा.
एखादा पदार्थ नव्याने शिकताना उपयोगी किचन टिप्स
vएखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा. त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा. योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या.
vस्वयंपाकासाठी लागणारे मसाले, चटण्या, पेस्ट, प्युरी आधीच तयार करून ठेवा.
vभात शिजवताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा.
vकडधान्याची भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला.
vडाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा.
vस्वयंपाक करायला सुरूवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा. पुलाव, खिचडी, भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो.
vभाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन तीन दिवसांसाठी तयार करून ठेवा.
vलसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो.
vशेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते.
vखोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपू्र्ण खोवून फ्रिजमध्ये ठेवा. ज्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर स्वयंपाकासाठी करता येईल.
vपीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुशखुशीत होतात. पराठा, शंकरपाळी, कचोरीसाठी या टिप्सचा वापर करा.
vगोड पदार्थ नेहमी जाड बुडाच्या भांड्यात करा ज्यामुळे ते करपणार नाहीत.
vगोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दुध वापरा ज्यामुळे त्यांचा टेक्स्चर छान येईल.
vदह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या.
vफ्रिजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा. ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल.
vएखाद्या पदार्थांसाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनीटे पाण्यात भिजत ठेवा.
vभात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका.
vन्यूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा.
vरात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा.
vथंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा.
vबटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनीटे पाण्यात भिजत ठेवा.
vलिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंब काही मिनीटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा.
vमसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा.
vभेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही.
vकठीण मळताना चिमुटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत.
vशेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भाजताना दाण्यांना पाण्याचा हात लावावा.
vवांग, दुधी अथवा कोणतीही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे.
vदुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दुध फाटते. यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे.
तळणासाठी किचन टिप्स
vपुरी अथवा भजी कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल कढईत चांगले गरम करा. तेल गरम नसेल तर पुरी नीट तळली जाणार नाही.
vतेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई, जिरे टाका.
vपदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदले पर्यंत नीट तळणं गरजेचं आहे.
vभजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहन आणि बेकिंग सोडा मिसळा.
vवाटणासाठी खोबरं भाजताना ते तेलात तळू नका.
vतळणाचे तेल पुन्हा पुन्हा वापरू नका.
vतळलेले पदार्थ तेल निथळण्यासाठी न्यूज पेपरमध्ये काढून ठेवू नका, यासाठी टीश्यू पेपर अथवा कोरा पेपर वापरा.
vपुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ मिसळा.
vभजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लोअर टाका.
vतळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका.
vअनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा.
उरलेल्या पदार्थांसाठी खास किचन टिप्स
vरात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते दोन्ही पदार्थ एक करा आणि त्याची एक वेगळीच स्वादिष्ट करी तयार होईल.
vशिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा.
vशिळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा, लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता. मात्र यासाठी शिळी पोळी कुस्करण्यासाठी ती मिक्सरमध्ये बारीक करा.
vतूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवांमध्ये करा.
vदिवाळीला उरलेल्या चकली, शेव आणि चिवड्याचा पुर्नवापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून मस्त थालिपीठ बनवा.
vरात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
vपास्ता अथवा भातासारखे पदार्थ उरले तर ते फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात.
vबटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील ते फ्रिजमध्ये ठेवून नंतर सॅंडविज, पराठा, पॅटिस, टिक्कीसाठी वापरता येतात.
vडाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका पराठे अधिक पौष्टिक होतील.
vपोळ्यांचे कणीक, थालिपीठाचे भिजवलेले पीठ, थेपल्यांचे कणीक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता. ज्यामुळे पोळ्या, पराठे मऊ होतात.
रस्सा किंवा ग्रेव्हीसाठी किचन टिप्स
vग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा.
vग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा, ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल.
vग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्याल ग्रेव्हीची चव वाढते.
vटोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता.
vग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टॉमेटोच वापरा.
vग्रेव्हीचा रंग चांगला असावा यासाठी घरगुती अथवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले वापरा.
vआल्यालसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं.
vग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं.
vभाजीचा रस्स्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा. पाच मिनीटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रस्स्याचा खारटपणा कमी होतो.
vशाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसीची पेस्ट मिसळावी.
vकरीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी पाच ते दहा मिनीटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे.
vपालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लाच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे. ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो.
vकरीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी. ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात.
साठवणीसाठी किचन टिप्स मराठी
vआलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवा बंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवा.
vवाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रिजमध्ये ठेवा.
vकोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीडमध्ये ठेवा.
vसाखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत.
vमिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका
vसुखं खोबरं फ्रिजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही.
vकडधान्य टिकण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे.
vसुकामेवा टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बरणीत भरून ठेवावा.
vदूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रिजच्या मागील भागात ठेवावे.
vमासे अथवा चिकन फ्रिजरच्या तळाशी साठवून ठेवावे. ज्यामुळे फ्रिजला घाणेरडा वास येत नाही.
vफ्रिजमध्ये बेरीज टिकवून ठेवण्यासाठी त्या व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवाव्या.
vपावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा. पापड, कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत.
किचनच्या साफसफाईसाठी खास टिप्स
vकिचनमधील कचऱ्याचा डबा नियमित स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवा. आठवड्यातून एकदा डबा धुवून उन्हात वाळवा. ज्यामुळे जीवजंतू त्यात पोसले जाणार नाहीत.
vकिचन स्वच्छ करण्यासाठी आऊट ऑफ डेट झालेलं व्हिनेगर, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा वापरा. किचन स्वच्छ आणि निर्जंतूक होईल.
vफ्रिजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी कोळशाचा एक तुकडा ठेवा.
vरात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा, शेगडी, ओव्हन नीट स्वच्छ करा. ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाहीत.
vकिचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा.
vकिचन सिंक तुंबलं असेल तर ते मोकळं करण्यासाठी त्यात व्हिनेगर टाका.
vकिचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावा आणि पंधरा मिनीटांनी कापडाने स्वच्छ करा.
vफ्रिज स्वच्छ करण्यासाठी मायक्रो फायबर कापडाने करा ज्यामुळे फ्रिजला चरे पडणार नाहीत.
vआठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड व्हिनेगर लावून स्वच्छ करा.
vचाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा, जर तुम्ही या वस्तू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवल्या तर गंज पकडून त्या खराब होतात.
vकिचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात जाडे मीठ टाका.
किचनसाठी वास्तू टिप्स
vअग्निचा आरोग्य, यश आणि समृद्धीवर परिणाम होत असतो. यासाठी किचन नेहमी आग्नेय दिशेला असावा. मुंबई सारख्या लहान जागेतील घरात वास्तू शास्त्राचे नियम पाळणे कठीण आहे. मात्र त्यावर योग्य ते उपाय केल्यास वास्तूदोष कमी होतो.
vस्वयंपाक घरात अग्नि आणि पाणी एकत्र ठेवू नये. याचा वाईट परिणाम त्या घरातील स्त्रीच्या मानसिक स्थितीवर होतो.
vस्वयंपाक घर कधीच नैऋत्य दिशेला नसावे. असं केल्यास गृहकलह निर्माण होतात.
vघरात शौचालया वर अथवा खाली स्वयंपाकघर नसावे.
vबेडरूमच्या वर अथवा खाली स्वयंपाक घर असू नये.
vस्वयंपाक घराच्या दरवाज्यासमोर शेगडी नसावी.
vस्वयंपाक घराच्या भिंतीना काळा रंग कधीच देऊ नये.
vकिचन सिंक ईशान्य अथवा उत्तर दिशेला असणं शुभ मानलं जातं.
vवास्तू दोष कमी करण्यासाठी किचनमध्ये लाल रंगाचा क्रिस्टल लावावा.
vरात्री झोपताना स्वयंपाक घर स्वच्छ करावे. शेगडी, पाण्याचे भांडे याची पूजा करावी आणि तिथे दिवा लावावा.
vवास्तू शास्त्रानुसार किचनमध्ये डायनिंग टेबल नसावा. जर ठेवायचा असेल तर तो उत्तर पश्चिम अथवा पश्चिम दिशेला ठेवावा.
vकिचनचा ओटा काळ्या ग्रॅनाईटपासून बनवू नये. हिरव्या अथा इतर रंगाचा असावा.
vघरातील धान्य नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे.
vकिचनच्या मध्यभागी शेगडी कधीच ठेवू नये.
भाजीपाला टिप्स
vभाज्या चिरण्याआधीच धुऊन घ्याव्यात.
vचिरल्यानंतर त्या धुऊ नयेत.
vचिरल्यानंतर धुतल्यास भाज्यातील महत्वाचे शरीरास आवशयक असणारे पोषक घटक पाण्याबरोबर निघून जातात.
vभाज्या शिजवताना एक चमचा खाण्याचा सोडा त्यामध्ये टाकावा. त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो.
vहिरव्या भाज्या नेहमी भांड्यावर झाकून शिजवाव्यात त्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे वाफेबरोबर निघुन जाणार नाहीत.
vकच्च्या भाज्या ह्या भरपूर पोषक असतात.
कडधान्य टिप्स
vतुर डाळ उन्हात वाळवु नये.
vधुता येणाऱ्या डाळी यांना बोरीक पावडर लावून ठेवावी. त्यामुळे त्यांना कीड लागणार नाही
vवाटाणा, मटकी, हरभरा यांना बोरीक पावडर लावून ठेवावी.
vआपणास केमिस्ट दुकानात बोरीक पावडर सहज उपलब्ध होते.
vडाळी साठवून ठेवताना त्या पोत्यांत सुकलेला कडुनिंबाचा पाला ठेवावा. त्यामुळे त्या ठिकाणी कीड लागत नाही.
vकडधान्य नीट निवडून घ्यावे, अगोदरच खराब असलेली कडधान्ये भिजल्यावर ते कुजण्याची शक्यता असते. यामुळे कडधान्याला चिकटपणा आणि वास येऊ शकतो.
vकडधान्य पदार्थांमध्ये वर्तमानपत्रांचे तुकडे घालून ठेवावेत. यामुळे वर्तमानपत्रावर असलेल्या शाईमुळे किटक कडधान्या भोवती येणार नाहीत.
दुध टिप्स
vगाईचे दूध फाटल्यानंतर त्या मधून निघालेले पाणी टाकून देऊ नका.
vत्याच पाण्याचा वापर पराठे तसेच चपाती यांची कणीक मळताना करा.
मसाले टिप्स
vस्वयंपाक घरात लागणारे मसाले एकदम भरपूर तयार करू नयेत.
vतीन किंवा सहा महिन्याचेच करावे त्यामुळे मसाले स्वाद कमी होत नाही. आणि पदार्थ अधिक स्वादिष्ट होतो.
फ्रीज टिप्स
vअद्रक लसूण पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल टाकून मिक्स करावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. यामुळे पेस्ट खूप दिवस टिकते.
vत्यामुळे तुमचा रोज रोज मसाला बनवण्याचा तुमचा वेळ जाणार नाही.
vहिरवी मिरची जास्त दिवस टिकावी यासाठी त्याची डेट काढून एका डब्यात भरून त्यानंतरच ती फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे मिरची जास्त दिवस टिकते.
vखसखस हि फ्रिजमध्येच ठेवावी.
vभगर सुद्धा फ्रिजमध्येच ठेवावी.
vबेकिंग सोडा वापरुन झाला कि लगेच तो फ्रिज मध्ये ठेवावा त्यामुळे पदार्थ छान फुलून येतो.
vपुरी लाटल्यानंतर तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावी, ज्यामुळे तळताना ती जास्त तेल शोषून घेणार नाही.
vनेहमी फ्रिजमध्ये पदार्थांचा वास येऊ नये यासाठी फ्रिजमध्ये कोळशाचा एक तुकडा ठेवावा.
vफ्रिजला कोणत्याही पदार्थांचा वास येत असेल तर लिंबाचे लहान तुकडे कापून फ्रिजमध्ये ठेवावेत, त्यामुळे फ्रिज मधील वास निघून जाईल.
इतर महत्वाच्या टिप्स
vनवीन पदार्थ बनवताना सुरुवातीला अगदी थोड्या प्रमाणात बनवावा.
vचुकून बिघडलाच तर जास्त वाया जात नाही आणि आवडला तर आणखी बनवता येतो.
vकापलेल्या सफरचंदाच्या तुकड्यावर जर लिंबाचा रस लावला तर ते काळे पडत नाहीत.
vलिंबाचा रस जास्त निघण्यासाठी त्याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावे.
vपोहे करत असताना त्याचा लगदा होतो ते होऊ नये यासाठी पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा जरआपण दोन वाट्या पोहे घेतले तर दीड वाटी कांदा वापरावा म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत.
vमहिन्यातून एकदा मिक्सरच्या भांड्यात खडे मीठ बारीक करून घ्या त्यामुळे भांड्याच्या पात्यांना धार येते.
vभाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भाजतेवेळी त्यात एक चमचा बेसन पीठ टाका त्यामुळे ग्रेव्ही ला ला छान स्वाद येईल.
vकोणताही गोड पदार्थ तयार करताना त्यात चिमूटभर मीठ टाका, त्यामुळे चव आणखी छान होईल.
vपावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते. यावेळी मिठाच्या बरणीत थोडेसे तांदूळ टाका त्यामुळे मीठ मोकळे राहते.
vलसूण सोलणे हे सर्वात अवघड काम वाटते. मात्र लसून लवकर सोलण्यासाठी ते 1 मिनिट ओव्हनमध्ये गरम करा. त्यानंतर एका घट्ट झाकण्याच्या डब्यात घालून हलवा. त्यामुळे लसूणाच्या पाकळ्या निघून जातील.
कृपया लक्षात असू द्या
वरील लेखातील सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातुन विविध वेबसाईट वरून संकलित केलेली आहे. विषयाला अनुसरून हि माहिती आवश्यक ते फेरबदल करून आपणा समोर प्रस्तुत केलेली आहे. संकलनकर्ता याच्या सत्यतेची कोणतीही जवाबदारी घेत नाही तसेच यामध्ये मांडलेले मुद्दे आणि माहिती या बद्दल १००% खात्री देऊ शकत नाही. वाचकांनी वाचनाचा आनंद घ्यावा हि विनंती. येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.